झुंज (शतशब्दकथा)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
24 Aug 2015 - 1:10 pm

आपण पुन्हा कधीच जागं न येण्याकरिता या तुरुंगात झोपलोय आज, हे त्या सर्वांना कळलंही होतं एव्हाना……
घरदार दुरावलं, सगेसोयरे दुरावलें......
हिरवे डोळे आणि सुंदर मुलायम केसांचा एकेकाळचा तिचा सगळा राजस रुबाब धुवून निघाला होता,
तरीही जगण्यातली सारी झुंज पुन्हा एकवटून, तुरुंगाचे गज आपल्या पकडीत घेऊन, त्या एका निकराच्या क्षणी आभाळाकडं पाहत ती ओरडते … मी अशी हरणार नाही...मी इथून निसटून जाईन..
कोठडीतल्या प्रत्येकाला एकएक करून नेलेलं पाहताना होणाऱ्या, हृदयाचा चावा घेतल्यासारख्या वेदनेमुळे,
इतरांचा स्वतःच्या चैतन्यशक्तीवरचा ताबा निसटून गेलेला आतापावतो, येणारा अटळ मृत्यू त्यांनी स्वीकारलेला,……
जगण्याची इतकी आसक्ती तिला का असावी? ती कशासाठी झुंजत होती? याचं मूकआश्चर्य करत होते ते आपापसात …. .

fight

शब्दक्रीडामाध्यमवेध

प्रतिक्रिया

gogglya's picture

24 Aug 2015 - 3:20 pm | gogglya

बाकी छायाचित्रामुळे सगळी उत्सुकता संपुन जात आहे नाही तर उत्तम गूढ निर्माण झाले असते.

पगला गजोधर's picture

24 Aug 2015 - 3:23 pm | पगला गजोधर

मिट-फेस्टिवल (मांस उत्सव/सण ) च्या वरून प्रेरित धागा, हजारो मांजरे कुत्री यांची कत्तल होते अश्या सणांना तिथे.

मांत्रिक's picture

24 Aug 2015 - 3:31 pm | मांत्रिक

अरेरे हे चीनी लोक! मांजरं आणि कुत्रे कसे खाऊ वाटतात या नतद्रष्टांना! कुत्रा मांजर हे तर माणसाचे फार चांगले मित्र!

खटपट्या's picture

24 Aug 2015 - 4:05 pm | खटपट्या

बाप्रे! मला चित्र दीसत नसल्यामुळे काहीच कळत नव्हते. आता अंदाज आला कसले चित्र असेल ते.

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Aug 2015 - 4:21 pm | माम्लेदारचा पन्खा

देव बाप्पा त्यांना पाप देतो....

आजची त्यांची बाजारपेठेची आणि निर्देशांकाची स्थिती पहा.....पापी मेले !

तुडतुडी's picture

24 Aug 2015 - 4:22 pm | तुडतुडी

काय आहे हे ?