झाडे आणि फुलांचे प्रदर्शन (२)

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
9 Feb 2015 - 8:53 pm

११)
११

१२)
१२

१३)
१३

१४)
१४

१५)
१५

१६)
१६

१७)
१७

१८)
१८

१९)
१९

२०)
२०

२१)आमच्या बाल्कनितला घेवडा
२१

२२)आमच्या बाल्कनितली फरसबी
२२

२३))बाल्कनितल्या शेवग्याच्या(कलम) शेंगा
३१

पहिला भाग इथे

ब्रिटिश कौंसल लाइब्ररीतून मी बोनसाइ विषयी बरीच इं पुस्तके पुर्वी वाचली होती. रेखाचित्रे देउन कसं करायचं ते छान लिहिलेलं असतं. समजायला काही अडचण नसते. मराठी पुस्तकांचं आता आली आहेत का ते माहित नाही.

थोडक्यात बोनसाइ माहिती:
चिकणमाती, चिकटमाती वापरायची नाही. पाणी छान झिरपले पाहिजे.जाड खडीसाखरेसारखा मुरूम तळाला, मध्ये भरड आणि वर जाड रवाप्रमाणे थर द्या. तीनचार भोकेवाले पसरट भांडे घ्या. वड, पिंपळ, उंबर, बांबु, संत्रे, लिंबू, जांभूळ इत्यादीची जुनी रोपे उपटून आणून त्यांची मुळे भांडयाच्या तळाच्या भोकांना तांब्याच्या २एमेम तारेने बांधावी लागतात. झाड वाढू लागल्यावर मोजक्याच फांद्या संतुलित राखून तांब्याच्या तारेने फांदीभोवती गुंडाळून वाकवून हळूहळू हवा तो आकार देत वाढवणे हे तीन वर्षाँनी करावे लागते. ही एक कला आहे.
बोनसाइप्रेमिंची एक संस्था असते. तिथे सभासद होऊन झाडांची नोंदणी करावी लागते. दोनशे वर्षाँचा वड पाहिला आहे.
सुमो, बोनसाइ, कल्चर्ड मोती आणि झरे, पर्वत, झाडांच्या आत्म्याची पुजा करणारा झेन हे जपानी लोकांची देणगी आहे .

प्रतिक्रिया

पैसा's picture

12 Feb 2015 - 10:05 am | पैसा

यात काही बोन्साय आहेत का? आणि घेवडा, फरसबीचे एकेक झाड एकवेळ भाजी करण्याइतक्या शेंगा देते का?

एस's picture

12 Feb 2015 - 11:26 am | एस

बोन्साय आवडले!

घेवड्याचे पाच वेल पुरतात. या भोगीला भाजी केली होती. घेवडा ,गवार हे वेडं पीक आहे. भरमसाठ शेंगा येतात. फरसबीचे दोनच दाणे लावले होते आणखी लावायला हवे होते. दोन्ही बिया नोव्हेंबरात आणलेल्या भाजीतून जून झालेल्या शेंगेतून मिळवले.

माझ्याकडे बोनसाइ नाही. याबद्दलची माहिती ७५ सालात घेतली. परंतू कमीतकमी पाचदहा वर्षे निगा राखण्याची चिकाटी नसल्याने कांदामुळाभाजी पर्यँत आमची धाव. शेवग्याचे कलम केले होते बाल्कनीत. वर्षातून दोनदा बहर यायचा आता झाड देऊन टाकले.यावर्षी टबात भात आले होते खास मुनिआंसाठी ठेवले होते.

अजया's picture

12 Feb 2015 - 3:53 pm | अजया

फरसबीचे दाणे मीही ठेवलेत.विसरले होते.आता लावतेच.गवारीचे पण तसेच मिळवतात का? गवार वाळवून बी काढायचं?

फरसबीचे अथवा इतर शेंगांचे चांगले वाळलेले दाणे हवे असल्यास जून शेंग आख्खीच कोरड्या जागी ठेवायची. शेंग वाळल्यावर ओलसर जमिनीवर दाणे ठेवा. खोल पेरू नका. गवारीची जून शेंग क्वचितच (भुलेश्वरला वाळवलेल्या कोवळ्या शेंगा तळून खाण्यासाठी मिळतात)मिळते. गवारीचे झाड वजनाने लगेच पडते. आधार हवा.

नाहीतर १३ला भायखळा राणीबाग प्रदर्शनात काम होईल.

पैसा's picture

12 Feb 2015 - 8:49 pm | पैसा

फरसबीचे झाड किती दिवसात तयार होते? पाणी किती घालावे लागते?

