विंडोज १०: एक धावता आढावा
माइक्रोसोफ्ट कंपनीच्या या नव्या ओपरेटिंग प्रणालीची घडणीची सुरुवात मागच्या वर्षीच झाली होती आणि जानेवारी २०१५ नंतर ती काही लोकांना वापरण्यास देण्यात आली. आता २८/२९ जुलैला ती अधिकृतरित्या सर्वांसाठी प्रकाशित करण्यात आली. दरम्यान यावर बरेच लेख जालावर लिहिले गेले आणि त्यात खालील मुद्द्यांचा ऊहापोह करण्यात आला.
१) विंडोज प्रणाली ८/८.१ अस्तित्वात होती,मग ९ कुठे गेली ?
२) विंडोज ८+ आणि १० मध्ये काय मोठा फरक करण्यात आला.
३) त्यांचा ब्राउजर IE11 बदलावासा का वाटला?
नवीन ब्राउजर "EDGE" आल्यावर तो फोनचा 'नेटिव'/डिफॅाल्ट ब्राउजर झाल्यावर IE 11 चे काय होणार.
४) बोलण्यावरून आज्ञा देणारी "Cortana" प्रणाली अगोदरच होती तिची व्यापकता किती वाढवली आहे
५) सर्व मोबाइल / लॅपटॅाप / पिसी तसेच कीबोर्ड / टचस्क्रीन / माउस यासाठी एकच आणि बिझनेससाठी एकमेकास जोडले जाण्यासाठी "OneDrive" या विंडोज १० मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे तो किती यशस्वी झाला आहे.
६) आतापर्यंत सॅाप्टवेअर विकून पैसे कमवणारी कंपनी जर असे फुकट देऊ लागली तर भवितव्य काय? आडमार्गाने नंतर फी सुरू करणार का? (२००४ साली नेटस्केप या दुसय्रा एका कंपनी चा ब्राउजर धडाधड डाइनलोड होतो हे पाहून इक्सप्लोरर फुकट वाटण्यावरून माइक्रोसोफ्ट कंपनीस " व्यापार मक्तेदारी विरोधी"न्यालयात दावा लागला त्याला उत्तर द्यावे लागले होते.यानंतर मुख्य बिलगेटस यांनी प्रमुखपद सोडले होते.यावरची एक डॅक्युमेंटरी टिव्हीवर नुकतीच दाखवण्यात आली होती.)
७) नवीन प्रमुख सत्त्या नडेला यांच्या धोरणांतर्गत कंपनीने पावले उचलली आहेत त्याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
काही लिंक्स -
- Cnet review
- Techradar review
- माइक्रोसोफ्टकडूनच अपग्रेड कसे करावे
- windowscentral review
- pcadvisor review
यावर्षी नवीन प्रणाली असलेलेच मोबाइल /टॅबलेट वगैरे येतीलच परंतू जुन्या प्रणाली अपग्रेड करायचे कामही सुरू झाले आहे. माझा यात विंडोज ८.१ चा मोबाइल वापरत असल्याने उत्सुकता व्यतिरिक्त काहीच अनुभव नाही, केवळ नेटवरचे वाचलेले इथे आणण्याचा एक प्रयत्न केला आहे.
एकूण रिव्ह्यूतील विचार पाहता मी अपग्रेड न करण्याचाच निर्णय घेतला आहे. कारण
- एज ब्राउजर पाहिजेच असं काही नाही.
- कोर्टाना 'Cortana' ची व्यापकता वाढल्याने विशेष काही फरक नाही.
- बिझनेसकरता "Onedrive" आहे त्याचा सामान्य मोबाइलधारकास उपयोग नाही आणि ८.१ मध्ये आहेच.
- फोटोवर काही लिहून पॅावरपॅाइंटसाठी तयार करणे यासाठी अॅप आहेच.
- रेडिओ रेकॅार्डींगठीसाठी लागणारा माइक्रोफोन विं ७ नंतर काढलाच आहे.
- वेबपेज सेविंग सुविधाही ७ नंतर बंदच आहे.
