करिष्माई निर्माते-दिग्दर्शक सुरज बडजात्या हे नवीन चित्रपट त्यांची आवडती व्यक्तिरेखा "प्रेम" आणि या वेळेस प्रेम च्या भूमिकेत सलमान खान दुहेरी भूमिकेत असल्या तिकीट बारीवर गाजण्याच्या दृष्टीने परिपूर्ण मसाल्या सहित आलेले आहेत. पहिल्या विकेंडलाच गाठलेला शंभर कोटींचा आकडा हा दाखवतो कि जनता आधीपासूनच फक्त बडजात्याच्या करिष्म्यावर विश्वास ठेवून आहे. पण कितीही नाकारले तरी रिपीट ऑडीयंस हि सुरज बडजात्या फिल्मची मागील काहीवेळची बनलेली खासियत या वेळेस कितपत चालते यावर या सिनेमाचे यश अवलंबून असेल. दिग्दर्शकाचे आणि मुख्य अभिनेत्याच्या जोडीचे प्री-इम्प्रेशनच इतके जबरदस्त कि पहिल्या तीन दिवसातच हिटचा दर्जा चित्रपटाने मिळवला पण यशस्वी होण्याचा दर्जा या नंतर सुरु होईल, आणि तो मिळेल का हे अनुभवणे मजेशीर राहील !!!!
सुरज बडजात्याचा सिनेमा म्हणजे पूर्ण शाकाहारी थोडक्यात पूर्ण कुटुंबाला सोबत नेउन देखील कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला आवडेल असे काही ना काही सापडणारा एक दुर्मिळ सिनेमा असे आजवर इम्प्रेशन होते. मैने प्यार किया, हम आप के है कौन, हम साथ साथ है आणि विवाह असल्या एक से एक उत्तम कलाकृती सादर करणारा हा गडी. अर्थात मै प्रेम कि दिवानी हु सारखा अपवाद पण या केस मध्ये हा अपवाद देखील "सन्माननीय अपवाद" आपोआप बनतो.
सलमान खान दुहेरी भूमिकेत आणि त्यातही एक भूमिका राजाची आणि एक त्याच राज्यातल्या प्रजाजनाची. या दोन भूमिकांचा आपसात-सहकलाकारांशी मेळ जमवताना लेखक स्वत:च कन्फ्युज झालाय का अशी शंका प्रेक्षकांना येते. या दोन पैकी एक भूमिका जवळपास तीनही तासभर कहाणीच्या बाहेर असूनही हे विशेष. कहाणीलेखक-पटकथा लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता या चारही महत्वाच्या भूमिकांत सुरज बडजात्याच असल्यामुळे जसे विवाहच्या केसमध्ये उत्कंठावर्धक आणि तारुण्यपिटिकेला गवसणी घालणारी आगळी- वेगळी कथा असली वाहवा त्याने सगळ्या वयोगटातून त्याने मिळवली त्याचप्रमाणे या वेळेस रिपीट ऑडीयंस तर सोडा पण मागील पुण्याईमुळे मिळालेला ऑडीयंसहि छी-थु करेल अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.
लेखकाने cinematic लिबर्टी इत्यादी इत्यादी संकल्पनांचा आधार घेत प्रेक्षकांना गृहीत धरणे हे हिंदी प्रेक्षकांसाठी नवीन नाही पण सुरज बडजात्या सारख्या प्रथितयश (!!!!!!) लेखक-दिग्दर्शकाने प्रेक्षकांना मूर्ख समजण्या इतपत कमतरता ठेवाव्यात याचा धक्का बसल्याशिवाय राहात नाही. जास्त नाही आपण एकंच छोट उदाहरण घेऊ एक राजाच्या कुटुंबातल्या आंतरिक बाबी भलेही बाहेरचा व्यक्ती राजवाड्यात त्यांचा आत्मज म्हणून शिरला तरीही इतक्या सहजा-सहजी बाहेरपर्यंत झिरपाव्यात?? बाकी प्रसंग हि सांगता येतील गृहीत धरल्याचे पण आधीची पुण्याई बघता इतकच सध्या पुरे बाकी बघणाऱ्या प्रेक्षकांनी आपापले ठरवावे.
