एक मस्त पोपट!!!

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in जनातलं, मनातलं
20 Feb 2015 - 11:27 pm

दोनेक वर्षांपूर्वीची गोष्ट .... (तेव्हा शब्दबद्ध केलेला)
कोपनहेगन (डेन्मार्क) च्या अतिशय सुरेख अशा स्कॅंडीक मध्ये मुक्काम .. ह्या हॉटेलच्या रिसेप्शन मध्ये भला थोरला पियानो ..काल सायंकाळी एका मडमेने काही गत वाजवली.... व ती गेली....थोड्या वेळाने...इकडे तिकडे बघून..समस्तांची लज्जा त्यजून आम्हीही मग बसलो... मंदशा सरत्या संधीप्रकाशात थोडा यमन छेडला... ...हार्मोनियम आणि पियानो मध्ये बराच फरक पण तरी तुका म्हणे त्यातल्या त्यात...म्हणता म्हणता मूड लागला व थोडा पुरिया धनश्री वाजवला (माफक हो)....उठून बघतो तर आजूबाजूचे गोरे बघत होते..चेहेर्यावरून तरी त्यांना आवडले असावे ....एक दोघांनी जरा हसून माना डोलावल्या..नाही..टाळ्या सुद्धा वाजवल्या ...आम्ही तसेच तंद्रीत ...तिथून निघून गेलो.. थोड्या वेळाने रात्री जेवण करून लांब फेरी मारून आलो ..... आलो तर सगळं जरा शांत शांत...म्हटलं या बुवा बस जरा हात साफ करू...'हमीर' चा मूड वाटत होता...म्हणून मग 'नमन नटवरा' सुरु केले ....आता स्वान्तसुखाय वादना मध्ये मला कसलाच अडथळा नको होता ...इतक्यात लक्ष्य गेले ...एक गोरा लांबून कुतूहलाने बघत होता...नजरा नजर होताच त्याने थम्स अप करून दाखवले..मी त्याचा स्वीकार करून पुढे गेलो आणि थोड्या वेळाने थांबलो... पुढे काय वाजवावे असे मनात येते न येते तोच ती रिसेप्शानिस्त माझ्या दिशेने येत होती... मी थोडेसे उठल्यासारखे करून तिला विश केले.. जवळ येउन....$%^$%^%&^.. सा$$ मला म्हणाली .. कृपया पियानो वाजवू नका... मी म्हटलं का?.... इथे शांतता राखली पाहिजे..मी म्हटलं ओ के ...इथे वाजवण्याच्या वेळा काय?...तर ती #@$@#$ म्हणते हा शो साठी ठेवलाय ...वाजवायला नाही.... म्हटलं ...गेलीस उडत!!!...गच्छ सूकर भद्रं ते (ह्याचा अर्थ काय आहे?..पु लं नि अनेक ठिकाणी वापरला म्हणून आपण पण वापरलं झाल ) नशीब एवढंच...हे बघायला कुणी नव्हते...

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

21 Feb 2015 - 1:07 am | बहुगुणी

बाकी तुमचं हार्मोनियम रेकॉर्डिंग असलं तर इथेच टाका की, 'या हॉटेलात आलेल्या' मिपाकरांना नक्कीच आवडेल :-)

टवाळ कार्टा's picture

21 Feb 2015 - 10:24 am | टवाळ कार्टा

हा पोपट नाही...१ वाया घालवलेली संधी आहे ;)

तुमचा काही पोपट झालेला नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Feb 2015 - 12:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

डेन्मार्क (निदान ते हॉटेल तरी) बराच "संगीत-अविकसित" दिसतो आहे ! :) नॉर्वेमध्ये ओस्लोमधील पार्लमेंटजवळच्या सार्वजनिक स्केटिंग रिंक आणि त्याच्या उत्तरेस किर्केनेसमधल्या स्नो हॉटेलमध्ये भारतीय संगीत आवडीने लावलेले पाहिले/ऐकले आहे !

स्पंदना's picture

21 Feb 2015 - 12:44 pm | स्पंदना

हात तेरी!!
त्या औरंगजेबीला घाबल्लात?

सुबोध खरे's picture

21 Feb 2015 - 1:19 pm | सुबोध खरे

गच्छ सूकर भद्रं ते भवतु
म्हणजे (शब्दशः) डुकरा जा. तुझे कल्याण होवो. आणि व्यंगार्थाने उच्च गोष्टीनचा आस्वाद घेण्याची तुझी लायकी आणि उंची नसल्याने निघून जा.

अत्रन्गि पाउस's picture

21 Feb 2015 - 1:38 pm | अत्रन्गि पाउस

माझाही अंदाज तोच होता...
धन्यवाद डॉक्टर

तिमा's picture

21 Feb 2015 - 1:44 pm | तिमा

हा अत्रंगी पाऊस त्यांना झेपला नाही.
तुमचे वादन ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Feb 2015 - 11:10 pm | माम्लेदारचा पन्खा

हे भलतंच झालं हो......जाऊ द्या....गाढ्वाक्क गुलाची चव नाय येऊची....

जेम्स बॉन्ड ००७'s picture

22 Feb 2015 - 12:50 pm | जेम्स बॉन्ड ००७

एक मस्त पोपट!!! *ROFL*

अगम्य's picture

22 Feb 2015 - 2:18 pm | अगम्य

तो श्लोक असा आहे:
गच्छ सूकर भद्रं ते | ब्रूहि सिंहो हतो मया |
पण्डिताः एव जानन्ति सिंहसूकरर्योर्बलं ||
अर्थ: हे डुकरा तुझे भले होवो. तू खुशाल (लोकांना ) सांग की मी सिंह मारला. जाणकार लोक सिंहाची शक्ती काय आणि डुकराची शक्ती काय हे जाणतात.