संपादक मंडळ पुनर्रचना बाबत माहिती

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
23 Nov 2015 - 1:22 pm

नमस्कार,

दर वेळे प्रमाणे यावेळीसुध्दा मिसळपावच्या संपादक मंडळात बदल करणे अपेक्षीत आहेत. सध्या असलेल्या संपादक मंडळाने अतिशय उत्तम काम केले आहे. विशेषत: गेल्या काळात मी अन्य कामांत व्यस्त असल्यामुळे किंवा अन्य कारणाने मिपास पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. अश्या वेळी मिसळपावची अतिशय उत्तम काळजी संपादक मंडळानी घेतली. खरं तर त्यांचे आभार प्रदर्शन करून त्यांना परकं न करता मी कायम त्यांचा स्नेह व मार्गदर्शन व्यक्तिश: मला मिळत रहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.

आज दि. २२/११/२०१५ रोजी सध्या अस्तीत्वात असलेले संपादक सदस्यं व एकूणच संपादक मंडळ आपल्या कामातून थांबतेय. यापुढे येते काही दिवस मिसळपाव वर प्रशांत आणि मी असे संपादक असू. त्यामुळे सर्व सदस्यांना सहकार्याची विशेष विनंती आहे. याकाळात सदस्यांशी संवाद साधण्यात जरा अडचण येऊ शकते. त्यामुळे सदस्यांनी मिपाच्या धोरणाप्रमाने वागणुक ठेवावी व कारवाई टाळावी अशी विनंती आहे.

काही अडचण आल्यास मला किंवा प्रशांतला व्यक्तिगत निरोपाद्वारे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया

अजुन एका राकुंना पण घ्या. ;)

मारवा's picture

23 Nov 2015 - 3:27 pm | मारवा

संपादक मंडळ कसे निवडले जाते ?
ते प्रत्येक लेख प्रतिसाद वाचत असतात का ?

सविता००१'s picture

23 Nov 2015 - 3:32 pm | सविता००१

सहकार्य आहेच. कायम.
नवीन संपादकांना आधीच शुभेच्छा!

नीलमोहर's picture

23 Nov 2015 - 3:33 pm | नीलमोहर

आधीच्या संपादक मंडळाचे आभार,
नवीन सं.मं साठी शुभेच्छा.
सहकार्य नेहमीच राहील.

वेबसाइट कशा चालतात त्याचे काही तांत्रिक ज्ञान नाही.छापील लेखनात त्यातील प्रसिद्ध केलेल्या मजकुराची जबाबदारी एका अधिसूचित संपादकावर असते.इथे स्वप्रकाशन असल्याने लेखनाच्या मजकुराचे कायदेशिर अथवा दोषारोपाचे उत्तरदायित्त्व त्या लेखकाकडे जाते.थोडक्यात लेखकांनी असंयमित होण्याचे लक्ष्य संपादक होऊ लागले तर पुढे कोणी ही जबाबदारी घेईल का याबद्दल शंका आहे.

प्रमोद देर्देकर's picture

23 Nov 2015 - 3:38 pm | प्रमोद देर्देकर

सगळ्यां संपादकांना धन्यवाद आणि येणार्या नविन संपादकांचे आगावु अभिनंदन.

सुहास झेले's picture

23 Nov 2015 - 3:39 pm | सुहास झेले

जुन्या संमंचे आभार... नवीन मंडळाला शुभेच्छा :)

प्रचेतस's picture

23 Nov 2015 - 5:03 pm | प्रचेतस

संपादक म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल नीलकांतचे अनेक आभार.
मिपासाठी सहकार्य कायम असेल आणि राहिलच.

मिपाच्या भावी वाटचालीला अनेकोत्तम शुभेच्छा.

