बघशील कधी आठवांना, असशील जिथे तिथे तू,
हसशील मनी गालांत, असशील जिथे तिथे तू !
स्पर्श नजरेचा होता, फुललेले अंगी रोमांच,
जपशील सदा मनांत असशील जिथे तिथे तू !
सांगत वाहील झरा, माझे शब्द न शब्द,
सोडशील श्वास उदासी असशील जिथे तिथे तू !
भेट तुझी माझी मोहोरल्या नभांखालची,
फुलतील ते क्षण पुन्हा असशील जिथे तिथे तू !
सांगतील कुणी विरुद्ध, माझ्या चार शब्द,
उठशील मैफल टाकून असशील जिथे तिथे तू !
विसरण्यां नाव “साजीद” करता कधी प्रयत्न
चुकतील हृदयताल तेव्हा, असशील जिथे तिथे तू !
- साजीद यासीन पठाण
प्रतिक्रिया
11 May 2015 - 12:10 pm | एक एकटा एकटाच
मस्त