माझे शब्द

Rajvardhan's picture
Rajvardhan in जे न देखे रवी...
21 Apr 2015 - 1:23 pm

मी शब्दच हरवून बसलो
आज शोधतो आहे तेच स्वप्न
स्वप्नात माझिया मीच
हरवलो आहे
माझेच शब्द नि माझीच वाचा

एक वेडी आशा
मिळतील का मला माझे शब्द
शोधतो आहे किनारे
नि आधारसाठी धरलेले ते
सृजनाशील हात
आज इनद्रधनुत पुन्हा तेच रंग
भेटतील का मला
शोधतो आहे मी माझेचे शब्द
नि माझीच स्मृतिपटले

एक समग्र व्यासपीठ
तिथे मिळतील का मला माझेच
शब्द
जे कीं हरवले आहेत व्याखानात
दबले गेले आहेत घुसमटातात ते
आता प्राप्तानात
कधी काळी त्यांचाही जरब
होता
चळवळीतून ,आंदोलांतून ,उठावातून
आता हरवले आहेत माझेच शब्द
नि माझा आवाज

एक विष्णन आभाळ
तिथे भेटतील का
मला माझेच शब्द नि माझेच
आर्तव
निर्विवाद गाजवतायात
क्षितिजे आपले आधिराज्य
खुंटलेत तिथेच माझे शब्द
नि माझेच निनाद
शोधतो आहे सापडतील
का मला माझेच शब्द
नि माझा स्वाभिमान ....

@ मी मात्र@
राजर्वधन

कविता