कट्यार पुन्हा काळजात घुसली

नितीनचंद्र's picture
नितीनचंद्र in जनातलं, मनातलं
2 Nov 2015 - 3:06 pm

पुरुषोत्तम दारव्हेकर लिखीत आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच संगीत असलेली संगीत नाटक कट्यार एक अजरामर नाटक आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, नुकतेच निवर्तलेले पं. पदमाकर कुलकर्णी तसेच नव्या पिढीतील तीन दमदार गायक डॉ रविंद्र घांगुर्डे, चारुदत्त आफ़ळे आणि वसंतराव देशपांडे यांचा वारसा घेऊन आलेले राहुल देशपांडे यांनी खासाहेबांची भुमिका करुन हे नाटक पुन्हा पुन्हा रंगमंचावर आणले. या नाटकाला प्रत्येक पिढीचा वारसा आणि नविन पिढीतल्या चाहत्यांचा उत्साह हे नाटक नव्याने सादर करायला भाग पाडतो आहे.

जसे विविध गद्य नाटकातले कलाकार एकदा नटसम्राट करायला मिळाले म्हणजे नट म्हणुन एक मानाचा शिरपेच मिळतो या भावनेने ही भुमिका करतात तसे संगीत नाट्यप्रकारात अनेक नाटकांपैकी हे एक नाटक करायला मिळाले म्हणजे सुध्दा शिरपेच अशीच भावना किमान या नव्या पिढीच्या गायकांमध्ये असावी.

वसंतरावांच्या गायकीने वेड लावलेले अनेक गायक/श्रोते महाराष्ट्रात आहेत. ज्यांनी स्वत: वसंतराव देशपांडे यांच्या कडुन संगीताचे धडे घेतलेले पं. पदमाकर कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य डॉ. रविंद्र घांगुर्डे यांना वसंतरावांनी गाजवलेली खासाहेबांची भुमिका करायचे मनात येणे नवल नाही. राहुल तर हीच सर्व गाणी ऐकत आणि कट्यार निर्मीतीच्या कथा ऐकत लहानाचा मोठा झाला असेल. आपल्या वडीलांकडुन किर्तनाचे धडे घेतलेला आणि किर्तन करणारा चारुदत्तला ही भुमिका करण्याची प्रेरणा कशी मिळाली हे त्यांच्याकडुन कधी काळी ऐकायला आवडेल.

मागच्याच वर्षी पंडीत पदमाकरजी हयात असताना मी त्यांना तुमच्या कडुन कट्यार बद्दल ऐकायचे आहे असे सांगताच पंडीतजी खुलले होते. हे सर्व व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा माझा मानस तसाच विरला. खर तर मला प्रत्येक खासाहेबांकडुन कट्यार चे काय गारुड आहे हे जाणण्याचा संकल्प होता पैकी पंडीत पदमाकरजींच्या जाण्याने ह्यातला काही भाग रेकॉर्डवर येण्याआधीच पुसला गेला.

पंडितजींच्या जाण्याने झालेला विरस सुबोध भावेंच्या नव्या सिनेमाच्या घोषणेने कमी झाला आहे. एखाद्या कथेला नाटकात नेपथ्याच्या मर्यादा येतात. राजे- रजवाडे असलेल्या कालवधीतली ही कथा राजगायकाचा महाल आणि छोट्या सदाशिवा बरोबर एका जुन्या शिव मंदीरात पंडीतजींचा रियाझ या दोनच सेटवर अडकुन पडते. किंबहुना नाटक म्हणुनच लिहायला घेतले असेल तर दारव्हेकरांना ते प्रसंग त्या मर्यादेतच लिहावे लागले असतील.

कट्यार च्या कथेवर येऊ घातलेल्या सिनेमाचे पहिले गाणे येऊन थडकल्यावर " सुर निरागस हो" हे गाणे आणि त्याचे चित्रीकरण नाट्यरुपांतरामुळे असलेल्या मर्यादा संपवुन एका नव्या भव्य आकृतीबंधात बांधले जाईल यात शंकाच नाही.

एक पिढी होती ज्यात जुन्या कथा चित्रपटात बांधुन त्याच्या भव्यतेसहीत पडद्यावर साकारत. हे निर्माते फ़क्त हिंदीतच सिनेमे करत. जुन्या पिढीत मुगले आझम असुदे किंवा त्यांचा कित्ता गिरवणारा संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा असुदेत. केलेला खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी मराठी माध्यम अपुरे पडत असावे. यातुन एक काळ असा गेला ज्यात मराठी सिनेमा नव्या कल्पना नसलेल्या निर्मीतीच्या गर्तेत अनेक वर्ष अडकल्याने आपली हिंमत आणि वारसा आणि प्रेक्षक वर्ग ही हरवुन बसला होता.

नजीकच्या मराठी सिनेमात अनेक प्रयोग झाल्यामुळे आणि लोकांना भावल्यामुळे मला मराठी सिनेमा करायचा आहे असे अमिरखान सारखे निर्माते तर रजनिकांत सारखे सुपरस्टार जाहीर रित्या म्हणुन लागले आहेत. ही नांदी मराठी सिनेमाला सुवर्णकाळ येईल की काय अश्या काळाची आहे. या पार्श्वभुमीवर कोर्ट या मराठी सिनेमाला कोणत्याही प्रसिध्द स्टार कास्ट शिवाय ऑस्कर पुरस्काराला नॉमिनेशन होणे हा सुध्दा एक चांगला योग मानायला हरकत नाही.

