टीव्ही वरची धूळ

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जे न देखे रवी...
4 Oct 2015 - 10:11 am

टीव्ही वरची धूळ
नेहमीच्या भांडणाला कारण मिळाल
पण देव-दयेने त्याच टीव्हीतल्या सासू-सुना योग्यवेळी भांडल्या
अन त्या रोजच्या भांडणात
आमच भांडण विरलं

तीच वाढत वजन
आमच्या भांडणाला पुन्हा एक कारण बनल
पण त्याच वेळी पिझ्झा हट वाल्यांची
फ्री होम डिलिव्हरी मी स्मरली
अन
आमच भांडण विरलं

फिरायला जाऊया म्हणे
गमतीत गाडी पेट्रोल पंपावर टाकली
नेहमीचं भांडणाला कारण बनलं
अन त्याच वेळी नेमका गाडीनी ड्रायचा दिवा लावला
त्या क्षीण प्रकाशात
आमच भांडण विरलं

आमच्या भांडणाच सदाहरित कारण
तिच्या दिसण्यावर मी दिलेली कॉमेंट
पुन्हा एकदा कारण बनल
पण नेमका त्याच वेळी आय सर्जन मित्राचा फोन यावा
तिच्या डोळ्यांची त्याने चौकशी करावी
भौजींच्या त्या चौकशीत आमच भांडण विरलं

तिचा नि माझा
स्वयंपाक घरातला प्रवेश
दिसण्या इतकच आमच्या भांडणच सदाहरित कारण बनल
पण नाही म्हटल तरी पंजाब्यांच कौतुक
त्यांनी सगळीकडे धाबे काढले
त्या प्लान मध्ये
आमचं भांडण विरलं
-समीर

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

च्यायला कुठला कुठला माल डंप व्हायलाय कोण जाणे.
द्या प्रोत्साहन अजून नवलेखकांना.
.
मस्त हो भऊ
अप्रतिम लिहिलेय
जबरदस्त
एकच नंबर

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 12:16 pm | टवाळ कार्टा

तुच का रे तो भ्रूणहत्या कर्णारा छुपा संपादक =))

डिमोशन करु नकोस सांगितले ना. ;)

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 12:21 pm | टवाळ कार्टा

खिक्क

दमामि's picture

4 Oct 2015 - 12:19 pm | दमामि

छे छे, आपला अभ्या टोप्या घालतो (नवकवींना).:)

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 12:22 pm | टवाळ कार्टा

टोप्या नाय रे...टी-शर्ट :)

दमामि, तुम्ही खास माझ्यासाठी कविता लिहिलीत.
इस खुशीमें अगले टीशर्ट के पार्ट मे आपको २ शर्ट. सिर्फ आपको ये मौका मिल रहा है.

दमामि's picture

4 Oct 2015 - 12:45 pm | दमामि

अरे वा!!! धन्यवाद हो!

सस्नेह's picture

4 Oct 2015 - 12:37 pm | सस्नेह

प्रोत्साहरे मेल्या

समीर_happy go lucky's picture

4 Oct 2015 - 6:47 pm | समीर_happy go lucky

च्यामायला खातरजमा न करता फक्त तोंड वाजवणे म्हणजे पुरुषार्थ असे लोक का समजतात कोण जाणे!!!

हि वेगळी आहे जी तुम्ही बघितली ती वेगळी असेल मला असा माझ्या नावाने माल खपवण्याची कधी गरज आजपर्यंत वाटली नाही

अद्द्या's picture

4 Oct 2015 - 8:47 pm | अद्द्या

शांत गदादारी भीम . शांत .

दमामि's picture

5 Oct 2015 - 7:34 am | दमामि

खिक्क

समीर्भाऊ, खूप प्रयत्न करूनही कवितेसारखं वाचायला जमलं नाही. जरा रेकार्डिंग टाकता का?

शुभ बोल रे.. ही म्हण ऐकून तरी म्हायती आहे का नाय हो? नस्त्या आयड्या देताय ते!

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 5:27 pm | टवाळ कार्टा

=))

समीर_happy go lucky's picture

4 Oct 2015 - 6:49 pm | समीर_happy go lucky

आधी मला आमंत्रण दाखवा मी पाठवलेले कि "प्लीज ब्वा माझी कविता वाचाच" हे तुम्हाला कधी मिळाले? मग बघेल

अद्द्या's picture

4 Oct 2015 - 8:46 pm | अद्द्या

ओपन फोरम वर तुम्ही काहीही टाकलं कि ते आमंत्रण च असतं .

असो .

चांगली कविता हो

तुम्ही लोकांनी वाचावी म्हणून मिपावर कविता टाकली असावी असा माझा ग्रह झाला. कविता + आमंत्रण अशी सिस्टिम असल्याचं ठाऊक नव्हतं. क्षमा असावी.

बाकी आमंत्रित लोकांचे प्रतिसाद कुठे वाचायला मिळतील? की त्यासाठी शेप्रेट आमंत्रण लागेल?

प्यारे१'s picture

4 Oct 2015 - 7:09 pm | प्यारे१

समीर भौ, मस्त लिहिलंय.
आवडलं आपल्याला.

जव्हेरगंज's picture

4 Oct 2015 - 7:57 pm | जव्हेरगंज

+१
अत्यंत सुंदर काव्य. शृंगारमिश्रित मिश्किल कवितेत तरल भावना अगदी फळाफळा उतरल्या आहेत.

