आमची प्रेरणा
तो अगदी घामेजून गेला होता! !
त्याने नवसागर, काळा गुळ, मोहाची फुलं, युरिया, जुन्या बॆट-या हे सगळे जिन्नस वापरून काहीतरी बनवीले होते. उत्सुकता म्हणून त्याने ते बोटावर ओतुन जाळावर धरलं. भपकन पेटणारा तो द्रव जबरी वास मारत होता. त्यांच्या धंद्याच्या उसुलात प्रत्येक बाटलीला "बूच" लावने आवश्यक होतं. त्याच्या जवळच काम करणार्या मित्राला त्याने विचारलं "दादूस...मांझा माल खपल ना...."
"हेच्या आसला हेच्या बेंबट्या.... कं बोलतोस कं तू....हा तर पयल्या धारंचा माल हं.... खपलाच पायजे बोल.... उद्या गटारी आमोशा हं.... तू तूंजा माल बिंधास्त मांझे गुत्त्याव लाव इकायला........."भट्टी" लावणारा बाला खुषीन येऊन बोल्ला.... जाळावरनं आपले लक्ष किंचीतही ढळू न देता.......
प्रतिक्रिया
16 Jul 2015 - 5:57 pm | जडभरत
आयला शाब्बास रे पठ्ठया! झक्कासच!
16 Jul 2015 - 6:42 pm | सदस्यनाम
मस्त! हटके रेसेपी! माणसाची सुद्धा आज पहिल्यांदाच भीति वाटली.बाद्वे तो द्रव म्हणजे हातभट्टीच का? कारण विनाझैरात विपणन हा सिद्धांत फक्त हातभट्टीलाच लागू होतो. येरवाळीच चांगला फुगा फोडलात!
16 Jul 2015 - 6:49 pm | प्यारे१
भारीच्च. पैल्या धारेची गोष्ट!
>>>> येरवाळीच
झाली की तिन्हीसांज. पावलं गुत्त्याकडं वळायचीच.
(येरवाळी ऐकून फार दिवस झाले होते. धन्स)
16 Jul 2015 - 7:16 pm | सटक
हीहीहीही!!
16 Jul 2015 - 8:39 pm | जडभरत
ही विडंबन स्टैल ओळखीची वाटते.
16 Jul 2015 - 7:15 pm | सटक
लय भारी!!
16 Jul 2015 - 7:26 pm | एस
हाहाहा! विडंबन झक्कास आहे! भट्टी एकदम जमलीयं बरं का! ;-)
16 Jul 2015 - 7:27 pm | उगा काहितरीच
झकास !
16 Jul 2015 - 8:39 pm | सोंड्या
सर्वांचे आभार
@सदस्ययनाम
प्रतिसादाचे विडंबनही जबरी
16 Jul 2015 - 9:17 pm | एक एकटा एकटाच
चांगल विडंबन जमवलय
16 Jul 2015 - 9:25 pm | विवेकपटाईत
गटारी अमावस्या कुठल्या महिन्यात येते. एक प्रश्न डोक्यात आला गटारी अमावस्येला यमदूताना ओवर टाईम मिळत असेल का?
16 Jul 2015 - 10:00 pm | जडभरत
तेका आखाडी आमुशा म्हंतात ओ भाऊ!!!
पण आखाडीवर तुमचा राग का इत्का?
16 Jul 2015 - 9:55 pm | पैसा
भट्टी जमली!
16 Jul 2015 - 11:54 pm | रातराणी
मूळ कथेसारख विडंबनही हटके!
17 Jul 2015 - 9:26 am | पगला गजोधर
नाम चैये था तेरा रतन-नुरा
क्योंकी इडंबन किया तुने खतम-पुरा
;)
17 Jul 2015 - 2:44 pm | तुडतुडी
झकास ………