कट्यारची कथा आता भव्य स्वरुपात पडद्यावर झळकेल ज्यात सचिन पिळगावकर खासाहेबांची तर पंडीतजींची भुमिका शंकर महादेवन रंगवणार आहेत. या सिनेमातले सेट डिझाइन रवी जाधव यांचे आहे तसेच आर्ट डायरेक्टर म्हणुन सुध्दा काम करत आहेत. रवी जाधव यांच्या सेट डिझाइनची झलक " सुर निरागस हो" या राजवड्यातल्या गणेश उत्सवाच्या भागाचे चित्रकरणासहीत चाहत्यांच्या समोर आल्याने कट्यारला काही नविन अ‍ॅगलमधे नुसते ऐकायला नाही तर पहायला मिळणार ही एक आनंदाची गोष्ट आहे.

शंकर महादेवनला या निमीत्ताने मराठी सिनेमात पहाणे आणि ऐकणे सुध्दा आगळाच आनंद देईल. मध्यंतरी राहुल देशपांडे आणि शंकर महादेवन यांनी काही गायन एकत्रीत केल्याचे दुरदर्शनवर केल्याचे पाहिले होते. त्यामागे असा काही संकल्प असेल याची कल्पना आली नव्हती.
या चित्रपटाला शंकर- एहसान -लॉय यांचे संगीत आहे. या त्रिकुटाने काही सिनेमांना हटके संगीत दिले होते. चाहत्यांना हवी असलेली नाट्य संगीताची तहान या सिनेमाच्या संगीताने भागवली जाते की संगीत नाटकाचे सिनेमात रुपांतर होताना काही वेगळ्या संगीत संकल्पना पुढे येतात हे पहाण्याचे बाकी आहे.

सुबोध भावे पुन्हा नाटकाप्रमाणे कविराज बाके बिहारींचीच भुमिका रंगवणार असे वाटत होते पण टीझर त्यांना सदाशीवाच्या रुपात आणतोय तर कविराज बाके बिहारी बहुतेक दुसराच प्रसिध्द नट रंगवणार असे दिसत आहे. उमेची भुमीका मृण्मयी देशपांडे तर खासाहेबांच्या मुलीची भुमिका अमृता खाडीलकर करणार असे दिसत आहे. गायकांची नावे या प्रमोत आलेली नाहीत. सचिन पिळगावकर गात असले तरी खासाहेबांची गायकी दुसराच पार्श्वगायकाला करावी लागणार यात शंका नाही. गायकांच्या यादीत फ़क्त शंकरचे नाव आत्ता दिसते आहे. प्रत्यक्षात ही गाणी राहुल की अजुन कोणी हे समजायला सिनेमाच प्रदर्शीत होण्याची वाट पहावी लागणार आहे.

download (1).jpg

सुबोध भावे यांनी कट्यारचे नाट्यप्रयोग केले आहेत ज्यात राहुल देशपांडे खासाहेब भुमीका करतात. या पार्श्वभुमीवर आणि दुरदर्शनवरची ती जुगलबंदी ऐकल्यावर एका गोष्ट जी कथेच्या मुळ रुपात बदल करुन येईल असे वाटते ती म्हणजे खासाहेब आणि पंडीतजींची दसरा दरबारातली जुगलबंदी. असे घडले तर कथेच्या मुळ स्वरुपात नसलेली एक गोष्ट जी चित्रपट पहाण्याला एक कारण मिळवुन देईल.

असे प्रयोग चित्रपट पुन्हा निर्माण करताना करावेच लागतात. संजय लीला भन्साळींचा देवदास पुन्हा पहाताना " डोला रे डोला रे " या गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या यांना एका फ़्रेम मधे आणण्याचा प्रयोग करावा लागला होता तोच प्रयत्न या निमीत्ताने होईल अशी एक आशा माझ्या मनात आहे. अन्यथा खासाहेब आणि पंडीतजी यांचा सामना झाला आणि पंडीतजी न गाताचा उठुन गेले ही मुळची कथा काहीशी चाहत्यांच्या अपेक्षा अपुर्ण ठेवणारी होती.
images.jpg

कथेत बदल होणार म्हणजे नाट्य प्रयोगाचे अस्तित्व अबाधीत ठेऊन नविन गाणी येणार हे " सुर निरागस हो" या निमीत्ताने जाणवले. यातुन कट्यारचे वैभव वाढणार अशी आशा बाळगायला हरकत नाही. मराठी प्रेक्शकांनी जसा बालगंधर्व हा सिनेमा डोक्यावर घेतला तसा नव्या स्वरुपातली नाट्य प्रयोग चित्रपटाच्या स्वरुपात मराठी सिनेमाला उंची मिळवुन देऊन एक नवा इतिहास घडवतो का हे समजायला फ़ारसा अवधी राहीलेला नाही. दिवाळीतच हा सिनेमा रिलीझ होऊन दिवाळीचा आनंद अनेक पटीने वाढवायला आपल्या समोर येतो आहे.

चित्रपटशुभेच्छा

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

2 Nov 2015 - 3:12 pm | वेल्लाभट

नक्कीच! पिक्चर सुपर डुपर हिट असणार यात वाद नाही !

उगा काहितरीच's picture

12 Nov 2015 - 5:33 pm | उगा काहितरीच

कट्यार काळजात घुसली पाहिला ! पहिल्या दिवशी , पहिला शो . प्रचंsssssssड आवडला. महागुरू कधीकधी असह्य होतात. पण बाकी चित्रपट अप्रतिम !

काकासाहेब केंजळे's picture

2 Nov 2015 - 3:24 pm | काकासाहेब केंजळे

सचिन पिळगावकर उर्फ म्हागुरुंनी या सिनेमाच्या प्रमोमध्ये गाताना जे अंगविक्षेप केले आहेत ते बघुन त्यांच्या पोटात जंत वळवळ करत असल्याचे वाटते,पिळगावकरने कीतीही उर्दू लहेजा भाषेत आणण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचे मराठी उच्चार लपत नाहीत,
शंकर महादेवन नुसता ठोंब्या वाटतो प्रमोमध्ये.बाकी सेट ,वेशभुषा उत्तम आहे यात वादच नाही.

अरेरे, दादा कोंडकेचा सलग ९ चित्रपट सिल्वर ज्युबिली देण्याचा, विक्रम मोडणाऱ्या (सलग १२ सिल्वर ज्युबिली) सचिन पिळगावकर या गुणी दिग्दर्शकाविषयी, अशी वैयक्तिक टीका, मला रुचली नाही. सचिन म्हटलं कि (माझा पती करोडपती, गम्मत जम्मत, अशीही बनवाबनवी, अष्टविनायक, मायबाप … ) असे चित्रपट डोळ्यापुढे येतात. मला वाटते सचिन मनसे च्या चित्रपट सेना प्रमुखपदी आल्यापासून, त्याचावर ऐका विशिष्ठ राजकीय पक्ष्याच्या समर्थांकडून हिणवले जाण्याची,ही बाब असावी. मला वाटते सचिन पूर्वीच्या काळात जे काही दर्जेदार काम करून मराठी चित्रपटसृष्टीची सेवा केली आहे, निदान ती तरी ध्यानी ठेवून (एवढी सेवा त्याच्या टीकाकारांनीही कदाचितच केली असेल ), गेल्या काही वर्षामध्ये त्याच्याकडून अतिउत्साहात काही आगळीक झाली असेल, ती आपण पोटात घालून, निदान हा चित्रपट पाहायला जावून दिवाळी साजरी करूया.

नाखु's picture

4 Nov 2015 - 12:35 pm | नाखु

पुण्याई

म्हटले आहे !!

सचिन 'पीळ'गावकर यांनी प्रोमोमधे जो थयथयाट केलाय..कहर! ऐन मैफिलित लेंग्यात झुरळ शिरुन पंचाईत झाल्याचा vibrant अभिनय मात्र जमलाय

आशु जोग's picture

5 Dec 2015 - 2:30 am | आशु जोग

त्यांचा मोबाईल व्हायब्रेट होत असेल

रमेश आठवले's picture

5 Dec 2015 - 2:55 am | रमेश आठवले

ह ह पु वा !

स्वाती दिनेश's picture

2 Nov 2015 - 4:01 pm | स्वाती दिनेश

सुबोधच्या कट्यारच्या सिनेरुपाची उत्सुकता होती पण सगळे बाकीचे दिग्गज सोडून म्हागुरुंना का निवडले खाँसाहेब म्हणून? उत्सुकता धाडकन आपटली..
सिनेगृहात जाऊन पहाण्यापेक्षा जालावर येईल तेव्हा पाहणे पसंत करेन.
स्वाती

+ १ , स्वयंघोषित महागुरुंना का म्हणुन खाँ साहेबांची भूमिका दिली असेल असा राहुन राहुन प्रश्न पडतो. कट्यार चं सिनेरुपांतर करण्याचं शिवधनुष्य पेलण्याचा नुसता विचार च नाही तर तो प्रत्यक्षात उतरवण्याची हिंमत दाखवली या एका मुद्द्यावर पण सुबोध भावेला पैकी च्या पैकी मार्क्स ! आशा करुयात की सिनेमा तेवढाच खास असेल देखील.

कट्यार पुन्हा काळजात घुसली-
यानिमित्ताने राहुल आणि शंकर महादेवन जुगलबंदी .टिव्ही साउंड रेकॅार्डींग.
राहुल आणि शंकर महादेवन जुगलबंदी ; MP3 ;Size 20MB

म्हागगुरुंना पाह्यलं आणि उत्सुकता विरली. आता थेटरात पदरचे पैसे खर्च करुन जाणार नाही.

माझीही शॅम्पेन's picture

4 Nov 2015 - 12:53 pm | माझीही शॅम्पेन

+१
ज्या कोणी दिव्य माणसाने चित्रपटाची casting केली आहे त्यानेच एकदम शिताफीने कट्यार पुन्हा (आम्हा मायबाप प्रेक्षकांच्या) काळजात घुस(वि)ली आहे ... संपूर्ण कथा ह्या पात्राच्या भोवती फिरत असल्याने महागुरूंना optionला टाकणे शक्य नाही
आता चित्रपट आणि माहागुरुंची overacting बघण्याची इच्छा उरली नाही
र च्या क ने .. नाना पाटेकर , विक्रम गोखले वा स्वता: राहुललाच ही भूमिका द्यायला पाहिजे होती

नसरुद्दिन शहा एकदम मस्त शोभले असते

सिरुसेरि's picture

7 Nov 2015 - 11:48 pm | सिरुसेरि

+१ . नव्या कटयारमध्ये पंडितजी , खांसाहेब यां भुमिकांमध्ये सचिन खेडेकर , अतुल कुलकर्णी , संदिप कुलकर्णी असे कलाकार जास्त शोभले असते . तसेच शंकर महादेवन यांचा आवाज खांसाहेब व सुरेश वाडकर यांचा आवाज पंडितजी यांना शोभला असता .

तुषार काळभोर's picture

2 Nov 2015 - 4:08 pm | तुषार काळभोर

मला यासाठी "दुर्दैव" हा शब्द वापरावासा वाटतो.

लई भारी's picture

2 Nov 2015 - 4:56 pm | लई भारी

'सचिन पिळगांवकर' नाव बघूनच अर्धा निर्णय झाला होता. ट्रेलर बघून बाकीच्या गोष्टी भारी वाटत असल्या तरी महागुरूंचा अचाट अभिनय(!) बघायला जाण्याची इच्छा होत नाही.

उगा काहितरीच's picture

2 Nov 2015 - 5:05 pm | उगा काहितरीच

अपेक्षा उंचावल्यात या चित्रपटाकडुन , पाहूयात पूर्ण होतात का नाही ते . शुभेच्छा !

