कॅलेंडर गर्ल्स
माझ्या मते मधुर भांडारकर ने दोनतीन वर्षांपूर्वीच डिक्लेयर केलाय. मी या या विषयावर चित्रपट काढणार आहे म्हणून . त्याच सगळ वेल प्लाण्ड व्यवस्थित अभ्यास करून चित्रपट असतात हे सांगायला नकोच . अर्थात त्याच्या चित्रपटांचा प्लॉट ही ठरून गेलाय. रियल लाईफ वर आणि जास्त करून सेलिब्रिटी वर्ड मध्ये जे काय चाललेलं असत त्या वर्ड मधल्या भानगडी / त्या वर्ड मध्ये शिरण्या करता कराव्या लागणाऱ्या उचापत्या /त्या वर्ड मध्ये "औट ऑफ द वे" जाऊन कराव्या लागणाऱ्या तडजोडी . ग्लॅमर वर्ड मधला नाटकीपणा या सगळ्याच मिश्रण करून त्याचे सिनेमे असतात. तो एखादा टोपिक सिलेक्ट करतो आणि त्या टोपिक वर "वुमन ओरिएन्टेड" सिनेमे असतात त्याचे. त्याच्या सिनेमातली काही पात्र पण ठरलेली असतात. ते त्याच स्वताच अस वैशिष्ठ आहे .
तर आत्ता सिनेमाबद्दल
"हॉट गर्ल्स" चे फोटो असलेली कॅलेंडर कुठल्या वर्षापासून सुरु झाली ते आठवत नाहीये. पण जेव्हा पासून ती बाजारात आली तेव्हा पासून ती फेमस झाली एवढ नक्की आठवतंय. ती घराघरात लागत नसतील कदाचित ती कुठे लावली जात होती/आहेत त्याची कल्पना नाही. पण त्या गर्ल्स मात्र गाजत होत्या नक्कीच . त्या गर्ल्स ना सेलीब्रीटिचा दर्जा प्राप्त होत असे किव्वा प्राप्त होत असतो . मुलींना फिल्म इंडस्ट्री मध्ये शिरण्याचा एक "प्लॅटफॉर्म" म्हणून त्यात झळकणाऱ्या मुलीकडे बघितलं जात. आणि ते खर ही आहे. पण लगेचच त्यांना सेलीब्रीटिचा दर्जा मिळतो का ? त्या नंतर त्या मुलींचं जीवन कस बदलून जात चांगल्या पद्धतीनेही आणि वाईट पद्धतीनेही.. शेवटी ज्याच त्याच आयुष्य ठरलेल असत त्या नुसार त्या त्या मुलींचं आयुष्य बदलत. ते बदल वाईटही असतात आणि चांगलेही . पण कसे ? हेच तर महत्वाच.
या कॅलेंडर साठी वेगवेगळ्या शहरातल्या (देशातल्या आणि परदेशातल्याही ) पाच मुलींचं सिलेक्शन होत आणि चित्रपटाला सुरवात होते, प्रत्येक मुलीच स्वप्न असत मी मुंबईला जाईन ग्लॅमर वर्ड मध्ये जाईन आणि माझ आयुष्यच बदलून जाईल. पण ते तस बदलत का? त्याचं आयुष्य कशा पद्धतीने बदलत यावर सिनेमा बेतलेला आहे .त्या मुलींना फक्त सिनेमात काम करण्याचे ओप्शन्स असतात का? का आणखीन पण ओप्शन्स असतात . ते कोणते ? त्याचं कॅलेंडर बाजारात आल्या आल्या लगेच त्यांना सिनेमाच्या ऑफर्स मिळायला लागतात का ? का आणखीन काही ? कॅलेंडर बाजारात आल्यावर त्यांना विविध ठिकाणी फिती कापण्याच काम मिळत आणि अर्थात त्याचे पैसेही . त्याना काही ठिकाणी "चीफ गेस्ट" म्हणूनही बोलावलं जात. पण हे किती दिवस चालणार?. त्यातल्या काही जणी कशा आणखीन वेगळ्या क्षेत्रात ओढल्या जातात आणि त्यांची काय अवस्था होते. तुरुंगात जाव लागतं. आक्सिडेंट होतात. औदासिन्य येत दारू / ड्रग ची व्यसन लागतात. दुसर्याचे "बेड" सजवावे लागतात. क्रिकेट बेटिंग मध्ये ओढल्या जातात आणि काय काय आणि काय. मुंबई बाहेरच्या मुली काहीतरी स्वप्न घेऊन मुंबईत येतात आणि त्यांची काय आणि कशी वाताहत होते किव्वा एक दोघींचं आयुष्य वेळीच घसरण्यापासून वाचतही आणि मार्गी ही लागत पण जास्त करून वाताहातच.एक वर्ष संपल्यानंतर नवीन "कॅलेंडर गर्ल्स" पुढच्या वर्षीच्या कॅलेंडर वर झळकतात आणि चित्रपट संपतो . चित्रपट मधुरच्या खास शैलीत आहे. अस्वस्थ करणारा . विचार करायला लावणारा .
