तिचा रुमाल

मनिष's picture
मनिष in जे न देखे रवी...
20 Nov 2007 - 12:23 am

जो दरवळायचा कधी तिच्या गंधानी
तो भिजत राहतो आता माझ्या आसवांनी
तिचा तो धुंद, मंद गंधही नाही
तिचा तो हळुवार स्पर्शही नाही
तिचा तो मधात भिजवलेला आवाजही नाही
हुरहुर लावणारी, काळीज चिरणारी तिची ती नजरही नाही
फक्त तिच्या आठवणींचे धागे जपत,
माझ्यासारखा आरवार होतो,
माझ्या आसवांत भिजत राहतो;
तिचा रुमाल…….

ती तोडून जाईल सगळे धागे
तिचा गंधही उरणार नाही मागे
तिला कळणार नाही माझी वेदना
ती ऎकणार ही नाही माझे रडणे
ती विसरुन जाईल शपथा वचने
विसरुन माझ्या स्पर्शाची थरथर
ती होईल त्याच्या स्पर्शासाठी आतुर
माझ्यासारखा आरवार होईल,
माझ्या आसवांत भिजत राहिल;
तिचा रुमाल…….

- मनिष

ही कविता आधी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केली होती.

कविता

प्रतिक्रिया

सर्किट's picture

20 Nov 2007 - 12:58 am | सर्किट (not verified)

मनिष,

कविता छान आहे. (आरवार म्हणजे काय ?) त्यानिमित्ताने आपल्या अनुदिनीवर फेरफटका झाला. "ए देश से आनेवाले" खूपच आवडली. त्याचे मराठीकरण शक्य असल्यास येथे टाकायला जमेल का ?

शुभेच्छा.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

20 Nov 2007 - 12:06 pm | विसोबा खेचर

मनिषराव,

कविता तशी छान आहे, परंतु आरवार म्हणजे काय ते मलाही कळले नाही...

असो,

तात्या.

मनिष's picture

20 Nov 2007 - 12:25 pm | मनिष

नक्की सांगता येइल का महित नाही पण "आरवार" म्हणजे sensitive & vulnerable असे म्हणता येइल.
"ए देश से आनेवाले" चे मराठीकरण करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. मिलिंद ईमेल पाठवल्यास ते गाणे पाठवतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2007 - 11:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता आवडली, आम्हाला अशाच मुक्तछंदातील कविता आवडतात ! येऊ दे आणखी काही कविता !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे