चंदाचे ऑफिस नवी दिल्लीत कश्मीर हाउसच्या जवळ होते. चंदाला चांगलेच आठवते, तो शुक्रवारचा दिवस होता. त्याचाच कार्यालायातली ती म्हणजे चांदनी पहिल्यांदाच त्याच्या केबिन मध्ये त्याला भेटायला आली. चांदनीला ऑफिसमध्ये सर्व ऐश्वर्या राय म्हणायचे, मध्यम बांधा, गोरा रंग, मोठे डोळे, सोनेरी लांबसडक केस आणि माधुरी दीक्षित टाईप कोलगेट स्माईल. कोण फिदा नाही होणार तिच्यावर. त्याच्या सारखे कित्येक तिच्यावर लाईन मारण्याचा प्रयत्न करायचे. पण ती कुणालाच भाव द्यायची नाही. तिला पाहताच चंदाच्या हृदयाचे ठोक वाढले. त्याच्या तोंडून एवढेच निघाले, काय सेवा करू आपली. ती आपल्या पांढर्याशुभ्र दंतपंक्ती दाखवत म्हणाली, सहजच आली होते, आज मला थोड लवकर जायचे होते, पण ५ वाजताच आधी इथून निघणे शक्य नाही. मला कळले आहे, तू बाईक विकत घेतली आहे. हरकत नसेल तर मला मंडी हाऊसच्या मेट्रो स्टेशन पर्यंत आपल्या बाईकनी सोडशील का? प्लीssज. चंदाची तर विकेटच उडाली. 'अंधा मांगे एक आंख, आणि इथे तर दोन-दोन मिळतात आहे. तो तिला म्हणाला, त्यात काय, हे तर माझे सौभाग्य. ती थोड लाजतच म्हणाली, मग ठीक आहे, मी पाच वाजता येते.
चंदा तर आता हवेवर तरंगू लागला. गेल्या शनिवारीच त्याने बाईक विकत घेतली होती. त्याच्या वडिलांनी शनिवारी बाईक घेऊ नये (लोखंडाची असल्यामुळे) हा उपदेश केला होता. त्याने काही आपल्या वडिलांचे ऐकले नाही. दिल्लीत एक म्हण आहे, 'बाईक हो पास तो कुडी मिलेंगी हजार'. चंदाने विचार केला, एकदा का सोनी कुडी बाईकवर बसली, मग तिला गटवायला कितीसा वेळ लागणार. आज ती त्याच्या सोबत बाईकवर बसणार होती. तिच्या ओझरत्या स्पर्शाच्या कल्पनेनेच चंदाचे सर्वांग रोमांचित झाले. त्या दिवशी घरी परतल्यावर चंदाने आपला चेहरा आरश्यात बघितला. दिसायला तो ही ठीकठाक होता. पण म्हणतातन 'एक नूर आदमी आणि दस नूर कपडा". तिला पटवायला आपल्याला ही स्मार्ट आणि सुंदर दिसले पहिजे. संसाराचे सुंदर चित्र त्याच्या डोळ्यांसमोर उमटले. ती ही सरकारी कर्मचारी, तो ही सरकारी कर्मचारी, दोघांचा पगार सारखाच. तिला पटविले तर काय मस्त राजा-राणीचा संसार होईल..
मासोळी जाळ्यात अडकविण्यासाठी चारा तर फेकावाच लागतो. तिच्या नजरेत सुंदर आणि स्मार्ट दिसण्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट तर करावीच लागेल. शनिवारीच सकाळी उठून सेलून मध्ये जाऊन हिरो सारखी हेअरस्टाईल करून घेतली. मालमध्ये जाऊन काही डिजाईनर कपडे एक दहाहजाराचा स्मार्ट फोन विकत घेतला. कुडीवर इम्प्रेशन पडले पाहिजे ना,तरच तर ती चारा खाणार.