नवीन प्रणालीतील दोष यथावकाश दूर होतीलही तोपर्यंत आपले अनुभव आणि शंका विचारण्यासाठी एखादा धागा असावा म्हणून हा प्रपंच. आपण यात भर टाकाल आणि चुका दुरूस्त करालच.
खालील चित्रे जालावरून साभारः
प्रतिक्रिया
6 Aug 2015 - 9:30 pm | श्रीरंग_जोशी
गेल्या आठवड्यात माझ्या लॅपटॉपवरची ओएस विंडोज ७ वरून विंडोज १० ला अपग्रेड केली आहे. अजून फारसा वापर केलेला नाही. काही गोष्टी उपयुक्त वाटत आहेत.
एज ब्राउझरचा अनुभव अजुन तरी खास वाटला नाही. पुन्हा एक दोनदा प्रयोग करीन. नाही तर क्रोम आहेच.
नवी ओएस अधिक वापरल्यावर इथे येऊन अनुभव लिहिनच.
6 Aug 2015 - 9:35 pm | सुहास झेले
सध्या तरी ग्राफिक ड्रायव्हर्स वगैरे च्या खूप केसेस येत आहेत.. ग्राहकांनी ८ / ८.१ पेक्षा १० ला पसंती दिलेली दिसते. हळूहळू कळतीलच त्यातले टेक्निकल प्रॉब्लेम्स. जसे अपडेट मिळतील तसे देत जाईन. :)
6 Aug 2015 - 11:31 pm | श्रीरंग_जोशी
विंडोज १० मधल्या त्रुटींबाबतची बातमी नजरेस पडली (न शोधता).
Windows 10 bugs emerge
6 Aug 2015 - 11:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
३० तारखेला विन ८.१ वरून १० अपग्रेड केली. काही दिवस "एच पी ऑल इन वन"चा स्कॅनर (WIA ड्रायव्हर नसल्याने) काम करेनासा झाला आणि वायफाय प्रत्येक बूटला ट्रबलशूट करून चालू करावे लागत होते. दोन्ही आवश्यक सेवा असल्याने विन ८.१ ला डाऊनग्रेड करायचा विचारही सुरू केला होता. पण, विन ८.१ अपग्रेडच्या वेळेस असेच झाले होते म्हणून थोडे दिवस कळ सोसायचे ठरवले. याचा फायदा झाला, कारण, कालपासून आपोआप झालेल्या कोण्या अपडेटने दोन्ही गोष्टी चालू झाल्या ! :)
नेहमीचे प्रोग्रॅम वापरताना कार्यप्रणालीमध्ये विन ८.१ आणि १० फारसा फरक आढळला नाही. काही कामासाठी (सेटींग्ज, इ), त्यांच्या जागा बदलल्याने, जरा शोधाशोध करवी लागली पण आता नविन प्रणालीत बदललेले तंत्र समजू लागल्याने नेहमीचे काम ठीक चालू आहे.
विंडो अपिअयरन्सवर (रंग, फाँट, इ) फारसा युजर कंट्रोल नाही. :( विंडोंचे टायटल बार्स पांढरे (कोणत्यही रंगांविना) असल्याने प्रणाली "वर्क इन प्रोग्रेस" वाटत राहते आणि ठळक विंडो बॉर्डर्स नसल्याने बिचकल्यासारखे वाटते... नंतर सवय होते... पण, हे दोन्ही बदल मला अजिबात आवडले नाहीत.
स्टार्ट मेन्यु अमेरिकेत आणि भारत / युरोपमध्ये वेगळा दिसतो आहे... लेखातले चित्र अमेरिकेतले आहे. अमेरिकेतला मेन्यु विन ७ च्या धर्तीवर बेतला आहे. मी भारतातून अपग्रेड केले तेव्हा आपोआप डायरेक्ट केलेल्या युरोपियन (जर्मन) संस्थळावरून डालो झालेल्या प्रणालीमध्ये खालीलप्रमाणे विन ८.१ च्या धर्तीवर असलेला डेस्कटॉप दिसतो...
6 Aug 2015 - 11:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
क्रोमच्या प्रेमात पडल्याने एज ची फारशी हालचाल विचारली नाही... वेळ झाल्यावर पाहीन :)
7 Aug 2015 - 8:05 am | आगाऊ म्हादया......
एक थीम फाईल आहे. हवा तो रंग आणि background ठेवता येईल.. इथे attach कस करू सांगा.
