एक दिवस शिक्षकांनी वर्गात सांगितले कि उद्या तुमच्या वर्गाचा ग्रुप फोटो काढायचा आहे तरी सर्वांनी प्रत्येकी ५० रुपये फोटोसाठी आणावेत
त्याच वर्गात आपला बाळ्या पण होता, ज्याला लहानपणीच नेता बनायचं किडा चावला होता ...आणि तोच सर्व वर्गाचा नेता होता. जशी त्याने हि सूचना ऐकली ...तशी तास संपल्यावर रागाच्या भरात सर्व विद्यार्थ्यांना म्हणाला कि "हि तर खुली लुट आहे...हे शिक्षक हि शाळा आपल्याला अशीच लुटत राहणार ...मला सांगा कि फोटो प्रिंटआउटला ५० रुपये लागतात का ?...प्रिंटआउट १० रुपयात मिळते ....हि शाळा आपले सर्व शिक्षक राहिलेले ४० रुपये आपआपसात वाटून घेणार. आपल्या वर्गात 60 मुले आहेत....म्हणजे २४०० रुपयाचा भ्रष्ठाचार आपल्या डोळ्यादेखत होतो आहे. अश्या भ्रष्टाचारी लोकांमुळेच देश मागे पडला आहे.तरीच मला वाटले कि हे शिक्षक रोज नाश्त्याला मिसळ आणि सामोसे कसे खातात. भलाईचा जमाना राहिला नाही"
भाषण देवून बाळ्या घरी आला आणि आईला म्हणाला
"आई उद्या शाळेत फोटो काढायचा आहे त्यासाठी १०० रुपये प्रत्येकी आणायला सांगितले आहेत"
आई : "१०० रुपये ? शाळा आहे कि दरोडेखोरांची टोळी ? दर वेळेस असे पैसे घेत असतात त्यात फी वेगळी. आपल्या पैशावर ऐश चालू आहे तुमच्या शिक्षकांची ...आमच्या काळात असे काही नव्हते. थांब तुझे बाबांकडून पैसे घेवून तुला देते"
बाबा कामावरून घरी आल्यावर
आई : अहो ऐकलेत का बाळ्याचा उद्या शाळेत ग्रुपफोटो काढायचा आहे...शाळेने २०० रुपये मागितले आहेत"
हि साखळी अशीच पुढे चालू आहे
अश्याच तऱ्हेने महागाई वाढत आहे
प्रतिक्रिया
2 Feb 2015 - 4:35 pm | राजाभाउ
सुरुवात फोटोग्राफर पासुन झाली १० रु नी, आणि शेवट झाला ते फोटोग्राफच्या बायकोने फोटोग्राफरकडे २०० रु मागीतले तेंव्हा :-D
2 Feb 2015 - 4:57 pm | प्रचेतस
चान चान
2 Feb 2015 - 5:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
छान रे देवांग्या.
2 Feb 2015 - 6:58 pm | बॅटमॅन
माई =))
3 Feb 2015 - 12:34 am | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या "ह्यां"चं मत राहीलच की ओ :) ;)
3 Feb 2015 - 9:50 am | बोका-ए-आझम
ते बहुधा फोटो काढायला गेले असावेत!;)
3 Feb 2015 - 11:55 am | नाखु
काढलेला फोटो पैसे न देता दुरुस्त करायला गेले आहेत !
उगा "ह्यांच" अवमूल्यन करू नका बरे !
2 Feb 2015 - 5:37 pm | जेपी
एक गिर्हाईक फोटोग्राफर कडे महागाई बद्दल तक्रार करु लागले.
फोटोग्राकर"महागाई काय फक्त तुमालाच का ? आमच्या बाळ्याच्या शाळेत एका फोटुचे 500 रु घेतात "
3 Feb 2015 - 12:36 am | मुक्त विहारि
मस्त
2 Feb 2015 - 6:58 pm | बॅटमॅन
आयटीवाल्यांचा उल्लेख नसल्याने फाऊल.
3 Feb 2015 - 12:29 pm | आदिजोशी
अच्र्त ब्व्ल्त
3 Feb 2015 - 9:48 am | बोका-ए-आझम
मस्त!आधी का नाही भेटलात? उगाचच इकाॅनाॅमिक्स शिकावं लागलं ना!
3 Feb 2015 - 10:21 am | श्रीरंग_जोशी
:-)