आलोक नाथ हा सुरज बडजात्याचा लकी चार्म वाटायचा मला कारण त्याच्या गाजलेल्या प्रत्येक सिनेमात तो एक महत्वपूर्ण भूमिकेत होता."मै प्रेम कि दिवानी हु" मध्ये नव्हता आणि असा सिनेमा होता हे कोणाला आठवते का या प्रश्नाच्या उत्तरातच मला असे का वाटते याचे उत्तर आहे का?? या सिनेमातही आलोक नाथ नाही !!!! वास्तविक बघता अनुपम खेरच्या जागी त्याला बसवता आल असत पण.........
मुख्य अभिनेत्री म्हणून सोनम कपूर आहे पण तिला प्रोमोसाठी वापरलेल्या गाण्यात कंबर हलवणे सोडून इतर काही महत्व नाही. सहाय्यक भूमिकेत नील नितीन मुकेशहि आहे पण त्याला तोंडी लावण्यापुरतेही महत्व नाही.
२००६ सालच्या विवाह मध्ये स्व.रवींद्र जैन यांचा म्हणजेच एका मेन स्ट्रीम चित्रपट क्षेत्रात नवीन संगीतकाराचा वापर करून त्यांनी दिलेल्या संगीताच्या बळावर चित्रपट यशस्वी करून दाखवल्या नंतर सुरज बडजात्याची हिंमत वाढली अन या वेळेस त्याने संगीतासाठी चक्क हिमेश रेशमियाचा वापर केला. पण ज्याप्रमाणे रवींद्र जडेजा कितीही फुगला तरी कसोटीत त्रिशतक मारू शकेल का?? यातच जाणकारांना रेशमिया महाशयांना वापरणे योग्य कि अयोग्य समजून जायला हवे.
चित्रपटाला मी अर्धा स्टार देईन अभिनेत्यांच्या मेहनतीसाठी आणि दिग्दर्शकाच्या पूर्वपुण्याईसाठी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
प्रतिक्रिया
19 Nov 2015 - 9:22 pm | टवाळ कार्टा
तो अर्धा स्टार नक्की कशासाठी दिलाय ते समजेल का? :)
19 Nov 2015 - 9:30 pm | समीर_happy go lucky
राव पदरचे पैसे खर्च केले आम्ही तिकिटात, इतना हक तो बनता है राम
23 Nov 2015 - 5:26 pm | कपिलमुनी
टक्कू चा राव झाला !
भावी संपादकाची पावले म्हणायची का ?
23 Nov 2015 - 6:48 pm | सागरकदम
टक राव
23 Nov 2015 - 7:53 pm | टवाळ कार्टा
खिक्क....मला मिपावर्च्या सग्ळ्यात मोठ्ठ्या कंपूचा सपोर्ट लागेल त्यासाठी ;)
23 Nov 2015 - 7:53 pm | टवाळ कार्टा
खिक्क
19 Nov 2015 - 9:23 pm | भाऊंचे भाऊ
ओ. फक्त हिमेशच सध्या पारंपारीक भारतीय संगीत असलेली यशस्वी गाणी देउ शकतो जी तरुण पिढीच्या ओठावर घोळतील. त्याला नाव ठेउ नका. बाकी सोडा पण किमान तेरे नाम व आप का सुरुर ची गाणी ऐकली असती म्हणजे रेशामियाच्या टॅलंटवर दुरुनही शंका उपस्थीत होत नाहीत. या एका वाक्याबद्दल आपला करावा तेवडा निषेध कमीच.
19 Nov 2015 - 9:29 pm | भाऊंचे भाऊ
हे तर तेंडल्यालाही शक्य नाही.
23 Nov 2015 - 5:16 pm | सौंदाळा
रविंद्र जडेजाने रणजी मधे दोन त्रिशतके मारुन भारताच्या कसोटी संघात बॅटींग ऑलराउंडर म्हणुन पदार्पण केले होते.
बाकी चालु द्या
23 Nov 2015 - 5:21 pm | भाऊंचे भाऊ
और ये लगते लगते बचा सिक्सर...! गेंद दो फिल्डरोंके बिचमेसे तेजीसे निकलती हुइ सिमापार. कडक शॉट. चौंका.
