मागील भाग......
कथा-कॉलेज कट्टा भाग १
कथा-कॉलेज कट्टा भाग 2
कथा-कॉलेज कट्टा भाग 3
वैष्णवी अभि शेजारी बसली.थोडा वेळ झाला मधेच नकळतपणे अभिचा हात वैष्णवीच्या हाताला लागला.
" ओह सॉरी..." असं म्हणत अभि जरा बाजुला सरकला.
त्यावर वैष्णवी गालातच हसली.कदाचित अभि हा खुपच लाजरा मुलगा आहे असे तिला वाटत होते.
" हाय....वैष्णवी...काय गं ही काय वेळ आहे काय कॉलेजचा आज शेवटचा दिवस आणि तु आज चक्क कॉलेजला?? पटतं का तुला हे!!!" लेक्चर झाल्यावर प्राचीने तिला विचारले.
" अगं असं कसं,At least काहीतरी शिकायला तरी मिळाले शेवटी" वैष्णवी गालातल्या गालात हसत म्हणाली.
अशा रितीने अभिच्या आयुष्यात वैष्णवीने केलेल्या Entry ने अभिचा कॉलेजचा शेवटचा दिवस संपला.
मग आता इंजिनीअरींगमध्ये असणारं सगळ्यात महत्वाचं पर्व सुरु झालं ते म्हणजे सबमिशन पर्व.
सगळे मुले त्यात एकदम व्यस्त होती.अभि जरी हुशार असला तरी लिखाणाचा त्याला जाम कंटाळा असे.त्याचं सबमिशन शेवटीच होत असे.
आज सबमिशनचा शेवटचा दिवस होता.अभिचे एकाच विषयाचे सबमिशन बाकी होते ते म्हणजे SOM या विषयाचं.SOM चे न्यायाधीश सर हे लहरी होते.कधी ते विद्यार्थ्यांशी फ्रीने वागत तर कधी अचानक रागात असत.
आणि मुलांच्या दुर्दैवाने आज त्यांचा मुड काही ठीक नव्हता.अंदाजे दहा विद्यार्थी फाईल चेकिंग करण्यासाठी सरांसमोर उभी होती.त्यात वैष्णवीदेखिल होती.अभिच्याच मागे रांगेत उभी होती.पण अभिने मुद्दामुन तिच्याकडे पाहिले नाही.कारण प्राची कॉलेजच्या शेवटच्या दिवशी काय बोलली ते अभि अजुन विसरला नव्हता.आपल्या मनात खरंच वैष्णवीबद्दल काही नाही असे त्याला सगळ्यांना पटवुन द्यायचे होते कारण याबद्द्ल आता वर्गात हळुहळु चर्चा व्हायला लागली होती.कारण प्राची आणि नॅनोने सगळ्या वर्गात या गोष्टीचा राईचा पर्वत करुन सांगितले होते.न्यायाधीश सर सगळ्यांना SOM मधले अवघड अवघड प्रश्न विचारत होते.नाही आले तर प्रत्येकाला लेक्चर झाडत असत आणि " Don't play with your own carrier" या वाक्याने त्यांच्या त्या महान लेक्चरची सांगता होत असे.थोड्यावेळाने अभिचा नंबर आला.पण अभिने सरांना लेक्चर झाडायची वेळच येऊ दिली नाही कारण सरांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची अचुक उत्तरे त्याने दिली.
"व्वा.हुशार आहेस.बघा मुलांनो शिका याच्याकडुन काहीतरी.बाहेर फाइल जमा कर." असे म्हणत सरांनी त्याला बाहेर जाण्याचा इशारा केला.
बाहेर पडल्या पडल्याच कपिलने ती फाइल अभिच्या हातातुन हिसकावुन घेतली.
"अभि यार नंतर कर ना जमा फाइल,माझं अजुन काहीच लिहुन झालं नाही.मी जमा करेन नंतर फाइल तुझी तु काळजी नको करुस."
