गणपती विसर्जन

अमेयहसमनीस's picture
अमेयहसमनीस in जनातलं, मनातलं
21 Aug 2008 - 12:51 pm

महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी गणेशमूर्तींची उंची आणि समुद्रातील विसर्जनाच्य नियमाना सामान्य मुंबईकरांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.

मुंबईतील तब्बल १९ संघटनांनी पालिकेकडे आपल्या विभागात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधून देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने ही मागणी तत्काळ मंजूर करीत त्या विभागात कृत्रिम तलाव बांधून देण्याचे मान्य केले आहे.

सागरी पर्यावरणाचा धोका लक्षात घेऊन वांद्रे, खार, चेंबूर, वरळी, प्रभादेवी, मालाड, अंधेरी, दहिसरसह सुमारे १९ विभागांतील नागरिकांच्या संघटनांनी कृत्रिम तलावांच्या मागणीसाठी नुकतीच महापौरांची भेट घेतली.

या संघटनांची एक बैठक नुकतीच महापौर निवासात झाली. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी चौपाट्यांवर गणेशमूर्तींची होणारी विटंबना कुणाही श्रद्धावंतांच्या मनावर आघात पोचवणारी आहे त्यामुळे पालिकेचा कृत्रिम तलाव उत्तम पयार्य असल्याचे अनेक मंडळांनी या बैठकीत सांगत महापौरांच्या पर्यावरणवादी भूमिकेला पाठिंबा दिला.

आपली काय भूमिका आहे ?

समाजबातमी

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

21 Aug 2008 - 1:47 pm | मराठी_माणूस

योग्य भूमिका
सुधारणेच्या दृष्टिने उचललेले पहिले पाउल असे म्हणता येइल. समस्येचि जाणिव झालि, हे हि नसे थोडके.
(अवांतरः दाहि दिवस सकाळि ६ ते रात्रि ११ पर्यंत मोठ्यान वाजणार्‍या गाण्यांच्या बाबतित हि काहितरि व्हायला हवे आहे. ह्या मंडळाना आजुबाजुच्या विद्यार्थ्यांचि, वृध्दांचि काहीही फिकिर नसते)

ऍडीजोशी's picture

21 Aug 2008 - 6:41 pm | ऍडीजोशी (not verified)

अतिशय योग्य निर्णय आहे. आपल्या घरीही इको-फ्रेंडली मुर्ती आणली पाहिजे. गावी मामा कडे फार आधी पासून आजोबा एक लहानशी शाडूची मुर्ती आणत. मखरही नसे. एक स्पेशल देवघर होतं लाकडाचं. तेच दरवर्षी (गरज असेल तर) पॉलीश करून वापरल्या जायचं. त्यावेळी वाटायचं सगळ्यांकडे इतक्या चकाचक, मस्त मोट्ठ्या मुर्ती, झक्कास मखर असतात, आपल्या कडेच असं का? आत पटतंय.

पण गंमत म्हणजे शिवसेनेनेच या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.
वास्तविक अशा विधायक कामासाठी त्यांनी राजकारण बाजुला ठेवुन मदत केली पाहिजे.

मनस्वी's picture

21 Aug 2008 - 6:56 pm | मनस्वी

फक्त तलावाची स्थिती समुद्रासारखीच होणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी आणि तसे व्यवस्थापन करावे.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

कुंदन's picture

21 Aug 2008 - 6:59 pm | कुंदन

कारण हे कृत्रिम तलाव असतील, मुळ बातमीतील राहिलेला भाग खालील प्रमाणे......

मुंबईतील २४ वॉर्डात प्रत्येकी दोन असे ४८ कृत्रिम तलाव पालिका बांधणार आहे. त्यासाठी दीड कोटी रुपये प्रशासन खर्च करणार आहे. हे तलाव ३०० चौरस मीटरचे असून १० फूट खोल असणार आहेत. तलावात टारपॉर्लिनच्या शीटचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली. तलावांमध्ये सुमारे पाच हजारांहून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन होईल, असा अंदाज महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केला आहे.

विकास's picture

21 Aug 2008 - 8:13 pm | विकास

सर्व प्रथम - बातमीचा दुवा पण देता आले तर बरे होईल. (हे अविश्वास म्हणून कृपया मानू नये. खालील मुद्दे वाचल्यास लक्षात येईल की या संदर्भात मला बातमीसंदर्भात पत्रव्यवहार करायला आवडेल ते...).

दुसरे महत्वाचे - गणपती विसर्जन या गोष्टीसंदर्भात किमान विधायक विचार आपण (म्हणजे विशेष करून मुंबईकर) करायला लागलोत ही आशादायक गोष्ट आहे.

पण बातमी आणि त्यातील उपाय वाचताना - ह्याच क्षेत्रात काम करत असल्याने काही स्वाभाविक प्रश्न पडले:

मुंबईतील २४ वॉर्डात प्रत्येकी दोन असे ४८ कृत्रिम तलाव पालिका बांधणार आहे.... तलावात टारपॉर्लिनच्या शीटचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली. तलावांमध्ये सुमारे पाच हजारांहून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन होईल, असा अंदाज महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केला आहे.