या चित्रपटात चक्क मधुरने काम ही केलाय. फिल्म डिरेक्टरचच. आत्ता नवीन गर्ल्स बद्दल .ज्या नवीन गर्ल्स घेतल्यात त्यांची काम चांगली झाली आहेत. पण दिसण्याच्या बाबतीत त्या सगळ्याच तशा बेताच्याच आहेत. ( हे माझ मत ) "कॅलेंडर गर्ल्स" ची निवड करताना त्यांचे लुक्स एवढे महत्वाचे नसतात का?. कोणीच ठसठशीत पणे मनात भरत नाहीत. दोन गाणी आहेत चित्रपटात ती फारशी लक्षात रहात नाहीत.
मधुर भांडारकर स्वतां या क्षेत्रात आता कित्येक वर्ष आहे त्यामुळे तोच काय ते खरेखुरे चित्रण करू शकतो . यातले खाचं खळगे काय ते त्यालाच माहिती .त्यामुळे ज्या मुली या क्षेत्रातल्या "ग्लॅमर" ( आणि अर्थातच त्यातून मिळणारा पैसा ) कडे ओढल्या जातात त्यांनी हा चित्रपट बघून वेळीच विचार करून स्वताच्या आयुष्याकडे डोळस पणे बघाव अस हा चित्रपट सुचवतो का? यातून "मधुर" हा संदेश देत असतो का ? आणि असा संदेश तो जर देत असेल तर किती मुली या कडे गांभीर्याने बघतात? ते मात्र माहिती नाही. त्याचा किती मुलींना फायदा होतो तेही माहित नाही पण "मधुर" त्याच्या चित्रपटातून कायमच या ग्लॅमर वर्ड च वास्तव चित्रण करत असतो आणि काहीतरी वेगळ आणि अर्थातच अस्वस्थ करून विचार करायला लावल्याच काम त्याचे चित्रपट कायमच करत असतात. त्यातलाच आणखीन एक :)
चित्रपट सुरेखच. बघावा असाच :)
प्रतिक्रिया
29 Sep 2015 - 11:59 pm | समीर_happy go lucky
सहि आवड्ला रिव्ह्यू
3 Oct 2015 - 2:11 pm | नाखु
आवडले आणि कसलाही आग्रह केला नाही त्या बद्दल धन्यवाद.
अधीर वाचक
30 Sep 2015 - 2:07 am | रेवती
अरे देवा! हाही सिनेमा आहे का! मधुर भांडारकर यांनी बहुतांश सिनेमे सिनेसृष्टी/वलयांकित जग यावर काढलेत पण कधीकधी कंटाळा येतो त्याचाही. चांदनी बार आवडला होता पण त्यानंतरचे फारसे लक्षात नाहीत. एक बिपाशा बासूचाही आला होता का? जालावर आल्यास बघेन. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्यावरून असे वाटले की दिग्दर्शकाला या क्षेत्राबद्दल भीती घालायची आहे की काय?
