विंडोज १०: एक धावता आढावा
माइक्रोसोफ्ट कंपनीच्या या नव्या ओपरेटिंग प्रणालीची घडणीची सुरुवात मागच्या वर्षीच झाली होती आणि जानेवारी २०१५ नंतर ती काही लोकांना वापरण्यास देण्यात आली. आता २८/२९ जुलैला ती अधिकृतरित्या सर्वांसाठी प्रकाशित करण्यात आली. दरम्यान यावर बरेच लेख जालावर लिहिले गेले आणि त्यात खालील मुद्द्यांचा ऊहापोह करण्यात आला.
१) विंडोज प्रणाली ८/८.१ अस्तित्वात होती,मग ९ कुठे गेली ?
२) विंडोज ८+ आणि १० मध्ये काय मोठा फरक करण्यात आला.
३) त्यांचा ब्राउजर IE11 बदलावासा का वाटला?
नवीन ब्राउजर "EDGE" आल्यावर तो फोनचा 'नेटिव'/डिफॅाल्ट ब्राउजर झाल्यावर IE 11 चे काय होणार.
४) बोलण्यावरून आज्ञा देणारी "Cortana" प्रणाली अगोदरच होती तिची व्यापकता किती वाढवली आहे
५) सर्व मोबाइल / लॅपटॅाप / पिसी तसेच कीबोर्ड / टचस्क्रीन / माउस यासाठी एकच आणि बिझनेससाठी एकमेकास जोडले जाण्यासाठी "OneDrive" या विंडोज १० मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे तो किती यशस्वी झाला आहे.
६) आतापर्यंत सॅाप्टवेअर विकून पैसे कमवणारी कंपनी जर असे फुकट देऊ लागली तर भवितव्य काय? आडमार्गाने नंतर फी सुरू करणार का? (२००४ साली नेटस्केप या दुसय्रा एका कंपनी चा ब्राउजर धडाधड डाइनलोड होतो हे पाहून इक्सप्लोरर फुकट वाटण्यावरून माइक्रोसोफ्ट कंपनीस " व्यापार मक्तेदारी विरोधी"न्यालयात दावा लागला त्याला उत्तर द्यावे लागले होते.यानंतर मुख्य बिलगेटस यांनी प्रमुखपद सोडले होते.यावरची एक डॅक्युमेंटरी टिव्हीवर नुकतीच दाखवण्यात आली होती.)
७) नवीन प्रमुख सत्त्या नडेला यांच्या धोरणांतर्गत कंपनीने पावले उचलली आहेत त्याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
काही लिंक्स -
- Cnet review
- Techradar review
- माइक्रोसोफ्टकडूनच अपग्रेड कसे करावे
- windowscentral review
- pcadvisor review
यावर्षी नवीन प्रणाली असलेलेच मोबाइल /टॅबलेट वगैरे येतीलच परंतू जुन्या प्रणाली अपग्रेड करायचे कामही सुरू झाले आहे. माझा यात विंडोज ८.१ चा मोबाइल वापरत असल्याने उत्सुकता व्यतिरिक्त काहीच अनुभव नाही, केवळ नेटवरचे वाचलेले इथे आणण्याचा एक प्रयत्न केला आहे.
एकूण रिव्ह्यूतील विचार पाहता मी अपग्रेड न करण्याचाच निर्णय घेतला आहे. कारण
- एज ब्राउजर पाहिजेच असं काही नाही.
- कोर्टाना 'Cortana' ची व्यापकता वाढल्याने विशेष काही फरक नाही.
- बिझनेसकरता "Onedrive" आहे त्याचा सामान्य मोबाइलधारकास उपयोग नाही आणि ८.१ मध्ये आहेच.
- फोटोवर काही लिहून पॅावरपॅाइंटसाठी तयार करणे यासाठी अॅप आहेच.
- रेडिओ रेकॅार्डींगठीसाठी लागणारा माइक्रोफोन विं ७ नंतर काढलाच आहे.
- वेबपेज सेविंग सुविधाही ७ नंतर बंदच आहे.
नवीन प्रणालीतील दोष यथावकाश दूर होतीलही तोपर्यंत आपले अनुभव आणि शंका विचारण्यासाठी एखादा धागा असावा म्हणून हा प्रपंच. आपण यात भर टाकाल आणि चुका दुरूस्त करालच.
खालील चित्रे जालावरून साभारः
प्रतिक्रिया
24 Mar 2016 - 11:35 pm | खटपट्या
ओके, तुम्ही म्हणतात तर करुन बघतो. पण खबरदारीचे उपाय घ्यावेच लागतील
25 Mar 2016 - 10:18 am | बोका
बहुतेक ससे नसावे.
नाहीतर आमच्या ऑफिसमध्ये अपग्रेड करण्याची धावपळ सुरु झाली असती !
25 Mar 2016 - 10:48 am | कंजूस
खरं आहे.त्याचे सिक्यु चेकिंग वगैरे अपडेट करणार नाही हा मेसेज मागेच येऊन गेलाय.
29 Mar 2016 - 9:03 pm | श्रीरंग_जोशी
Microsoft Support Lifecycle या पेजवरील तारखा..
सर्वसामान्य वापरकर्ते एक्स्टेंडेड सपोर्ट विकत घेण्यापेक्षा अद्ययावत फ्री अपग्रेड (अजुनही उपलब्ध असल्यास) वापरणे पसंत करतील असे मला वाटते.
माझ्याही हापिसात सर्व लॅपटॉप्सवर विंडोज ७ अजूनही चालत आहे. अर्थात त्यांनी एक्स्टेंडेड सपोर्ट विकत घेतला असणार.
