सनसेट बुलेव्हार्ड
नुकतेच रॅंडम वेब पेजेस् सर्च करत असताना एक लिंक हाती लागली. ’ २४ मूव्हीज् विथ ग्रेट ओपनिंग सीन्स’ ही लिंक हाताला लागली आणि सहज चाळत असताना ’सनसेट बुलेव्हार्ड’ चे नाव समोर आले आणि सर्र्क्कन अंगावर काटा आला.
मी कित्येक लोकांना ’कुठले चित्रपट पाहू?’ हा प्रश्न विचारला नसतानादेखील मी ह्या चित्रपटाचे नाव सुचवले आहे. मला खुद्द शिरीष कणेकरांच्या ’बिली वाईल्डर’ बद्दल लिहिलेल्या ’एकमेवाद्वितीय’ ह्या लेखामुळे ह्या चित्रपटाचे नाव कळाले. दिग्दर्शकाचे नाव कळाले. त्यामुळे मी कणेकरांचा जन्मभर आभारी आहे.
वाईल्डर आपल्या चित्रपटांमध्ये एखादा गंभीर विषय विनोदाची हलकी डूब देऊन मनोरंजक बनवण्यात पटाईत होता. ( त्याची चित्रपट बनवायची रेंज खूप मोठी आहे. हे स्टॅलॅग १७, द अपार्टमेंट, द लॉस्ट विकेंड, सनसेट बुलेव्हार्ड, किस् मी स्टुपीड, सम लाईक इट हॉट, अवान्ती, एस इन द होल (Ace in the hole), सॅब्रीना, सेव्हन इयर्स इच (Sevan Year Itch), विटनेस फॉर प्रॉसीक्यूशन, इर्मा ल ड्यूश (Irma la Douce), द प्रायव्हेट लाईफ ऑफ शेरलॉक होम्स, फेडोरा, आणि फ्रन्ट पेज पाहा आणि तुम्हीच ठरवा).
चित्रपटाची सुरूवातच विल्यम होल्डनच्या धीरगंभीर आवाजात होते. तो सांगत असतो. ’ हाऊ जेन्टल पीपल गेट विथ यू , वन्स यू आर डेड’. हलकाच शहारा येतो. आणि चित्रपटाची सुरूवातच आपल्या त्यात गुंतवून ठेवते.
त्या चित्रपटाचे अधिक माहितीसाठी कणेकरांचा लेखच पुरेसा आहे. पण त्या चित्रपटातील काही खुमासदार संवाद सांगायची इच्छा होतेय्.
१. आम्हांला संवादाची गरजच नव्हती. आमचे तिथले अस्तित्वच पुरेसे होते(चित्रपट चालायला)-मूक चित्रपटांच्या अभिनेत्रीचा उद्गार
२. तुम्ही ५० वर्षांच्या असाल ह्यात काहीच वावगे नाही. जोपर्यंत तुम्ही पंचविशीच्या दिसायचा अट्टाहास करत नाही.
३. फर्स्ट असिस्टंट डाररेक्टर सेसील बी. डी’मिल ला म्हणतो- ती बहुतेक कित्येक वर्षांपूर्वी म्हातारी झाली असेल.
डी’मिल म्हणतो- चूप बस. मला हा विचारच करवत नाही. ह्या हिशोबात तर मी मग तिच्या वडिलांच्या वयाचा असेल.
४. नायकाच्या ओळखीचा माणूस त्याला म्हणतो- अरे बरे झाले तू भेटलास ते.
नायक- का? गेल्या वेळेस विश्वासघात करून पाठीत खुपसलेला खंजीर परत हवा आहे का?
ह्या सर्व संवादावर शेवटची १० मिनीटस् चित्रपटाला खूप बोलकी आणि दर्शकांना अबोल करून जातात. त्यासाठी हा पूर्ण चित्रपटच पाहावा लागलो.
माझ्यासाठी मात्र ह्या चित्रपटाची सुरूवात आणि विल्यम होल्डनचे नरेशन शेवटपर्य़ंत पुरेसे राहते.
वर सांगितलेले पहिले वाक्य चित्रपटाच्या सुरूवातीला जो सीन आहे, त्याचा फोटो खाली देत आहे.
चित्रपट जरूर पाहा. (कधी पुढे जमले तर सनसेट बुलेव्हार्डबद्दल अजून काहीतरी लिहीन)
आत्तातरी , धन्यवाद !
Sunset Blvd.' (1950)
Billy Wilder's ruthless Hollywood satire is known for its final line, but the opening is also tremendous: a tracking shot that starts on the street marker and traverses the titular road, panning to siren-blaring cop cars. William Holden's voice over accompanies the imagary — and even spoils the eventual climax. The final frames of a floating corpse in a pool, filmed upwards from underwater, are also how Norma Desmond thinks of herself: timeless.
—Will Robinson
प्रतिक्रिया
29 Sep 2015 - 12:00 am | समीर_happy go lucky
आवडला लेख/रिव्यु पण मि बघित्ला चित्रपट मला इतका अलौकिक/मोहक/इम्प्रेसिव्ह वाट्ला नव्ह्ता, असो......
29 Sep 2015 - 2:09 am | सायकलस्वार
+१. जेवढं कौतुक ऐकलं होतं त्यामानाने... :(
29 Sep 2015 - 11:15 am | कवितानागेश
छान ओळख.
29 Sep 2015 - 2:35 pm | महासंग्राम
विश्वास खूप दिवसांनी लिहिलात, लेख सुंदर झालाय... तेवढी चित्रपट द्या आता पाह्यला.
29 Sep 2015 - 11:37 pm | बोका-ए-आझम
हा बिली वाइल्डरच्या अप्रतिम चित्रपटांपैकी एक. ग्लोरिया स्वान्सनने त्यातली नाॅर्माची मध्यवर्ती भूमिका फार सुंदर केलेली आहे. मला स्वतःला त्याचा फेडोरा जास्त आवडतो.
30 Sep 2015 - 7:58 am | अजिंक्य विश्वास
फेडोराला सुद्धा ’सनसेट बुलेव्हार्ड’चाच बेस आहे. माझा स्वत:चे ’द अपार्टमेंट’, स्टॅलॅग १७, सनसेट बुलेव्हार्ड, किस् मी स्टुपीड, अवान्ती, एस इन द होल (Ace in the hole), सॅब्रीना, इर्मा ल ड्यूश (Irma la Douce) हे अत्यंत आवडते चित्रपट आहेत बिली वाईल्डरच्या पठडीतील.
1 Oct 2015 - 11:33 pm | बोका-ए-आझम
साब्रिना - ये दिल्लगी
सम लाईक इट हाॅट - रफूचक्कर
इर्मा ला ड्यूस - मनोरंजन
सुदैवाने सनसेट बुलेवार्ड आणि फेडोरा यांना हात लावला नाही.
30 Sep 2015 - 11:02 pm | मारवा
बंधु
परीचय अत्यंत आवडला
हा चित्रपट माहीत नव्हता बघायला पाहीजे
धन्यवाद