(वाया) (मयपूर कथा)

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
4 Aug 2015 - 5:30 pm

*** आमची प्रेर्ना

शनिवारच्या रात्री मस्त तीर्थ-प्रसाद चापून, वाँकिंग झॉँबी मँरेथॉन करता करता साधारणपणे मला अर्ध्याएक मिनिटे (काल सापेक्ष असतो, चुभुघ्याद्या.) सोफ्यावरच अमळसा डोळा लागला तोच, कोणितरी मला हलविल्यासारखे जाणवू लागले. मला माझे डोळे बंद असताना पण सर्व दिसत होते. पण तरीही अंगात उठण्याची ताकद नव्हती, हालचाल करू शकत नव्हतो ...ओरडावंस वाटलं पण तोंडातुन शब्दच फुटत नव्हते. कोणितरी माझ्या घशातून बाहेर यायला पहात आहे असे वाटत होते.
जी उमस, जो काळीज फोडून बाहेर यायला बघणारा कालवा मी एवढी वर्षे मनाच्या जुनाट सांदीकोपर्‍यात गाडून टाकला होता, तो प्रचंड वेगाने सळसळत वर येत आहे. सर्वांगाचा पंप झालाय, पण हातपाय लुळावलेत आणि घशाला ओलाव्याची गरज आहे असे वाटून शेवटी मी तो ओला करण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी मला जाणवत होतं की माझ्या डोक्याजवळ कोणितरी उभे आहे. हिंमत करून, मोठ्या मुश्किलीनं मी वर पाहून
पुटपुटलो “और पिलादे साकी”, तर सगळंच ब्लर दिसत होतं. मला एक पुसटशी पांढरी आकृती दिसली. हातभर अंतरावरून तिची ती कमनीय काया माझ्यातच सामावून जायला उत्सुक होती. एकाएकी तिचे ओठ विलग झाले. माझ्या घशातली कोरड वाढली तर तिचे तांबूस डोळे लकाकू लागले.

ओठातून भरभरून देण्यास समर्थ असणारं हसू तिच्या तांबूस डोळ्यांतून ओसंडत होतं. पण त्याला हसू तरी म्हणता आलं असतं का? तो उन्माद होता. तिच्या डोळ्यातल्या आनंदात हक्क आणि आक्रमण होतं; आणि त्या पलीकडलंही काहीतरी होतं. त्या आनंदात एक आधाशीपणा होता. मला पिऊन टाकण्याचा. तो चेहरा मी कधीही विसरलो नसतो. माझ्या शरीरावरचे केस नं केस ओठ झाले. तिच्या अतिपरिचीत वासाचे थंड पांघरूण पूर्ण सोफाभर पसरले. पाय लटपटू लागले. कमनीय आकृती ओठातून पोटांत आणि पुन्हा ओठांतून सोफ्यावर कशी पोहोचली मला कळलंही नव्हतं. आणि मग बाहेरच्या दुष्ट आकृतींच्या तोंडातले उद्गार मला ऐकू येऊ लागले. सिमेंट मिक्सर खडखडावे तशी ती खडखड मला खडसावीत… स्पष्ट काही कानावर पडत नव्हतं माझ्या, पण त्यांच्या भेसूर चिडचिडाटाला आसमंताने साथ द्यायला सुरुवात केली होती.

त्यांच्या किरट्या, कर्कश आवाजाने सभोवताल नडल्या गेला. एक प्रकारचा शब्दछळ होता. तो स्वर शूल टोचीत होता. माझ्यातल्या निर्जीवाला, अचैतन्याला आवाहन करीत होता. माझ्यांत काहीतरी जिवंत होऊ लागलं. आजवर मृत असणारं, किंवा कधीच जिवंत नसणारं असं काहीतरी त्या सूरात सूर मिसळून बोलू लागलं. "किती वेळचे पडू देणार आहेत मला सोफ्यावर ? मघापासून सांगत होतो 'एक तरी द्या म्हणून…, पण तुम्ही माझ्याकडूनच सगळी काढून घेतली. उठवा रे मला … आपल्याला जायचं नं मॉलमधे? ५ मिनिटात दुकान बंद होईल, बाटल्या संपल्यात, उठवा मला आणि पैसे घेतले नां कोणी तरी बरोबर?
*******
माझे साथी माझ्या पाकीटातल्या नोटा काढीत ओरडले “होहो हे काय, घेतले ना पैसे!”,
…… स्साले हे पियक्कड म्हणजे नं….

विडंबनशुभेच्छा

प्रतिक्रिया

तुडतुडी's picture

4 Aug 2015 - 5:36 pm | तुडतुडी

जेव्हा लोक तुमच्या कथांचं विडंबन करतात तेव्हा तुम्ही कथा लिहिण्यात यशस्वी झालात आणि तुमची लोकप्रियता वाढत चाललीये हे सिध्द होतं . ;-)

अरुण मनोहर's picture

4 Aug 2015 - 5:53 pm | अरुण मनोहर

प्रेर्ना ची लिंक चुकलीय ओ!

करेक्ट लिंक

"लेखनप्रकार:
शुभेच्छा"

हाहाहा

जडभरत's picture

11 Aug 2015 - 9:48 pm | जडभरत

भन्नाट हाय! मस्तच!!!