काल की परवाच वर्तक कुटुंबियांना दुबईतुन भारतात जाउन सहा वर्षे पूर्ण झाली!
आणि आज ब्लॉग चाळता चाळता हा लेख मिळाला…
वर्तक कुटुंब... एक ३ पात्री 'मित्र'
अभिजीत वर्तक. चैत्रा वर्तक. प्राजक्ता वर्तक.
सुरुवात करतो अभिजीत पासून...
सुरुवातीला झीरो कट... नंतर सचिन टाइप्स... आता जवळपास झाकीर.. किव्वा डिट्टो शंकर महादेवनचा मुलगा, सेम हेयर स्टाइल!
फूल दिल से क्यारेक्टर... सीधी बात नो बकवास वाला!
आमची ओळख कशी झाली, डोक्याला ताण द्यावा लागतोय,
आठवलं... २००८.. नवीनच होतो दुबैत, एका कामा निमित्त मी त्याच्या घरी गेलेलो, ८-९वाजले असतील... घरी बायको आणि मुलगीही होते,
१० वाजले आणि म्हणाला चल जेवायला बसु हॉल मध्ये, मी चकीत... डायरेक्ट जेवायला, न विचारता... तेव्हा पासून मस्त दोस्ती.
तसे बघितले तर प्रोफेशनली लोक जवळ आले की पर्सनली डिस्टन्स ठेवतात, पण अमच्यात तसलं काय नाय... मी नंतर त्याच्याच बिल्डिंग मध्ये राहायला आलो, जवळपास रोज हाय बाय व्हायचा.
त्याला चैत्रा नावाची गोड पोरगी (गॉड म्हणालात तरी चालेल)...
आणि बायको कशी असावी अश्या प्रश्नचं उत्तर असलेली 'प्राजक्ता वर्तक'...केतकर आणि वर्तक मस्त आमची गट्टी जमलेली, चैत्रा येता जाता आमची बेल वाजवी, आणि धमाल... मी आणि ती भांडायचो, हो हो... तिच्या बरोबर खेळताना तीच्याच् वयाचा व्हायचो, हुज्जत घालायचो, चिड़वायचो वगैरे, एकदातर ती म्हणाली, बाबा तू समीर काका कड़े मला सोड, त्याला कळूदे की मी किती त्रास देते, हे सांगताना फूल ऑन खुन्नस देऊन माझ्याकडे पाहिलं चैत्रानी! आता चैत्रा मोठी झालीये, मध्येच ईमेल वगैरे पण करते ती, जाम गुणाची पोर, छान गाते, सुंदर चित्रकला... बहुगुण संपन्न! अगदी आई वर गेली आहे (आता हां डायलोग मारल्यावर एक दगड मैं दो पक्षी वगैरे साध्य केले मी हे आलेच) पण नाही... तितक्यात भागणार नाही, पहिल्या भेटीतच जेवण दिलेले.. त्यामुळे तिला आयुष्यात विसरण अशक्य, ती क्विलटींग तर इतकं सुरेख करते की बास रे बास, खुप हवा वाटतो! अभिजीतनी लग्न करून मस्तच इन्वेस्टमेंट केली आहे ह्यात वाद नाही! ह्यांचं पण बहुतेक कलाकार मंडळींप्रमाणे प्रेमविवाहच...
जोड़ीं सलामत रहे वगैरे म्हणायची काय गरज नाही वाटली!
-दे आर मेड फॉर ईच अदर्स-
छान गट्टी जमलेली वर्तक फॅमिलीशी, पण...
आम्ही त्याच्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट झालो आणि ते ४ महिन्यानी मुंबईत गेला,
आता ५ वर्ष झाली मुंबईत शिफ्ट होऊन, अभिजीतची होंडा सिविक पाहुनच मी माझी पहिली गाडी घेतली, होंडा सिविक... मला लाइसेन्स मिळाल्याची पहिली बातमीही मी त्यालाच दिली, त्याची गाडी ही कदाचित मीच घेतली असती पण तेव्हाच नेमका दुबई सोडणार होता तो, असो... पण मग तो जिथे पार्किंग करायचा तिथेच मी करायला लागलो. खुप आठवण यायची वर्तक फॅमिलीची!
अजुनही खुप मिस करतो! व्हॉट्सअॅप / स्काईप होतं अधुन मधून.
मुंबईत गेलेलो वर्षापुर्वी... दुबईत परत येण्या आधी मस्त राहिलो त्यांच्या घरी,
मस्त जुन्या आठवणींत रमलो, तेव्हा अन्वया १ वर्षाची असेल, चैत्रा आणि ती फूल धमाल...
-कंडिशंस नॉट अप्लाय- सारखी मैत्री असते ती ही!
अणि ते ही विथ फॅमिली! फार भाग्य लागतं...
चार-पाच महीने का होईना!
अशी लोकं मिळायला भाग्य लागतं!
छान छान आठवणींचा किल्ला बांधायला भाग्य लागतं,
गोड गोड अश्या ह्या नातींच्या सहवासाचं भाग्य लागतं,
मस्त मस्त गप्पांच्या मेहफिलीत रामायलां भाग्य लागतं,
दूर दूर राहूनही जवळ जवळ असायला भाग्य लागत
अशी लोकं मिळायला भाग्य लागतं!
#सशुश्रीके
प्रतिक्रिया
26 Nov 2015 - 5:10 pm | मांत्रिक
तसे बघितले तर प्रोफेशनली लोक जवळ आले की पर्सनली डिस्टन्स ठेवतात, पण अमच्यात तसल काय नाय... हे वाक्य क्लासच्च!
26 Nov 2015 - 5:23 pm | आदूबाळ
वर्तक फ्यामिली छा गयी हय मिपा पे आजकल...
26 Nov 2015 - 5:29 pm | सूड
अगदी!!
26 Nov 2015 - 6:42 pm | कपिलमुनी
मला वाटले , तारा वर्तकचे कुटुंबाचा सीक्वल आला
26 Nov 2015 - 7:06 pm | विश्वव्यापी
छान
26 Nov 2015 - 7:16 pm | बाबा योगिराज
थोड्स एक दोन ठिकाणी काना मात्रा पुढ माग झालय, बाकी लेख छान आहे.
3 Feb 2016 - 10:00 pm | मयुरMK
जीवन हा एक प्रवास आहे . ... प्रवास न संपणारा ... या प्रवासात अनेक नागमोडी वळणे येतात, अनेक पांथस्थ भेटतात. थोडा वेळ साथ देऊन काही पांथस्थ वेगळ्या वाटेने जातात ; तर काही पांथस्थ जीवाभावाचे नाते जोडीत जीवनात आणि मनातही काय घर करून राहतात अश्या आप्तांच्या भाव्स्पंदनातून आलेला हा लेख सुरेख वाटला :)