7 Aug 2015 - 8:19 am | श्रीरंग_जोशी
वन ड्राइव्ह वर अपलोड करा अन पब्लिकली शेअर करून इथे दुवा द्या.
इथे थेट काहीच अटॅच होत नसतं.
7 Aug 2015 - 9:34 am | आगाऊ म्हादया......
करतो..नाहीतर गुगल driveला टाकतो
7 Aug 2015 - 9:38 am | श्रीरंग_जोशी
या लेखात लिहिलेल्या स्टेप्स फॉलो केल्या आहेत का?
How To Change Title Bar Color In Windows 10
7 Aug 2015 - 9:40 am | श्रीरंग_जोशी
अगोदरच्या प्रतिसादातील लेखातल्या स्टेप्स अन त्यातील एका प्रतिसादातील स्टेप फॉलो करून अखेर टायटल बारचा रंग बदलणे जमलं.
8 Aug 2015 - 3:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रथम हे केलं आणि फाईल एक्सप्लोरर व ब्राऊजर्सच्या टायटल बार्सना रंग दिले... परंतू या प्रकरणात विंडोच्या सिस्टिम फाईल्सची छेडछाड करावी लागते. हे धोक्याचे ठरू शकते... पुर्वी अश्या खोड्या करून हातांना चटके लावून घेतले आहेत. त्यामुळे जरा अधिक उत्खनन केले तर हेच सर्व काम...
Start ---> Settings ---> Rationalization ---> Background / Colours / Themes
वापरून करू शकतो हे ध्यानात आले. तेव्हा पहिले सगळे परत रिवर्स केले आणि वरचा उपाय वापरला.
कोणताही प्रकार वापरला तरी; विंडो ७ पर्यंत जो डिस्प्ले विंडोंच्या रंग, टायटाल बार, बॉर्डर थिकनेस, फाँट, इ इ वर जो सुक्ष्म ताबा मिळत असे; तो नविन ८.१ आणि १० मध्ये मिळत नाही. बहुतेक अॅप विंडो स्नॅप्पी करण्यासाठी केलेली तडजोड असावी, असा अंदाज आहे :)
8 Aug 2015 - 6:49 pm | श्रीरंग_जोशी
या माहितीसाठी मनःपूर्वक धन्यवाद. या समस्येवर शोधले असता बहुतेक लिंका त्या सिस्टिम फाइल्सबरोबर छेडछाड करणार्या मिळाल्या. ज्या स्टेप्स फॉलो केल्यात त्यात बॅकप घेऊनच करायला सांगितले आहे.
आता मी देखील ते रिवर्स करून तुम्ही सांगितलेल्या मार्गाने हवे ते सेटिंग बदल करीन.
8 Aug 2015 - 10:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
वर ते Rationalization नाही Personalization आहे ! (Personalization च्या खाली तांबडी रेषा आल्याने राईट्क्लिक करून न बघता स्पेलिंग "सुधारल्याचा" परीणाम !
7 Aug 2015 - 6:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
ते माहीत आहे...
१. डेस्कटॉपवर फक्त (अ) बॅ़कग्राउंड चित्र (विंडोतले / वैयक्तीक) अथवा (आ) विंडोत उपल्बध असलेल्या मोजक्या रंगाच्या पॅलेटमधिलच एक रंग निवडता येतो. माझ्या प्रतिसादातले चित्रही त्यापैकीच एक आहे. (माझे वैयक्तीक डेस्कटॉप चित्र वैयक्तीक असल्याने ते स्नॅप घेताना ते बदलून विंडोचे डिफॉल्ट चित्र ठेवले आहे).... या गोष्टी काम बंद असताना डेस्क्टॉपवर दिसतात आणि त्यांचा तुमच्या कामावर फारसा प्रभाव पडत नाही.
पण हे सगळे अलाहिदा आहे....
२. माझा मुख्य रोख अप्लिकेशन / अॅप विंडोंच्या बॉर्डर्स, फाँट, रंग, इत्यादींवरच्या युजर कंट्रोलवर होता... जो विंडो ८.१ पर्यंत होता. या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. त्यांच्यामुळे युजरने कस्टमाईज केलेल्या विंडोंमुळे सर्वसाधारण युजर कंफर्ट व परफॉर्मन्सवर चांगला प्रभाव पडतो. हे फिचर विन १० मध्ये गायब आहे.
यापेक्षा वेगळे काही असल्यास स्वागत आणि नंतरचे धन्यवाद आधिच घ्या !
7 Aug 2015 - 8:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
मुख्य म्हणजे प्रत्येक विंडोचा पांढराच टायटलबार हे जरा जास्तच इरिटेट करतं ! :(
7 Aug 2015 - 8:44 pm | श्रीरंग_जोशी
काल जेव्हा अधिक काम करून पाहिले तेव्हा पांढरा टायटल बार खूपच जाचत होता नजरेला. शेवटी इथे सांगितलेलं फॉलो करून त्यापासून मुक्ती मिळवली.
8 Aug 2015 - 12:21 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद ! फाईल एक्सप्लोरर, ब्राऊझर्स आणि डेस्क्टॉपच्या समस्या सोडवल्या.
7 Aug 2015 - 10:36 am | आगाऊ म्हादया......
https://www.dropbox.com/s/xs2oumi4qmggmqz/Themes.rar?dl=०
१. इथून एक .RAR फाईल घ्या
२. फोल्डर मधील गोष्टी काढून घ्या desktop वर (colored आणि colored.theme)
३. C:\Windows\Resources\Themes इथे कॉपी करा.
४. colored.theme वर दोनदा टिचकी द्या. थीम स्थापित झाली की हवे तसे रंग बदलायला तुम्ही मोकळे आहात. किंवा accent color आपोआप निवडला जाईल.
6 Aug 2015 - 11:52 pm | chetanlakhs
सध्यातरी Display, Wi-Fi, आणि BSOD चे issues दिसत आहेत..
एकदा सगळे drivers अपडेट झाले की एकदम टकाटक चालेल
7 Aug 2015 - 12:08 am | रेवती
विंडोज १०ला अपग्रेड केल्यावर कांपुटर ढिम्म हलत नाहीये. शेवटी मुलाला सांगितले की त्याच्या काँप्युटरवर नंतर करू. एकदम सगळे बंद नकोत पडायला.
7 Aug 2015 - 12:11 am | डॉ सुहास म्हात्रे
अपग्रेड करण्याअगोदर त्याच विंडोत असलेला "काँपॅटिबिलिटी" ऑप्शन रन करून पहा. जर काहीच समस्या नसेल तरच अपग्रेड करा.
7 Aug 2015 - 5:27 am | रेवती
काम झाले. आधी संगणक जरा हळू चालला पण आत्ता एकदम मस्त!
7 Aug 2015 - 1:47 am | बहुगुणी
३० तारखेला विंडोज १० install केलं. काही वेळा माझा Surface Pro भलताच मंदावल्यासारखा वाटतो. काही जाणवलेले इतर issues:
१. Java Update करायला गेलो तर अशी सूचना आली: Internet Explorer 11 and Firefox will continue to run Java on Windows 10. The Edge browser does not support plug-ins and therefore will not run Java. जावा अपडेटेड नसेल तर याचा पुढे त्रास होणार नाही का?
२. Reading List, Share the Page वगैरे सुविधा ज्या ८.१ मध्ये उजवीकडे वरती सहज उपलब्ध होत्या त्या गायब झाल्या आहेत. (Reading List मिळतं पण त्यासाठी Favorites मधून जावं लागतं, जे त्रासदायक वाटलं.)
३. पुन्हा ८.१ ला revert करता येईल, पण त्यासाठी तीसच दिवसांची मुदत आहे असा संदेश आला. जर ३० दिवस विंडोज १० नीट चाललं पण त्यानंतर त्रास सुरू झाला आणि revert करावंसं वाटलं तर काय करायचं, पैसे भरायला लागतील का?
7 Aug 2015 - 8:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
इन्स्टॉल करण्याअगोदर्/करताना ISO / इमेज फाईल वापरून ८.१ विंडो इन्स्टॉलेशन सिडी केलेली असल्यास ही समस्या येऊ नये.
