दर्शन

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
18 Mar 2015 - 12:04 am

गवताच्या एका पात्याने पिंपळाच्या प्रचंड सावलीकडे तक्रार केली,
'तू सारखी इकडून तिकडे हलत राहतेस, माझी शांतता भंग पावते!'
सावलीने उत्तर दिले,
'मी हलत नाही. जरा वर पहा, तिथे एक झाड आहे आणि ते वाऱ्याने चहूबाजूंनी हलते!'
गवताच्या पात्याने आपले इवलेसे डोळे वर करून पहिले........
........ आणि जीवनात पहिल्यांदाच त्याला आपल्यावरील वृक्षाच्या विराट रूपाचे दर्शन घडले!
ते पाते मनातल्या मनात म्हणाले, ' माझ्यापेक्षा हे गवत खूप विशाल आहे!'
..... तेव्हापासून ते पाते शांतचित्त झाले.

खलील जिब्रानच्या 'The Shadow'या लघुकथेचा भावानुवाद.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

खेडूत's picture

18 Mar 2015 - 8:33 am | खेडूत

रूपांतरित कथा आवडली.

इसापनीती मध्ये वाचलेली अशीच थोडी वेगळी कथा आठवली.

पाणी प्यायला आलेला लांडगा आणि बकरीची !

श्रीरंग_जोशी's picture

18 Mar 2015 - 8:58 am | श्रीरंग_जोशी

शतशब्दकथेचा मोह टाळलेला दिसतोय.

यशोधरा's picture

18 Mar 2015 - 9:28 am | यशोधरा

सुंदर.

सस्नेह's picture

18 Mar 2015 - 10:44 am | सस्नेह

छान भाषा/भावांतर !

माझ्यापेक्षा हे गवत खूप विशाल आहे

ही ओळ थोडी बदलता आली तर पहा. मूळ कथा वाचल्यावरच मला कळलं की नक्की काय म्हणायचं आहे.

बाकी अनुवाद सुंदरच!
धन्यवाद...!

मनीषा's picture

19 Mar 2015 - 1:39 pm | मनीषा

उत्तम कथा .

उमा @ मिपा's picture

19 Mar 2015 - 1:46 pm | उमा @ मिपा

सुरेख अनुवाद

शिव कन्या's picture

20 Mar 2015 - 10:17 am | शिव कन्या

प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

रुपी's picture

11 May 2015 - 11:39 pm | रुपी

सुंदर..

प्रियाभि..'s picture

28 Jul 2019 - 6:58 am | प्रियाभि..

आवडला अनुवाद