'' अरे, ऐकतोस ना रे...''

संकेत२५'s picture
संकेत२५ in जनातलं, मनातलं
7 May 2015 - 2:16 pm

एखाद्या स्वप्नवतं दुनयेत गाढ असता अचानकपणे जाग यावी अन ते स्वप्नचं कोलमडून जावे तसंच काहीसं आयुष्यात कधी घडतं .
आयुष्यातले ' रंग ' एकाकी बदलतात.. अन होत्याच न्हवतं होवून जातं.
'क्षणा' चा हि विलंब न लागता...
अशीच एक रविवारची रात्र ,हास्य आनंदा कडून वेद्नेकडे झुकलेली ...

रात्रीचे साधारण सव्वा आठ होत आले होते ..
पनवेल स्थानकाहून ठाण्यासाठी आम्ही लोकल पकडली अन सीट वर निवांत बसते झालो. .
रेल्वे रुळावरून लोकलं अगदी धीम्या गतीनं पुढे सरत होती.
डब्यात कमी अधिक रेलचेल होती.
हळू आवजात कुणा एकेकाची, आप आपसात कुजबुज चाललेली .
कुणी मोबाईल मध्ये डोकावलं होतं. कुणी एकांतात हरवलं होतं.

आम्ही हि आजच्या दिवसभरातल्या गोडव्यात अगदी मंत्रमुग्ध झालो होतो.
निसर्गाने देऊ केलेला आनंदाचा रसाळ प्याला नुकताच प्राशन करून मनं तृप्त झालं होतं.
त्यामुळे तना- मनात आनंदाचे लहरी वारे अगदी सुसाट वेगाने वाहू लागले होते.

म्हणावं तर आजचा ट्रेक अगदी प्रसन्नतेच्या वावटळात फिरक्या घेत पूर्ण झाला होता .
निसर्गाने आज असे काही रंग उधलेले होते कि काय बोलावं अन काय नाही, अशी ह्या मनाची स्थिती झाली होती.
किती सुंदर वातावरण होतं ते ..!

न बोलविता हि , ‘ कधीही , अवेळी दाखल होणाऱ्या पाहुण्या मंडळीसारखा हा वेडापाऊस...
कधी रिमझिम कधी धो धो बरसत लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहतो .
तर दुसरीकडे जीव सृष्टीला ना ना विविध अलंकार परिधान करत लोकांकडूनच अमाप सौंदर्याची वाहः वाहः अन कौतुकाची वारेमाप थाप मिळवत राहतो.

आजचा आमचा दिवस अश्याच अलंकार चढवलेल्या लावण्यावती प्रमाणे नटाटला होता.
त्याने सगळेच मोहित झालो होतो. सृष्टी सौंदर्याचे अमाप सुख मनी ढवळत होतो.
त्यातच रममान होतो ...

तोच एकाकी ..हृदय पिळावनारं वाक्य कानी पडलं.

'अरे, ऐकतोस ना रे '
क्षणात ह्या वाक्यांनी हृदयावर एक घाव घातला अन वेदनेची ठिकरी उडाली..
नजर त्या आकृतीकडे स्थिरावली.

एखाद्या फळा फुलांनी बहरलेल्या, अन गर्द छायेंनी नेहमीच
आपलसं करणाऱ्या, ' वृक्षावर 'आपल्या नजरेदेखत कुर्हाडीचा कत्तली घाव पडावा अन काळजात कळीची चर्र उठावी तशी काहीशी स्थिती झाली होती. काळजाला एक एक शब्द ते भिडले होते.

'अरे, ऐकतोस ना रे... , ऐक ना , थांब ना ..'

ती माउली कळकळीने हाक देत होती. आपल्या पाठमोऱ्या मुलाकडे पाहत.
पण तो तसाच चालत सुटला , आईचे ते बोल ऐकूनही न ऐकल्यासारखं करत, मागे जराही वळून न बघता ..
तेंव्हा मनात विचारांची गस्त सुरु झाली.

कशी हि माणसं असतात, काळीज नावाचं प्रकार असत कि नाही त्यांच्याजवळ , काही कळत नाही .. तो एक प्रश्न चिन्हच ?
जिथे काळीज नावच मनचं नाही तिथे ती आर्त हाक तरी कशी पोहोचणार, कशी भिडणार ?

काळजाची आर्त हाक कळायला आधी 'काळीज' असावं लागत तेंव्हा ती हाक काळजाला जावून भिडते.
पण कुणास ठाऊक त्या तरण्या मुलाकडे ते नसावं ?
अन्यथा तो असा चालत सुटला नसता . ..मागे न वळता ..त्या माउलीच्या डोळ्यात आसवे निर्माण करून ...