इन्स्टॉलेशन सिडी नसल्या आताच विंडो कस्टमर हेल्प/सर्वीसची मदत घेऊन ती करून घ्या.
7 Aug 2015 - 11:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सीडी का जमाना गया अब. बुटेबल पेन ड्राईव्ह बनवा. :)
8 Aug 2015 - 12:29 am | डॉ सुहास म्हात्रे
डीव्हीडी का जमाना तो खतम नही हुवा ना ?
१ किंवा जास्त टीबीचा फ्लॅश ड्राईव्ह असला तरी डीव्हीडीचे महत्व कमी होत नाही हे अनुभवाने शिकलो आहे ! :)
7 Aug 2015 - 2:58 am | गामा पैलवान
लोकहो,
नुकतीच कृतकयंत्रावर (व्हर्च्युअल मशीन) ८.१ चढवली. उद्यापरवा १० शी अद्ययावत करेन म्हणतो. कोणाला याचा अनुभव आहे? काही खुब्या आणि मार्गदर्शन (टिप्स अँड गायडन्स) मिळल्यास बरं होईल. कृतकयंत्रावर कशी चालते त्यावरून खऱ्या संगणकावर अद्ययावत करावी का ते ठरवायचा बेत आहे.
धन्यवाद.
आ.न.,
-गा.पै.
7 Aug 2015 - 6:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मला अजुनही विंडोज १० चा अपडेट आलेला नाही. माझं विंडोज ८.१ लायसन्स्ड कॉपी आहे.
7 Aug 2015 - 7:10 am | श्रीरंग_जोशी
विंडोज ८.१ ज्या उपकरणावर इन्स्टॉल्ड आहे त्यावरून या दुव्यावर जाऊन बघा.
7 Aug 2015 - 7:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पाहिलय आधीचं. सगळे क्रायटेरियाज मॅच होत असुनही मला नोटीफिकेशन नाही.
मायक्रोसॉफ्ट सपोर्ट ला मेलविन आता.
7 Aug 2015 - 7:16 am | श्रीरंग_जोशी
ओह्ह्ह, आश्चर्याचीच बाब आहे. भारतातही लोकांनी विंडोज १० ला अपग्रेड केले आहे.
7 Aug 2015 - 7:34 am | अभिदेश
मी Microsoft help line वर Live Chat केले त्यानी मला लिन्क दिली , आत्ताच केले install.
9 Aug 2015 - 12:43 am | भुमन्यु
मला पण हीच समस्या होती. सगळे अपडेट्स व्यवस्थित इनस्टॉल केले, त्यानंतर आज लॅपटॉप सुरु केला तर अचानक अपडेट दिसला
7 Aug 2015 - 8:02 am | आगाऊ म्हादया......
फोर्सड् अपग्रेड (windows 7 किंवा 8, एकदम latest update करा. ) त्यानंतर,
१. Windows update ची window open करून ठेवा.
२. C:/windows/SoftwareDistribution/Download यात जे काही सापडेल ते डीलीट करा.
३. Command prompt; Administrator म्हणून Run करा.
४. wuauclt.exe /updatenow ही प्रोसेस run करा.
५. Windows update ची window open आहेच, आता पुन्हा check for updates वर क्लिक करा.
Done!!
7 Aug 2015 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
विन ७ किंवा विन ८.१ ची लायसन्स्ड आणि अॅक्टिवेटेड कॉपी असली तर टास्कबार मध्ये उजवीकडे विन१०-अपडेटचा आयकॉन येतो... तो असा (किंवा वायरफ्रेम फॉर्मॅटमध्ये) दिसतो...
त्याच्यावर डबलक्लिक केल्यावर येणार्या विंडोतला काँपॅटिबिलिटी ऑप्शन वापरून तुमची सिस्टीम टेस्ट करून, काही समस्या नसल्यासच, अपग्रेड करावे.
=============
तो आयकॉन दिसत नसल्यास तुमची लायसन्स्ड कॉपी अॅक्टिवेट केलेली नसावी. ती करायला File explorer ---> This PC ---> (right click) ---> Properties ---> System Window (Use Windows Activation Option at its bottom). आता ताबडतोप (किंवा फारतर एक रिबूटनंतर) विन१०-अपडेटचा आयकॉन दिसू लागेल.