19 Nov 2015 - 9:31 pm | टवाळ कार्टा
१३ १३ १३ सुरूर =))
19 Nov 2015 - 9:34 pm | भाऊंचे भाऊ
ते आपका सुरुर मधलं नाहीये.
20 Nov 2015 - 9:21 pm | टवाळ कार्टा
हैला...म्हैत नव्हते मला
19 Nov 2015 - 9:32 pm | समीर_happy go lucky
निषेध मंजूर आणि दुर्लक्षित कारण हिमेश रेशमियाने अक्षरश: खेळखंडोबा करून टाकलाय सिनेमाभर
22 Nov 2015 - 7:49 pm | मांत्रिक
मी पण हिमेश रेशम्मियाचा फ्याण आहे. आशिक बनाया आपने आणि तेरे नाम का विसरला सदर लेखक? कहर केलता या गाण्यांनी राव! का विसरलात ते, का? जनता जानना चाहती है!
19 Nov 2015 - 9:33 pm | सागरकदम
डोकं दुखून भणभण पायो
हे पण नक्की बघा
19 Nov 2015 - 9:37 pm | रेवती
गेल्या आठ दहा दिवसात कट्यार, प्रेम रतन, भन्साळीबाबा यांची इतकी उलटसुलट चर्चा झालीये की भारतात अराजक माजल्याचा फील आला. नशीबाने मुंबई पुणे मुंबई माझ्याकडून विसरला गेला होता पण नाखुंनी आठवण थोडक्यात करून दिल्याने त्याचा काही त्रास झाला नाही. ;) (हलके घ्या).
सिनेमात आलोक नाथ नाही कारण बाबूजी तर आत्ता कुठे पैदा झालेत ना! लगेच कसे काम मिळणार? ;)
हा सिनेमा बघण्याचा विचार स्वप्नातही करणार नाही.
19 Nov 2015 - 9:47 pm | फारएन्ड
मैने प्यार किया, हम आप के है कौन, हम साथ साथ है आणि विवाह असल्या एक से एक उत्तम कलाकृती सादर करणारा हा गडी. >> इथे जरा ठ्सका लागला :)
बाय द वे, रवीन्द्र जैन हे बडजात्यांचे घरचे मूळचे संगीतकार. राजश्री प्रॉडक्शन्स च्या अनेक चित्रपटांना त्यांचे संगीत होते. मधल्या काळात राम लक्ष्मण यांना संधी दिल्यावर विवाह मधे पुन्हा त्यांना घेतले, असे दिसते.
19 Nov 2015 - 9:49 pm | याॅर्कर
गढूळाचं पाणी कशाला ढवळलं,नागाच्या पिलाला____
19 Nov 2015 - 10:52 pm | समीर_happy go lucky
हि म्हण कि काय?? समजल नाही राव !!!!
20 Nov 2015 - 10:47 pm | भाऊंचे भाऊ
ते एक गाणं आहे समजा... थिरकता तरी येइल ;)
22 Nov 2015 - 10:48 pm | अभ्या..
गढूळाचं नाय हो. कल्लूळाचं पाणी.
तुळजापूरच्या आराध्यांचं गानं हाय ते. कल्लोळ तीर्थ नावाचं तीर्थ हाय तिथं.
19 Nov 2015 - 9:50 pm | कविता१९७८
आजकाल सलमानचे सिनेने पाहणे सोडुन दिलय सो तसाही हा सिनेमा पाहणार नाहीच
19 Nov 2015 - 9:51 pm | कविता१९७८
सिनेनेच्या जागी सिनेमे असे वाचावे
22 Nov 2015 - 6:32 pm | आनन्दा
मुळात तुम्ही तो सिनेमा बघायला गेलातच कशाला?
22 Nov 2015 - 7:06 pm | समीर_happy go lucky
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
22 Nov 2015 - 7:52 pm | मांत्रिक
याच चित्रपटात आज उनसे मिलना है हमे हे झक्कास गाणं आहे. त्या गाण्यासाठी तरी बघणार चित्रपट.
19 Nov 2021 - 5:25 pm | हस्तर