कपिल एवढे म्हणतो ना म्हणतो तोच " साइड,साइड म्हणत सौरभ तिथे येऊन थबकला.
" अरे सौर्या मी फाइल बुक केलीये तुला नाही मिळणार." कपिल अजुन काही बोलण्याच्या बेतात होता तोच सौरभ कपिलच्या कानात काहीतरी कुजबुजला.कपिलने सौरभला टाळी दिली.
" अरे यार काय चाललंय तुमच्या दोघांच एवढ्या वेळेपासुन?" एवढा वेळ त्या दोघांकडे शांतपणे पाहत असलेला अभि म्हणाला.
"सौरभ आहे का तो प्रॉब्लेम कुणाकडे?" अभिच्या मागुन कुणितरी येत होते.ती वैष्णवी होती.
"हो आहे ना.अभिने सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहिलियेत." यावर अभिने सौरभकडे हे सगळे काय चालले आहे असे विचारण्यासाठी डोळ्यांनीच इशारा केला.
" अरे हा अभि..त्याचं काय आहे ना की एक ते उदाहरण दिले होते ना सरांनी Assignment मध्ये ते कोणीच लिहलेले नाहीये.आता ते सरांच्या लक्षात आलेय आता सर ते उदाहरण नसेल तर फाइल चेकच करत नाहीये रे.बघ ना वैष्णवीची पण फाइल चेक नाही केली.मला वाटतं की तु सगळं लिहलं असेल." एवढे बोलुन सौरभची ती सुपरफास्ट ट्रेन एकदाची थांबली.अभिने वैष्णवीला आपली फाइल घ्यायचा इशारा केला.तिने लगेच फाइल चाचपुन पाहिली आणि तिचा काळजीमध्ये असलेला चेहरा जरासा खुलला होता.कदाचित तिला जे पाहिजे होते ते तिला मिळाले होते.
" थँक्स अभि मी पाचंच मिनिटांत तुझी फाइल आणुन देते" असं म्हणत ती निघुनही गेली.
" काय रे सौर्या, तुला काय गरज होती हे सगळं करायची?त्या बिचार्या कपिलचं एकतर बरंच लिहायचं राहिलंय."
" अरे अभि राहुदे रे तुझ्यासाठी काहीपण मी दुसर्याची फाइल घेतो." कपिल.
" तुझ्यासाठी काहीपण म्हणजे?" अभिने आश्चर्याने विचारले.
" अरे भावा, एकतर तुझ्यासाठी एवढा खाटाटोप करायचा आणि तु स्वतःच त्यावर पाणि फेरतोस?? अरे ती वैष्णवी आवडते ना तुला?" सौरभ.
" अच्छा त्या नॅनो आणि प्राचीने सगळ्या वर्गात केलं तर....अरे अफवा आहेत रे सगळ्या.आणि तुम्ही अशा अफवांवर विश्वास ठेवता..." अभि नाराज होत म्हणाला.
मात्र अभिच्या मनात काय दडलं होतं ते कदाचित फक्त अभिलाच माहित होतं....
थोड्याच वेळात वैष्णवी परत आली.तिने अभिची फाईल त्याला परत केली आणि जाता जाता स्मित हास्य करत 'थँक्स' असंही म्हणुन गेली.एवढा वेळ शांत असलेला कपिल आणि बाकीचे मुले त्या फाईलवर पुन्हा एकदा तुटुन पडली.
आता अभिचे दुसरे सेमेस्टर सुरु झाले होते.या आधीचे सेमेस्टर त्याच्या परीक्षा कधी संपल्या हे कळालंच नाही.कॉलेजच्या परंपरेप्रमाणे पहिले पंधरा दिवस जास्त विद्यार्थी कॉलेजला आली नव्हती.पण आपण ठरविल्याप्रमाणे सुरुवातीस रेग्युलर आणि नंतर परीक्षेच्या वेळी सुट्ट्या घ्यायच्यात या विचारांनी ज्ञानेश्वर आणि अभि पहिल्या दिवसापासुन कॉलेजला जात होते.