स्वच्छंदी_मनोज's picture

23 Nov 2015 - 5:09 pm | स्वच्छंदी_मनोज

नोंद घेतली आहे

सस्नेह's picture

23 Nov 2015 - 5:12 pm | सस्नेह

संपादक म्हणून नीलकांतनी टाकलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आणि संपादकीय कामातील पाठींबा/सहकार्याबद्दल सर्व सदस्यांचे मन:पूर्वक आभार !
संपादक म्हणून काम करताना सदस्यांपैकी कुणाला नकळत दुखावले असेल तर वैयक्तिकरित्या दिलगीर आहे.
सदस्य म्हणून मिपा प्रिय आहेच आणि राहील.

भाऊंचे भाऊ's picture

23 Nov 2015 - 5:27 pm | भाऊंचे भाऊ

हेच. हीच ती गंमत.

संपादक म्हणून काम करताना सदस्यांपैकी कुणाला नकळत दुखावले असेल तर वैयक्तिकरित्या दिलगीर आहे.

मुळात संपादक म्हणून काम करताना कोणी कोणाला का दुखावले / सुखावले याचा ताळेबंदच जर समोर ठेवला जाणार नसेल तर ही औपचारीकता प्रांजळ का ठरावी ?

अवांतर @ निलकांतः- राज्यसभेसारखी रचना निर्माण करण्यापुर्वी मिपावर जर RTI लागु केला तरच त्या नेमणूकांना अर्थ आहे. ;)

सुबोध खरे's picture

23 Nov 2015 - 6:18 pm | सुबोध खरे

भाऊ साहेब
मिपा हे "लोकांनी, लोकांचे आणी लोकांसाठी चालवलेले संस्थळ" नसून ते एक खाजगी संस्थळ आहे आणी त्याचे सर्वाधिकार श्री नीलकांत यांच्याकडे आहेत. (असे असूनही ते लोकशाही पद्धतीने चालविले जाते) तेंव्हा त्यात आर टी आय लागू होत नाही याची कृपया नोंद घ्यावी.

भाऊंचे भाऊ's picture

23 Nov 2015 - 6:25 pm | भाऊंचे भाऊ

ब्रीटनमधे राजेशाही असुनही लोकशाही त्याखालोखाल नांदते असे काही माननीय निलकांत साहेबांच्या मनात असावे म्हणूनच त्यांनी एखाद्या खाजगी संस्थळावरील संपादक मंडळाची रचना ही राज्यसभेसारखी असावी अशी आस लागली असावी. पण ती पुर्ण होण्या पुर्वी राज्यसभेच्या संकल्पनेची परीपक्वता त्यांच्या या स्तुत्य विचारात उतरावी म्हणून मी काही इनपुट दिले आहेत. आणी ते कुठेच अस्थायी नाहीत.

मुळात संस्थळ खाजगी आहे तर त्याला राज्यसभा का बनवता असा अनुभवी सल्ला आपण द्यायला हवा.

सुबोध खरे's picture

23 Nov 2015 - 6:30 pm | सुबोध खरे

उदाहरण चुकीचे आहे
ब्रिटनची राजेशाही नाममात्र आहे आणी राणी फक्त उत्सवमूर्ती आहे. तेंव्हा ब्रिटनला विकून ती मोनाको बेटावर निवृत्त होऊ शकत नाही.
मिपाचे तसे नाही. नीलकांत मिपा विकून किंवा बंद करून घरी बसू शकतात.
त्यांनी फक्त आमच्या सारख्या मंद बुद्धी लोकांना समजावे कि मागील पानावरून पुढे चालू कसे राहावे यासाठी म्हणून राज्यसभेचे उदाहरण दिलेले आहे. तशी कोणतीही आस लागण्याचे त्यांना कारण नाही.

मृत्युन्जय's picture

23 Nov 2015 - 6:30 pm | मृत्युन्जय

भाऊ मिपा संमं ची रचना रज्यसभेसारखी का असावी याचे कारण नीलकांत ने अगदी स्पष्टपणे दिले आहे. त्यामुळे तुमच्या मनात जे आहे तो उद्देश काही इथे दिसत नाही. त्याच कारणासाठी डॉक्टरांनी नीलकांतला काही सल्ला दिला नसावा.

