हाऊ मेनी कॉलम्स डिड ही गेट?

अजिंक्य विश्वास's picture
अजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं
7 Oct 2015 - 10:37 pm

’How many columns did he get?’

व्हीनस - २००६

ऑस्कर कधी कधी खूप कद्रूपणे वागते. अर्थात हा कद्रूपणा ऑस्करची उंची कमी करतो. त्या व्यक्तीची नाही , ज्याला इतकी नामांकने मिळूनदेखील एकही ऑस्कर कधी मिळाले नाही. (नाही म्हणायला, लाईफ टाईम अचिव्हमेंट देऊन आपला खुजेपणा तेवढा दाखवला. "Always a bridesmaid, never a bride - my foot!" - ही त्याची ७५व्या ऑस्करच्या वेळेस अ‍ॅव्हॉर्ड मिळतानाची प्रतिक्रिया!)

पीटर ओ’टूल

’लॉरेन्स ऑफ अरेबिया’चा हा नायक इतका देखणा होता की, नोएल कॉवर्ड त्याला गंमतीत म्हणाला होता, ’तू जर अजून देखणा असतात तर ती फिल्म ’फ्लॉरेन्स ऑफ अरेबिया’ म्हणून देखील चालली असती.’
शांत करारी आवाज, चमकदार निळे डोळे आणि प्रभावशाली देखणेपण घेऊन आलेला नट अभिनयातदेखील तोडीस तोड होता. त्याच्या गाजलेल्या चित्रपटांची नावे जरी अशीच आठवत गेलो, तर तो डोळ्यांसमोर सहज उभा राहतो. लॉरेन्स ऑफ अरेबिया, बेकेट, हाऊ टू स्टील अ मिलीयन, लायन इन्‌ द विन्टर, द रूलिंग क्लास, व्हॉटस्‌ न्यू पुसीकॅट, गुडबाय, मि. चिपस्‌, मर्फीज्‌ वॉर अशी कित्येक नावे सहज डोळ्यांसमोर येतात. तशी त्याची ओळख १० वर्षांपूर्वी मी कॉलेजमध्ये नुकताच गेलो होतो, तेव्हा झाली होती. ’लॉरेन्स ऑफ अरेबिया’ आणला होता आणि पहिली ५ मिनिटस्‌ पाहून ठेवून दिला होता, इतकीच. तसा तो इतर चित्रपटातून देखील दिसत आणि जाणवत होता, फक्त तेवढा जवळचा नव्हता. ट्रॉय, स्टारडस्ट, रॅटॅटुई इ. ३ वर्षांपूर्वी त्याचा ’हाऊ टू स्टील अ मिलीयन’ पाहिला आणि हा नट कमालीचा लक्षात राहिला. तसे चित्रपट पाहताना नट उजवा आहे की, डावखोरा हेच चाचपण्याचा जास्त प्रकार होतो, आणि ह्या बाबतीतसुद्धा त्याने मला लक्ष देऊन पाहण्यास भाग पाडले. ( कॅथलिक असल्यामुळे लहानपणी नन्सने त्याला मारून मारून डावखोरेपणा घालवायचा प्रयत्न केला होता). चित्रपट पाहण्याचे खरे कारण ’रोमन हॉलिडे’ ची ऑड्रे हेपबर्न होते हे निराळे. पण त्यानंतर झपाटल्यासारखे त्याचे बेकेट, लायन इन्‌ द विंटर, लॉरेन्स ऑफ अरेबिया, कॅलिगुला, व्हीनस, द रुलिंग क्लास असे चित्रपट पाहिले. इतके सुंदर चित्रपट देऊनही त्याचे आणि ऑस्करचे नेहमीच व्यस्त प्रमाण राहिले. आजपर्यंत ८ वेळा नामांकन होऊन देखील त्याला एकदाही ऑस्कर मिळाले नाही. त्याच्या ’बेकेट’ मधील सहकलाकार , मित्र आणि ७ वेळा ऑस्कर नामांकने मिळूनदेखील ऑस्कर न मिळालेल्या रिचर्ड बर्टन सारखेच.
हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, १४ डिसेंबर २०१३ ला त्याचे निधन झाले. माझी बसलेली दातखीळ आज कुठे निघाली , तेव्हा त्याच्या आठवणीत हे लिहिण्याचा प्रपंच मांडला आहे. इतके देखणे टॅलेंट विस्मृतीत कधीच जाणार नाही, पण माझ्यासारखी आजच्या पीढीला त्याची ओळख व्हावी इतकीच छोटी इच्छा आहे, बस!

