बाबा रामदेवांनी भ्रष्टाचार विरुद्ध लढा पुकारला, सरकार विरुद्ध एका रीतीने युद्धच पुकारले. याचे परिणामहि त्यांना भोगावे लागले. सर्व सरकारी यंत्रणा हात धुऊन पतंजलीच्या मागे पडली. विभिन्न सरकारी विभागांच्या शेकडोंच्या संख्येने नोटीसा, कोर्ट केसेस, इतकेच नव्हे तर अनेक वेळा पतंजलीचे अकाऊंट सुद्धा सीज केल्या गेले. आज एका वाहिनी वर एका कार्यक्रमात, एका पत्रकाराने आचार्य बाळकृष्ण यांना विचारले, त्या वेळच्या विपरीत परिस्थितीतहि पतंजलीची ‘दिन दुनी रात चौगुनी’ उन्नति कशी झाली. याचे रहस्य काय?
आचार्य म्हणाले तुम्हाला एका कुत्र्याची गोष्ट सांगतो. फार पूर्वी इंद्रप्रस्थ नगरीत एक कुत्रा राहत होता. त्याची इच्छा हरिद्वार येथे जाऊन गंगेत स्नान करायची होती. त्यांनी आपली इच्छा आपल्या बायकोला बोलून दाखविली. त्याच्या बायकोनेहि त्याला सहर्ष हरिद्वारला जाण्याची परवानगी दिली. हरिद्वार इंद्रप्रस्थ पासून २५० किमी दूर आहे. जायला ३ दिवस आणि यायला ३ दिवस असे किमान सहा दिवस लागणार होते. सोबत सहा दिवसाची शिदोरी आपल्या गळ्यात टांगून त्या कुत्र्याने दुसर्या दिवशी सूर्य उजाडताच हरिद्वारच्या दिशेने प्रयाण केले.
आपल्या सर्वांना माहित आहे, प्रत्येक कुत्र्याचा एक इलाका असतो. आपल्या इलाक्यात कुणा दुसर्या टोळीच्या कुत्र्याला तो प्रवेश करू देत नाही. जसे त्या कुत्र्याने आपला इलाका ओलांडला आणि दुसर्या कुंत्र्यांच्या इलाक्यात प्रवेश केला. तेथील कुत्रे त्याच्या मागे लागले. त्या कुत्र्या समोर एकच प्रश्न होता, परत फिरावे कि हरिद्वारच्या दिशेने यात्रा सुरु ठेवावी. कुत्र्याने पुढे जाण्याच्या दृढनिश्चय केला. जीव मुठीत घेऊन दुसर्या कुत्र्यांना चुकवत तो हरिद्वारच्या दिशेने धावत सुटला. धावत-धावत तो तिसर्या कुत्र्यांच्या इलाक्यात पोहचला, तेथील कुत्रे हि त्याच्या मागे धावले. अश्या रीतीने अनेक इलाक्यांच्या कुत्र्यांना चुकवत, धावत-धावत, तो ३ तासातच हरिद्वारला जाऊन पोहचला आणि गंगेत उडी टाकली. गंगेत स्नान केल्यावर पाहतो तर काय, तेथील कुत्रे त्याच्या स्वागतास सज्ज होते. पुन्हा सर्वशक्तीनिशी तो इंद्र्प्रस्थच्या दिशेने धावत सुटला. सर्यास्तापूर्वीच तो घरी देखील पोहचला. त्याच्या बायकोने त्याला विचारले, स्वामी तुम्ही हरिद्वारला जाणार होता, अजून येथेच कसे? तो म्हणाला, मी हरिद्वारला जाऊन सुद्धा आलो. तिच्या संतुष्टीसाठी सोबत आणलेले गंगाजळहि तिला दाखविले. कुत्र्यांच्या मेहरबानीने त्याने सहा दिवसांचा प्रवास एकाच दिवसात पूर्ण केला.
जशी मदत दुसर्या कुत्र्यांनी ६ दिवसांचा प्रवास एका दिवसात पूर्ण करण्यास त्या कुत्र्याला मदत केली तसेच सरकारच्या मेहरबानी(?) मुळे पतंजलीचे उत्पाद घरा-घरात पोहचले.
प्रतिक्रिया
10 Oct 2015 - 10:55 pm | तर्राट जोकर
मस्त......