माझ्या मते मिसळपावच्या संपादक मंडळाची रचना ही राज्यसभेसारखी असावी. म्हणजे त्यातील काही लोक जावेत आणि काही लोक येत रहावेत. त्यामुळे संपादनाची जी रचना आहे ती तशीच पुढे कायम रहावी.

भाऊंचे भाऊ's picture

23 Nov 2015 - 6:41 pm | भाऊंचे भाऊ

सुबोध खरे's picture

23 Nov 2015 - 6:51 pm | सुबोध खरे

भाऊसाहेब
मी भावी संपादक नाही किंवा इच्छुक सुद्धा नाही. मुळात मी एक लेखकही नाही जे लिहितो ते फक्त माझे प्रत्यक्ष अनुभव आहेत. माझ्या दवाखान्यातून वेळ मिळतो त्यातील काही वेळ मी मिपावर असतो एवढेच.त्यात संपादकांची फुकट फौजदारी करण्यासाठी मला वेळ नाही आणि माझी तेवढी लायकी पण नाही.
श्री.निलकांत यांना मी ओळखत नाही कि मी कधीही भेटलेलो नाही प्रत्यक्ष किंवा व्यनितूनही. अगोदरचे मालक श्री तात्या यांना एकदा २००८ मध्ये भेटलो होतो त्यांनी मिपावर यायचे आमंत्रण दिले त्यावर मी २०१३ मध्ये मिपावर आलो.
बाकी आपल्याला जसा सोयीस्कर अर्थ काढायचा असेल तो आपण काढायला मोकळे आहात.

मृत्युन्जय's picture

23 Nov 2015 - 7:38 pm | मृत्युन्जय

डॉक्टर मी कुठे तुम्हाला काही बोललो. किती फाडफाड बोलाल ते

भाऊंचे भाऊ's picture

23 Nov 2015 - 7:45 pm | भाऊंचे भाऊ

मी गंमत म्हणून बोललो आहे हो (खडा टाकायचा म्हणून/ खोडकरपणा म्हणून). कृपया अतिराग नको.

बाकी तुम्ही वेळ देउ शकणार नाही हेच एकमेव कारण आहे की मी तुमचे नावं रेकमेंड केले नाही. अन्यथा आपली तारतम्यता बर्‍याच सदस्यांपेक्षा जास्त परिणामकारक आहे अशीच माझी आपल्याबद्दल धारणा आहे ( आपले अनुभवलेखन वाचुन बनलेली आहे.)

बाकी संपादक बनायला तुम्ही मुळात लेखक असले पाहीजे हा निकश इथे अजिबात नाही याची खात्री बाळगा. तेंव्हा आता अपण एकत्र संपादकांची फुकट फौजदारी करणार्‍यांना शुभेच्छा देउन चर्चेवर इथेच पडदा टाकुया.

भाऊंचे भाऊ's picture

23 Nov 2015 - 7:47 pm | भाऊंचे भाऊ

अरे काय चाललयं ? हा प्रतिसाद खरे साहेबांना दिलाय. भलत्याच जागी प्रकाशीत झाला वाटते.

औपचारिकता आहे की प्रांजळपणा हे समजून घेणा-याला नक्कीच समजेल.

मित्रहो's picture

23 Nov 2015 - 5:19 pm | मित्रहो

जुन्या संपादक मंडळाचे आभार
नवीन संपादक मंडळास शुभेच्छा.

