एक स्वातंत्र्यदिन - (ठाणे ) मानसिक रुग्नालयातला

प्रगती's picture
प्रगती in जनातलं, मनातलं
16 Aug 2008 - 7:20 pm

नमस्कार,
मी (लायन) नंदकिशोर काशीकर बोलतोय, मॅडम उद्या १५ ऑगस्टला "लायन्स क्लब ठाणे 'तर्फे एक कार्यक्रम
ठाण्याच्या मेंटल हॉस्पीट्ल मध्ये आयोजीत केला आहे त्याचं निमंत्रण देण्यासाठी तुम्हाला फोन केला. मी लगेचच होकार दिला
लायन्स क्लब यासारख्या १५० देशामध्ये कार्यरत असणार्या संस्थेने आपल्याला आमंत्रण दिलं याचा आनंद होताच, त्याचबरोबर
वेड्यांच्या हॉस्पीटल मध्ये जाऊन त्यांचे कार्यक्रम बघायचे, त्यांचं जग बघायचे याबद्द्ल मनामध्ये एक कुतुहल होते.
आम्ही सकाळी १०.३० ला रुग्नालयात पोहोचलो , आजुबाजुला इतकी सुंदर झाडं होती त्यामुळे प्रसन्न वाटलं पण आजुबाजुला
असलेल्या नीरव शांतते मुळे का कोणास ठाऊक अगदी उदासवाणं वाटत होतं.
'ठाणे" म्हणजे "वेड्याचं हॉस्पीटल" असं पूर्वी एक समीकरण होतं. आपण कीती सह्जपणे एखाद्याला 'वेडं' 'मेंटल' म्हणतो पण
हे ख्ररंतर चुकीचं आहे कारण वेडी असली तरी ती आपल्यासारखीच माणंसं आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला शरीराचे वेगवेगळे रोग
होतात त्याचप्रमाणे त्यांना शरीराचा नाही तर मानसिक आजार असतो म्हणून त्यांना माणूस म्हणून हेटाळणी ची नाही तर आधाराची
गरज असते. असो,
आम्ही मुख्य हॉल मध्ये जिथे कार्यक्रम चालु होता तिथे गेलो तर सगळे रुग्ण अगदी व्यवस्थित रांगेमध्ये बसले होते
मला आश्चर्य वाटलं हे वेडे आहेत? त्यानंतर त्यांचे कार्यक्रम चालु झाले एकीने छान कवीता म्हटली स्वातंत्र्यदिना निमीत्त ( मनात
विचार आला ह्यांना कधी स्वातंत्र्य मिळणार हे जगामधे कधी मिसळणार?) त्यानंतर नाचण्याचे कार्यक्रम झाले सगळया मुली/मुलं
व्यवस्थीत नाचत होते कोणीही चुकलं नाही, खरंच हे वेडे आहेत? असा प्रश्न मला पुन्हा पडला
त्यानंतर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झाला, बक्षिस मिळाल्याचा एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसत होता
एका मुलाने " ऐ मालिक तेरे बंदे हम" हे गाणं म्हटलं
या गाण्याने डोळ्यात पाणी उभं राहीलं, आपल्याकडे कोणी बघत नाही हे बघून मी रडून घेतलं नंतर मात्र स्वत:ला सावरलं
विचार केला रडून फक्त माझं मन मोकळं झालं, मी खरंच ह्यांच्यासाठी काय करु शकते? त्यांना पैशाची गरज नाही , त्यांना
गरज आहे आपल्या आधाराची , आपल्या प्रेमाची. म्हणूनच
मी इथे येणार, परत परत येणार...


ऐ मालिक तेरे बंदे हम...


बक्षिस समारंभ


पूजा खान पाच वर्षापुर्वी गुजरात येथून आली तिला घरचे कोणीच भेटायला येत नाही.


रुग्णालयातील परिचारकांचा वर्ग माझ्या मते "देवदूत"


मी एक माणुस आहे

समाजबातमी

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

16 Aug 2008 - 7:44 pm | प्रकाश घाटपांडे

"माझी गोष्ट" हा विद्याधर बापट यांनी प्रस्तुत केलेला चित्रपट हा मनोरुग्णांच्या समस्यांवर आहे. चित्रपट पहाताना सुन्न होते. इथे काही माहिती.

प्रकाश घाटपांडे

मदनबाण's picture

17 Aug 2008 - 4:54 am | मदनबाण

खरच अशा लोकांना आधाराची गरज आहे..
रुग्णालयातील परिचारकांचा वर्ग माझ्या मते "देवदूत"
१००% बरोबर.

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

विकास's picture

17 Aug 2008 - 6:13 am | विकास

लेख आवडला आणि त्यातील छायाचित्रांमुळे तो अजूनच माहीतीपूर्ण वाटला.

माहीती वाचून अस्वस्थता नक्कीच येते.

सहज's picture

17 Aug 2008 - 6:22 am | सहज

रोजमर्रा के जिंदगी मे काही विषय नेहमीच बाजुला पडतात त्यातील हा एक.

असे म्हणतात की एकादा समाज किती प्रगत आहे हे तो समाज त्या देशातील मानसिक रुग्णांना, कैद्यांना कसे वागवतो यावरुन ठरते.

धन्यवाद प्रगती.

अतिअमापअवांतर - [हा काही लोक इथे धुमाकूळ घालून ह्या विषयाकडे लक्ष वेधत असतात खरे त्याबद्दल त्यासगळ्या 'रावसाहेबांचे' धन्यवाद ; - ) ] बोंबला! आता मला त्या मानसिक रुग्णांना सहानुभूतीने वागवले पाहीजे.

विसोबा खेचर's picture

17 Aug 2008 - 8:09 am | विसोबा खेचर

मी खरंच ह्यांच्यासाठी काय करु शकते? त्यांना पैशाची गरज नाही , त्यांना
गरज आहे आपल्या आधाराची , आपल्या प्रेमाची.

खरं आहे!

चांगला लेख...

अभिज्ञ's picture

17 Aug 2008 - 7:05 pm | अभिज्ञ

>>मी खरंच ह्यांच्यासाठी काय करु शकते? त्यांना पैशाची गरज नाही , त्यांना
गरज आहे आपल्या आधाराची , आपल्या प्रेमाची.

प्रगती,
अतिशय प्रांजळ लेख.

अभिज्ञ.

धनंजय's picture

18 Aug 2008 - 6:49 am | धनंजय

लेख, चित्रे दिल्याबद्दल धन्यवाद.