29 Mar 2016 - 9:28 pm | कंजूस
वेबपेज सेव ओप्शन काढू नका म्हणावं.
26 Mar 2016 - 11:51 am | डॉ सुहास म्हात्रे
Win10 केवळ स्टेबल आणि जुनी झाली नाही तर तिचा एक मेजर अपग्रेडही गेल्या आठवड्यात आला !
25 Mar 2016 - 12:39 am | उगा काहितरीच
विंडोज १० डाऊनलोड करतोय ७९% झालेय...बघूया कशी आहे ती.
28 Mar 2016 - 11:57 am | उगा काहितरीच
२-३ दिवस झालेत वापरतोय विंडोज १० . काही गोष्टी आवडल्या काही नाही.
आवडलेल्या गोष्टीः
१) GUI एक नंबर आहे. ८ मधे असलेले टाईल्स नसल्यामुळे विशेष आवडले. बाकी बरेचसे लहान मोठे बदल आहेत GUI मधे तेही मस्तच.
२) स्टार्ट बटन जे की ८ मधे गायबले होते ते वापस आले.
३) ८ मधे कोपऱ्यात कर्सर नेल्यावर ज्या वेगवेगळ्या विंडो उगवत होत्या त्या बंद केल्या.
न आवडलेल्या गोष्टीः
१) बॕटरी जास्त खाते.
२) बूट व्हायला जास्त वेळ घेते.
28 Mar 2016 - 12:57 pm | गामा पैलवान
उका, फोनावर की ल्यापाटोपावर वापरताय?
आ.न.,
-गा.पै.
28 Mar 2016 - 2:06 pm | उगा काहितरीच
लॕपी.
29 Mar 2016 - 2:19 am | गामा पैलवान
उका,
जर युईएफाय (Universal Extended Firmware Interface) चं बूटिंग असेल तर चटकन बूट व्हायला हवा. युईएफाय नवीन मानक (standard) आहे. कदाचित ब्याटरी देखील वाचेल. बूटिंगचा पर्याय युईएफाय करून बघा. त्यासाठी सीमॉस (cmos) मध्ये सेटिंग करावं लागतं. कदाचित काम जमून जाईल. स्वत:ला जमलं नाही तर मशीनच्या डॉक्टरला सांगून पहा.
आ.न.,
-ग.पै.
29 Mar 2016 - 6:08 am | कंजूस
असं वाचलंय की विं १० प्रत्येकवेळी स्टार्ट केली की सर्व अॅपस अपडेट करते त्यामुळे १) वेळ तर लागतोच पण २) डेटाही उगाचच खात असेल.३) वन ड्राइवही अपडेट करते.
25 Mar 2016 - 4:41 am | कंजूस
मला फोन अपडेट नोटिफिकेशन आले आहे पण करणार नाही.विं १० असलेलाच फोन नंतर घेणे सोयिस्कर पडेल असा विचार केला.व्हिडिओ रे० करताना ओडिओ न येणे,प्रिंटिंग हे प्रब्लेम बय्राचजणांनी लिहिले आहेत.
फोनवर अपडेट कोणी केल्यावर " html5test dot com" नवीन EDGE / IE 11 browser वर किती स्कोअर येतो ते पाहा. अगोदरच्या विं८.१ चा IE 11 चा स्कोअर 345/550 आहे.
25 Mar 2016 - 4:49 am | कंजूस
स्कोअर 345 points out of total 550.
पुढे विं १० घडीव करून अपडेट करताना त्यातील जो भाग अपडेट करायचा आहे उदा ब्राउजर तेवढाच करण्याचा अंतिम हेतू आहे.त्यासाठी सर्वच ओएस अपडेट करावी नाही लागणार.
चार दिवसांपुर्वी कोणते फोन्स अपडेट होतील यांची यादी इथे:http://www.neowin.net/news/windows-10-mobile-heres-the-full-list-of-wind...
29 Mar 2016 - 4:39 pm | कंजूस
जर तुम्हाला विं ७ , ८.१ वरून १० वर जायचेच नसेल तर? इथे वाचा:http://www.neowin.net/news/steve-gibsons-never-10-tool-will-help-you-kee...
3 Apr 2016 - 11:10 am | खटपट्या
झालो अपग्रेड विंडोज १० ला. मस्त वाटतंय. अँटीवायरस परत इन्स्टॉल करावे लागेल. बाकीतरी व्यवस्थीत चालतेय.
3 Apr 2016 - 11:22 am | डॉ सुहास म्हात्रे
नुकताच विंडोज १० चा एक मेजर अपग्रेड आला आणि हो म्हटल्यावर इन्स्टॉल झालाही.
मूळ विंडोज १० मध्ये एचपी १२०० ऑल-इन-वन प्रिंटरच्या, स्कॅनर व फोटोकॉपिअरसाठी सपोर्ट होता, पण प्रिंटरचा ड्रायव्हर नव्हता... या अपग्रेडने ती एक महत्वाची समस्या सोडवली. इस्लिये हम लय खूस है :)
4 Apr 2016 - 8:15 am | खटपट्या
विंडोज १० इंस्टॉल करायच्या आधी मला माझे अँटीवायरस अनइन्स्टॉल करायला लावले. सर्व विंडोज इन्स्टॉल झाल्यावर अँटीवायरस इंस्टॉल होइना. विंडोज १० बरोबर "विंडोज डीफेंडर" नावाचे अँटीवायरस येते. ते डीसेबल केल्यावर सीमेंटेक कींवा अन्य अँटीवायरस इंस्टॉल होते.