30 Sep 2015 - 2:35 am | प्यारे१
मधुर भांडारकर नं आयुष्य भरासाठी एकच एक क्षेत्र निवडलं की काय????
पान क्रमांक ३ वर असणारे सगळे विषय : पेज ३, फॅशन, हीरॉईन, कॅलेन्डर गर्ल्स आणि आनुषंगिक कॉर्पोरेट असे चित्रपट झाले. त्याच्याच परिघातले असलेले चांदनी बार, जेल, ट्रॅफिक सिग्नल वगैरे चित्रपट झाले.
अवांतरः भांडारकरांचे तीन चार चित्रपट पाहिलेत. त्यात कुणीतरी समलैंगिक असतोच. काही खास कारण असेल की काय कोण जाणे?
30 Sep 2015 - 7:01 am | मदनबाण
हल्लीच मधुरची या चित्रपटा विषयी मुलाखत पाहिली होती. { बहुतेक एबीपी माझावर }
चित्रपट अर्थातच मधुरच्या हातळणीचा विषय असल्याने त्याला भाडांरकर टच आहेच.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bailando (Español) ft. Descemer Bueno, Gente De Zona :- Enrique Iglesias
30 Sep 2015 - 10:31 am | शोधा म्हन्जे सापडेल
माझं मत जरा वेगळं आहे ह्या पिक्चरबद्दल. अत्यंत रटाळ पिक्चर आहे. स्टोरी अजिबातच नाही. मधुर भांडारकरचा म्हणून बघायला गेलो पण अत्यंत निराशा पदरी पडली. स्टोरीमध्ये काहीही नावीन्य नाही किंवा ह्याआधी बघितलं नाही असं काही नाही. अत्यंत टुकार अभिनय (दि मधुर भांडारकरांसहित). मान्य आहे कि नवीन मुली आहेत पण......
पिक्चर संपता संपता मला फार बोर व्हायला लागलं म्हणून मी गाणी आठवयाचा प्रयत्न केला पण मी ब्लँक होतो. पेज ३ मधलं ‘कितने अजिब रिश्ते “ हे गाणं आजही ऐकावसं वाटतं.
30 Sep 2015 - 11:07 am | द-बाहुबली
मधुर भंडारकर दिग्दर्शक हे नाव बघुनच हा चित्रपट आता टीवीवर सुधा बघायच्या फंदात पडणार नॉय.
30 Sep 2015 - 11:16 am | द-बाहुबली
नाही. फक्त अॅसेट्स महत्वाच्या असतात. म्हणजे जे निकष आहेत त्याच्या जवळपास जाणार्य. लुक्स कसे असावेत हे व्यक्ती ठरवु शकत नाही पण अॅसेट्स कशा अशाव्यात यावर नक्किच मेहनत घेता येउ शकते म्हणून मोडेलिंगमधे लुक्स पेक्षा अॅसेटवर भर दिला जातो.
30 Sep 2015 - 11:08 am | सुजल
<<मधुर भांडारकरच्या पिक्चर मध्ये कोणतरी सम लैंगिक असतोच>> . .हो. ती तर त्याची स्पेशालिटी आहे. माझ्या मते प्रत्येक दिग्दर्शकाची काहीतरी खासियत असतेच. त्याचे चित्रपट आवडत असले तरच आपल्याला ते आवडतात.
30 Sep 2015 - 11:29 am | पद्मावति
छान केलंय परीक्षण. चित्रपट पाहवासा वाटतोय.
मध्यंतरापर्यंत ग्लॅमरच्या दुनियेची रंगीत बाजू आणि नंतर अंधारी, भयाण बाजू- ही मधुर भंडारकरांची खासियत बनली आहे.
30 Sep 2015 - 10:31 pm | मारवा
मधुर भंडारकर ग्रेट आहे.
एक मराठी माणुस ज्याला तशी हिंदी सिनेमाची घराण्याची बॅकग्राऊंड नाही.