  1. हे पाणी नंतर कुठे जाणार आहे?
  2. ते जर जमिनीत जाणार असले तर त्याच्यामुळे होणारे प्रदुषण हे समुद्रातील प्रदुषणापेक्षा जास्त भयावह असू शकते.
  3. जर पाणी नंतर नाल्यात सोडले जाणार असले तरी ते जमिन आजूबाजूचे पर्यावरण आणि नंतर समुद्र/खाडी/मिठी नदी /इतर नैसर्गिक प्रवाह पण प्रदुषित करणार. ते पण जास्त कॉन्सट्रेटेड पाण्याने. काही झाले तरी समुद्रात डायल्यूशन पटकन होते. याचा अर्थ मी काही करू नये असे म्हणत नाही आहे. पण जर या गोष्टींचा विचार केला नसला तर रोग आणि इलाज दोन्ही भयंकरच रहाणार आहेत.
  4. जर पाणी नंतर सांडपाण्याच्या पातळीइतके शुद्ध करून सोडणार असले तर त्याची काय व्यवस्था केली गेली आहे? त्या शुद्धीकरणासाठी पैसे ठेवले आहेत का कृत्रिम तलाव तयार करण्यासाठीच (आणि पर्यायाने त्या कंत्राटदारांना देण्यासाठी) पैसे ठेवले आहेत?

थोडक्यात ह्या बातमीमुळे उत्तरे कमी आणि प्रश्न जास्त तयार होत आहेत असे वाटले.

आता बाकी गणेश मुर्ती आणि त्यामुळे होणार्‍या प्रदुषणासंदर्भात मला काय वाटते ते थोडक्यात -

  1. गणेशोत्सवातील विसर्जनाचे तीन ते चार दिवस सोडल्यास सागरी प्रदुषणासंदर्भात उरलेले ३६१ दिवस कोण किती वेळा गळे काढते?
  2. किनार्‍यांची अवस्था काय आहे, ते फिरण्या लायक आहेत का? त्यात असलेले किमान इ-कोलाय बॅक्टेरीयांचे प्रमाण या संदर्भात किती जण बोलतात ( हा प्रश्न जे आवाज करतात त्यांच्या संदर्भात आहे - संस्था, राजकारणी, वृत्तपत्रे)
  3. म्हणून गणेशोत्सवाचा विचार करू नये असे माझे अजिबात म्हणणे नाही. पण कुठलीही गोष्ट समाजात सुधारायला किमान काही वर्षे द्यावी लागतात -
  • लोकशिक्षण सातत्याने करावे लागते.
  • श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून ओरडून भाद्रपद शुद्ध चथुर्दशीस उत्तरे मिळत नाहीत. फक्त ओरडण्याचे समाधान मिळते आणि "काय आपला समाज," असे म्हणायला मिळते.
  • जरा विचार करा, उदाहरण म्हणून - जेंव्हा प्रदुषण कमी करणार्‍या गाड्या तयार करायच्या असतात. तेंव्हा आधी पॉलीसी तयार केली जाते. मग कायदे आणि ते कायदे प्रचलात आणायला किमान ५ वर्षांचा वेळ द्यावा लागतो. तेंव्हा कुठे संशोधन, उत्पादन आणि लोकशिक्षण यांचा मेळ बसतो.
  • ऐनवेळेस ओरडाआरडी करून केवळ राजकारण्यांची सोय होते - अर्धे दाखवू शकतात की आम्ही कसे पर्यावरणाची काळजी करतो तर उरलेले दाखवतात आम्ही कशी धर्माची आणि धार्मिक भावनांची काळजी करतो. त्या बिचार्‍या गणपतीच्या मुर्तीस काहीच मिळत नाही. तो म्हणतो की सर्व करणार आणि वरून जर "आवाहनम न जानामी, न जानामीतव अर्चनम... " असा "डिसक्लेमर" म्हणणारच असाल तर माझ्या मुर्तीचा आणि तीच्या विसर्जनासंदर्भात असला फुकटचा दिखावा कशाला ?

म्हणून समर्थरामदासांच्या ओळी थोड्याशा बदलून "बुद्धी दे गणनायका" असे म्हणावेसे वाटते...

अनामिक's picture

21 Aug 2008 - 8:56 pm | अनामिक

मुंबईच्या अफाट जनसंखेपुढे ४८ तलाव पुरेसे आहेत का?

त्यापेक्षा आपण कोणतीही पुजा करताना सुरवातीला जसे सुपारीची गणपती म्हणून पुजा करतो, तशीच गणपती स्थापनेवेळी करावी अन तिचेच विसर्जन करावे. आणि शोभेची मूर्ती दरवर्षी रंगरंगोटी करून परत वापरावी. मला वाटतं पुण्यातले जवळ जवळ सगळेच गणेश मंडळ गेली अनेक वर्षे दरवर्षी एकच शोभेची मूर्ती वापरताहेत. घरोघरीसुद्धा असेच करणे योग्य होईल असे वाटते.

अनामिक

विकास's picture

21 Aug 2008 - 9:19 pm | विकास

घरच्या घरी मुलांना घेऊन गणेशमुर्ती करायच्या असतील तर हे "व्हिडीओ ट्यूटोरीयल" पहा!