वेल्लाभट's picture

2 Nov 2015 - 5:15 pm | वेल्लाभट

महागुरू फेवरिंग विरुद्ध महागुरू नॉन फेवरिंग असा वाद या धाग्यत उफाळून येण्याची शक्यता दिसते..

आपापली मतं असू शकतात. असो.

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 8:58 pm | टवाळ कार्टा

कमीत कमी मिपावर वादाचा नवीन विषय तरी मिळेल त्या निमित्ताने =))

वेल्लाभट's picture

3 Nov 2015 - 7:44 am | वेल्लाभट

लौल !

म्हाग्रू सोडून दुसरे लोक मेले होते की मुके झाले होते????? राहुल्देश्पांडेही चाल्लाअसता पण त्याला अ‍ॅक्टिंग कितपत येते काय माहिती.

स्वाती दिनेश's picture

2 Nov 2015 - 5:29 pm | स्वाती दिनेश

कट्यार नाटकात राहुलच करतो ना काम?
माझीही पहिली रिअ‍ॅक्शन हीच होती. सगळे सोडून म्हागुरु काय?

कट्यार नाटकात राहुलच करतो ना काम?

असेल, मला माहिती नाही. मला वाटलेलं की तो फक्त गाण्यातला आहे. अ‍ॅक्टिंगही येते हे माहिती नव्हतं.

आजकाल ज्याला अभिनय म्हणतात तो अन पूर्वीचा संगीत नाटकातील गायक नटांचा अभिनय यात बराच फरक असणार.

संगीत नाटकात अभिनयाची गरज नसते असे नाही म्हणता येणार पण दमदार आवाज अन गायकी हाच यूएसपी असेल तर बाकी सीन सामान्य रुप अन अभिनयाने सुध्दा निभावून नेले जात असणार.

विशाल कुलकर्णी's picture

4 Nov 2015 - 10:54 am | विशाल कुलकर्णी

असेल, मला माहिती नाही. मला वाटलेलं की तो फक्त गाण्यातला आहे. अ‍ॅक्टिंगही येते हे माहिती नव्हतं.

म्हाग्रुंना तरी 'सचिन पिळगावकर'शिवाय इतर कुणाची अ‍ॅक्टिंग कुठे येते करायला? :P

म्हग्रू बद्दल किती काही वाटत असलं तरी . गाणी आणि सुबोध भावे साठी बघणार हा सिनेमा मी . .

बाकी . . ज्यांना नावे ठेवायची आहे ते कशाला हि ठेवतात. यामध्ये बालगंधर्व , पु ल , पं भीमसेन जोशी या सारख्या दिग्गजांना प्रत्यक्ष ऐकायची / बघायची संधी आणि सुदैव लाभलेली लोकं जास्त आहेत . आमचा जन्म झाला नवता तेव्हा. प्रत्येक वेळी 'तुम्ही यांना ऐकलं पाहिजे होतात .. या नवीन लोकांत काहीच दम नाही . "

च्यायला . एवढी आवड होती तर ठेवायचं होतं रेकोर्ड करून . ऐकलं असतं

या चित्रपटाबद्दल ऐकलेली हि लेटेस्ट ओकारी . .

"अरे कुठे ते देशपांडे आणि कुठे हा महादेवन . काही तरी सर आहे का ? "
हो बाबा होते देशपांडे महान . त्यात वादच नाहीये . पण म्हणून महादेवन कसा फालतू ठरतो ? तुम्हाला नसेल बघायचं तर नका बघू . आपणच सर्वज्ञानी असल्याच्या थाटात दुसऱ्याचा मूड का खराब करताय ?

या चित्रपटाबद्दल ऐकलेली हि लेटेस्ट ओकारी . .

"अरे कुठे ते देशपांडे आणि कुठे हा महादेवन . काही तरी सर आहे का ? "
हो बाबा होते देशपांडे महान . त्यात वादच नाहीये . पण म्हणून महादेवन कसा फालतू ठरतो ? तुम्हाला नसेल बघायचं तर नका बघू . आपणच सर्वज्ञानी असल्याच्या थाटात दुसऱ्याचा मूड का खराब करताय ?

कसंय ना अद्द्या, क्लासिकल संगीत मत्तु पिच्चर ही दोन क्षेत्रे अशी आहेत जिथे बद्धकोष्ठाचा विकार झालेली थेरडेशाही खूप बळजोर आहे. बाकी ठिकाणीही आहेच, पण या ठिकाणी प्रकर्षाने जाणवून येते. त्यातही क्लासिकल संगीत म्हणजे काय विचारता! प्युअर थेरडेशाही असते इथे. तुला अमुक एखादं आवडलं तर ते कसं फालतू आहे हे सांगण्यात जन्म घालवणारे बद्धकोष्ठी लोक्स खच्चून भरलेत. लक्ष द्यायचं नाय.

बाकी म्हाग्रू सक्स पण पिच्चर बघणार हेवेसांनल.

अद्द्या's picture

2 Nov 2015 - 6:09 pm | अद्द्या

अगदी .

दुसरं म्हणजे . "स्टोरी बदलतील राव" . . अरे लेको . नाटक आणि सिनेमा. फरक असतो. आणि स्टोरी बदलली म्हणून ती वाईटच असेल हे कश्यावरून ठरवलं?

बाजीराव मस्तानी च हि तेच कर्ताएत . . अरे एक ऐतिहासिक लव स्टोरी म्हणून बघा न! . . बाहुबली / मगधीरा इत्यादी डोक्यावर घेऊन नाचणारे हेच लोक बरं का .

तुम्हाला माहितीये बाजीराव कसा होता . (तरी ९०% लोक त्याला यावनिशी संग करणारा म्हणूनच ओळखतात ) तुम्हाला माहितीये मस्तानी कशी होती ( पान खाल्ल्यावर गळ्यात रंग उतरणारी वगेरे वगेरे ) . तीच इमेज डोक्यात ठेवा आणि बसा घरी शांत .

