महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या अनेक नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे. महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे. राजाने आज्ञा दिली, यात विचार कसला, ठेचुन टाका त्याला. सैनिकानी तत्काल त्या नागाला ठेचुन ठार केले.
दुसरी कथा:
महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे. महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे. राजाने आपल्या मंत्र्याना या बाबत त्यांच्या सल्ला मागितला.
पहिला मंत्री: महाराज अधिक विचार न करता ह्या विषारी नागाला ठार मारले पाहिजे, जर हा सुटला तर पुन्हा लोकांना डसेल. याला जिवंत सोडले तर शेजारच्या जंगलातून अनेक नाग या नगरात येऊन प्रजेला डसतील.
दुसरा मंत्री: महाराज, आपण नागाची बाजू हि लक्ष्यात ठेवली पाहिजे. नाग हा विषारी असतो,नागाचा दंश प्राण घेणारच. आपण सभ्य मानव आहोत. 'खून का बदला खून' हि आपली नीती नाही. आपली प्रजा असो वा नाग. दोघांना एक समान न्याय मिळाला पाहिजे. बिना विचार करता त्याचे प्राण घेणे योग्य नाही. राजाला दुसर्या मंत्रीचे विचार पटले. त्याने नगरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समितीचा सल्ला घेण्याचे ठरविले. या समितीत अतिशय बुद्धिमान नाना कलासंपन्न आणि पुरोगामी विचारांचे प्रजाजन होते.
प्रतिष्ठित नागरिकांच्या समितीने राजाला सल्ला दिला. राजा नाग हा विषारी असतो, तो लोकांना डसतो. हा त्याच्या स्वभाव आहे. त्याने त्याच्या स्वभावानुसारच लोकांना डसले आहे. दंश विषारी असल्यामुळे लोक मेले. त्या साठी नाग जवाबदार कसा. त्याला ठेचून मारण्याची शिक्षा देणे हा त्याच्यावर अन्याय आहे. आमची सिफारीश आहे, नागाचे प्राण घेण्याएवजी त्याला सोन्याच्या पिंजर्यात ठेवले पाहिजे. दर नागपंचमीला त्याला दुधाचा नेवेद्य दाखविला पाहिजे. असे केल्याने तो कुठेही पळून जाणार नाही.
राजाला प्रतिष्ठित नागरिकांच्या समितीचे विचार पटले. त्याने नागाला जीवदान दिले. एका सोन्याच्या पिंजर्यात नागाला ठेवले. दर नागपंचमीला तो दुधाचा नेवेद्य नागाला दाखवू लागला. एका नागपंचमीला नागाला दुधाचा नेवेद्य दाखवीत असताना तो नाग राजाला डसला. नाग दंशाने राजाची मृत्यू झाली.
आता प्रश्न आहे, राजाच्या मृत्यूला कारणीभूत कोण? नाग कि प्रतिष्ठित नागरिकांची समिती.
स्वामी त्रिकाळदर्शी म्हणतात, ज्याला याचे उत्तर कळेल, त्याची सर्पदंशाने कधीच मृत्यू होणार नाही.
प्रतिक्रिया
29 Jul 2015 - 10:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
छान लिहिलयं. अगदी यथोचित.
29 Jul 2015 - 10:33 pm | जडभरत
मस्तच चालू बिनडोक घटनांवर सुंदर भाष्य.
आवडेश.
29 Jul 2015 - 10:36 pm | माम्लेदारचा पन्खा
नको त्यांना नको तिथे ठेवलं की हे असं होतं !!
29 Jul 2015 - 10:38 pm | स्रुजा
छान लिहीलंय, मार्मिक भाष्य.
त्या समिती चे स्वतःचे अनेक गुंतलेले हितसंबंध पण असतात या निर्णयात. नंतर टिवटिवाट करणार्यांचे सिनेमे उभे राहिले असतात नागजमाती च्या पाठिंब्याने. सगळा देखावा.