11 Oct 2015 - 2:43 am | गामा पैलवान
विवेकपटाईत,
मोदींची अशीच परिस्थिती होती. गोधरा दंगलींनंतर दहाबारा वर्षे सेक्युलर प्रसारमाध्यमांनी त्यांची यथेच्छ बदनामी केली. कुठल्यातरी किरकोळ नगरपालिका निवडणुकीत उगीच गुजरात दंगली ओढून ताणून आणायच्या! त्यातून मोदींची देशभर फुकट प्रसिद्धी होतेय याचं भान कुणालाच नव्हतं. साहजिकच त्याचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलं. त्याचा त्यांनी बरोब्बर फायदा उठवला.
वस्तुत: शिवराजसिंह चौहान आणि नीतिशकुमार हे दोघेही तीन वेळा निवडून येऊन मुख्यमंत्रीपदी राहिले आहेत. आपापल्या राज्याच्या विकासाच्या बाबतीत दोघांचं कर्तृत्व मोदींच्या जवळपास आहे. मात्र मोदी बदनामीयोगे जसे घराघरात पोहोचते झाले, तसं या दोघांना शक्य झालं नाही. सेक्युलर प्रसारमाध्यमांचे नावडते नग असणे एकंदरीत फायद्याचे आहे. :-)
आ.न.,
-गा.पै.
11 Oct 2015 - 4:43 am | रमेश आठवले
गा. प.
आपण छान मांडला मुद्दा आहे. पटल
11 Oct 2015 - 12:22 pm | गामा पैलवान
रमेश आठवले,
प्रशंसेबद्दल धन्यवाद. :-)
या मुद्द्याचे मूळ जनक भाऊ तोरसेकर नामे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी 'मोदीच का' हे पुस्तक २०१३ मध्ये प्रकाशित केले होते. त्यात त्यांनी याचा उहापोह केला आहे. पुस्तक मी वाचले नाहीये. त्यांच्या अनुदिनीवर यासंबंधी एक मालिकाच लिहिली होती. 'इंदिराजी ते नरेंद्र मोदी' असे गुगलून पाहावे.
आ.न.,
-गा.पै.
11 Oct 2015 - 12:36 pm | सतिश गावडे
भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग पूर्वी (केंद्रात आणि राज्यात सत्ताबदल होण्यापूर्वी) आवर्जून वाचत असे. आता कुण्या एका विशिष्ट विचारसरणीचा उदो उदो असतो त्यामुळे वाचावेसे वाटत नाही.
11 Oct 2015 - 5:30 am | कंजूस
परवाच पतंजली आणि बिगबजार,फ्युचर्स ग्रुपचा करार झाला याबद्दल आहे ना? एक हजार कोटीचं लक्ष्य ठरलं आहे विक्रीचं या वर्षी.देसी घीचा वाटा अधिक आहे.
11 Oct 2015 - 6:44 am | dadadarekar
म्यागीवर बंदी आली मी तेंव्हाच लिहिले होते. रामदेवबाबाचे नूडल्स बाजारात येत आहेत.
11 Oct 2015 - 9:56 am | विवेकपटाईत
आस्था चेनेल वर २-३ वर्षांपासून आटा मेगी लवकर बाजारात आणू असा प्रचार होत होता. पतंजली मध्ये आटा मेगी वर काम सुरु होते.
बाकी सरकारी नियम आम्ही पाळत नसतो, हे MNCचे धोरण असते, ग्राहकांना आम्ही विष हि खाऊ घालू शकतो, आमची मर्जी. (थंडा पेय मध्ये आम्ही किती हि pestiside, incectiside घालू, तुम्ही कोण आम्हाला विचारणारे).
11 Oct 2015 - 10:16 am | असंका
आटा मॅगी? पतंजली ची मॅगी!!!!
त्यांचं मार्केटच नाही तर नावही हवंय का?
11 Oct 2015 - 9:29 am | मार्मिक गोडसे
रामदेवबाबाने योग,प्राणायम,आयुर्वेदिक उपचार 'आस्था' वाहिनीच्या माध्यमातून घराघरात पोहोचवले. देशभर निवासी शिबिरांमुळे लोकांना योगाचे व प्राणायमाचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले. शिबिरात योग व प्राणायमाबरोबर स्वदेशीचा प्रचार केला, काळा पैसा व भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला, जे आत्तापर्यंत कोणीही केले नव्हते ते काम रामदेवबाबांनी एकट्याने करुन दाखविले. ज्या लोकांना रामदेवबाबाचे विचार् व आचार पटले ते त्याचे समर्थक बनले, देशात फार मोठ्या प्रमाणात रामदेवबाबाचे चाहते तयार झाले.