आम्ही आपले दीपिकाला बघून होतो खुश , सावळी असली तरी अति लैच भारी दिसते ती .

बॅटमॅन's picture

2 Nov 2015 - 6:18 pm | बॅटमॅन

ऐतिहासिक सत्याची काशी केली तरी मी एकदा तरी थेट्रात जाऊन बाजीराव मस्तानी पाहणारच. तेवढीच त्या निमित्ताने बाजीरावांची चर्चा होईल, लोक जरा मराठा इतिहासात इंट्रेस घेतील आणि महाराज सोडूनही मराठ्यांकडे अनेक वीर होते हे कळेल.

मराठी इतिहासाला चांगले मार्केट उपलब्ध करून देण्यात या पिच्चरचा नक्कीच रोल आहे. त्यामुळे एकदा टोकन उपस्थिती लावायला तरी काहीच हरकत नसावी. आणि ट्रेलर पाहिलं त्यावरून चांगलंच वाटतंय. बॉलिवुडी मसाला वगैरे आहे, तेवढं चालायचंच.

अन दीपिकाला सावळी काय म्हणतो बे. थोडी टॅन आहे म्हण. ;)

ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला...(ॐ शांती ॐ)

पण खास लोकाग्रहास्तव एक मागणी आहे आपली भन्साळीसाहेबांकडे. त्या पिच्चरात २ सीन्स पाहिजेत म्हणजे पाहिजेतच.

१. बाजीरावसाहेब घोड्यावर बसल्या बसल्याच घाईघाईने कणसे मळून खाताहेत आणि बाकीचे लोक ते पाहून अचंबित होताहेत (बाहुबलीमध्ये शिवलिंग उचललेले पाहिल्यावरची रिअ‍ॅक्शन आठवा.)

२. मस्तानी पान खातानाचा ज्यूस गळ्यातून आरपार दिसतो आहे.

हे दोन शीन नसले तर भन्साळीसाहेबांचा छोटा का होईना निशेद करू आम्ही.

अद्द्या's picture

2 Nov 2015 - 6:31 pm | अद्द्या

थोडी टॅन आहे म्हण. > हाहाहाहा
पिवळं पितांबर , मेलेलं मडं, वाकडं वळण इत्यादी इत्यादी

पहिला असण्याची शक्यता आहे . दुसर्यासाठी CGI वापरावा लागेल . पण तरी तो आम्ही बघूच .

आणि नसला तरी कणीस खात खात निषेध करत करत बघू च

अभ्या..'s picture

2 Nov 2015 - 6:34 pm | अभ्या..

रावबाजी ज्वारीचे नायतर बाजरीचे खात असतील. तू मक्याचे खाणार. तेपण भाजून मीठ मसाला लावून.

अद्द्या लेका निषेध तरी दमदार करावा माणसाने.

आता थेटरात दमदार निषेध नाही करू देत राव इथे. .

तो नंतर करेन कि हॉटेलात =]]

बोका-ए-आझम's picture

2 Nov 2015 - 10:40 pm | बोका-ए-आझम

असं दुस-या बाजीरावाला म्हणायचे ना? चूभूद्याघ्या. वाल्गुदेश्वर, प्रचेतसभाऊ वगैरे इतिहासपंडितांनी स्पष्ट केल्यास बरं होईल.

बोकेश. दुसर्‍या रावसाहेबांंना त्यांच्या इतर बाजींबद्दल म्हणत असतील पण पहिल्या रावसाहेबांना रावबाजी संबोधल्याचे माझ्या वाचनात आहे. पानिपत तर कादंबरीच आहे पण त्यातही ह्या कणसाच्या किश्श्यातच मल्हारराव बाजीरावांचा उल्लेख रावबाजी म्हणूनच करतात.

पानिपतातला किस्सा पाहिला पाहिजे, पण अदरवाईज़ बोकेश इज राईट. जनरली रावबाजी = दुस्रा बाजीराव असे ऐकले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Nov 2015 - 6:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

येक लंबर !

मित्रहो's picture

6 Nov 2015 - 1:51 pm | मित्रहो

तेवढीच त्या निमित्ताने बाजीरावांची चर्चा होईल, लोक जरा मराठा इतिहासात इंट्रेस घेतील आणि महाराज सोडूनही मराठ्यांकडे अनेक वीर होते हे कळेल.

बाजीरावच्या ट्रेलरनंतर काही लोकांनी त्याविषयी माहीती विचारली. मी काही विकीपिडियाच्या लिंक पुरवल्या. एका मित्राच्या म्हणण्यानुसार शिवाजीच्या पुढे मराठ्यांचा इतिहास माहीतीच नाही. कदाचित बाजीरावांचे कतृत्व लोकांना कळेल.

बाजीराव मस्तानी बघणार राव!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Nov 2015 - 7:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुट्टीवर आलो असताना पोरगा खास आग्रहाने "बालगंधर्व" पहायला घेऊन गेला होता... तेव्हा आश्चर्य जास्त वाटलं होतं की मस्त पिक्चर बघितल्याचा आनंद जास्त झाला होता याचा अजून निकाल लागलेला नाही. पण त्याच्या आवडीचा अभिमान नक्कीच वाटला होता !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Nov 2015 - 8:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सूडने म्हणे बाजीराव मस्तानी बघुन भिकबाळी घातली कानामधे.

बोका-ए-आझम's picture

2 Nov 2015 - 10:37 pm | बोका-ए-आझम

महागुरूंऐवजी दुसरा कोणी घेतला असता तर चाललं असतं हे जरी कितीही खरं असलं तरी महागुरु हा ब-यापैकी ओळखीचा आणि त्यामुळे एक किमान गर्दी ensure करणारा घटक आहे. शिवाय जर दिग्दर्शकाने महागुरुंना नियंत्रणात ठेवलं असेल तर ते सुसह्य होतील. एवढे काही ते टाकाऊ नाहीत. आता जातो वाहावत कधी एखादा! उसकेलिए उसपे इतना चिल्लाओगे? बूढे की जान लोगे क्या?