29 Jul 2015 - 10:49 pm | दा विन्ची
पुणेकर मंडळी, ही पुणेरी पलटण टीम पुण्याची पार लाज काढतेय राव .
30 Jul 2015 - 12:22 am | एक एकटा एकटाच
मार्मिक
30 Jul 2015 - 9:02 am | अमृत
आताच बातमी वाचली नागपुरहून आलेली.
30 Jul 2015 - 9:55 am | तुषार काळभोर
स्वामी त्रिकाळदर्शी महाराज की जय!!
30 Jul 2015 - 10:25 am | सुबोध खरे
शालजोडीतून उत्तम हाणल्या आहेत.
30 Jul 2015 - 10:33 am | मृत्युन्जय
अर्थात नागच जबाबदार. पण लक्षात घ्या. डसणे हा त्याचा धर्मच आहे. त्यामुळे त्याला मोकळा सोडलाच पाहिजे. प्राणीमित्र पण हेच सांगतील.
30 Jul 2015 - 10:38 am | नाखु
नागडे पण परखड वास्तव !!
स्वामी त्रिकाळदर्शी महाराज की जय!!
30 Jul 2015 - 10:41 am | यशोधरा
समर्पक.
30 Jul 2015 - 11:31 am | शब्दबम्बाळ
एक रुक हुआ फैसलाची आठवण झाली!
30 Jul 2015 - 12:08 pm | पद्मावति
बाकी मृत्यूला राजा खुद्द जबाबदार. कोणाचा सल्ला घ्यावा आणि कुणाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करावे हे राजाला कळलेच पाहिजे.
30 Jul 2015 - 1:25 pm | तुडतुडी
हे हे हे . मस्त . राजा स्वतःच त्याच्या मृत्यूला जबाबदार .
30 Jul 2015 - 4:11 pm | इरसाल
राजाच जबाबदार.
भेंडी सापाला/नागाला सोनेरी पिंजरा वरुन दुध पाजाल तर भडकणार नाय तो.
रं बाला तेला मांगच्या परवीन आंब्याची सुक्की पाना अंथरुनशिनी तित आवरी बारकाली हुंदराची पिला सोरुन ठेवाचा तं पिंजर्यान भरला, तो चितालला ना आनी मंग फुस्स्दिशी डसला नां !
30 Jul 2015 - 4:37 pm | सस्नेह
परखड रूपक कथा.
30 Jul 2015 - 8:16 pm | विवेकपटाईत
प्रतिसादाबाबत धन्यवाद. काल डोक्यात विचार आल्यावर घाईघाईने कथा खरडली. उशीर का होईना राजाने योग्य निर्णय घेतला. उशीर का होईना. पण योग्य निर्णय न घेता नागाला दूध पाजले तर काय होते.... आपल्या दोन पंत प्रधानांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. पंजाब आणि तमिळ लोकांना हि त्याचे फळ भोगावे लागले. जे लोक नागाला दूध पाजण्याची भाषा करतात नागाचा दंश प्रथम त्यांनाच होतो. हे विसरता कामा नये.
30 Jul 2015 - 9:42 pm | जडभरत
ब्बरोब्बर. हैला. पटाईतबुवा फार्मात!!!
31 Jul 2015 - 12:32 am | पाटीलअमित
इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा चा नवीन अवतार
==========================
आजची स्वाक्षरी
रावणाचे उदाती कारण
31 Jul 2015 - 5:42 pm | उगा काहितरीच
छान रुपक ! समझदार को इशारा काफी है .
10 Aug 2015 - 5:24 pm | तुडतुडी
सर्पसत्र यज्ञाशी इंद्राचा काय संबंध आहे कोणी सांगेल का ? कारण इन्द्रासहित तक्षकाला धरून आणलं होतं असं वाचनात आलंय
10 Aug 2015 - 8:03 pm | विवेकपटाईत
https://hi.wikipedia.org/s/7a5 हे पहा