आता वरची प्रोसेस सुरू करा !
शुभेच्छा !
7 Aug 2015 - 7:34 am | अजया
विंडोज १० साठी मेसेज आलेला आहे.दोन दिवस रात्रंदिवस डेटा डालो होत होता.९८% झाला आणि डालो फेल्ड यायला लागलं.मग परत त्याच्या नादी न लागता,या धाग्यावर लक्ष ठेवून आहे.सर्वांनाच इतका वेळ लागतो का माझ्या वाय फायचा प्राॅब्लेम असावा?
7 Aug 2015 - 7:42 am | श्रीरंग_जोशी
या कामापुरती मोडेमहून लॅपटॉपला थेट जोडणी देऊन बघा. वायफायपेक्षा वेग कधीही अधिक मिळतो.
7 Aug 2015 - 8:00 am | आगाऊ म्हादया......
Windows 10 review
आत्ताच अपग्रेड केलंय काही तासांपूर्वी, जाणवलेल्या काही ठळक गोष्टी खालीलप्रमाणे.
१. खूप त्रास होतोय हे अपग्रेड व्हायला, कॉपी आरक्षित केलेली आहे तरीही. २ संध्याकाळ फुकट गेल्या आहेत.
अगदी घाईने करायचं असेल तर प्रक्रिया सांगेन शेवटी.
२. UI चांगला वाटतोय, पण खूप इंटरनेट खाणारा आहे.
३. बूटअप टाईम मध्ये बिलकुल फरक नाही. ११२ सेकंद. (XP असलेला desktop अजूनही ३२ सेकंदात बूट होतोय.)
४. Add Desktop हे नव फिचर आहे, सर्व खिडक्या उघड्या ठेवून नवा desktop ओपन करता येतो. त्यामुळे नवीन desktop वर clutter रहात नाही.
५. टायटल बार पांढरा आहे, retinaवर आघात आहे.
६. इंटरनेट एक्सप्लोरर नेहमीप्रमाणे वाईट आणि क्रोम crash होतोय. IEची नवी फीचर्स इतर softwareवर अवलंबून आहेत, उदा. onenote.
speed च्या नावाने बोंब
७. सर्वात मोठ्ठी समस्या- Display drivers आणि audio drivers अजून यायचे आहेत. अद्यतनित होण्यास वेळ लागेल. आवाज नाही .फंक्शन कि वापरून ब्राईटनेस कमी होत नाहीये.
८. Action center चांगलं केलंय. खूप नव्या गोष्टी घातल्यात.
९. जुना मराठी font “मंगल ” होता, आता arial आहे. नाही आवडला.
१०. Videos tool जरा improved आहे.
११. google च मेघ मराठी इनपुट उपकरण फार वाईट पद्धतीने वागतंय. Word suggestions दिसत नाहीयेत.
तरीसुद्धा अपग्रेड करायचंच असेल तर,
प्रक्रियेच नाव- फोर्सड् अपग्रेड (windows 7 किंवा 8, एकदम latest upgrade करा. ) त्यानंतर,
१. Windows update ची window open करून ठेवा.
२. C:/windows/SoftwareDistribution/Download यात जे काही सापडेल ते डीलीट करा.
३. Command prompt; Administrator म्हणून Run करा.
४. wuauclt.exe /updatenow ही प्रोसेस run करा.
५. Windows update ची window open आहेच, आता पुन्हा check for updates वर क्लिक करा.
Done!!
7 Aug 2015 - 9:22 am | कंजूस
माझा असा प्रश्न आहे की आता विंडोज ८/८.१ वाल्या मायासारख्या मोबाइलधारकांनी ठरवलं की नाहीच अपग्रेड करायची ओएस तर काय होइल?
7 Aug 2015 - 11:27 pm | भाते
सध्या आलेले विंडोज १० फक्त डेस्कटॉप / लॅपटॉप साठी आहे. मोबाइलसाठी विंडोज १० यायला अजुन वेळ आहे. सध्याचा गोंधळ पहाता मोबाइलवर विंडोज १० आल्यावर वाट पाहुन नंतरच अपग्रेड करावे लागणार आहे.