शलभ's picture

23 Nov 2015 - 5:46 pm | शलभ

+१

foto freak's picture

23 Nov 2015 - 6:02 pm | foto freak
अभिजीत अवलिया's picture

23 Nov 2015 - 6:27 pm | अभिजीत अवलिया

सहकार्य कायम राहील. भावी संपादकांना शुभेच्छा !!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Nov 2015 - 6:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

नीलकांत भाऊ,

नोंद घेतलेली आहे तुम्हांस अन प्रशांतजींस खुप खुप शुभेच्छा

माजी संपादक मंडळास मनःपूर्वक शुभेच्छा अन मंडळी तुमचे खुप खुप आधार , आता फ़क्त संपादन कार्यातून मोकळीक मिळाल्यामुळे जरा भारी भारी साहित्य मेवा आम्हाला द्याल अशी अपेक्षा अन पुलेशु

इतकी महत्त्वाची जबाबदारी विश्वासाने देणाऱ्या नीलकांत यांचे आभार.
आणि
आजी माजी भावी संपादकांना शुभेच्छा!

मी-सौरभ's picture

23 Nov 2015 - 7:15 pm | मी-सौरभ

महितिबद्दल आभार मालक
नविन लोक लौकर नेमा.

रच्याकने: नविन संपादक कोण कोण असणार यावर सट्टा सुरु करावा का?

भाते's picture

24 Nov 2015 - 11:57 am | भाते

मी चुकुन सट्टा ऐवजी कट्टा असे वाचले.
नविन संपादक मंडळात कोण असणार यावर सविस्तर चर्चा (!) करण्यासाठी एक कट्टा होऊन जाऊ द्या.

वाचताय ना मुवि.

रेवती's picture

23 Nov 2015 - 7:20 pm | रेवती

ओक्के.

अनेक लेखक त्यातले बहुतांश हौशी, त्यामुळे होणा-या चुका सुधारण्यासाठी करावा लागणारा संपर्क; यावेळी प्राकर्षाने जाणवले ते म्हणजे सदैव मदतीसाठी तत्पर असलेले; वेगवेगळे उपक्रम यशस्वीपणे राबवणारे जुने संपादक मंडळ नेहमीच लक्षात राहिल. सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.

सर्वांना सरसकट निवृत्त करायचा आपला धोरणात्मक निर्णय असेल त्याला विरोध नाही परंतु नव्याजुन्याचा मेळ घालून जर नवे मंडळ करता आले तर अधिक आवडेल अशी सूचना मात्र निलकांत, आपल्याला जरुर करेन.

नोंद घेतली आहे. सहकार्य राहिल. सर्व संपादकांचे आभार. नीलकांत आणि प्रशांत चे पण आभार.

पीके's picture

23 Nov 2015 - 9:41 pm | पीके

निलकांत, पण माझी तेव्हडी पात्रता नाही अजून.

पीके's picture

23 Nov 2015 - 9:48 pm | पीके

व्य. नि. केला आहे.

आदिजोशी's picture

23 Nov 2015 - 9:43 pm | आदिजोशी

आणि नव्या येणार्‍या संपादकांना शुभेच्छा.
मध्यंतरीच्या काळात डु.आयडींचा जो ढळढळीत सुळसुळाट वाढला होता त्यावर अंकुश ठेवण्यात नवीन संपादक मंडळास यश येवो असे चिंतितो.
कितीही वेळा काढले तरी पुन्हा पुन्हा उगवणारे हे बेशरमाचे झाड समूळ उपटून टाकले जाईल ह्याची खात्री आहे. तसेच, काही मंडळींची मेंबरशीप रिक्वेस्ट महिनेच्या महिने पेंडींग राहून उडवलेले डु.आयडींचे कर्तेधर्ते काही दिवसातच नव्या अवतारात समोर कसे काय येतात हे गौडबंगाल सोडवण्यातही यश येवो.

धन्यवाद

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2015 - 9:51 pm | टवाळ कार्टा

खिक्क....ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊउ

हे संस्थल माहिती व विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी पदरमोड करून नीलकांत यानी मोफत उपलब्ध करून दिले आहे तसेच इथे मोफत इ मेल ची ही सोय व्यनि या नावाने सुरू आहे.मी कसा दुसर्याला लोळवतो पहा हे चार चौघाना दाखविण्या ची ही जागा नव्हे.हे एकदा सांगून ज्याना कळत नाही त्याना त्याना बाहेरचा रस्ता निर्दयपणे दाखविण्यात आला तर संपादक मंडळ नामक कुणाची गरज पडणार नाही व्यनि चा उपयोग करून अशा खोडसाळ पणाला नीलकांत यांचे निरिक्षणाखाली आणता येउ शकते .

