निरोप दे आता

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
28 Sep 2015 - 4:49 pm

या आधी मी मला आवडलेल्या काही इंग्लिश कवितांच्या/ गीतांच्या मराठी रुपांतराचे प्रयत्न केले होते. (Desiderata, First things first, The Last Thing on my Mind, The cab ride I will never forget, I give you the morning)

आज इटालियन कवि Umberto Saba यांची एक कविता सापडली (खरं तर त्याचा इंग्लिश भावार्थ वाचायला मिळाला, मला इटालियन येत नाही!) कविता आवडली म्हणून मराठीत रुपांतराचा प्रयत्न करावासा वाटला तो खाली देतोय. कविता छोटीशीच आहे, पण अखेरच्या ओळीतली आर्तता खूप भावली (ती मला शब्दांत पकडता आली नसली तरी).

त्या निष्पर्ण वृक्षावरील पान पहा एकुलतं
आयुष्य संपलंय, पण अजून आहे डुलतं

मीही तसाच, पण विसर मला, निरोप दे आता
नको बालिश बडबड, ना वयाची चिंता

सांगायला नको, पण मरणभयाचं कसलं रडू?
जगणं सहज सोडेन मी, तुला कसं सोडू?


मूळ इटालियन काव्य खाली आहे (इथे नक्कीच कुणीतरी इटालियन जाणणारे वाचक असतील, कृपया भावानुवादात काही चुकलं असेल तर नक्की सांगा) :

Io sono come quella foglia - guarda -
sul nudo ramo, che un prodigio ancora
tiene attaccata.

Negami dunque. Non ne sia rattristata
la bella età che a un'ansia ti colora,
e per me a slanci infantili s'attarda.

Dimmi tu addio, se a me dirlo non riesce.
Morire è nulla; perderti è difficile.

प्रेमकाव्यआस्वाद

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

28 Sep 2015 - 4:59 pm | मुक्त विहारि

पण कविता आवडली.

शिवाय कवितेला योग्य त्या चित्राची जोड असल्याने, फारच परिणामकारक ठरली.

(हे असे गुणी आय-डी आहेत, म्हणूनच आम्ही अद्याप इथे आहोत.)

द-बाहुबली's picture

28 Sep 2015 - 5:04 pm | द-बाहुबली

पण मी म्हातारा झाल्यावर नक्किच परिणामकारक वाटु शकेल.

ज्योति अळवणी's picture

28 Sep 2015 - 5:35 pm | ज्योति अळवणी

अत्यंत परिणामकारक. शेवटची ओळ वाचून मनात लख़्कन् हलल.

अभ्या..'s picture

28 Sep 2015 - 6:32 pm | अभ्या..

अहाहा,
अप्रतिम, सुंदर.

स्रुजा's picture

28 Sep 2015 - 7:51 pm | स्रुजा

वाह !!

बोका-ए-आझम's picture

28 Sep 2015 - 10:56 pm | बोका-ए-आझम

आपल्या भा.रा.तांब्यांची ' नववधू प्रिया मी वावरते ' आणि ' मधु मागसी माझ्या सख्या परि ' या कवितांची आठवण झाली!

चांदणे संदीप's picture

28 Sep 2015 - 11:08 pm | चांदणे संदीप

बहुगुणी सर मस्त जमला आहे भावानुवाद!
"जगणं सहज सोडेन मी, तुला कसं सोडू?" ही एकच ओळ या चित्रासाठी पुरेशी आहे! अतिशय समर्पक चित्र निवडलतं!

धन्यवाद!

पिवळा डांबिस's picture

28 Sep 2015 - 11:14 pm | पिवळा डांबिस

उत्तम कविता!!
पण इटालियनबरोबरच इंग्रजी तर्जुमाही द्या ना.
इटालियन येत नसलं तरी इंग्रजी जाणणारे लोक आहेत ना इथे...

बहुगुणी's picture

28 Sep 2015 - 11:39 pm | बहुगुणी

ठिक-ठिकाणी किंचित फरक होता, मला योग्य वाटला तो भावार्थ घेतला. काही दुवे खालीलप्रमाणे:

१. बहुतेक ठिकाणी हे रुपांतर मिळालं:
I'm like that leaf - watch -
on the bare branch, a prodigy yet
He was attached.

Negami* then. Do not be sad
the beautiful age that enhances your anxiety,
and for me to childish outbursts lingers.

Tell me goodbye, though I can not say.
Dying is nothing; it is hard to miss.

(*negami या या शब्दाचा अर्थ कुठे मिळाला नाही.)

२. तेच रुपांतर, पण थोड्या स्पष्टीकरणासह:

अत्रुप्त आत्मा's picture

28 Sep 2015 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा

छान

पिशी अबोली's picture

29 Sep 2015 - 12:42 pm | पिशी अबोली

सुंदर. मूळ कवितेतलं जेवढं समजलं तेपण सुंदर. भावानुवाद छान आहे, पण दुसर्‍या कडव्यात कवी त्याची स्वतःची 'बालिश बडबड' आणि तिची 'वयाची चिंता' असा दोघांमधला फरक दाखवतोय का? म्हणजे मला नक्की पकडता येत नाहीये काय आहे ते, आणि तुम्ही केलेला भावानुवाद खूप चपखल बसतोय, पण काहीतरी फरक आहे तिकडे इतकंच जाणवलं.

negami हे 'negare' क्रियापदाचं काहीतरी रूप वाटलं उचकापाचक केल्यावर. असंच्या असं रूप नाही येणार कदाचित, ते काहीतरी poetic license घेऊन बनवलेलं असावं.

आवडली कविता.

मांत्रिक's picture

29 Sep 2015 - 12:46 pm | मांत्रिक

इटालियन कळत नाही. पण तुम्ही जो भावानुवाद केलाय तो अत्युत्तम आहे. मला तो देखील काव्य म्हणून पुरेसा वाटतो.