प्रेमाचा वर्षाव

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
1 Oct 2015 - 8:46 pm

व्याकूळ चातक
विरही मीरा
दग्ध धरती
भूक बळीची.

आसुसलेल्या
डोळ्यांना
एकच आस
प्रेमाचा वर्षाव.

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 8:51 pm | समीर_happy go lucky

राव इतक्या वेगवेगळ्या धाटणीच्या वेगवेगळ्या विषयांना चारोळी स्वरुपात बांधून तरीही त्याद्वारे सांगण्याचे काय हे कळत नाही, अर्थात माझी आकलन शक्ती कमी पडली असेल

विवेकपटाईत's picture

2 Oct 2015 - 9:32 am | विवेकपटाईत

अश्या प्रकारच्या कविता हिंदीत पूर्वी अमीर खुसरो यांनी लिहिल्या होत्या. त्यात वेगवेगळ्या बाबीत असलेली निसबत (समानता) दाखविली जात होती. तोच प्रकार मराठीत; अमीर खुसरो यांचे एक उद:

बादशाह और मुर्ग (कोंबडा) में क्या निसबत है.
दोनों ताज पहनते हैं.

तसेच चातक, मीरा, धरती आणि बळीराजा यात एक समानता आहे, ती म्हणजे ते सर्व प्रेमाच्या वर्षावाची आसुसलेल्या डोळ्यांनी वाट पाहत आहे.

मांत्रिक's picture

2 Oct 2015 - 8:14 pm | मांत्रिक

खुलासा केल्यावर अगदी भावली मनाला. नवीन प्रयोग असल्याने चटकन समजत नाही. पण आता आवडली.

चांदणे संदीप's picture

1 Oct 2015 - 9:29 pm | चांदणे संदीप

पटाईतकाकांची मौलिक दुहेरी धाव!

मस्त आहे! आवडली!

सुरेख कविता. कविता मांडण्याची शैली आवडली.

पैसा's picture

2 Oct 2015 - 8:00 pm | पैसा

छान प्रयोग!

विवेकपटाईत's picture

4 Oct 2015 - 10:06 am | विवेकपटाईत

धन्यवाद पैसा ताई.

समीर_happy go lucky's picture

4 Oct 2015 - 10:13 am | समीर_happy go lucky

खुलाश्यानंतर आवडली आधी समजलीच नव्हती