चित्रगुप्त's picture

3 Nov 2015 - 12:51 pm | चित्रगुप्त

थेरडेशाही मोडीत काढून यंगशाही आणायची म्हणजे राहुलबाळ गद्दीनशीन होणार की काय ?

पैसा's picture

2 Nov 2015 - 8:24 pm | पैसा

श्रीनिवास खळ्यांचे संस्कार आहेत शंकरवर. बाकी त्याची अफलातून गायकी वगैरेकडे सगळ्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले तरी त्याचं कोणतंही गाणं ऐकायला तेवढं पुरेसं आहे.

शंकर महादेवन अशी भुमिका करतोय ( पंडितजींची ) ज्याना नाटकात फारसा वाव नव्हता. त्यामुळे महादेवची वसंतराव किंवा राहुलशी तुलना योग्य नाही. वर उल्लेख केलेली जुगलबंदी ऐकली /पाहिली तर शंकर महादेवन याचे गायन कौशल्य उत्तम आहे याची खात्री पटेल. अभिनय ते प्रथमच करत आहेत. त्याबाबत आत्ता काय बोलावे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Nov 2015 - 5:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्हाग्रू किंवा नो म्हाग्रू... केवळ "कट्यार... " आहे म्हणून आणि इतर कलाकार व गायक यांच्यामुळे नक्की थेटरातच बघणार !

याॅर्कर's picture

2 Nov 2015 - 6:50 pm | याॅर्कर

सुरत पिया कि न छिन बिसुराये

.
.
.
.
क्लासच

वरच्या बर्याच प्रतिसादांशी सहमत. प्रोमोवरुन चागंला असेल असे वाटते पण महागुरुंना पाहुन काचकुच करतय मन.

सचिन ची निवड जरा "ही" वाटली तरी गाण्यांसाठी सिनेमा बघावा वाटतोय.

कंजूस's picture

2 Nov 2015 - 7:40 pm | कंजूस

सुरतपिया-राहूल
टिव्ही ओडिओ रेकॅार्डिंग
सुरतपिया-राहूल- ; MP3; size 10 MB

पैसा's picture

2 Nov 2015 - 8:21 pm | पैसा

लिंकांसाठी धन्यवाद!

बासुंदी's picture

3 Nov 2015 - 2:08 am | बासुंदी

घेई छंद मकरंद चे पण असे रेकॉर्डिंग आहे का? असल्यास प्लिज शेअर करा

१ ) घेई छंद -राहूल. टिव्ही ओडिओ रेकॅार्डिंग
घेई छंद -राहूल; MP3 size 6 MB

२)
शंकर महादेवन-- घेई छंद मकरंद - tv ओडिओ रेकॅार्डिंग
शंकरचे घेई मकरंद tv SOUND recording,7MB

आणखी टिव्ही ओडिओ रेकॅार्डिंगज
३)
गुजरे सनम -राहूल.7.3 MB
गुजरे सनम -राहूल.7.3 MB

४ )
लागी_करे, राहूल.7.3MB
लागी_करे, राहूल.7.3MB

५ )
तेजो निधि गोल- राहूल 6.2 MB
तेजो निधि गोल- राहूल 6.2 MB

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2015 - 7:44 pm | प्रभाकर पेठकर

वसंतराव देशपांडे ह्यांच्या बुलंद आवाजात खाँ साहेबांना पाहिलं/ऐकलं आहे. (१९७३).
अभिनेता सचिन असला तरी पार्श्वगायनात राहूल देशपांडे आहेत. आवाज आणि गायकी तेव्हढीच दमदार आहे. त्यामुळे पुन्हा कट्यार भावली.

याॅर्कर's picture

2 Nov 2015 - 8:25 pm | याॅर्कर

महागुरूंबाबत आकस दिसतोय,का बरे?

एकापेक्षा एक बघितलं असाल तर तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही. 'मला पहा फुल वाहा' टाईप कमेंट्स नी डोक्याचं भजं झालंय!!

अगदी अगदी.. तोपर्यंत सचिन या व्यक्तिमत्वाबद्दल थोडं फार कौतुक होतं, ते पूर्ण गेलं.

या प्रतिसादाबद्दल तुम्हाला शंभर रुपये...

नाखु's picture

3 Nov 2015 - 9:01 am | नाखु

आप्लया हातानी माती करणे हा वाकप्रचार तेव्हांच जन्माला आला.

खांसाहेब म्हणून सचिन? दुसरा कोणी मिळाले नाही का? या एकाच कारणासाठी बघायला नको वाटतो आहे.

चित्रगुप्त's picture

2 Nov 2015 - 8:40 pm | चित्रगुप्त

हा धागा वाचूनच समजले याविषयी आणि लगेच पिच्चराचे टेल्लर बघितले. म्हागुरूच्या टकुरात अजून नच बलियेतील ती एनर्जी, कोर्योग्राफी अन काय काय ते वळ्वळ्ते आहेसे वाटले. आप्लयासार्खे लई लोक इथे आहेत, हे बघून परम संतोष जाहला आहे. बाकी दिल्लीत हा पिच्चर लागणार नाही त्यामुळे कधीतरी छोट्या पडद्यावर बघणार.

अशोक सराफचा नारायण केला तसं का?

योगी९००'s picture

2 Nov 2015 - 10:05 pm | योगी९००

महागुरूंविषयी फारच आकस दिसतोय. त्यांचे ते महागुरू पण आणि काही बकवास पिक्चर सोडले तर इतके काही वाईट अ‍ॅक्टर नाहीयेत आपले सचिन सर...

