स्वच्छतेचा चष्मा- एक रूपक कथा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
19 Jul 2015 - 10:25 am

सिंहासनावर विराजमान अवंती नरेश विक्रमादित्यचे डोके भडकलेले होते, ते रागाने राजसभेत बसलेल्या सभासदांवर डाफरत होते, आज सकाळी राजवाड्या बाहेर फिरायला गेलो होतो. सहज म्हणून अवंती नगरीचा फेरफटका मारला. नगरात जागो-जागी कचर्याचे ढिगारे आणि घाणीचा उग्र वास पसरलेला होता. कसे राहतात आपले प्रजाजन डुक्करांसारखे या घाणीत, सहन होत नाही मला, आता असे चालणार नाही. काही ही करा मला पुन्हा कधी नगरीत घाण दिसता कामा नये. पण एक लक्ष्यात ठेवा, प्रजेला आर्थिक स्वरूपाचा काही त्रास झाला नाही पाहिजे आणि सरकारी तिजोरीला ही फटका बसला नाही पाहिजे. प्रधानमंत्री म्हणाले असेच होईल महाराज.

दुसर्या दिवशी महाराजांच्या प्रधानमंत्रीनी, महाराजांसमोर एक चष्मा पेश केला आणि म्हणाले महाराज हा चष्मा खास इंद्रप्रस्थ नगरीतून महाराज युधिष्ठिर यांनी पाठविला आहे. हा चष्मा घातल्यावर तुम्हाला कुठेही घाण दिसणार नाही किंवा घाणीचा वास ही येणार नाही.

महाराज विक्रमादित्यांनी चष्मा डोळ्यांवर चढविला. अवंती नगरीत फेरफटका मारला. त्यांना कुठेही घाण दिसली नाही किंवा घाणीचा वास ही आला नाही. महाराज प्रसन्न झाले.

स्वामी त्रिकाळदर्शी म्हणतात, ज्याला या कथेचा अर्थ समजेल, त्याचे घर नेहमीच स्वच्छ राहील.

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

dadadarekar's picture

19 Jul 2015 - 10:35 am | dadadarekar

छान

चौथा कोनाडा's picture

19 Jul 2015 - 1:03 pm | चौथा कोनाडा

मस्त !

असा चष्मा शासकिय अनुदानाने मिळत असेल तर नकी घेणार !

विवेकपटाईत's picture

19 Jul 2015 - 9:21 pm | विवेकपटाईत

शासकीय अनुदान ही बहुतेक मिळेल असे वाटते. पण एक लक्ष्यात ठेवा, चष्मा लावल्याने घाण दिसणार नाही, चष्मा काढल्यावर दिसेल. (जसे दरवर्षी पावसाळ्या आधी सरकारी कागदात नाले स्वच्छ केलेले दिसतात ).

पैसा's picture

19 Jul 2015 - 10:28 pm | पैसा

कथा मस्त आहे! इंद्रप्रस्थातल्या चष्म्याचा चमत्कार! दुसरे काय!