अश्मयुगातला बाबा

saumitrasalunke's picture
saumitrasalunke in जनातलं, मनातलं
17 Feb 2015 - 11:22 am

आपली मुलगी बाबांसोबत दंगा करण्याच्या मूडमधे आहे.. बाबांनासुद्धा तेच करायचं आहे. पण नकळत डोक्यात काटे टकटक करत पुढे चाललेले.. बॉस कालच म्हणाले होते, जरा लवकर ये उद्या, डेडलाइन जवळ आलीये आणि आपण अर्ध्यात पण नाही आहोत. मुलीला फसवून दाराबाहेर पडताना चहासुद्धा घ्यायची इच्छा होत नाही. ती जी काही सात अट्ठाविस किंवा आठ चौदा असते ती पकडायला उसेन बोल्टला शरम वाटावी या स्पिडमधे तुम्ही पळता. कधी मिळते कधी हुकते. मिळाली तर ठीक पण हुकली तर जबर म्हणजे डबल मूड ऑफ़! असं वाटतं अश्म्युगात असतो (हे गृहीत धरून की तेव्हा काहीतरी बोली विकसित झाली असेल) तर कसं असतं?

मुलगी सकाळी सकाळी म्हणाली असती... "बाबाबा सकासाशा!" (चला सश्याच्या शिकारीला जावुया)
मग तुम्ही म्हणाले असता, "नकोगा वाबोगाचावा नाता तिहातिया दुण्सो टापाटाका" (वाघ चावेल नाहीतर हट्टी हत्ती सोंडेत धरून आपटेल)
मग ती चिडून आईला (जीने कुठल्या तरी जड़ीबुटिचा चहा कढत ठेवलाय) म्हणाली असती,"सपक्ला तार्भी वारिबा साटू नकाला सपकला वारिबा माटु"... (किती भित्रा नवरा आहे तुझा, मला नका आणू असला भित्रा नवरा)
मग तुम्हाला वाईट वाटलं असतं..
तुम्ही तड़क office bag सॉरी, दगडी भाला खांद्याला लावून तिला म्हणाला असता:

"ठूल झेमा परी
काशिरी रुकुन ययूया घरी,
तिराती जम्मर वालचे मलाला
सव्वालाचा घाम्प्रून ताघ्लेला हुम्माला.
होप लिझा झिमा नझाला रिबारी
हुम्मान टोखाटा लोबलो चिगोष्ट खरी"

(ऊठ माझे परी,
शिकार करून येवुया घरी
रात्री मछर कडकडून चावले मला
अस्वलाचं पांघरुण घातलं होतं मी तुम्हाला
झोप नव्हती झाली माझी बरी
म्हणून खोटं बोललो, हिच गोष्ट खरी)

तुम्हाला ती "झेमाबाबाला.... झेमाबाबाला" म्हणत बिलगली असती आणि तुम्ही तुमच्या योकोबाला (बायकोला) म्हणाला असतां, "जाआ मूर्साय राफ्राय राका हां, लोकाम्बी लिमाली राता गबातो" (आज सुरमई फ्राय कर हां, कोलमी मिळाली तर बघतो)

हट्टी हत्ती आणि चावरया वाघांचा एरिया टाळत तुम्ही मस्त फिशिंग नेट घेवुन गेला असता छोट्याश्या समुद्रसफरीला आणी तुमच्या परिराणी सोबत केली असती मासेमारी!!!

नको तो लैपटॉप, त्या डेडलाइन्स, त्या मीटिंग्स, एम् एस वर्डची सेटिंग, आणि अप्रूवलसाठीचं वेटिंग...

तुम्ही आणि तुमची बच्चू मासेमारीला,
कधी शिकारीला,
झाडांवर लटकायला,
जंगलात स्वैर भटकायला,
दगडाने ठिणग्या पाडत,
झाडावरचा मध काढत,
उंच डोंगरावर दोघींना घेवुन जात,
गुहेतून आणलेला शिधा,कुठल्याश्या सुळक्यावर बसून खात...
सूर्य उतरला की तुम्हीही उतरून तुमच्या घरी,
थंडीत दोघिंवर अस्वलीं पांघरूण
आणि तुमची रात्रभर राखणदारी

सौमित्र साळुंके
१७ फेब्रुआरी २०१५

तळटीप: अश्मयुगात कुठून आली फिशिंगनेट आणि नाव, अश्मयुगात बोली भाषा नव्हतीच, ही बोली भाषा मराठी किंवा अरबी भाषेसारखी वाटतेय अश्या स्वरूपाच्या कमेंट्स करू नयेत. तसल्या खवचटपणावर फक्त माझी मक्तेदारी आहे स्मित केवळ भावना लक्षात घ्यावी. माझी ज्ञानपीठासाठी शिफारस व्हावी असा माझा मानस नाही कारण मला सलमान रश्दीची भीती वाटते.

मुक्तक

प्रतिक्रिया

बाबा पाटील's picture

17 Feb 2015 - 11:30 am | बाबा पाटील

जल्ला काय कल्ला नाय बा.*scratch_one-s_head* *SCRATCH*

स्पंदना's picture

17 Feb 2015 - 11:47 am | स्पंदना

ऑ? अस कस कळल नाही?
घरात ती दोन गुण्ड पोरटी आहेत ना? त्यांच्या बद्द्लच्या प्रेमाबद्द्ल लिहीलं आहे.
मराठीतले शब्द इरवुन फिरवुन त्यांना जरा जास्तीचे काने मात्रे दिलेत.

तपशिल एकच....पोरी बरोबर टवाळक्या करायच्या सोडुन पैक्याच्या मागे धावावं लागतयं.

गिरकी's picture

17 Feb 2015 - 12:16 pm | गिरकी

आवडलं !!

पण काय करता,दमलेल्या बाबाची गोष्ट माहिते आहे ना.

तुषार काळभोर's picture

17 Feb 2015 - 8:39 pm | तुषार काळभोर

ची जाहिरात आठवली!!

लेखन वाचले ! अश्मयुगात प्रवेश झाल्या सारखे वाटले... *LOL*
चला आत्ताच्या डिजीटल युगात परतावे म्हणतो !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

ब़जरबट्टू's picture

20 Feb 2015 - 2:21 pm | ब़जरबट्टू

लेखकाची कल्पनाशक्ती व शब्दप्रभुत्व बघून वारल्या गेलू आहे.. :)

पैसा's picture

20 Feb 2015 - 8:08 pm | पैसा

खूप छान!