जय हो

अमेयहसमनीस's picture
अमेयहसमनीस in जनातलं, मनातलं
25 Aug 2008 - 12:19 pm

लोकमान्य टिळकांनी प्रथम पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली आणि बघता बघता सार्वजनिक गणेशोत्सव परदेशातही साजरा होऊ लागला.

यंदा प्रथमच हॉलंडच्या हेग शहरात गणेशोत्सव साजरा होणार असून, यासाठी सोमवारी पुण्यातून गणेशमूर्ती रवाना करण्यात येत आहेत.

मूर्तीबाबत देशमुख म्हणाले, "मूर्ती पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नियमांचा विचार करून निर्माण केली आहे. मूर्तीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला असून, ती पर्यावरणपूरक आहे.

हे नियम फक्त आंतरराष्ट्रीय मूर्तीला का?

भारतात पर्यावरणाला काही धोका नाही का?

अमेय

समाजबातमी

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

25 Aug 2008 - 1:50 pm | दत्ता काळे

अमेया

हॉलंडची तशी अट असू शकते.

आणि आपल्या पर्यावरणाबद्दलच्या नियमांची पायमल्ली देखील देशमुखांनीच केलेली आहे.
उदा. कालच्या दहीहंडीला प्रचंड आवाजाच्या स्पीकर्सच्या मोठ्याला अनेक भिंती उभारुन लोकांच्या छातीमध्ये धडकी भरवली.
कारण विलासरावांना ते ऐकुच येत नव्हते. हा कार्यकर्त्याना सांभाळून घेण्याचा खेळ आहे.

कुंदन's picture

25 Aug 2008 - 2:08 pm | कुंदन

मुळ बातमी खालील प्रमाणे आहे , "सकाळ" मध्ये......

पुणे, ता. २४ - लोकमान्य टिळकांनी प्रथम पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवास सुरवात केली आणि बघता बघता सार्वजनिक गणेशोत्सव परदेशातही साजरा होऊ लागला.
यंदा प्रथमच हॉलंडच्या हेग शहरात गणेशोत्सव साजरा होणार असून, यासाठी सोमवारी पुण्यातून गणेशमूर्ती रवाना करण्यात येत आहेत.

दगडूशेठ गणपती मूर्तीची प्रतिकृती असलेली ही मूर्ती "नटराज आर्ट'चे मूर्तिकार भालचंद्र देशमुख यांनी तयार केली आहे. या मूर्तीचे वजन २१ किलो असून, उंची २ फूट आहे. निनाद संस्थेच्या सहकार्याने आज विमानाने मूर्ती हॉलंडला जाणार आहे. लंडनच्या "हिंदू हेरिटेज ऍण्ड कल्चरल सोसायटी'तर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ही संस्था गेल्या चार वर्षांपासून लंडनमध्ये उत्सव आयोजित करत असून, यंदा प्रथमच हॉलंडमध्येही साजरा होणार आहे. यात २९ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता हेग शहरातील "श्रीकृष्ण मंदिरा'त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या वेळी २५ देशांतील संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ३० ऑगस्टला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, ३१ ऑगस्टला भव्य शोभा यात्रेने मिरवणूक काढून हेगच्या समुद्रात मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. पुढील वर्षी संस्थेच्या बॅंकॉक, सिंगापूर, पटाया येथील सदस्यांच्या सहकार्याने थायलंडमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे.

मूर्तीबाबत देशमुख म्हणाले, ""मूर्ती पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नियमांचा विचार करून निर्माण केली आहे. मूर्तीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला असून, ती पर्यावरणपूरक आहे. ही मूर्ती १५ दिवसांत पूर्ण करण्यात आली. पुण्यात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सवास सुरवात झाल्यामुळे मूर्ती पुण्यातून मागविण्यात आली आहे.''

रविवारी दुपारी सदाशिव पेठेतील सुभाषनगरमध्ये या गणेशमूर्तीची पूजा करण्यात आली. या वेळी नगरसेविका शुभदा जोशी, उदय जोशी, निनाद संस्थेचे चंद्रकांत सणस, रामलिंग सणस, अनिल शिदोरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. या वेळी बोलताना उदय जोशी म्हणाले, ""रविवारी संध्याकाळी ही मूर्ती मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. उद्या सकाळी ती "केएमएल' एअरवेज या विमानाने ती हॉलंड येथे रवाना होईल.''