तसेही ’व्हीनस’ मध्ये मॉरिस मेल्यावर त्याचे मित्र न्यूजपेपर मध्ये आलेला त्याचा फोटो आणि बातमी पाहात असतात, तेव्हा एक मित्र विचारतो, ’ किती कॉलम मिळाले त्याला?’
आणि तिथलीच वेट्रेस मॉरिसच्या मित्राला विचारते, ’तुमचा मित्र आज आला नाही?’
मित्र न बोलता आलेला हुंदका आवरत तिला त्याची पेपरात आलेली बातमी दाखवतो.
’गॉड, ही वॉज गॉर्जस’ . ती उद्गारते. :)


---------------------------------------------------------
बहुतांश माहिती स्त्रोत- IMDB.COM

कलाचित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

वगिश's picture

8 Oct 2015 - 9:43 am | वगिश

छान माहिती.

असंका's picture

8 Oct 2015 - 9:49 am | असंका

सुरेख!!!

धन्यवाद!!

अन्या दातार's picture

8 Oct 2015 - 10:17 am | अन्या दातार

त्रोटक वाटला. लॉरेन्स ऑफ अरेबिया बघायचा राहून गेलाय. रोमन हॉलिडे तर अफलातूनच आहे. ऑड्री हेपबर्नसाठीच अर्थात बघितला गेला; पर्यायाने नायकाकडे फार लक्ष गेले नाही.

असंका's picture

8 Oct 2015 - 10:33 am | असंका

रोमन हॉलिडे चा उल्लेख अनुषंगिक आहे...त्याचा हिरो ग्रेगरी पेक आहे. पीटर ओ टुल त्यात नसावा....

आणि असे लेख त

अजिंक्य विश्वास's picture

8 Oct 2015 - 8:52 pm | अजिंक्य विश्वास

त्रोटक आहे , कारण त्याच्या अभिनयाबद्दल लिहायला वाव ठेवला आहे. बेकेट, आणि लायन इन्‌ द विंटर येईलच थोड्या दिवसात.
रोमन हॉलिडे मधली ऑड्रे हेपबर्न इतकाच ग्रेगरी पेकसुद्धा प्रभावी होता.
त्यात पीटर ओ’टूल नाहिये.
जाता जाता अवांतर- ऑड्रे हेपबर्न रोमन हॉलिडेमध्ये जेवढी सुंदर दिसली आहे, तेवढी सुंदर ती मला फक्त सॅब्रीना मध्ये दिसली होती. बाकी कुठल्याच नाही.

अभिजितमोहोळकर's picture

8 Oct 2015 - 11:38 am | अभिजितमोहोळकर

पीटर ओ टूलच्या कुठल्या कुठल्या भूमिका नामांकनं मिळालेल्या होत्या ते पाहू, सोबत अन्य नामांकन मिळालेले अभिनेते आणि विजेत्याचं नाव. १९६४, १९६८ आणि १९६९ वगळता अन्य वर्षी समोर जबरदस्त ताकदीचे आणि विविध छटा असलेल्या भूमिका साकारणारे नट होते. मला स्वतःला हॅरिसन आणि जॉन वेन फारसे भावले नाहीत, चार्ली विषयी फार काही माहित नाही.
1962
O’Toole- Lawrence of Arabia | Gregory Peck – To Kill a Mockingbird - winner
Burt Lancaster – Birdman of Alcatraz | Jack Lemmon – Days of Wine and Roses
Marcello Mastroianni – Divorce Italian Style

1964
O’Toole - Becket | Rex Harrison – My Fair Lady - winner |
Richard Burton – Becket| Anthony Quinn – Zorba the Greek
Peter Sellers – Dr. Strangelove

1968
O’Toole - The Lion in Winter | Cliff Robertson – Charly - winner
Alan Arkin – The Heart Is a Lonely Hunter | Alan Bates – The Fixer
Ron Moody – Oliver!

1969
O’Toole - Goodbye, Mr. Chips | John Wayne – True Grit - winner
Richard Burton – Anne of the Thousand Days| Dustin Hoffman – Midnight Cowboy
Jon Voight – Midnight Cowboy

1972
O’Toole - The Ruling Class | Marlon Brando – The Godfather (declined) - winner
Michael Caine – Sleuth | Laurence Olivier – Sleuth
Paul Winfield – Sounder

1980
O’Toole - The Stunt Man | Robert De Niro – Raging Bull -winner
Robert Duvall – The Great Santini | John Hurt – The Elephant Man
Jack Lemmon – Tribute

1982
O’Toole - My Favorite Year | Ben Kingsley – Gandhi - winner
Dustin Hoffman – Tootsie | Jack Lemmon – Missing - winner
Paul Newman – The Verdict

2006
O’Toole - Venus | Forest Whitaker – The Last King of Scotland
Leonardo DiCaprio – Blood Diamond | Ryan Gosling – Half Nelson
Will Smith – The Pursuit of Happyness