7 Aug 2015 - 10:00 am | नाव आडनाव
पीयूजी (पुणे यूझर्स ग्रूप) चा एक ईवेंट आहे आमच्या कंपनीत (पर्सिस्टंट मधे). वेगवेगळ्या कंपन्यातले / कधीकधी मायक्रोसॉफ्ट चे लोक येऊन नव्या टेक्नोलॉजी चा डेमो देतात. यावेळी विंडोज १० आणि विजुअल स्टुडिओ २०१५ आहे. http://events.puneusergroup.org/welcome-windows10 वर जाऊन रजिस्टर करू शकता. हे ईवेंट फ्री असतात. काही शंका असतील तर तिथे विचारू शकता. ८ तारखेला ९ ते २ या वेळेत आहे.
7 Aug 2015 - 11:05 am | अद्द्या
खेळत असलेले काही गेम्स अजुनी विंडोज १० सपोर्ट करत नाहीत . त्यामुळे तोपर्यंत तरी असलेल्या "७" ला हात लावणार नाही .
पण जेवढे रीव्युज वाचलेत त्यानुसार. . सध्या तरी फार गडबड करण्यात काही अर्थ नाही . २-३ महिन्यांनी जेवढा याचे पेचेस येतील . आणि बग्स कमी झालेले असतील तेव्हाच अपग्रेड करणे
7 Aug 2015 - 4:36 pm | अनामिक२४१०
विंडोज ७ वरून विंडोज १० वर एकदम अपग्रेड झालोय ३-४ दिवस आधीच …
सध्या तरी WINDOWS १० ठीक वाटतंय … नाही पटलं तर Recovery option आहेच पुन्हा एका महिन्याच्या आत
वेळ खूप खाल्ला download आणि इंस्टाल करायला …
EDGE पेक्षा Chrome उत्तम …
… सध्या इतकच
7 Aug 2015 - 7:38 pm | सुधीर
पोर्ट ८० कॉन्फ्लिक्ट झाला. सिस्टीमकडूनच पोर्ट ८० वापरला जातो. काही ॲप्लिकेशन्स पण नाही चालले.
दुस-या दिवशी क्रिटीकल एरर यायला लागला...
Windows 10: Critical Error: Start menu and Cortana aren't working, we'll try to fix it when you next sign in..
लॉगिनमध्येच प्रॉब्लेम ...
नेहमीप्रमाणे रिस्टार्ट मारल्यावर इश्यू गेला... (जूने दिवस आठवले)
वैतागून रोलबॅक करून टाकली रविवारी रात्रीच.
स्टेबल झाली की मग टाकेन....
हा धागा ॲन्ड्रॉईड धाग्या प्रंमाणे जागा ठेवा...
चर्चेचा उपयोग होईल.
7 Aug 2015 - 9:37 pm | चौकटराजा
ही एक वेगळी च मैफल रंगली आहे.मी 1986 पासून संगणक वापरीत असूनही काय बी कलला नाय !
25 Mar 2016 - 1:44 pm | भाऊंचे भाऊ
- 1996 पासून संगणक वापरत असुनही अजूनही विन टेन फुकट आहे की विन टेन अपडेट फुकट आहे या संभ्रमातला भाऊ.
7 Aug 2015 - 11:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
झालं काम. काही ८.१ चे अपडेट्स पेंडींग होते. ते केले की होउन जाईल काम.
10 Aug 2015 - 10:17 am | अभिजितमोहोळकर
३० तारखेला अपग्रेड करायला घेतला. घाई घाई ने लगेच अपग्रेड सुरू केला आणि स्क्रीन काळा होऊन एरर दिसू लागली. म्ह्टले चला, परंपरा मोडली नाही. इन्स्टॉलेशन फेल गेलं असलं तरी मूळच्या ७ व्या खिडकीला धक्का लागला नव्हता. पुढचं इन्स्टॉलेशन फेल गेलं. एरर कोड घेऊन नेट वर शोधलं असतां अँटी व्हायरस काढून टाकणे आणि युएसबी डिव्हाईस डिसकनेक्ट करणे ह्या दोन सूचना दिसल्या. ते केल्यावर अत्यंत सुरेख अन कसलेही धक्के न बसता विंडोज लॅपटॉपवर इनस्टॉल झाली.मला तरी रूपडे आवडले. विंडोज ७ वर इनस्टॉल केलेल्या सर्व अॅप्लीकेशन्स ऊत्त्म चालतायत. फिफा १३ आणि एऑएं ३ हे दोन गेम्सही टकाटक चाललेत.