रामदेवबाबा अगोदरच प्रसिद्ध झाला होता, सरकारी यंत्रनांच्या विरोधी भुमिकेमुळे रामदेवबाबाची प्रगती झाली हे चुकीचे आहे.पतंजलीची उत्पादने आता शहरात, गावांत उपलब्ध आहेत, त्यांच्या दर्जामुळे व किमतीमुळे ती विकली जातात. पतंजलीच्या उत्पादनांमुळे बिग बाजारलाच अधिक फूटफॉलचा फायदा होईल.
11 Oct 2015 - 9:45 am | विवेकपटाईत
आचार्य बाळकृष्ण यांनी गमतीने सांगितलेली गोष्ट आहे. यात तथ्य एकच आहे, आपण जे करत आहोत त्या वर आपण ठाम असाल तर कुणीही आपल्याला थांबू शकत नाही.
11 Oct 2015 - 10:40 am | मार्मिक गोडसे
आचार्य बाळकृष्ण गमतीने म्हणाले असतील तर ठिक आहे,परंतू त्यांनी
असे म्हणायला नको होते.
11 Oct 2015 - 7:18 pm | विवेकपटाईत
मार्मिक गोडसे साहेब, काही तरी गल्लत झाली आहे
सरकारची मेहरबानी (?) - त्या दरम्यान पतंजली वर शेकडोंच्या संख्येने नोटीसा, कोर्ट केसेस इत्यादी, आचार्यांना जेल मध्ये सुद्धा टाकले. इतर कुठली संस्था असती तर तिचे तीन तेरा झाले असते. पण या सर्वांमुळे 'मुफ्त प्रचार' पतंजलीला मिळाला. एवढेच म्हणणे होते.
बरेच वर्षांपूर्वी कदाचित 'अभिजित' या मराठी मासिक विको वज्रदंती बाबत एक लेख वाचला होता. MNCच्या दबावात येऊन, सरकारी खात्यांनी त्यांच्यावर हि कारवाई केली होती. सर्वोच्च न्यायालयापर्यंत केस गेली. कोट्यावधींचे नुकसान झाले होते.
11 Oct 2015 - 10:14 pm | तर्राट जोकर
विको आणि पतंजली ची तुलना प्रथम चुकीची आहे. विको ही एक पारंपरिक कंपनी आहे. तिच्या आपल्या क्षमता-उणीवा आहेत. रामदेवबाबांनी आधी माहोल बनवला, आपल्यापाठी मोठी जनता उभी केली, त्यातून अनेक अप्परसर्किट कॉन्टॅक्ट्स तयार झाले. पतंजली हे एक साम्राज्य होण्यात हे योग-शिवीर-टीवी-दर्शन-जनता-जनार्दन मोठं ब्याकग्राउण्ड आहे. तुम्ही पतंजलीला फार लहान-साळसूद समजताय हीच एक गल्लत असू शकते. आज अशी कामे करणारे फक्त पतंजली वा रामदेवच नाही, आसाराम वैगेरे माहात्मेही बरीच वर्षे ही कामे करत आहेत. राजीव दिक्षित यांच्यासारख्या लोकांना मनगढंत कहान्या सांगून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एमएनसीची उत्पादने कशी वाईट (म्हणजे स्वदेशीच कशी चांगली) असे अनेक भाषणांमधून या उत्पादनांसाठी लोकांमधे सकारात्मक (अढळ) अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा?) तयार केली. जेवढं दिसतं तेवढं कधीच नसतं म्हणून प्रतिसाद प्रपंच...
तळटीपः आपुन कोंच्याइ धंदेवाल्याच्या इरोदात नै बरंका.. कोनीबी इतं धंदे कर्याले मोकया हाय... ज्याले ज्यमते तो च्यमकते... बाकी चे बसते टीवीच्या चौकोनाइत बकबक करत....
12 Oct 2015 - 9:33 am | रिम झिम
फारच राग दिसतोय तुमचा स्वदेशी गोष्टींवर. कारण कळेल काय??
11 Oct 2015 - 9:34 am | जव्हेरगंज
आवडेश!
11 Oct 2015 - 10:02 am | नूतन सावंत
पातान्जलीची उत्पादने खूप चांगली आहेत.विशेषतः गाईचे तूप.
12 Oct 2015 - 12:15 pm | वेल्लाभट
भांडी घासायचा साबण क्लास आहे.
11 Oct 2015 - 10:26 am | पैसा
मस्त कथा!
11 Oct 2015 - 10:59 am | चांदणे संदीप
पटाईतकाका छान लेख! आवडला!
Sandy
11 Oct 2015 - 7:21 pm | dadadarekar
आता ह्यो कुत्रा घरी कवा जाणार ?
11 Oct 2015 - 8:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
डुकरांची नरडी फाडल्याशिवाय इमानी कुत्रा घरी जात नाही चिंता नसावी.