ती माउली मात्र तिच्या वेगानं धापा टाकत त्या पाठोपाठ लोकल मधून उतरती झाली .
'अरे थांब ना ' ऐक ना रे ... अशी आर्त हाक मारत, हृदय पिटाळत...त्या पाठोपाठ...

क्षणभर नजर तिथेच खिळून राहिली. ..त्या पाठमोऱ्या आकृतीकडे ..त्या माउलीकडे.. त्या क्षणाभोवती रेंगाळत ..
विचारांचं काहूर माजलं मनात ...
अवघा क्षणाचा तो प्रसंग ...मनावर घाव करून भळभळती जखम देऊन गेला.

हे काळीज...खरच फार हळवं असत ..फारच हळवं...

भावनेनं उतू गेलेलं, प्रेमानं ओथंबून वाहिलेलं
कुणा ना कधी कळलेलं , एकांतात कायम गढलेलं

शब्दांशी मिसळलेलं , काळजाशीच नडलेलं
आक्रोशांनी रडावंलेलं , स्वतः वरच हास्यांलेलं

बंध नात्याशी जुळलेलं , कधी कुठे भांडलेल
क्षणात तुटलेलं..अन दुभंगून उरलेलं, दुरावलेल .

हे काळीज...खरच फार हळवं असत ..

संपल ते सगळ नाट्य , संपल सगळ .... डोळ्यात देखेतं...घडलेलं.. क्षणापूर्तीच.. .

गाडीने हळूच वेग घेतला अन ती पुन्हा धावू लागली.
काही क्षणाआधी ,नजर भेट झालेली ती मंडळी...
ती माउली , तिचा तो मुलगा ..अन ते वाक्य , तो सारा प्रसंग मनात तसच तरलत राहिला.

काय घडलं असेल त्या बंध त्या नात्यात....ते माहित नाही .
पण त्या माउलीच्या काळजाची ती आरोळी मात्र मनास अजूनही खूप यातना देते....कळवळत मनं त्यानं..

आई वडील , जन्मदाते आपले , अनेक स्वप्नं बघून , सुखाचा त्याग करून , काबाड कष्ट करून लहानाचं मोठ करून वाढविलेलं.
त्या माउलीच्या मनाची साधी हाक, ती कळकळ आपण ऐकू नये ... त्यास प्रतिसाद देऊ नये .तिला तसच एकट सोडूनी निघून जावे ..
काय बोलावं ह्या उपरी ..शब्द नाहीत ....

आपलीच माणसं जेंव्हा आपल्याशी अशी तर्हेवाईकपणे वागतात..
तेंव्हा खरंच गुदमरत मनं ..

संकेत य. पाटेकर
http://manaatlekaahi.blogspot.in/2015/03/blog-post_14.html

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

7 May 2015 - 3:33 pm | सस्नेह

शब्दबंबाळ !

कपिलमुनी's picture

7 May 2015 - 4:10 pm | कपिलमुनी

:)

पिलीयन रायडर's picture

7 May 2015 - 5:56 pm | पिलीयन रायडर

नक्की घडलं काय होतं???
कशानी काळजाच्या एवढया ठिकर्‍या उडाल्या!!! मला पण सांगा ना.....

बॅटमॅन's picture

7 May 2015 - 6:07 pm | बॅटमॅन

संडे हो या मंडे, रोज खाओ-खिलाओ दवणीय अंडे!

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2015 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा

या लेखात २५ निरनिराळे संकेत दडलेले आहेत, वाचकगण...टुम्ही ओळखा ब्रे!

बॅटमॅन's picture

7 May 2015 - 6:22 pm | बॅटमॅन

कुठले म्हणे?

पण दारु मात्र कधी मी सोडणार नाही... हे वाक्य आठवलं.

एस's picture

7 May 2015 - 6:31 pm | एस

कथेचा पालापाचोळा दूर केल्यावर दिसलेले कथाबीज मात्र किंचितसे डोळे ओलावून गेले.

पैसा's picture

7 May 2015 - 8:08 pm | पैसा

मिपावर स्वागत. लिहीत रहा. चांगलं लिहू शकाल. कधी कधी ओझरतं पाहिलेलं ऐकलेलं पण मनाला जखमी करून जातं.

संकेत२५'s picture

8 May 2015 - 3:01 pm | संकेत२५

कधी कधी ओझरतं पाहिलेलं ऐकलेलं पण मनाला जखमी करून जातं...
हो अगदी खर ..:)

खूप खूप धन्यवाद ..आपल्या प्रतिक्रियेबद्दल ..!

