लहानग्या चिंतामणी उर्फ चिंटू च्या घरात लगबग होती..
दिवाळी साठी खुपा दिवसाने सारे जमले होते..
धाकटा शशी काका व शशी आत्या..थोरली यमु आत्या..अन वत्सला आत्या
बाबा सदाशिव व आई सविता...
दुपारची जेवणे झाली अन गप्पांचा फड रंगला होता...
आज्जी आराम खुर्चीत बसून कौतुकाने मुलांच्या गप्पा ऐकत होती..
.
तेव्हढ्यात खिडकीतून गुपचुप उडी मारून आजोबा आत आले..दीर्घ श्वास घेतला..
अन पुणेरी जोडे टॉक टॉक वाजवत आत आले...
डोक्यावर पुणेरी पगडी ...हातात काठी.. मिशा.. ढगळ सदरा...
आजोबांना पाहताच आजी कौतुकाने म्हणाली..
"अग्गोबाई ..किती छान म्हणायचे"
सगळेजण कौतुकाने आजोबा कडे बघत होते..
"काय गं यमे ..तु कधी आलीस?""’
खर्जातल्या आवाजात आजोबानी यमीला विचारले..
अन आजोबाची नकली मिशी गळून पडली....
"अहो आजोबा तुमची मिशी गळून खाली पडली बघा" यमी म्हणाली
अन एकच हास्य कल्लोळ घरात उडाला...
.
अन आजोबा पण हसू लागले..
लहानग्या चिंटूने मग आजोबांची पुणेरी पगडी टेबलावर ठेवली...
काठी खुंटीला अडकवली..
अन धावत जात आज्जीला बिलगला...
आजीने त्याला कवेत घेत कौतुकाने डोक्यावर हात फिरवत म्हणाली..
"अगदी आजोबाचे रूप घेतले आहे अन गमत्या स्वभाव पण.."
सगळे घर कौतुकाने हसत होते..चिंटूंचं ते नाटक बघून...
.
आतल्या खोलीत आजोबा अंमळ जेवण जास्त झाल्याने दुपारची वामकुक्षी घेत होते...
बैठकीच्या खोलीत कसला दंगा चालू आहे याची त्यांना खबर पण नव्हती
प्रतिक्रिया
5 Nov 2015 - 7:23 am | कंजूस
वय्यं मोठं खोटं.
5 Nov 2015 - 8:53 am | अत्रुप्त आत्मा
ऑ...अच् जाल तल !?
5 Nov 2015 - 9:47 am | एस
:-)
5 Nov 2015 - 3:16 pm | पियुशा
आतल्या खोलीत आजोबा अंमळ जेवण जास्त झाल्याने दुपारची वामकुक्षी घेत होते...
बैठकीच्या खोलीत कसला दंगा चालू आहे याची त्यांना खबर पण नव्हती
अर्र्र र्र्र कवतिकच नाय बगा नातवाच खुशाल झोपलेत ;)
"धाकटा शशी काका व शशी आत्या" हे कस काय बुवा ? (पेचात पडलेली पियु )
5 Nov 2015 - 5:48 pm | पगला गजोधर
त्या आजोबांच्या पत्नीला (म्हणजे आज्जीला) डीलीवरीत जुळं झालेले (ऐक मुलगा, ऐक मुलगी), त्यांनी दोघांची नावे शशी (शशी कपूर वरून प्रेरित), व शशी (शशिकला वरून प्रेरित) ठेवली, तेच या लहान मुलाचे काका व आत्या. हे दोन्ही जुळे शशी दिसायला पण सारखे असल्याने, तेव्हापासून त्याघारापासून म्हण सुरु झाली, ''आत्याबाईला जर मिशा असत्या तर तिला काका म्हटले असते.''
5 Nov 2015 - 3:50 pm | होबासराव
:))
5 Nov 2015 - 3:55 pm | जातवेद
छान!
5 Nov 2015 - 5:37 pm | चित्रगुप्त
अजून या काळात पुणेरी पगडी घालणारे आजोबा आहेत ? आमचा त्यांना शिरसष्टांग दंडवत. फोटोही द्यावा इथे.
5 Nov 2015 - 5:49 pm | पगला गजोधर
तात्यानु
अकु कथा म्हणजे कमीतकमी १०० वर्षे जुन्या बोधकथा असतात.
5 Nov 2015 - 9:16 pm | उगा काहितरीच
पुभाप्र ...
5 Nov 2015 - 10:36 pm | शिव कन्या
:)))
6 Nov 2015 - 8:25 am | एक एकटा एकटाच
छान आहे
9 Nov 2015 - 10:38 am | सिरुसेरि
छान कथा . 'सकाळ'मधल्या खोडकर व लाघवी चिंटुची आठवण झाली.