अमिताभ / कमल हसन / शाहरुख यांचा पण काही चित्रपटांमुळे कंटाळा आलाच होता ना? (शाहरुखचा राम जाने किंवा गुड्डु चित्रपट बघा, त्यानंतर प्रदिप कुमार / भारत भुषण यांचे चित्रपट सुद्धा सुसह्य होतील).

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2015 - 10:22 pm | परिकथेतील राजकुमार

अमिताभ / कमल हसन / शाहरुख यांचा पण काही चित्रपटांमुळे कंटाळा आलाच होता ना?
असल्या टुकार लोकांशी महागुरुंची तुलना?

योगी९००'s picture

3 Nov 2015 - 8:48 am | योगी९००

परा परत आलात? तुमचे स्वागत. आता परत मज्जा येणार..!! (तुमचे फेसबुक पेज भारी हाय..)

असल्या टुकार लोकांशी महागुरुंची तुलना?
याहुन टुकार नाही मिळाले

आणि मुळ मुद्दा असा आहे की महागुरू म्हणून पिळगांवकरांनी फार छळलं याचा अर्थ असा नाही की कायम आपण त्यांना कमी लेखावं. किती झालं तरी पन्नास वर्ष पुर्ण केलीत त्यांनी. हाच जर रोल विक्रम गोखले किंवा या सम जेष्ठ अभिनेत्याने केला असता तर उगाचच त्यांचे कौतूक झाले असते.

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2015 - 11:29 am | प्रभाकर पेठकर

सहमत.
शिवाय हिन्दी चित्रपटात आपला निभाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर छोट्या पडद्यावर 'तू तू मैं मैं' सारख्या मालिकेतून यशस्वी दिग्दर्शन केले आहे. शिवाय 'नवरा माझा नवसाचा' ह्या चित्रपटातून निर्मिती, दिग्दर्शन, कथा आणि पटकथा वगैरे सर्व क्षेत्रात हात अजमावून त्या चित्रपटाला यशस्वी करून दाखविले आहे. इतर अनेक मराठी कलाकारांपेक्षा सचिनने वैयक्तिक पातळीवर बर्‍यापैकी चतुरस्त्र प्रगती साधली आहे.
त्याचे महागुरू प्रकरण, स्वतःच्याच चेहर्‍याभोवती आरती ओवाळण्याचे प्रकार चेष्टेचा विषय ठरले. ते नैसर्गिकही आहे. पण तेव्हढे वगळून त्यांनी मिळविलेले यश हे नेत्रदिपकच म्हणावे लागेल.
ह्या चित्रपटातील त्यांची खाँसाहेबांची भूमिका त्यांना देऊन निर्माता/दिग्दर्शकाने चूक तर केली नाही नं? असा विचार माझ्याही मनात आला. त्याला मुख्य कारण सचिन ह्यांची शारीरीक उंची आणि आवाज 'खाँसाहेब' ह्या व्यक्तीरेखेला साजेसा वाटत नाही. पण प्रत्यक्ष चित्रपट पाहूनच मतप्रदर्शन करणे योग्य ठरेल.

अनुप ढेरे's picture

3 Nov 2015 - 11:35 am | अनुप ढेरे

हेच बोल्तो. जनरली थट्टेचा विषय असलेले सचिन, महेश कोठारे, लक्षा आणि अशोक सराफ यांच्याबद्दल खूप आदर आहे. मराठी सिनेमा 'प्रगल्भ' (!) होण्यापूर्वी या लोकांनी निखळ करमणूक केलेली आहे. अजूनही त्यांचे अनेक सिनेमे टीव्हीवर लागले की पाहतोच.

महागुरू म्हणवून घेणं वगैरे प्रकार फाल्तू आहे याच्याशी सहमत.

नाखु's picture

3 Nov 2015 - 12:04 pm | नाखु

आणि अचूक . सरत्या काळात अशी स्वतःच्या हाताने माती करून घेऊन पूर्वीची (जमवलेली) पुण्याई वाया घालवली सचिन ने किमान अशोक सराफ वयानुरूप भूमीका तरी करतायत.

शारूक पण एवढा अभिनय नाही करत. आमची किमान अपेक्षा होती कि म्हाग्रू स्वतः अभिनय करताना गायक जेव्हा गाणे म्हणतो तेव्हाचे त्याचे हावभाव पाहून त्याप्रमाणे हावभाव करतील. किती हलवावं हो माणसानं अंग गाणं म्हणताना!

असो झापडं घेऊन जावं थेटरात असं मत झाल आहे.

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2015 - 3:21 pm | टवाळ कार्टा

तेव्हडाचाच ड्यान्स करायचा चान्स ;)

मोगा's picture

2 Nov 2015 - 10:32 pm | मोगा

साकारण्यासाठी सचिनने लागा चुनरी दागचा राजकुमार किंवा सावन बीता जाए चा मेहमूद वगैरे कॉपी केल्यासारखा वाटतो.

खानसाहेब हे अतीहुशार , मितभाषी , स्थितप्रज्ञ तरीही पाताळयंत्री असे अजीब रसायन होते. पं. वसंतराव , राहूल देशपांडे किंवा सीडीत असलेले पं. लिमये याना तो बाज छान जमला होता.

सीडी आहे त्यात लहानपणीचा सदाशिव सुबोध भावे आहे.

आता मोठा होऊन तोच मोठ्या सदाशिवचा रोल कर्रणार हाही एक नवीन विक्रम आहे.

स्रुजा's picture

2 Nov 2015 - 10:39 pm | स्रुजा

सीडी आहे त्यात लहानपणीचा सदाशिव सुबोध भावे आहे.

आता मोठा होऊन तोच मोठ्या सदाशिवचा रोल कर्रणार हाही एक नवीन विक्रम आहे.

अरे वा, हे माहिती नव्हतं.