संकेत२५'s picture

8 May 2015 - 3:15 pm | संकेत२५

कथेचा पालापाचोळा दूर केल्यावर दिसलेले कथाबीज मात्र किंचितसे डोळे ओलावून गेले.

आपल्या अश्याच प्रतिक्रिया लिहिण्यास अधिक बळ देतील.
नेमकं काय घ्यावं अन काय लिहावं ... :)

आपलीच माणसं जेंव्हा आपल्याशी अशी तर्हेवाईकपणे वागतात..

आपलीच असली तरी शेवटी माणसंच ना ती? तर्‍हेवाईक वागणारच!!

हो , त्याच्याच तर कधी कधी त्रास होतो ..., इतकंच सांगायचं आहे. :)

सतिश गावडे's picture

8 May 2015 - 3:21 pm | सतिश गावडे

आपली माणसे तर्हेवाईकपणे वागली तरच त्रास होतो हो. परक्यांच्या तर्हेवाईक वागण्याचं कशाला कुणी मनावर घेतंय.
पण अशावेळी ज्यांना आपण आपले समजतोय ती माणसं खरंच आपली आहेत का, "आपली माणसं" याची आपली व्याख्या काय हे प्रश्नही स्वतःला विचारावेत.

या जगात आपण सारे मुखवटे लावून वावरतो. कधी कधी एखादी गोष्ट नको इतकी ताणली जाते आणि आपला मुखवटा गळून पडतो. आणि मग आपले खरे स्वरुप जगाला कळते.

लिहित राहा. तुमचे लेखन यथावकाश सुधारेल. मिपाकर त्यात मदत करतील. =))

परक्यांच्या तर्हेवाईक वागण्याचं कशाला कुणी मनावर घेतंय.

हो , बरोबर आहे आपलं म्हणनं..

पण एखादी घटना (प्रवासा दरम्यान वा कुठे हि म्हणा ) आपल्या समोर घडत असताना , त्याचा परिणाम आपल्यावर हि काही प्रमाणात होताच असतो , नाही का ? ...मग तो दीर्घकाळ असेल वा तात्पुरता , ते, त्या त्या प्रसंगावर अवलंबून आहे. आणि आपल्या संवेदनशील मनावर ..

मी ह्या गोष्टीतून आपलेपणाच्या त्याच गोष्टी मांडल्या आहेत ज्या मला भावल्या ..त्यावेळेस..
ती व्यक्ती जरी ओळखीची नसली . नात्यातली नसली तरी तो प्रसंग एखाद्याच्या जीवनात
घडलेला असू शकतो.
मी त्यातील 'काळजाची ती कळकळ' इथे मांडण्याचा प्रयत्न केलाय. बस...

आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद ...
आणि हो नक्कीच लेखन सुधारेल ...हळू हळू ..., प्रयत्न चालू आहे . चालू राहील . :) :)

"आपलं कोणीच नसतं". हे एकदा लक्षात राह्यलं की फार त्रास होत नाही.

धुडगूस म्हणून एक मराठी सिनेमा लागतो कधीतरी झी मराठीवर. आवर्जून बघा, मला काय म्हणायचंय ते कळेल.

हे ज्याच्या त्याच्या विचारावर आहे . त्याला काय वाटत ....
प्रत्येकाचे आपआपले अनुभवाचे बोल ... अजून काय ;) :)

कपिलमुनी's picture

8 May 2015 - 6:27 pm | कपिलमुनी

"आपलीच माणसं जेंव्हा आपल्याशी अशी तर्हेवाईकपणे वागतात.."

"य" पासून कोणतं नाव चालू होतं?

ब्लॉगची लिंक दिली आहे की त्यांनी.. तिकडे सापडेल.

पिलीयन रायडर's picture

8 May 2015 - 4:57 pm | पिलीयन रायडर

यतिन
यशवंत

संकेत२५'s picture

8 May 2015 - 5:36 pm | संकेत२५

संकेत यशवंत पाटेकर

स्पंदना's picture

8 May 2015 - 4:49 pm | स्पंदना

कळलं काय उराला डसलं ते तुमच्या.
एखादी कळवळुन मारलेली हाक खरच काळजाच पाणी करुन जाते.
अर्थात अशी एखाद्या क्षणात मनावर कोरुन गेलेली कहाणी मांडण अतिशय कठिण!!
लिहीत रहा. आणि हो मिपावर स्वागत!

संकेत२५'s picture

8 May 2015 - 5:29 pm | संकेत२५

:)