11 Oct 2015 - 9:58 pm | तर्राट जोकर
काल्यापैश्यावाल्या डुकरांची नरडी फाडायची डरकाळी ह्या इमानि कुत्र्यानी फोडली होती.... आता कुटं शेपूट घालून बसलंय याचीच चिंता जस्त हाय आमास्नी....
12 Oct 2015 - 10:29 am | dadadarekar
कवा कवा हे बेणं बायकांचा दुपट्टा घालून पळतं म्हणे.
12 Oct 2015 - 7:55 pm | विवेकपटाईत
जीव वाचविण्यासाठी पाळावेच लागते. म्हंटले आहे 'चालत राहा चालत राहा' जो थांबला तो संपला.
12 Oct 2015 - 10:24 pm | भैड्या
धुवत राहा धुवत राहा धू.
11 Oct 2015 - 8:22 pm | जातवेद
अर्थबोध गेला उडत. पयला हे सांगा ते कुत्रे पुर्ण शाकाहारी होते का? नसल्यास त्याला मंदिरात प्रवेश मिळालाच कसा? यावर प्रत्येक पुढारीची प्रतिक्रीया हवीये मला!
11 Oct 2015 - 9:53 pm | विकास
रोचक किस्सा. फक्त वर म्हणल्याप्रमाणे, जरी गोष्ट असली तरी त्यात कुत्र्याची तुलना रुचली नाही!
बर्याचदा नो पब्लीसिटी इज बॅड पब्लिसिटी हे वास्तव असते. रामदेवबाबा आणि वर प्रतिसादात आल्याप्रमाणे मोदींच्या बाबतीत देखील ते खरे ठरले आहे. अर्थात असे म्हणून त्यांचे महत्व कमी होत नाही. आधी आडात होते म्हणूनच पोहर्यात येत आहे. :)
11 Oct 2015 - 10:12 pm | Sanjay Uwach
कोल्हापुरातील इचलकंरजी सारख्या लहान गावात १९७० च्या दरम्यान श्री .शंकर दाजी कुलकर्णी या यंत्र भास्काराने " मीरा " या नावाची चार चाकी मोटार कार बनवली होती. या गाडीची तुलना सद्ध्या असणाऱ्या नयनो कारशी केली जात आहे . निव्वळ मारुती सुझीकीने त्या काळी भारतीय बाजार पेठेत केलेला प्रवेश , त्याला असणारा राजकीय वरदहस्त व मराठी माणूस काय कार बनवणार ? हि दुर्दैवी मानसिकता असल्या मुळे केंद्र शासनाने त्यांची मंजुरी नाकारली . ह्या सद्गृहस्थांनी त्या काळी ह्या गाडीच्या निर्मिती साठी पन्नास लाख रुपये त्या काळी खर्च केले होते . निदान आतातरी भारत निर्मित गोष्टीचे स्वागत हे झालेच पाहिजे तर खऱ्या अर्थाने "मेड इन इंडिया " हि संकल्पना साध्य होईल .(गुगल वर "शंकर दाजी कुलकर्णी " मीरा मोटार या वर माहिती उपलब्ध )
11 Oct 2015 - 10:32 pm | कैलासवासी सोन्याबापु
सर्व सरकारी यंत्रणा हात धुऊन पतंजलीच्या मागे पडली.
सरकारी यंत्रणेला बाकी शुन्य कामे उरली होती काय?
12 Oct 2015 - 10:27 am | अमृत
पतंजलीचे बहुतेक उत्पादने वापरलीत. सगळीच छान आहेत.
12 Oct 2015 - 11:51 am | द-बाहुबली
हम्म एका कुत्र्याची गोष्ट आवडली.
तुम्ही मात्र त्यांना(पतंजलिला) मिपावर वाघाप्रमाणे मदत करताय हे मी आचार्य बाळकृष्ण भेटले तर त्यांच्या सगोष्ट कानावर घालेन. ;)
13 Oct 2015 - 7:54 pm | विवेकपटाईत
मी कुणाचा प्रचार करत नाही आहे, गोष्ट आवडली आणि त्या मागची भावना वाचकांसमोर पोहचविण्याचा प्रयत्न होता.
14 Oct 2015 - 1:07 am | दिवाकर कुलकर्णी
कुल्को इचलकरंजीकर यांची मीरा कार मी कोल्हापूरात मिरजकर तिकटी ला पाहिली होती,
त्या परिसरात कोल्हापूर ला रहात,त्या नी एक टेलिस्कोप पण तयार केला होता चंद्रावरचे डाग त्यातून
पाहाता येत असत.