सोमवारी ऑफिसमध्ये आल्यावर सर्वांची नजर त्याचावरच होती. तो ही तिची वाट पाहत होता. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान ती, त्याच्या केबिनमध्ये आली. त्याला पाहताच म्हणाली, 'क्या बात है, आज तो एकदम हिरो लग रहे हो' चंदाने ही लगेच उत्तर दिले, हिरो हूँ तो हीरो लगूंगा ही. आज शाम को भी छोडना है क्या? चांदनीने मान डोलावली आणि म्हणाली आज पण थोड लवकर जायचे आहे. चंदाने मौक्याचा फायदा उठविला तो लगेच म्हणाला, आजही सोडून देईल, चहाचा टाईम झालाच आहे, एक कप चहा माझ्या सोबत घेईल का. ती ही लगेच म्हणाली, तू रोज सोडणार असेल तर मला एकदा काय दहा वेळा तुझ्या सोबत चहा घ्यायला हरकत नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच चंदाने तिच्या सोबत केंटीन मध्ये चहा घेतला. आजूबाजूला बसलेले बाबू त्याच्याकडे पाहत होते. त्यांना आपल्याकडे घूरताना पाहून चंदाची छातीही ५६ ईंच चौडी झाली. त्याला वाटले, मासोळी गळाला लागली.
पुढचे १०-१५ दिवस असेच निघून गेले. तो तिला सोडायला, मंडी हाऊस पर्यंत जायचा. सरकारी कार्यालयात कुठलीही गोष्ट लपून राहत नाही. तिळाचे ताड बनायला इथे वेळ ही लागत नाही. चांदनीच्या मैत्रीणीनीं ही तिला चंदाचे नाव घेऊन चिडवू लागल्या होत्या. एक दिवस चांदनी, पर्स उघडून एक फोटो एकटक लाऊन पाहत होती. तिचे लक्ष इतरत्र कुठे ही नव्हते. तिची मैत्रीण, सुमन तिच्या जवळ आली, आणि तिच्या मागे उभी राहून ती ही तो फोटो निरखून बघू लागली. अचानक ती, म्हणाली, हा तर चंदाचा फोटो नाही. चांदनी भानावर आली, आणि सुमनला उद्देश्यून म्हणाली, मला, चंदाचा फोटो पर्स मध्ये ठेवायचे काही कारण आहे का? तो फक्त माझा मित्र आहे, सहकर्मी आहे. तो गेल्या पंधरवड्यापासून मला मंडी हाऊस पर्यंतची लिफ्ट देतो, थोड हसून बोलून घेते त्याच्याशी. सुमन: मग हा फोटोवाला कोण आहे. आणखीन किती मजनूंना तू अशी झुलवते आहे. चांदनी आपले डोळे वटारत तिला म्हणाली, मला काय समजते तू, हे तुझे होणारे जिsजाजी आहेत. सूरज नाव आहे त्याचं. मोठ्या कंपनीत इंजिनिअर आहेत. सी.पी.ला ऑफिस आहे त्याचं. पर्स मधून सोन्याची एक अंगठी दाखवत चांदनी म्हणाली, ही बघ आमच्या साखरपुड्याची अंगठी. सुमनला हसूच आले, अच्छा, तर रोज संध्याकाळी सी.पी.ला जाऊन सूरजला भेटते. त्यासाठी चंदाकडून लिफ्ट घेते. ग्रेटच आहे तू, पण चंदाला कळल्यावर त्याचे काय होईल. चांदनी म्हणाली, थोडे दिवस थांब, लग्नाची तारीख निश्चित होऊ दे, सर्वांना सांगणारच आहे मी. त्या बिचार्या मजनूला ही. हा!हा! हा! दोघीही जोरात हसल्या.