यु ट्युबावर आहे.

www.youtube.com/watch?v=X6RSKJURpss

मोगा's picture

2 Nov 2015 - 10:57 pm | मोगा

सीडीत तो राहूल वैद्य आहे.

सुबोध भावे लहानपणी हा रोल करायचा का हे कन्फर्म करायला हवे.

मी सीडी कट्यारच्या प्रयोगावेळीच दीनानाथ पार्ले बाहेर जो स्टॉल होता तिथे घेतली होते.

तो सीडीवाला तसे बोलल्याचे अंधुकसे आठवते. कन्फर्म करायला हवे.

स्रुजा's picture

2 Nov 2015 - 11:21 pm | स्रुजा

ओके ओके, मी पण जरा आंजावर उचकापाचक करते.

सुबोध भावे बहुतेक लहानपणी काम करत नव्हता.
2004 ला नाशिक सीबीएस ला एस टी ने प्रवास करताना भेटला होता. तेव्हा ती शामराव परांजपे वाली सीरियल इटिव्ही मराठी ला लागायची.'या गोजिरवाण्या घरात' त्यात तो काही काळ होता. सिगारेट ओढ़त उभा होता. बोललो. compliment दिली. व्यवस्थित बोलला.

योगी९००'s picture

3 Nov 2015 - 8:43 am | योगी९००

साकारण्यासाठी सचिनने लागा चुनरी दागचा राजकुमार...
तो राजकपुर आहे..

मोगा's picture

3 Nov 2015 - 9:15 am | मोगा

चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद

बोका-ए-आझम's picture

4 Nov 2015 - 11:30 pm | बोका-ए-आझम

तुम्हाला राज कपूर म्हणायचंय का? कारण पडद्यावर हे गाणं राज कपूरनी म्हटलंय. (दिल ही तो है)
सावन बिता जाय मेहमूदवर आहे.(सांझ और सवेरा)

बोका-ए-आझम's picture

4 Nov 2015 - 11:31 pm | बोका-ए-आझम

तुम्हाला राज कपूर म्हणायचंय का? कारण पडद्यावर हे गाणं राज कपूरनी म्हटलंय. (दिल ही तो है)
सावन बिता जाय मेहमूदवर आहे.(सांझ और सवेरा)

मोगा's picture

5 Nov 2015 - 1:24 pm | मोगा

हो

आशु जोग's picture

5 Dec 2015 - 2:47 am | आशु जोग

छोटा सदाशिव, मोठा सदाशिव खाँसाहेब चारुदत्तचने केले आहेत

अभिदेश's picture

3 Nov 2015 - 4:27 am | अभिदेश

मला एक कळत नाही , की १२ तारीख का निवडली ?? त्या दिवशी अजुन एक मोठा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय ंमु.पु.मु.-२ शिवाय सलमानचा आहेच. निदान एक आठवडा जाऊ दिला असत्ता तर दोन्हि मराठी चित्रपटाना चान्गला प्रतिसाद मिळाला असता. मला तरी वाटतय की , ंमु.पु.मु.-२ जास्त भाव खाऊन जाईल , कारण त्याची उत्सुकता जास्त आहे.

संदीप डांगे's picture

7 Nov 2015 - 12:37 pm | संदीप डांगे

मराठी सिनेमाचे लोक प्रदर्शनाच्या तारखांबाबत एवढे का बिनडोक वागतात तेच कळलं नाही आजवर.. मागे तर एकाच दिवशी चार का पाच चित्रपट आले होते. काय मूर्खपणा आहे राव? एक एका शुक्रवारी काढा की बाहेर. सगळेच धंदा करतील.

फारएन्ड's picture

6 Dec 2015 - 8:19 am | फारएन्ड

उलट मला वाटले की कट्यार वाल्यांनी प्रेम रतन च्या रिलीज च्या दिवशी रिलीज करून मोठी डेअरिंग केली, आणि सुदैवाने त्याचा फायदा झाला. असेही ऐकले की दुसर्‍या आठवड्यात काही थिएटर्स नी शोज वाढवले.

बाकी एकमेकांशी स्पर्धा न करता रिलीज करण्याबाबत सहमत. अगदी 'आनंदाचं झाड' आणि 'भाजीवाली सखू, हवालदार भिकू' असतील तर दोघांचा प्रेक्षकवर्ग एकदम वेगळा असल्याने हरकत नाही :). (हे दोन्ही खरेच चित्रपट आहेत)

अर्धवटराव's picture

3 Nov 2015 - 8:46 am | अर्धवटराव

हम्म्म्म.. थोडी धाकधुक आहेच म्हणजे. शोलेमधला अहमद म्हातारा होऊन ए.के हंगलचे कपडे घालुन वावरतोय असं वाटतय.
ट्रेलर तर फस्क्लास वाटतय. सिनेमापण भारी जमला असेल. पण एकुणच मुख्यं पात्रं-पंडीतजी आणि खाँसाहेब- कुडतेमे रहे तो बेहेतर.

बोका-ए-आझम's picture

6 Nov 2015 - 1:13 am | बोका-ए-आझम

शोलेमधला अहमद म्हातारा होऊन ए.के हंगलचे कपडे घालुन वावरतोय असं वाटतय.

फारएन्ड's picture

6 Dec 2015 - 8:19 am | फारएन्ड

शोलेमधला अहमद म्हातारा होऊन ए.के हंगलचे कपडे घालुन वावरतोय असं वाटतय. >> लोल हे खत्रा आहे

सुमीत भातखंडे's picture

3 Nov 2015 - 10:08 am | सुमीत भातखंडे

भाऊंची निवड खटकली. एखादा तगडा नट असायला हवा होता असं वाटतय.
तरीपण चित्रपट थेट्रात जाऊन पाहणार. राहुल देशपांडे आणि शंकर महादेवन यांची आणि इतर गाणी सिनेमाला तारतील असं वाटतय.