स्वस्तिक

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
26 May 2015 - 12:33 am

खुप वर्षापुर्विची नव्हे तर अगदी अलिकडची गोष्ट आहे.रम्य पहाटेची वेळ. मंद गार वारा वाहतो आहे आणि अशावेळी काहीच घडत नाही. सर्व गोष्टींची सुरवात रम्य पहाटेने व्हावी असे काही नाही.असो.
रात्र्ी मित्र्ांसोबत[फक्त मित्रच हं] फिरताना नेहमीप्रमाणे अचानक मोबाईल वाजला.फोन अक्षयचा. "स्वस्तिकला बघितल का बे?" " नाय बा काय झाला?" "अरे ते येड्याxx कालपासुन गायब आहे." माझ्या पायाखालची वाळुच काय दगड माती सगळच सरकलं.
" घरच्यांशी भांडुन गेला तो आलाच नाही अजुन. आत्ता फोन केलो तेव्हा कळालं." " मग आता?" " ए मंद बुद्धी सुंद काम निघ आणि माझ्या घरी ये."
गाडीवरुन लगेच निघालो. समोर सारखा स्वस्तिकचा चेहरा येत होता. स्वस्तिक म्हणजे एक अदु्भुत रसायन होते. आजवर कोणीही त्याला सिरीयस झालेलं पाहिलच नव्हतं. सदा हसरा चेहरा. समोरुन आणी बाजुने जरी पाहिलं तरी फारसं फरक न जाणवणारी शरीरयष्टी. याला एकदा जरी पाहिलं तरीही सात जन्मांपर्यंत लक्ष्ात राहिल असा हा.
असे असले तरी पुर्ण कॉलेजमद्धे याचा दरारा पसरलेला. शिपाईसुद्या याला सलाम ठोकायचे. पिन्सिपल जरी समोरुन आले तरी ते शिपाई स्वस्तिकलाच पहिला सलाम ठोकणार असे उगीचच वाटायचे.
याचाठी जबाबदार असलेली गोष्ट म्हणजे त्याची विनोदबुद्धी. तो फार मोठे जोक्स सांगायचा असे नाही. पण बोलण्याची लकब अद्भुत टायमिंग यामुळे सगळा वर्ग गडाबडा लोळायचा.
थेटरमद्धे जर बोअर पार्ट सुरु झाला [हल्ली तो सुरु होत नाही तो पहिल्यापसुनच असतो ] की याची फिल्म चालु व्हायची. एकच अोळ बोलुन तिथल्या तिनतिन अोळींना हसवण्याचे कसब असलेला हा निघुन जातो म्हणजे ?
अशा विचारात अक्षयकडे पोहचलो. तिथे आधिच दोघे पोहचले होते. मी गाडी कशी हळू चालवतो याचं धावतं वर्णन माझ्या एका मित्र्ाने केले. आपल्या सोईसाठी आपण त्याला क्ष म्हणु.
तिथे एका अनोळखी मुलालासुद्धा मी पाहिलं. आमच्यापेक्ष्ा वयाने तो मोठा होता. "हा स्वस्तिकचा भाऊ" इति अक्षय. त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यात पाणि तरारलं होत.
मी क्ष कडे रागाने पाहु लागलो. उगीच वाद नको म्हणुन मी गप्प बसलो.अजुन दोघेतिघे यायचे बाकी होते.
सगळे आल्यावर वेळवेगळ्या ठिकाणी शोधण्यासाठी आमच्यात गट पाडण्यात आले.माझ्यासोबत दुर्देंवाने क्ष माझ्यासोबत येणार होता. पुर्वजन्मीची पापं दुसरे काय!
आम्ही स्टेशनकडे निघालो होतो.रात्र्ीची वेळ. सगळे पांघरूण घेऊन गाढ झोपलेले. आता यात त्याला कसे शोधणार असा यक्ष प्रश्ण आमच्या समोर पडला. शेवटी पायावरुन त्याचा शोध घेण्याचे ठरले. स्वताःचा भार उचलू शकेल इतपतच पायाभरणी त्याच्या पायाची झाली होती.
आम्ही पाय बघत फिरु लागलो. एक माणुस पांघरुणाआडुन आमच्याकडे पाहु लागला. आमच्या हेतुबद्दल शंका घेतली जात आहे हे पाहुन पाय पाहण्याच्या कार्यक्रमातुन आम्ही काढता पाय घेतला.
त्या भावाच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरारल होते. क्ष तेवढ्यात कचरयापेटीकढे धावला त्यात स्वस्तिकला शोधण्या प्रयत्न करुन आला. त्याची ही असली चेष्टा पाहुन माझा पारा सहनशिलतेच्या सिमांना पार करु पाहत होता. पण त्या भावाला आता त्या प्रकाराने कसनुस हसताना पाहुन माझा पारा पार खाली उतरला.
फोनाफोनी झाली. अजुन काय पत्ता लागला नव्हता. शोधणारे एकेक नग होते. इकडे क्षचे चाळे चालु होते तिकडे एक मंद तर दुसरा बावरलेला तिसरा फोनवर बोलतोय चौथा कुठुन यात अडकलो असा चेहरा करुन बसलेला. पाचवा त्यांच्या महाराजांचा पत्ता शोधतोय जे हरवलेल्यांचा पत्ता शोधतात पण त्यांचाच पत्ता हरवला होता.
हे सगळे प्रकार पाहुन स्वस्तिक आल्यावर आपणच हिमालयात पळुन जायचे असे मी मनाशी ठरवले.
तेवढ्यात स्वस्तिकच्या घरुन फोन आला. त्यांनी सगळ्यांना घरी बोलावले होते. रात्र वेगाने पुढे सरकत होती.
त्याच्या घरी मी क्षला हलके होण्याच कारण देऊन बाजुला ओढल." लेका तुला काय अक्कल ? कुठल्या वेळेस काय बोलावं याचं जरा तरी भान?"
" अरे मग काय गळा काढुन रडायचं का? त्याच्या भावाचा चेहरा पाहिलास का? त्याच्यावरचा ताण मोकळा करण्यासाठी ते सगळं चालू होत" स्वताःवरचा ताण कमी करत तो बोलत होता.
तेव्हा मला कळाले की किती सहज आपण गैरसमज करुन घेत असतो. नेहमी त्या महाराजवाल्या मित्र्ाची चेष्टा उडवणारे आम्ही त्याच्या घरी त्याच महाराजाचा पत्ता का शोधत होतो? नेहमी क्षला टाळणारा मी आज त्याच्यासोबत का फिरत होतो? हे आजवर उमजल नाही.
या असल्या विचारात असताना मला मागुन एक सावली माझ्याकडे येताना पाहिली. आणि एखाद्या नाटकात हिरोची एंट्र्ी व्हावी तशी स्वस्तिकची एंट्र्ी झाली.
मी धावत जाऊन त्याला पकडले आणि एक कानाखाली ठेवुन दिली. तो वेड्यासारखा माझ्याकडे पाहुन हसत होता. " पुण्याला गेल्तो.." काहीच न झाल्यासारखा त्याचा चेहरा बघुन मी चाट पडलो. खिशात एक दमडी नसताना हा रेल्वेने पुण्याला पळाला होता तसाच परतसुद्धा आला. त्याला बुकलुन काढावे असे मनात येत असतानाच माझ्या मित्र्ांनी ते विचार सत्यात उतरवले.
त्या गडबडीत स्वस्तिकच्या खिशातुन एक चिठ्ठी बाहेर पडली. कोणाला लक्ष्ात येणार नाही अशा पद्धतिने मी ती उचलली.
त्यावर मी माझे नाव वाचले आणि पुन्हा चाट पडलो.
...क्रमशः