तो शनिवारचाच दिवस होता, संध्याकाळी काही कामाने चंदा सी.पी.त आला होता. चंदाच्या मनात विचार आला, बघू या प्रेमी-प्रेमिका सी.पी.च्या सेन्ट्रल पार्क मध्ये बसून काय करतात ते. एखाद्या संध्याकाळी चांदणीला ही इथे घेऊन येऊ. आपण तिच्यावर प्रेम करतो, हे सांगण्यासाठी सेन्ट्रल पार्कपेक्षा चांगली जागा दुसरी कुठली. आपल्या स्वप्नील विचारात दंग असताना, अचानक त्याची नजर एका जोडप्यावर पडली, अमलतासच्या झाडा मागे ते दोघ आलिंगनबद्ध, चुंबनरत होते. लोक आपल्याकडे पाहत असतील त्याची त्यांना पर्वा नव्हती. त्या जोडप्याला पाहताच चंदा दचकलाच, त्याने एका झाडाची ओट घेतली. तो त्यांना निरखून बघू लागला. चांदनीच, हो चांदनी त्या पुरुषा बरोबर आलिंगन बद्ध होती. त्याचे डोके गरगरले, भडकले, विचारचक्र सुरु झाल, अच्छा तर ही याला भेटायला रोज इथे येते, त्या साठीच माझ्याकडून लिफ्ट घेते. ती सी.पी. पर्यंतची लिफ्ट पण घेऊ शकत होती, कदाचित मला अंधारात ठेवण्यासाठी मंडी हाउस पर्यंतचीच लिफ्ट घेते. मंडी हाउस पासून सी.पी.ला मेट्रोनी येत असेल याला भेटण्यासाठी. आपला तर चक्क चांदनीने ड्राइवर सारखा वापर केला. किती मूर्ख आहे मी. त्याला त्याचीच लाज वाटली. त्याला वाटले, आत्ताच जाऊन चांदनीला जाब विचारावा, पण तो थबकला. चांदनी तर त्याला मिळणार नाहीच, उगाच शोभा होईल. त्याचे स्वप्न भंग झाले होते. भारी मनाने तो घरी परतला.
दुसर्या दिवशी चांदनी नेहमीच्या वेळी अर्थात दुपारच्या चहाचा वेळी, त्याच्या केबिन मध्ये आली. त्याने काही दर्शवले नाही. केंटीन मध्ये गेल्यावर चहा पिणे झाल्यावर तो तिला एवढेच म्हणाला, चांदनी, मी आज बाईक आणली नाही किंवा आता कधीच आणणार नाही. तू दुसरा ड्राइवर आपल्यासाठी शोधून घे. मला काय म्हणायचे आहे तू समजली असेलच. पुन्हा कुणाच्या जीवाशी असे खेळ खेळू नकोस म्हणत तो, तिच्या उत्तराची वाट न पाहता आपल्या केबिनमध्ये परतला.
चांदनी काही क्षण चंदा कडे पाहत राहीली. बेचारा... आज न उद्या हे होणारच होत... ती पुटपुटली. आज काही सूरजला भेटता येणार नाही. बसने पाऊण एक लागतो सी.पी. पर्यंत जायला. रोज-रोज घरी पोहचायला उशीर करणे ही योग्य नाही. अजून काही लग्न झालेले नाही. तिने फोन लावला, सूरज बहुतेक त्या मजनूने आपल्याला सी.पी.त बघितले असावे. आता लिफ्ट मिळणे शक्य नाही. मला ही तुला आज भेटणे शक्य होणार नाही. आपल्याला भेटायचे असेल तर तुलाच काही उपाय करावा लागेल.
प्रतिक्रिया
5 Jul 2015 - 8:09 pm | टवाळ कार्टा
???
5 Jul 2015 - 8:36 pm | जडभरत
चांदनी दूष्ट आहे!!!
5 Jul 2015 - 8:40 pm | जडभरत
बाद्वे, चंदा आणि चांदनी वाचून मला इथं "फायर" टाईप काहीतरी असल्याचा संशय आला होता. पुढे त्याचे निराकरण झाले. पण शेवट जम्या नाही भाऊ!
