एक पी. जे.

प्रशांतकवळे's picture
प्रशांतकवळे in जनातलं, मनातलं
15 Nov 2007 - 7:41 pm

एकदा एक माणुस एका सान्तासिन्गच्या कानात काहीतरी बोलतो, सान्तासिन्ग लगेच मरतो, आता सान्गा की तो माणुस सान्तासिन्गच्या कानात काय बोलतो?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ढिश्क्यऊ

विनोद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

16 Nov 2007 - 12:33 am | विसोबा खेचर

एकदा कोकणात तात्या अभ्यंकरच्या वाडीत एक हुप्प्या (मोठा वानर) घुसतो आणि आंब्याफणसाची, सुपारीची, ताडामाडांची व इतर झाडांची भरपूर नासाडी सुरू करतो. तात्या खूप वैतागतो व त्या हुप्प्याला हाकलायचा हरेक प्रयत्न करतो. परंतु हुप्प्या काही त्याला दाद देत नसतो.

त्याच गावात तात्याचा शिकारी मित्र मिलिंद भांडारकर राहात असतो. मिलिंदला बोलावणं धाडलं जातं. मिलिंद लगेच एक बंदुक आणि शिकारी कुत्रा, अश्या तयारीनिशी तात्याच्या वाडीत हजर होतो आणि तात्याला म्हणतो,

"आता मी आलो आहे. घाबरू नकोस. कुठाय तो हुप्प्या?"

"तो बघ! त्या आंब्याच्या झाडावर बसून माझ्या आंब्यांचं नुकसान करतोय." तात्या म्हणतो.

त्यावर मिलिंद म्हणतो, "मी एक काम करतो. त्या आंब्याच्या झाडावर चढतो आणि त्या हुप्प्याशी मारामारी करून त्याला खाली पाडतो. हुप्प्या खाली पडताक्षणी माझा शिकारी कुत्रा धावत जाऊन त्या हुप्प्याच्या अवघड जागी जोरात चावेल आणि त्याला ठार मारेल!"

हे ऐकून तात्या खुश होतो. मिलिंद भराभर आंब्याच्या झाडावर चढायला लागतो. तेवढ्यात तात्याची ट्युब पेटते. तो तिथे पडलेल्या बंदुकीकडे पाहात ओरडून मिलिंदला विचारतो,

"अरे असंच जर का होतं, तर तू ही बंदुक कशाला आणली होतीस?"

मिलिंद झाडावरनच उत्तर देतो,

"अर्रर्रर्र, विसरलोच बघ! जर in case मी खाली पडलो तर तू पहिली कुत्र्याला गोळी घाल!"

:)

आपला,
(कोकणातला आंबा बागयतदार) तात्या.

विसुनाना's picture

16 Nov 2007 - 12:43 am | विसुनाना

विसोबा, कुत्र्याचे नाव 'जिम्या' असे नाही का? :)

सर्किट's picture

16 Nov 2007 - 12:48 am | सर्किट (not verified)

जबरा पीजे आहे !

- शिकारी सर्किट

नंदन's picture

16 Nov 2007 - 4:10 am | नंदन

कुत्र्यापुढे उभा असणारा पेच -- नरो वा वानरो वा. [कृ. ह. घे.]

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

किमयागार's picture

16 Nov 2007 - 8:45 am | किमयागार (not verified)

अध्यक्ष महोदय,
फार पूर्वी जीम कॉर्बेटच्या नावाने खपवलेला हा किस्सा आमच्या वाचनात आला होता. आणि 'अवघड जागा' असला 'अवघड' शब्द काय वापरता? आमच्या वाचनानुसार,ते कुत्रं त्या वानरांच्या वृषणांचा वेध घ्यायचं!
-किमयागार

विसोबा खेचर's picture

16 Nov 2007 - 9:14 am | विसोबा खेचर

आमच्या वाचनानुसार,ते कुत्रं त्या वानरांच्या वृषणांचा वेध घ्यायचं!

खरं आहे, आम्हीही असंच ऐकलं होतं! :)

मोगॅम्बो's picture

16 Nov 2007 - 7:39 pm | मोगॅम्बो

त्या कुत्र्याला कुठेही चावू द्या, पण जोक बाकी मस्त आहे विसोबांचा.

विसोबा खेचर's picture

16 Nov 2007 - 9:59 pm | विसोबा खेचर

म्हणजे मोगँबो खुश हुआ! :)