एक नामांकीत सॉफ्टवेअर कंपनी. संगणकावर चॅटींग सोफ्टवेअरवर चालू असलेला संवाद -
तो - हाय
ती - हेलो
तो - कधी आलीस ?
ती - आत्ताच आलीय. १५ मिनिटे झालीत. ट्राफिक जास्त होते आज.
तो - ओके, चहा झाला का?
ती - नाही जातेय आता.
तो - मीपण जातोय चहासाठी, कँटीन मध्ये येतेयस का?
ती - नाही मी जागेवरच चहा घेऊन येतेय.
तो - ठीक आहे. डब्यात काय आणलं आहेस ?
ती - कालचा उरलेला भात होता त्याला नवऱ्याने फोडणी दिली, तोच घेऊन आलेय.
तो - ओके. लकी आहेस.
ती - का ? तुला नाही का करून दिले काही बायकोने?
तो - तीचे जाउदे गं…. तुला माहीत आहे ना.
ती - काय ?
तो - आज काल नीट बोलते कुठे माझ्याशी…
ती - काही झालंय का ?
तो - सोड ना. तू सांग.
ती - माझं काय…. आल्यावर १२/१ वाजेपर्यंत laptop घेऊन बसला होता.
तो - हम्म. आमच्या बाईसाहेब ११ वाजेपर्यंत किचन मधलं आवरत होत्या आणि नंतर छोट्याची शाळेची तयारी करत होत्या.
ती - हम्म, ठीकै चल, आता मीटिंग आहे. परत आल्यावर पिंग करते.
तो - बघू
ती - करते बोलली ना रे बाबा.
तो - ओके.
---------------------------------------------------------------------------------
तो - हेलो आहेस कुठे ?
ती - मीटिंग लांबली रे.
तो - जेवायला येतेयस का ?
ती - नको डेस्कवरच जेवणारेय…
तो - ………
ती - काय रे.
तो - मी काय बोलू, बस एकटी…।
ती - तसं नाही रे…
तो - ??
ती - अरे उगाच लोकाना विषय नको, चघळायला…
तो - ठीकै… दोघे एकत्र जेवण्यामुळे लगेच विषय मिळतो का ?
ती - तुला समजत नाही रे…
तो - मग समजव ना तू…
ती - जाउदे…. तुला काही कामे नाहीये का ?
तो - काम पूर्ण झालंय आता नुसतं दाखवण्यासाठी विंडो ओपन करून बसलोय. :)
ती - स्मार्ट हा … मग आता काय करणार आहेस.
तो - एकाने पिक्चर दिलाय मस्त "टू स्टेट्स". बारीक विंडो करून गपचूप बघणार आहे दुपारी.
ती - शी त्यात काय मजा….
तो - मग चल थियेटर मधे …
ती - "…………"
तो - काय ग ?
ती - काय ?
तो - येणार का ?
ती - तू जरा जास्तच बोलतोयस असं नाही वाटत तुला?
तो - नाही.
ती - घरी नवरा आहे माझ्या
तो - आठवड्यातून किती वाक्य बोललाय तुझ्याशी ?
ती - "………"
तो - ओ मॅडम.
ती - तुला असं तर नाहीना वाटत की मी तुझ्या…
तो - काय ?
ती - मला खूप काम आहे. मी आता तुझ्याशी परवा बोलेन.
तो - ठीकै राहिलं….
ती - बायकोकडे लक्ष दे जरा…. एखादं गिफ्ट घेऊन जा.
तो - ते मी माझं बघेन.
ती - राग आला वाटतं
तो - तुला खूप काम होतं ना ?
ती - अरे चल निघायची वेळ झाली. सी यु.
-----------------------------------------------
दिवस दुसरा.
ती - हेलो
तो - बोल
ती - काय करतोयस
तो - काही नाही. बोलणार नव्हतीस ना आज?
ती - नव्हतीच बोलणार पण कांदेपोहे आणले होते म्हणून तुला पिंग केले. नको असतील तर राहू दे.
तो - कुठे येऊ ?
ती - कँटीन मध्ये
तो - लोकांना चघळायला विषय मिळेल.
ती - तू जरा अती करतोयस असे नाही वाटत तुला ?
तो - तूच म्हणालीस ना काल ?
ती - हो.
तो - मग ?
ती - "…… "
तो - काय गं ?
ती - मला वाटतं आपण थोडे दिवस एकमेकांशी नको बोलूया.
तो - ते तर तू काल पण म्हणालीस, की आपण परवा बोलूया. आणि आज तूच पिंग केलेस ना ?
ती - "……… "
तो - हेलो ?