समीर_happy go lucky's picture

4 Oct 2015 - 8:02 pm | समीर_happy go lucky

"फ़ळाफ़ळा" या द्वयर्थीउपमेसाठी विशेष आभार
पण वाचल्याबद्दल धन्यवाद

पैसा's picture

4 Oct 2015 - 8:37 pm | पैसा

कविता आवडली. पण नवी कविता जरा थांबून थांबून टाका. नाहीतर लोकांना कन्फ्युज व्हायला होतं.

मांत्रिक's picture

4 Oct 2015 - 8:45 pm | मांत्रिक

राजे!!! जे सांगायचं ते पोचलं!!! थोडंसं अजून मेहनत घ्या!!! नक्कीच आवडेल मिपाकरांना!!!
काही त्रुटी आहेत त्या दुरूस्त करा हे हक्काने सांगेन. मी पण एक नवीन मिपाकर आहे म्हणून!!!
बाकी थोडंसं लेखनात अंतर ठेवा. अतिपरिचयादवज्ञा!!!

नाखु's picture

5 Oct 2015 - 9:16 am | नाखु

एक मिपाकर म्हणून :

निषेध .. नवसाहित्य उन्मेषी लेखकांना प्रोत्साहन (भत्ता) द्यायचा सोडून त्यांचे मानसीक्+वैचारीक खच्चीकरण करून

मिपाला एक साहित्यसूर्याला मुकण्याचे जे पाप करीत आहात त्याबद्दल तीव्र त्रीवार (+रवीवार) निषेध .

आमचाच एक जुना(ट) प्रीतीसाद इथे चोप(डा) पेस्त(वा) करीत आहोत. फक्त या वेळेला पदावर नवीण नेमणूक केली आहे

इशारा...
नाद खुळा - Sat, 28/02/2015 - 14:54
नवौन्मेषी साहित्यकांना भाकड प्रतिसादप्रभूंचा आणि मिपा लेखकूंचा शून्य उपयोग आहे. कारण ह्या प्रतिसादप्रभूंचा, लेखकांचे लेखन आणि मार्गदर्शन फ़ारतर घराच्या उंबर्यापासून उसगावापर्यंत वाचकांना पोहचवून देऊ शकते. वाचकांच्या (का याचकांच्या) सवंग लोकप्रियतेची गुरुकिल्ली यांनाच अजून गवसलेली नाही मग या मंडळींचे काढे नवौन्मेषी साहित्यकांना लोकभक्तीचा मार्ग कसा दाखवू शकेल? तरीही नवौन्मेषी साहित्यकांना फुकटाचा नको तो सल्ला देणार्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना दोन साहित्यप्रसवात (हो साहित्यच उगा गैरसमज नको) योग्य अंतर ठेवायला सांगतो , दुसरा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना अर्थपूर्ण आणी अ-पाल्हाळीक लिहायला सांगतो, तिसरा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना प्रतिसादावर चिंतन आणि जमले तरच मनन करायला सांगतो, चवथा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना ललीत लेखन कसे करावे हे शिकवू पाहतो. त्यामुळे नवौन्मेषी साहित्यक गोंधळतो एवढेच नव्हे तर या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे सल्ले तद्दन फालतू, फडतूस आणि अव्यवहार्य असल्याने नवौन्मेषी साहित्यकांना ते वापरायचा प्रयत्न केल्यास नवौन्मेषी साहित्यकंची उर्मी आणि उर्जा दबली जाते. (त्या दबलेल्या साहित्याचा सर्वांनाच त्रास होतो ते वेगळे)

त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या प्रतीसदाखाली क्षुब्ध नवकविता टंकली पाहिजे जेणेकरून निदान प्रतीसाद तरी बंद होईल. साहित्य स्फुरत असेल तर स्फुरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. नवौन्मेषी साहित्यकांना तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त नवौन्मेषी साहित्यक विस्मृतीत जावा म्हणून मिपा वाचकीय पातळीवरून होणार्या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. नवौन्मेषी साहित्यक स्वतःचे स्वतःच बघून घेईल.

तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त नवौन्मेषी साहित्यकाचे धाग्यावरून उठा. तुम्ही साहित्यकाचे धाग्यावरून उठलात तर नवौन्मेषी साहित्यक स्वतःच स्वतःचा (बहिर्गमनाचा) मार्ग शोधण्यास समर्थ आहे. त्याला तुमच्या भाकड सल्ल्याची आवश्यकता तर नाहीच नाही.

सुमार बालक
चिट(क्)वणीस भुसभसा
भुस्काट
साहित्याचा
रमार
साठा
नवौन्मेषी साहित्यकांच्या हिताची आभासी काळजी घेणारी एक्मेव संघटना

पैसा's picture

5 Oct 2015 - 9:57 am | पैसा

फक्त उंटावरचा 'शहाणा' या जमातीबद्दल बोलून 'शहाणी' या प्रजातीला अनुल्लेखाने टाळल्याबद्दल समस्त उंट आणि शहाण्यांतर्फे नाखुंचा तीव्र णिशेढ. याबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वैग्रे वाटली.

जाहीर निशेधाची सभा आणि मोर्चा लकडी पुलावर आयोजित केला आहे. पूस्प्गूच घेऊन येणेचे करावे.

dadadarekar's picture

5 Oct 2015 - 9:22 am | dadadarekar

छान