5 Jul 2015 - 9:57 pm | अरवीन्द नरहर जोशि.
साधारण
5 Jul 2015 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा
एंडिंग?????
5 Jul 2015 - 11:46 pm | dadadarekar
चंदा आणि चांदनी ... मला आधी लेस्बियन वाटले होते.
मग कळले. चंदा पुरुष आहे ते.
6 Jul 2015 - 5:28 pm | स्पंदना
चांदनीने चंदा को चुना लगाया!!
मुर्ख असतात असल्या पोरी. समोरचा आपल्या वागण्याचा काय अर्थ घेतोय माहित असूनही ... जाऊ दे.
6 Jul 2015 - 5:52 pm | कपिलमुनी
याला चापटर ! चलाख असे म्हणतात .
यांना कुठे करायच बरोब्बर माहिती असता ..
आणि दिल्लीच्या पोरी तर ..............
6 Jul 2015 - 7:16 pm | सूड
पर्फेक्ट!! या प्रकारच्या पोरीं कोणाला कसं वापरायचं ते बरोब्बर ओळखून असतात. खेळवत बसणे हा त्यांचा खेळ असतो. मग एखादा नवरा मटेरियल बघून त्याच्याशी लग्न करुन मोकळ्या होतात.
6 Jul 2015 - 7:22 pm | टवाळ कार्टा
या धाग्याचे ३००+ करायचे आहेत???
6 Jul 2015 - 7:25 pm | सूड
तुला वेळ असेल तर खुश्शाल करु शकतोस!! =))
6 Jul 2015 - 5:38 pm | गवि
"चंदा रे चंदा रे.. कभी तो जमीं पर आ..!!" ;)
6 Jul 2015 - 5:40 pm | मृत्युन्जय
कथा सरधोपट वाटली त्यामुळे मनाची पकड नाही घेउ शकली. पंच योग्य रितीने नाही जमला असे वाटते.
6 Jul 2015 - 5:49 pm | दमामि
सगळ्यात महत्वाचे म्हणजे थोडक्यात आटोपली. नाही तर आपला "curse"र खाली नेतोय , नेतोय, नेतोय , नेतोय , नेतोय ......:)
6 Jul 2015 - 6:27 pm | एक एकटा एकटाच
हा हा हा..........
6 Jul 2015 - 6:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोडक्यात स्टोरी आटोपली आणि वाचायलाही बरी वाटली.
अरे माझ्यासारखा असता तर तिला शेवटच्या दिवशी कॉफी पाजून म्हणाला असता-
मुझे मालूम है की ये ख्वाब झूठे है और
ख्वाहिशे अधूरी है,
मगर जिंदा रहने के लिये कुछ
ऐसी गलतफहमिया भी जरुरी है. :)
-दिलीप बिरुटे
6 Jul 2015 - 6:02 pm | मृत्युन्जय
इर्शाद इर्शाद
6 Jul 2015 - 6:05 pm | जडभरत
मुझे मालूम है की ये ख्वाब झूठे है और
ख्वाहिशे अधूरी है,
मगर जिंदा रहने के लिये कुछ
ऐसी गलफहमिया भी जरुरी है. :)
6 Jul 2015 - 7:24 pm | विवेकपटाईत
काही वर्षांपूर्वी घडलेली सत्य घटना आहे. त्या बिचार्याने आपली बाईकच विकून टाकली होती. आपल्या पदरची थोडी कल्पना टाकली एवढेच.
6 Jul 2015 - 8:58 pm | कविता१९७८
आता विचारणारच होते सत्यकथा आहे का? वाचतानाच वाटले कथेला काही शेवट नाहीये आणि आठवण सान्गितल्यासारखी लिहीलीये म्हणजे सत्यकथा असावी.
6 Jul 2015 - 10:44 pm | मितभाषी
अरे हे तर सि.ंमोजि.