व्हीडिओ लायब्ररीत काम करता करता पुढे राम गोपाल वर्माचा असिस्टंट
नंतर स्वतःची वाट प्रयत्नपुर्वक शोधुन त्यावर चालत त्याचा एक राजमार्ग बनवणारा
एक मराठी माणुस म्हणुन त्याचा अभिमान वाटतो.
एक एक क्षेत्र घेऊन त्याचा सखोल अभ्यास करुन परत त्याला रोचक कथे ची जोड देऊन
प्रोज कॉन्स दोन्ही बाजु दाखवुन संतुलन साधत
एक एक जगाचा मार्मिक परीचय करुन देणारा मधुर भांडारकर जीनीअस आहे. त्याचा दि बेस्ट म्हणजे पेज ३
मधुर ने आता थोड वेगळच क्षेत्र घ्यायला हव
तो थोडा रीपीट होतोय सीमीलर फील्ड्स घेऊन
तरीही कॅलेंडर गर्ल्स विषयी उत्सुकता आहेच
विजय माल्या आणी कींगफिशर कॅलेंडर वर आधारीत असेल हा
जरुर बघणार हा चित्रपट
30 Sep 2015 - 11:47 pm | palambar
एकदा पहायला हरकत नाही.असे वाटते.
3 Oct 2015 - 2:05 pm | कलंत्री
"डिक्लेयर" "वेल प्लाण्ड" "प्लॉट" "रियल लाईफ" "सेलिब्रिटी वर्ड" "वर्ड" "ग्लॅमर वर्ड" "टोपिक सिलेक्ट" "हॉट गर्ल्स" "फेमस" "गर्ल्स" "फिल्म इंडस्ट्री" "सिलेक्शन" "ग्लॅमर वर्ड" "ओप्शन्स" "ऑफर्स" "आक्सिडेंट" "फिल्म डिरेक्टरचच" "लुक्स".
वरील शब्दांना समर्पक असे मराठी शब्द आहेतच. कृपया इतका चांगला लेख अश्या शब्दांमूळे थोडासा विरुप वाटतो इतकेच.
शुभेच्छा.
3 Oct 2015 - 4:07 pm | अभ्या..
असू द्या हो. मधुर भांडारकर तरी कुठे हिंदी नावे वापरतो टायटलसाठी. (बार सोडून चांदनी अपवाद बर्का)
अर्थात त्यांना तेवढेच सशक्त मराठी/हिंदी प्रतिशब्द नाहीत हे पण आहेच म्हणा.
पण लेखात हे शब्द चुकीच्या पध्दतीने टायपल्यामुळे जास्तच टोचतात हे खरे.
बाकी समीक्षण बिल्कुल आवडले नाही.
(च्यायला आधी काही लिहायला येत नसले की किमान भांडवलावर चारोळ्या पाडायची फॅशन आलेली, आता चित्रपट परिक्षणे काय?)
4 Oct 2015 - 7:17 pm | सुजल
समीक्षण आवडले नसल्यास काहीच हरकत नाहीये ( मी कोण हरकत घेणारी ? ) सगळ्यांचाच आपले लिखाण आवडावे असे थोडेच आहे ? पण "आधी काही लिहायला येत नसले की किमान भांडवलावर चारोळ्या पाडायची फॅशन आलेली, आता चित्रपट परिक्षणे काय?" हे व्यक्त केलेलं मत तर बिलकुलच आवडलं नाही.
आम्हाला लिहायला येत कि नाही हे ठरवणारे तुम्ही एकटेच आहत का ? इतरांना पण ठरवू दे कि :)
4 Oct 2015 - 7:42 pm | जव्हेरगंज
3 Oct 2015 - 4:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
शिणुमा हाय व्हय. मल्ल्या साहेबांची अठवण येउन अंमळ हळवा झालो =))
4 Oct 2015 - 7:49 pm | प्यारे१
तुला का टीशर्ट पायजेत का त्यांचे फोटो असलेले???
(त्यांनी काढून ठेवलेले अशी एक पुस्ती जोडता येईल)