अजिंक्य विश्वास's picture

8 Oct 2015 - 8:47 pm | अजिंक्य विश्वास

७२ चे वर्ष तर खूप धूमधामीचे गेले. मी स्ल्यूथबद्दल लिहिणारच आहे. पण त्याला लायन इन्‌ द विंटरचे मिळायलाच पाहिजे होते, ह्या ठाम मताचा मी आहे. बाकी १९६२, १९८० आणि १९८२ टफ होतेच.
स्ल्यूथ, बेकेट, लायन इन्‌ द विंटर हे स्वतंत्र लेखाचे विषय आहेत. :)

बोका-ए-आझम's picture

8 Oct 2015 - 10:56 pm | बोका-ए-आझम

ग्रेगरी पेक - टू किल अ माॅकिंगबर्ड, मार्लन ब्रँडो - गाॅडफादर, राॅबर्ट डी नीरो - रेजिंग बुल आणि बेन किंग्जले - गांधी - हे सोडले तर बाकी वेळा पीटर ओ टूलला आॅस्कर मिळायला खरंच हरकत नव्हती. बेकेट साठी तर ते मिळायलाच हवं होतं. असंच दुर्दैव दिग्दर्शकांमध्ये आल्फ्रेड हिचकाॅकचं आहे. सायको, रिअर विंडो, व्हर्टिगो, थर्टीनाईन स्टेप्स, डायल एम फाॅर मर्डर, नाॅर्थ बाय नाॅर्थवेस्ट - हे चित्रपट गाजले. अँथनी पर्किन्ससारख्यांना आॅस्करही मिळालं पण हिचकाॅकला एकही आॅस्कर मिळालं नाही.

अस्वस्थामा's picture

8 Oct 2015 - 11:10 pm | अस्वस्थामा

हिचकॉक सारखे लोक ऑस्करपेक्षा लै मोठ्ठे आहेत हो. आता मला सांगा २००२/०३ अथवा १९९४ साली कोणाला ऑस्कर मिळालेले असेल त्यांची नावे लोकांच्या लक्षात तरी आहेत काय? पण हिचकॉकला बाप माणूस मानतातच ना अजून पण. :)

राही's picture

10 Oct 2015 - 3:31 pm | राही

बेकेट्विषयी अगदी सहमत.

अभिजितमोहोळकर's picture

8 Oct 2015 - 11:41 am | अभिजितमोहोळकर

Charly Gordon (Cliff Robertson), who has an IQ of 69, is constantly derided by his boss and fellow employees at the bakery where he works. His efforts to read and write prove fruitless. But when Dr. Straus (Lilia Skala) offers Charly an opportunity to participate in a radical medical experiment, he becomes a certified genius. The newly educated Charly develops feelings for his teacher, Alice Kinian (Claire Bloom), but their happiness is threatened by an unforeseen complication.

अर्थात वरील यादी आणि हा तपशील आंतरजालावरून साभार

तुषार काळभोर's picture

8 Oct 2015 - 1:40 pm | तुषार काळभोर

शम्मी कपूरची आठवण झाली.

तर्राट जोकर's picture

8 Oct 2015 - 2:03 pm | तर्राट जोकर

तिकडच्या ष्टाइल इकडे कॉपी करणं पार जुनं है....!

तुषार काळभोर's picture

9 Oct 2015 - 10:27 am | तुषार काळभोर

शम्मी सारखा राजबिंडा हिरो दुसरा नाही बॉलिवूडात.

विजुभाऊ's picture

10 Oct 2015 - 8:45 am | विजुभाऊ

शम्मी सारखा राजबिंडा हिरो दुसरा नाही बॉलिवूडात.

एक सजेशन. राजबिंडा या ऐवजी राजधोंडा म्हंटले तर योग्य होईल

तुषार काळभोर's picture

10 Oct 2015 - 2:49 pm | तुषार काळभोर

shammi

राही's picture

10 Oct 2015 - 3:40 pm | राही

शम्मी देखणा होताच तरी शशी अधिक देखणा होता. पण शम्मीची एनर्जी शशीत नव्हती. शिवाय तो मेन-स्ट्रीम किंवा समांतर-प्रायोगिक या कल्पनांमध्ये गोंधळला. ना धड धंदेवाईक, ना धड प्रायोगिक. त्याची अशी शैली त्याला डेवलप करता आली नाही.
शम्मीकपूरचा ओवर-मेक्अप त्या काळच्या ईस्टमन किंवा गेवा किंवा टेक्नि जो काही होता त्या कलरमध्ये अजिबात चांगला दिसत नसे. ते रंगवलेले ओठ...खालच्या फोटोतही आहेतच.

मदनबाण's picture

9 Oct 2015 - 4:27 am | मदनबाण

छान माहिती.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अधीर मन झाले,मधुर घन आले... :- निळकंठ मास्तर