तो सोमवारचा दिवस होता सकाळचे आठ वाजले होते.पण अजुनही बस येत नव्हती.आपले पहिले लेक्चर बुडेल या काळजीमध्ये अभि होता.तर ज्ञानेश्वर कुणाच्या तरी शोधात होता.
"यार अजुन कशी आली नाही?" अभि.
" हो ना रे एवढ्या वेळात ती येत असते ना.तसं पण खुप दिवस झालेत तिला पाहिले नाही मी." ज्ञानेश्वर.
" हो ना मी पण." अभि.
" कशी दिसत असंल आता ती?? तिच्याशी ओळख करायची खुप इच्छा आहे रे.तुला काय वाटतं अभि मी बोलु का आज तिच्याशी??" ज्ञानेश्वर.
" अरे तु कोणाबद्द्ल बोलतोय?" अभिने आश्चर्य व्यक्त केले.
" अरे तिचं, इथे स्टॉपवर रोज उभी असते ना ती मुलगी." ज्ञानेश्वरने हसत उत्तर दिले.
" अरे मी बस बद्द्ल बोलतोय आणि तुझं एक वेगळंच." अभिने डोकयाला हातच लावुन घेतला.
इतक्यात हडपसर आकुर्डी स्टेशन बस आली.बस गच्च भरली होती.कसेबसे दोघे आत चढले.
" हाय मित्रांनो कसे आहात सगळे??" बसमधील विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर प्रश्न करत त्या घोळ्क्यात शिरला.अभि मात्र बाजुलाच उभा राहिला.
एवढ्या दिवसांत दररोज बसने येणार्या बर्याच मुलांसोबत ज्ञानेश्वरने ओळख करुन घेतली होती.
संभाजी चौकात गाडीतील गर्दी कमी झाली होती.आता फक्त बसमध्ये विद्यार्थीच होते.अचानक ज्ञानेश्वर त्या घोळक्यातुन बाहेर अभिजवळ आला आणि हळुच म्हणाला.
"यार अभि एक विचारु का?"
" हो विचार ना."
"बघ हा रागावणार नाही ना?"
"अरे नाही ना.बोल लवकर.." अभि असे म्हणतो न म्हणतो तोच बसमधील सगळे एका सुरात म्हणाले
" वैष्णवीला प्रपोज कधी मारणार???" आणि एकच हशा पिकला.
'यार हा नॅनो जरा अति करतोय जरा.' अभि मनातल्या मनात म्हणाला.
प्रतिक्रिया
9 Mar 2015 - 9:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
I truly understand why that professor chose lecturers job as "Carrier"...
10 Mar 2015 - 6:12 pm | विजुभाऊ
अशीच एक कादंबरी नुकतीच वाचनात आली. काही पात्रांची नावे सुद्धा सेम आहेत. उदा : ज्ञानेश्वर. अभी वैगैरे.
पुढच्या भागात "स्वरा" नावाचे पात्र येणार का ?
अर्थात ती कादम्बरीही या कथेइतकीच रटाळ होती.
19 Mar 2015 - 11:22 pm | चेतन677
एका वेळी एकच वाचत जा म्हणजे असं कन्फुजन होणार नाही...स्वराचं पात्र असलेलं ती माझीच एक दुसरी कथा आहे..नक्कीच ती कथाही तुम्हाला रटाळ वाटली असणार..परंतु तुम्ही वगळता बाकी सगळ्यांना ती कथाआवडली आहे
19 Mar 2015 - 11:28 pm | चेतन677
एका वेळी एकच वाचत जा म्हणजे असं कन्फुजन होणार नाही...स्वराचं पात्र असलेलं ती माझीच एक दुसरी कथा आहे..नक्कीच ती कथाही तुम्हाला रटाळ वाटली असणार..परंतु तुम्ही वगळता बाकी सगळ्यांना ती कथाआवडली आहे
19 Mar 2015 - 11:31 pm | चेतन677
सर्वात महत्वाचे म्हणजे मी कोणी मोठा लेखक नाही..