केस

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
8 Jul 2015 - 12:15 pm

प्रेरणा

दमामी यांची डोळे

जे हवे ते नेमके का तूटती केस,
अन सुपलीभरुन बाथरूमात जमती केस.

बंद कर चोचले आता तेल मालीशचे,
सांग किती तेल पिनार अजून हे केस.

दिवस वर्षांचे युगांचे जन्म जन्मीचे,
कोणत्या गुणसुत्रास फितुर झाले हे केस.

भेटली होती जिथे कौतुकाची थाप,
का आज त्या आरशास टाळती हे केस.

तू जरा नवा होऊन ये भ्रतारा,
त्याच त्या न्हाव्यास माग क्रुत्रीम केस.

जीवघेणे असे तू हासू नये राजा,
"टकलू हैवान आला" बघ चित्कारती पोरे.

मार्गदर्शनविडंबन

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

8 Jul 2015 - 12:46 pm | एक एकटा एकटाच

हा हा हा

मस्त

तुडतुडी's picture

8 Jul 2015 - 4:37 pm | तुडतुडी

लय भारी . च्या आयला डोस्क्यावरचे च केस नेमके गळतात आणि पांढरे होतात

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jul 2015 - 4:49 pm | ज्ञानोबाचे पैजार


डोस्क्यावरचे च


हा तुमचा भ्रम आहे

पैजारबुवा,

उगा काहितरीच's picture

8 Jul 2015 - 8:07 pm | उगा काहितरीच

हा तुमचा भ्रम आहे

पैजारबुवा,

संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या .

सतिश गावडे's picture

8 Jul 2015 - 8:51 pm | सतिश गावडे

तुम्हाला मुद्दा कळलेला नाही असं दिसतंय.

हा देवलसिकर्मकांडाच्या निरर्थक आत्मरंजनाचा भ्रामक भ्रमवाद आहे.

टवाळ कार्टा's picture

8 Jul 2015 - 11:38 pm | टवाळ कार्टा

lllluuuulllluuuu

या शिवाय हा संवाद पुर्ण होत नै ;)

केस गळल्यानंतर पांढरे होतात?
कस्काय ब्वा?

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jul 2015 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा

@ "टकलू हैवान आला">> =))))))

इतकी मजेशीर कविता निसटून गेली होती.
मस्तच आहे.

"टकलू हैवान आला" बघ चित्कारती पोरे.

लोल

खटपट्या's picture

25 Jul 2015 - 12:24 pm | खटपट्या

वा छान.