माळी पुनेव

ऊध्दव गावंडे's picture
ऊध्दव गावंडे in जे न देखे रवी...
26 Oct 2015 - 10:44 pm

माळी पुनेव!

माळी पुनेवचा चंद्र
जशी पन्हावली गाय
धारा लागल्या दुधाच्या
भिजते धरनी माय

चांदन्याचं वावरातं
डोले पीक हिर्वं गारं
पाना पानाऊनं झरे
गोळं अमृताची धारं

कन्सा कन्सा वरं झाली
चांदन्याची आबादानी
कन्सातला दाना कसा
हासे तान्ह्या पोरा वानी

नयतुर्न्या पोरी वानी
चंद्र हरखूनं जाये
वायत्या पान्यातं नदीच्या
रूपं निरखूनं पाये

धुंद झाली चांदन्यानं
मैना फूगळी धरते
धरनीच्या मळक्यातं
रई गर्गरं फिरते

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Oct 2015 - 10:46 pm | प्रचेतस

लयबद्ध.

आतिवास's picture

26 Oct 2015 - 11:06 pm | आतिवास

कविता आवडली.

ऊध्दव गावंडे's picture

26 Oct 2015 - 10:49 pm | ऊध्दव गावंडे

धन्यवाद !

फारच छान कविता! आवडली.

ऊध्दव गावंडे's picture

26 Oct 2015 - 11:04 pm | ऊध्दव गावंडे

आभारी आहे

अभ्या..'s picture

26 Oct 2015 - 11:16 pm | अभ्या..

अहाहाहा. अप्रतिम

धरनीच्या मळक्यातं
रई गर्गरं फिरतेधरनीच्या मळक्यातं
रई गर्गरं फिरते

काय ती शब्दकळा. जणू नजर लागल अशी कलदार.

उध्दवराव. माय सरसोती प्रसन्न हाये तुमच्यावर बर्का.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Oct 2015 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा

कन्सा कन्सा वरं झाली
चांदन्याची आबादानी
कन्सातला दाना कसा
हासे तान्ह्या पोरा वानी

केवळ अप्रतिम रुपक

चांदणे संदीप's picture

26 Oct 2015 - 11:30 pm | चांदणे संदीप

खूपच छान लिहिली आहे! आवडली!

अवांतर : (खरं तर नको इतक्या छान कवितेत...पण आठवल आहे तर...) पुलंची ती पाहुण्यांना 'ळ' चा 'ड' करून 'फडे' खायला सांगणा-या मुलाची कथा आठवली!

किसन शिंदे's picture

27 Oct 2015 - 12:02 am | किसन शिंदे

अहाहा! केवळ क्लासच

दमामि's picture

27 Oct 2015 - 6:29 am | दमामि

वा!

ऊध्दव गावंडे's picture

27 Oct 2015 - 6:47 am | ऊध्दव गावंडे

धन्यवाद मित्रांनो!

चाणक्य's picture

27 Oct 2015 - 7:25 am | चाणक्य

एकदम लयीत आहे. कुठली भाषा आहे ही? अहिराणी? (अज्ञानाबद्दल क्षमस्व)

ऊध्दव गावंडे's picture

27 Oct 2015 - 10:32 pm | ऊध्दव गावंडे

वर्हाडी

प्रचेतस's picture

27 Oct 2015 - 10:43 pm | प्रचेतस

वर्हाडी भाषा म्हटले की गोनीदांची 'पूर्णामायची लेकरं' डोळ्यांसमोर येते. अफाट सुंदर आन तितकीच गोड भाषा.

बोका-ए-आझम's picture

27 Oct 2015 - 7:42 am | बोका-ए-आझम

माळी पुनेवचा चंद्र
जशी पन्हावली गाय
धारा लागल्या दुधाच्या
भिजते धरनी माय

आणि

नयतुर्न्या पोरी वानी
चंद्र हरखूनं जाये
वायत्या पान्यातं नदीच्या
रूपं निरखूनं पाये

हे तर अफलातून!

नाखु's picture

27 Oct 2015 - 10:33 am | नाखु

कन्सा कन्सा वरं झाली
चांदन्याची आबादानी
कन्सातला दाना कसा
हासे तान्ह्या पोरा वानी

आबादानी लई दिसानी भेटला हा शब्द!!

साक्षात दंडवत शब्दकळेसाठी.......

नकाश्यातच गाव शिल्लक असलेला

नाखुस कांक्रीट जंगलवाला

शिव कन्या's picture

27 Oct 2015 - 6:56 pm | शिव कन्या

चित्रदर्शी.

जव्हेरगंज's picture

27 Oct 2015 - 7:01 pm | जव्हेरगंज

सुंदर!

राही's picture

27 Oct 2015 - 7:09 pm | राही

बहिणाबाई चौधरींच्या 'धरित्रीच्या कुशीमध्ये बींयबियाणी निजली' ची आठवण झाली.
'टाया वाजविती पानं, दंग देवाच्या भजनी
जशी करती करोना, होऊ दे रे आबादानी'
कविता आवडली.

ऊध्दव गावंडे's picture

27 Oct 2015 - 10:40 pm | ऊध्दव गावंडे

येथे करं माझे जुळती...

धन्यवाद !

आनंद कांबीकर's picture

27 Oct 2015 - 11:34 pm | आनंद कांबीकर

.

फार सुंदर आहे कविता.आवडलीच.दिवाळी अंकातही वाचायला आवडेल तुमची कविता.

ऊध्दव गावंडे's picture

28 Oct 2015 - 11:09 pm | ऊध्दव गावंडे

सकारात्मक प्रतिसाद म्हणजे नवनिर्मिती ला प्रोत्साहन
(अर्थात मुळात निर्मितीचा दर्जा ऊत्तम असेल तर )

thanks

अन्या दातार's picture

28 Oct 2015 - 11:55 pm | अन्या दातार

कंसातले कॅव्हेट टाकलेत हे फार छान.
कविता लयबद्ध आणि सुंदर हेवेसांनल

रातराणी's picture

29 Oct 2015 - 1:20 am | रातराणी

सुरेख!

स्वप्नज's picture

29 Oct 2015 - 6:45 am | स्वप्नज

अप्रतिम. .