फक्त मूग अडीच महिने आणि तूर नऊ महिन्यांनी बाकी सर्व साडेतीन महिन्यांची कडधान्ये पिके आहेत. भाजीसाठी ओल्या शेंगा एक महिना आणखी लवकर तोडायला मिळत असतात. घेवड्यांचे वेगवेगळे प्रकार त्यांच्या जातीनुसार जुलै अथवा डिसेंबरात फळतात. एरवी वेल नुसतेच वाढतात.
चवळी ,वालींचे असेच आहे.
वेलवर्गिय फळभाज्यांसाठी कचरा खत ,वांगी, टोमेटो, मिरचीसाठी शेणखत आणि कडधान्यांसाठी सुफला खत रोपे लहान असतानाच बाळ -आहार म्हणून द्यावे लागते. फळ येईनासे झाल्यानंतर खत ओतून काहीही होत नाही. शेवग्याची {कडवी, तुरट, गोडट ,सपक, भरीव गराची वगैरे }एकदा, दोनदा फळणाऱ्या जाती असतात. गोकुळाष्टमि +/महाशिवरात्र बहर. खतं मारून फरक होत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2015 - 11:42 pm | अत्रुप्त आत्मा

बुट्टी झाडे भारी आहेत.
पणा यांना बोन् साय म्हणावं? की बोन्स आय? ;)

समांतरः- आय आय आय,काय शब्दफोड सुचली हाय! =))

मॅक's picture

16 Feb 2015 - 1:09 pm | मॅक

मस्तच .......
असेच एक प्रदर्शन महापालिकेतर्फे या शनि.--रविवारी भायखळा येथे भरले होते....

मॅक's picture

16 Feb 2015 - 1:16 pm | मॅक

http://www.misalpav.com/node/17168
२०११ मधील प्रदर्शन (मनपा मुंबई)

होय ,भायखळ्यालाही गेलो होतो आणि फोटो काढले परंतू फुलांचाही ओवरडोस होईल म्हणून नाही डकवले.

आता बाल्कनीतच शेवग्याच्या शेंगा उगवायचे दिवस आले आहेत ! आमच्या इकडचा भाजीवालाच्या दरा प्रमाणे एक शेवग्याची शेंग १५ रुं ला मिळते. *shok*

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }

यातल्या १२ व्या फोटोतल्या Ficus Retusa ह्या झाडाचे बोन्साय करायला घेतले आहे. याला मराठीत काय नाव आहे बरें? (अर्जुन?) माळरानावर हिंडताना एका खडकाच्या कुशीत सापडले. तिथून काढले व घरी आणून लावलेय. गुरे चारायला येणार्‍या पोरांनी उगीचच फांद्या मोडून मोडून वाईट हालत केली होती. तरी तग धरून होते. आता छान कोंब फुटले आहेत. अजून वडाचीही काही रोपे आणली आहेत. त्यातल्या एकाचे बोन्साय ऑन रॉक शैलीतील बोन्साय करायला घेतले आहे. दोनेक वर्षांनी अपडेट देईनच. बहुगुणींनी सुचवलेल्या 'बोन्साय'(लेखकः आ. बा. पाटील) या पुस्तकाचाही फार फायदा झाला. त्याबद्दल तुम्हां दोघांचेही आभार!

स्वैप्स आता बोन्साइचे प्रयोग सुरू केलेच आहेत तर मी असं सुचवेन की पंधरा झाडे लावा आणि त्याचे सहा सहा महिन्यांनी फोटो काढून ठेवा कारण १)झाडाचे रेजिसट्रेशन करता येईल २)तीन चार वर्षाँनी असं वाटेल की आणखी हवीत तर त्याला आणखी तीन चार वर्षे वाया जातील काळ विकत मिळत नाही.

होय. अजून बरीच झाडे आणणार आहे. बादवे, हे रजिस्ट्रेशन काय असते आणि कुठे करायचे असते?

या नोंदणीबद्दल कळले होते. परंतू तेव्हा पत्ता शोधला नव्हता. झाड अमुक एक वर्षांचं आहे हे पुढे स्पर्धेत वगैरे भाग घेण्यासाठी. या छंदाचे हौशी केरळ आणि गुजरातमध्ये आहेत. friends of trees गुगलून मिळेर वाटतं.

फ्रेंड्स ऑफ बोन्साय म्हणून एक ग्रुप दिसतोय पुण्यात. सौ मंगला राव-निलंगेकर ह्या एक बोन्साय आर्टिस्ट दिसल्या एका ब्लॉगवर. अजून काही सापडतेय का पाहतो. पण नोंदणी करण्याबद्दल काही सापडले नाही.

माटुंग्याच्या प्रदर्शनात ते बोनसाईवाले वही घेऊन बसलेच होते अगोदर माहीत असते तर त्यांचे संपर्क कार्ड लगेच घेतले असते.