ती - मला खूप काम आहे. मी तुला उद्या पिंग करते.
तो - तुझी मर्जी
ती - तू अशक्य आहेस.
तो - ?????
ती - जाउदे
तो - तुला काम आहे ना?
ती - हम्म
तो - नवरा काय म्हणतोय.
ती - नाव नको काढूस. चार दिवस बोलला नाहीये. काहीतरी अर्जंट डेलिवरेबल आहेत म्हणे.
तो - तेच करत बस म्हणावं
ती - "……."
तो - आज मी दुपारी निघून लाँग ड्राइव ला जाणार आहे.
ती - एकटा ?
तो - तू चल …
ती - "……. "
तो - हेलो
ती - मला काम आहे. मी उद्या बोलते तुझ्याशी
तो - ठीक आहे
ती - कुठे जाणार आहेस
तो - येणार नाहीस तर कशाला विचारतेस
ती - "…...."
तो - आहेस का ?
ती - आता खरंच काम आहे रे.
तो - हो का ?
ती - हो आपण उद्या बोलूया.
तो - तुझी मर्जी
ती - तू अशक्य आहेस
तो - हे कितीवेळा सांगणार आहेस ?
ती - तू पण ना.
तो - काय ?
ती - चल, मी जाते.
तो - ठीक आहे.
क्रमश:
प्रतिक्रिया
12 Mar 2015 - 12:59 pm | अभिजित - १
इथे मिपा वर काही महिन्या पूर्वी एक धागा आला होता. काही बायका समोरच्या माणसाला कसे उत्तेजन देतात .. आणि शेवटच्या क्षणी कशी माघार घेतात. त्या वर दोन्ही बाजूनी बर्याच उलट सुलट प्रतिक्रिया आल्या होत्या. तोच प्रकार आहे हा ..
12 Mar 2015 - 2:36 pm | एक एकटा एकटाच
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत
12 Mar 2015 - 8:44 pm | नगरीनिरंजन
ट्विस्ट येणार दिसतोय दुसर्या भागात. फार लांबवू नका ओ खट्पट्या भाऊ
-क्रमश: कथांना कंटाळलेला.
12 Mar 2015 - 9:16 pm | सस्नेह
विंट्रेष्टिंग !
जरा फाष्ट घ्या आता..
12 Mar 2015 - 11:38 pm | प्रसाद गोडबोले
थोड्याफार फरकाने सत्यकथा ! पुढील भागात काय होते ह्याची वाट पहात आहे !
12 Mar 2015 - 11:47 pm | चुकलामाकला
बापरे, ही तर माझी गोष्ट!
पुढिल भाग लवकर टाका हो!
13 Mar 2015 - 2:14 pm | कपिलमुनी
पुढे काहीतरी ट्विस्ट मिळायचा
13 Mar 2015 - 2:27 pm | प्रसाद१९७१
हे दोघे नवरा-बायको असणार ( एकमेकांचे )
13 Mar 2015 - 2:45 pm | पॉइंट ब्लँक
भारी क्लायमॅक्स होईल.
13 Mar 2015 - 2:43 pm | नाखु
धाग्यात पिंग !
वाचकांना झिंग !!
शेवटात टिंगा !!
झट्क्यात रिंगा !!
============
13 Mar 2015 - 2:51 pm | स्पा
हल्ली बऱ्याच ठिकाणी हा प्रकार सुरु असतो ,
13 Mar 2015 - 3:17 pm | कपिलमुनी
हिंजवडीमध्ये पण बरेच ऐकून असतोय पण आजूबाजूला काहीच 'सापडत' नाही :(
13 Mar 2015 - 6:29 pm | प्रसाद गोडबोले
चोराच्या वाटा चोराला ठावुक ...
इथे मिपावर तांब्या संप्रदायाची दीक्षा घेतलेल्यांना अन इथे रतीब पाडत बसलेल्यांन्ना कसे सापडणार असे काही ....
गड्या आपुला तांब्याच बरा =))
19 Mar 2015 - 8:40 pm | प्रसाद गोडबोले
पुढे ??
19 Mar 2015 - 8:47 pm | सूड
पुभाप्र..
19 Mar 2015 - 9:14 pm | अजया
पुभाप्र.
19 Mar 2015 - 9:31 pm | स्रुजा
ह्म्म.. पुढचा भाग आला की बोलेन ह्म्म च्या पुढे :)
20 Mar 2015 - 12:10 am | अत्रुप्त आत्मा
पिंग पॉंग! :-D
20 Mar 2015 - 2:16 am | खटपट्या
हे सगळे आय टी मधले शब्द हायेत !! :)