एज ब्राऊजर भलताच मस्त वाटला. जीमेल, मिपा आणि अन्य मराठी संस्थळं, चेपु, लिंक्डीन, वर्तमानपत्र< ब्यांका सर्व सायटी भन्नाट चालल्या. मधे एक दोन वेळा थोडासा अडकलेला वाटला, पण अगदी १-२ सेकंदापुरतं. विंंडोज १० मधे मेल अॅप आहे. त्यावर ईमेल सहज कॉन्फीगर झाली. कॅलेंडर अॅप मधे ३ गुगल आणि १ लाईवह अकाऊंट कॉन्फीगर करूनही ते स्लो नव्हतं. ग्रुव्ह मुझिक आणि व्हीडीओ अॅपही व्यवस्थित.
एकूण एक्दम मस्त आणि अ-मायक्रोसॉफ्टी अनुभव...
24 Mar 2016 - 9:51 pm | खटपट्या
काही लोकांना विण्डोज १० अपग्रेड करण्याबद्द्ल ऑप्शन येतोय काहीना नाही येत.
माझ्या मित्राने करुन पाहीले पण त्याचे व्हीडीओ आणि साउंड ड्रायवर १० मधे आपोआप लोड झाले नाहीत.
अँटीवायरस अनइन्स्टॉल करणे चांगले. (पण तुमच्याकडे विन्डोज १० साठी अँटीवायरस आहे का हे तपासून ठेवा)
वर झेले साहेबांनी सांगीतल्याप्रमाणे रीकव्हरी सीडी/डीवीडी/पेन ड्राइव बनवून ठेवणे केव्हाही चांगले. नाही आवडले किंवा काही प्रोब्लेम झाल्यास जुन्या वर्जन वर जाण्यास सोपे. रीकव्हरी सीडी बनवताना डेटा सहीत बनवल्यास वेगळा डेटा बॅकअप घेण्याची गरज नाही.
वयक्तीक मत - विन्डोज १० स्टेबल झाल्याशिवाय अपग्रेडला न गेलेले बरे. कमीतकमी जांच्याकडे फक्त एकच मशीन आहे त्यांनी तरी. मायक्रोसॉफ्ट आधी फुकट देते ते लोकांकडून फीडबॅक घेण्यासाठीच. आणि मग आपल्या फीडबॅकवर बाकेच्या सुधारणा करते. थोड्क्यात आपला गीनीपीग सारखा वापर केला जातो.
24 Mar 2016 - 11:11 pm | श्रीरंग_जोशी
खटपट्या - विंडोज १० ला अपग्रेड करून माझ्यासकट अनेक मिपाकरांना सात महिने होऊन गेले आहेत. कुणीही कुठली मोठी समस्या इथे मांडलेली नाहीये.
माझा स्वतःचा अनुभव उत्तम आहे. सहा वर्षांपूर्वीच्या लॅपटॉपची ओएस विंडोज ७ वरून १० ला अपग्रेड केली.
केवळ माझा कॅनन कंपनीचा प्रिंटर + स्कॅनर या उपकरणाचे जे स्कॅनिंगचे सॉफ्टवेअर होते ते विंडोज १० ला कॉम्पॅटिबल नाहीये. कॅननचे कस्टमर केअर त्याबद्दल मदत करायला तयार आहेत. पण मलाच वेळ न मिळाल्याने ते काम अपूर्ण राहिले आहे.
थोडक्यात म्हणजे हा प्रतिसाद काळानुरूप संदर्भहीन झालेला आहे. मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ चा सपोर्ट थांबवला आहे. विंडोज ८ चा सपोर्ट जानेवारी २०१८ ला संपत आहे.