अर्थक्षेत्र भाग 7 : "ट्रेंड" ते ट्रेड (ब)

Primary tabs

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
1 Jul 2015 - 9:16 pm

अर्थक्षेत्र भाग ७ : अ

मी शेअर्स घेतले हे लक्षात घेऊन "मार्केटने" मंदी करताच कामा नये ते केवळ वरच गेले पाहिजे ? पण मार्केट तर कुणाचे नाही आणि कुणासाठी थांबत नाही मग गेले तेल लावत मी पण मार्केट कधी माझ्या पदरात पैसे टाकेल ते पाहत बसणार नाही. शेवटी जो ओरडतो त्याचेच चणे विकले जातात मेहनत आहेच कुठे हि आणि कुठ्ल्याही क्षेत्रात. मग थोडे प्रयत्न आपण हि करू की !
५०० रुपयाने मी जर एखादा शेअर घेतला तर माझी मानसिकता अशी की माझा ब्रेक इव्हन हा रुपये ५००+१०% व्याज =५५० आहे. मग जर तो ११०० भाव झाला तर माझे भांडवल मोकळे होईल आणि ३५० झाला तर ? मग मी माझे ट्रेड सुरु करतो जेणे करून मला ५०० रुपये भांडवल इरोड होऊ न देता ते सोडवून घ्यायचे आहे ते हि सव्याज. मग पुढील कार्यवाही सुरु होते कशी ते पुढच्या लेखात पाहू.

नमस्कार मंडळी,
बर्याच दिवसांनी काही बाही खरडायला घेतले आहे. मागे ट्रेंड ओळखण्या विषयी लिहिन असे ठरवले होते तेच कंटीन्यू करतो. हि पद्धत अत्यंत ढोबळ आहे.
ट्रेंड हे तीन प्रकारचे असतात
१) तेजीचा (बुलीश) २) मंदीचा (बेअरीश) ३) अनिश्चिततेचा (होल्ड ओर वेट)
ट्रेंड ओळखण्यासाठी तीन महिन्याचे (कमीतकमी सहा तिमाही भाव) ओपन, हाय, लो आणि क्लोज जमा करून त्याचे निरीक्षण खालील प्रमाणे करून घ्यावे.
१) क्लोज हा मागील हाय पेक्षा वर आहे का ? (बुलीश)
२) क्लोज हा मागील लो पेक्षा खाली आहे का ? (बेअरीश)
३) क्लोज हा मागील हाय – लो ह्याच्या मध्ये आहे का? (होल्ड)

मी स्वतः अमी ब्रोकर हे software वापरत असल्याने हि वरील माहिती गोळा करणे कठीण जात नाही. अन्यथा बी.एस.ई. आणि एन.एस.ई च्या संकेतस्थळावर हा सगळा डाटा उपलब्ध आहे.
मी HDFC बँकेचा DATA खाली देत आहे. (आठवड्याचा)

HDFC BANK

१) २२/०५/२०१५ चा क्लोज हा १५/०५/२०१५ मधील हायपेक्षा वर आहे त्यामुळे २९/०५/२०१५ चा क्लोज आणि हाय २२/०५/२०१५ पेक्षा जास्त आहे.
२) १९/०६/२०१५ ला परत १२/०६/२०१५ च्या हायपेक्षा क्लोज वर आहे आणि बुलीश ट्रेंड बरकरार राहिला आहे.

३) वरील चित्रात जिथे ट्रेंड बदलला आहे तिथे मार्क केले आहे.
क्रमांक तीन मधील क्लोज हा दोनमधील हाय पेक्षा वर असून हि म्हणजेच अट क्रमांक १ प्रमाणे परिस्थिती असूनही ट्रेंड बदलला आहे आणि अट क्रमांक ३ प्रमाणे परिस्थिती झाली आहे.

का ?

प्रतिक्रिया

प्रतिमा दिसत नाहीये, त्यामुळे जास्त काही लिहिता येणार नाही.

लेख फारच थोडक्यात संपवला असे वाटत आहे. पुढील भागात अजून विश्लेषण येणार असल्यास तो लवकर टाकावाही विनंती.