रेखाटनप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

26 May 2015 - 8:34 am | श्रीरंग_जोशी

रोचक सुरुवात झाली आहे कथेची.

पुढील भागात यापेक्षा अधिक सुटसुटीत व तपशीलवार लिहावे असे सुचवतो.

पुभाप्र.

शब्दानुज's picture

26 May 2015 - 10:30 am | शब्दानुज

अहो टाइपिंग जमत नाही अजुन म्हणुन जरा गोंधळ झाला आहे.

श्रीरंग_जोशी's picture

27 May 2015 - 12:42 am | श्रीरंग_जोशी

टंकलेखन सहाय्य.

मिपावर टंकलेखनाबाबत काही प्रश्न असतील तर हक्काने विचारा...

शब्दानुज's picture

26 May 2015 - 10:31 am | शब्दानुज

अहो टाइपिंग जमत नाही अजुन म्हणुन जरा गोंधळ झाला आहे.

पाटील हो's picture

26 May 2015 - 8:50 am | पाटील हो

सुरवात चांगली आहे . येवू द्या पुढील भाग पटापट .

शब्दानुज's picture

26 May 2015 - 10:39 am | शब्दानुज

चला कमितकमी तुम्हाला तरी आवडली कथा

मृत्युन्जय's picture

26 May 2015 - 10:45 am | मृत्युन्जय

चांगली सुरुवात आहे. वाचतोय. पुभाप्र

शि बि आय's picture

26 May 2015 - 12:02 pm | शि बि आय

छान लिहीत आहात. जमेल हळुहळु
google transliteration मदत घ्या

शि बि आय's picture

26 May 2015 - 12:02 pm | शि बि आय

छान लिहीत आहात. जमेल हळुहळु
google transliteration मदत घ्या

राही's picture

26 May 2015 - 1:35 pm | राही

छान जमलाय पहिला भाग. आवडला.
पुढचे भाग थोडे विस्ताराने लिहा म्हणजे झाले.
टायपिंगची काळजी नको. ते आपोआप येतंय.

चांगली सुरुवात आहे. वाचतोय. पुभाप्र

उगा काहितरीच's picture

26 May 2015 - 11:35 pm | उगा काहितरीच

मी सहसा क्रमशः असणारे लेख पूर्ण भाग आल्याशिवाय वाचत नसतो. पण तुम्ही फसवणूक केली. शिर्षकात भाग १ वगैरे टाकलं नाही , आणि डायरेक्ट क्रमशः ! आणि तेही एवढया रोमांचक क्षणी ! आता पुढील भाग लौकर टाका.

पंतश्री's picture

6 Sep 2017 - 3:10 pm | पंतश्री

छान सुरवात आहे. पण स्वस्तिक जर जास्त स्पश्त हवा होता. त्याचे वर्णन अजुन सविस्तर केले असते तर अजुन छान झालि आसति कथा