नवीन संपादक मंडळास हार्दिक शुभेच्छा.

जुन्या संमं चे मन:पूर्वक आभार आणि नव्याला शुभेच्छा!

पिशी अबोली's picture

24 Nov 2015 - 12:57 pm | पिशी अबोली

जुन्या संपादक मंडळाचे आभार! असं काम स्वीकारून ते इतका काळ चालवण्याचं कठीण काम पार पाडल्याबद्दल अभिनंदन! नवीन संमंस आगाऊ शुभेच्छा!
असा धागा काढून या निर्णयाची नीट माहिती देऊन सर्व मिपाकरांवर असा विश्वास टाकल्याबद्दल नीलकांत यांचेही आभार. कितीही भांडणं आणि वाद-विवाद असले तरी आम्ही मिपाकर एक आहोत, त्यामुळे हा विश्वास सार्थ ठरवूच.

प्रीत-मोहर's picture

24 Nov 2015 - 1:44 pm | प्रीत-मोहर

संमं तील जुन्या सदस्यांचे आभार. भावी सदस्यांना शुभेच्छा!!!

सानिकास्वप्निल's picture

25 Nov 2015 - 12:12 am | सानिकास्वप्निल

जुन्या संपादक मंडळाचे आभार आणि नवीन संपादक मंडाळाला अनेक शुभेच्छा.

मिहिर's picture

25 Nov 2015 - 4:55 am | मिहिर

आख्ख्या संपादक मंडळाने काम करणं एकाच वेळी थांबवण्यासारखं नक्की काय झालं?

जाणार्‍या संपादक मंडळाच्या सदस्यांचे मनापासून आभार.
नवीन संपादकांसाठी बार आपण खूपच वर नेऊन ठेवला आहेत.

धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

25 Nov 2015 - 3:09 pm | तुषार काळभोर

एकदम झाल्याचा एक फायदा अपेक्षित आहे.
सर्व संपादक हे मिपावरच्या सर्वात लोकप्रिय लेखकांपैकी आहेत. संपादकमंडळात गेल्यावर ते सर्वजण सुप्तावस्थेत गेल्यासारखे झाले आहेत. ते आता लिहिते होतील ही अपेक्षा व त्यांना विनंती.

दमामि's picture

25 Nov 2015 - 5:21 pm | दमामि

+11111

पारदर्शकता आवडली. मिपा प्रगल्भ संस्थळ आहे ह्याची काही लोकांना प्रचीती येईल अशी आशा. या संक्रमणकाळात मिपाच्या बरोबर राहूच. मावळत्या संपादकमंडळाने उत्तम कामगिरी केली. नवीन संमंदेखील तीच परंपरा कायम ठेवेल अशी खातरी आहे.

एक शंका - केवळ संपादक मंडळ स्थगित झाले की साहित्य संपादक मंडळही स्थगित आहे?

पैसा's picture

25 Nov 2015 - 4:32 pm | पैसा

साहित्य संपादक तसे नवीनच आहेत, त्यामुळे त्यात काही बदल सध्या नाहीये. ते त्यांचे काम करत आहेत.

आनंदराव's picture

27 Nov 2015 - 11:11 am | आनंदराव

नोंद घेण्यात आली आहे.
नवीन संपादक मंडळाने जे काही काळाने रुजु होईल त्यांनी अभ्याकडुन टी शर्ट सदस्यांना कसे मिळ्तील ते पहावे. ( ह. घ्या. )

बोका-ए-आझम's picture

27 Nov 2015 - 12:55 pm | बोका-ए-आझम

म्हणजे मिपाला संपादक मंडळ वगैरे आहे का? बरं वाटलं ऐकून!