छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ७: शांतता

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
1 Feb 2015 - 12:23 pm

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ७: "शांतता"

http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
http://www.misalpav.com/node/28931
http://www.misalpav.com/node/29297
http://www.misalpav.com/node/29690
http://www.misalpav.com/node/29884
********************************************

नमस्कार मंडळी! ६ वी स्पर्धा स्वॅप्स यांनी अत्यंत यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद! आता पुढच्या काही स्पर्धा पुन्हा जुन्या फॉर्मॅटप्रमाणे घेऊ आणि मग पुन्हा एखाद्या जाणकार मिपाकरांना स्पर्धा आयोजित करायची विनंती करू.

यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "शांतता". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे!

प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम पहिल्या ५ स्पर्धांप्रमाणेच राहतील.

सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!

*************************************

(एक विनंती: खूपच सुंदर छायाचित्रे येत आहेत. मात्र निसर्गचित्रांमधे शांतता खूप सहज सापडते. अजून काही कल्पक विषय हाताळावेत अशी सर्वांनाच विनंती.)

छायाचित्रणप्रतिभा

प्रतिक्रिया

चला, माझी प्रवेशिका देत आहे.
फोटोचं ठिकाण - तुलसी तलाव, मुंबई
फोटोबद्दल - मुंबईत शांतता शोधणं म्हणजे मिरचीत गोडपणा शोधण्यासारखं आहे. अशक्य. पण भर मुंबईत मधोमध हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग तुम्हाला विलक्षण शांतता देतो. मुंबईला जलपुरवठा करणारा हा शांत जलाशय तुलसी. पक्षांच्या किलबिलाटाव्यतिरिक्त, मधूनच दूर कुठेतरी माकडाच्या हुप हुप करण्याव्यतिरिक्त इथे कुठलाही आवाज नव्हता.

शांतता

एक्झिफ़ डेटा
कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस
अ‍ॅपर्चर - एफ़ ४
शटर स्पीड - १/१२५०
आय एस ओ १६०
फ़ोकल लेन्ग्थ - ६ एम एम
एक्स्पोजर +-०

सुरेख! शांतता फोटोत पकडणे सोपे नाही.

काय सुंदर फोटो आहे! निळ्या पुलाचं हिरवं प्रतिबिंब खासच.

निव्वळ अप्रतिम रे वेल्लेश
जबराट रेफ्लेक्षण आलंय

मला शांतता लाभली, म्हणून ही प्रवेशिका. ;)

1

चित्रकलेस हासू नये. चालक शिकत आहे.

आणि वेल्लाभटांनो, तुमचे खूप खूप आभार!

सविता००१'s picture

9 Feb 2015 - 12:35 pm | सविता००१

वेल्लाभट तर खूषच होतील की.
मस्त काढलंय.

वेल्लाभट's picture

9 Feb 2015 - 3:41 pm | वेल्लाभट

काय सही काढलंयत !!!!

वाह
कमाल !

आदूबाळ's picture

9 Feb 2015 - 4:07 pm | आदूबाळ

__/\__

एक्सलंट म्हणण्याइतकं भारी नाही याची मला कल्पना आहे, पण हौसलाअफजाहीबद्दल तुम्हां दोघांचेही आभार.

असंका's picture

13 Feb 2015 - 3:17 pm | असंका

सुरेख... अगदी तो प्रदूषित तवंगही हुबेहुब उतरवलात!!

स्पा's picture

13 Feb 2015 - 3:19 pm | स्पा

मस्ताड रे आदुबाळ

तुझ्या पेंटिंग चा एक वेगळा धागा काढ आता :)

nasatiuthathev's picture

1 Feb 2015 - 7:00 pm | nasatiuthathev

शांतता

मुंबईत एखाद्या रेल्वे स्टेशन वर एवढी शांतता असण अशक्य... वाशी स्टेशन वर क्लीक केलेला हा फोटो ....

असंका's picture

2 Feb 2015 - 12:01 pm | असंका

फोटो दिसत नाहिये...?

चतुर नार's picture

1 Feb 2015 - 11:04 pm | चतुर नार

साधारण पाचेक वर्षांपूर्वी सोनी POS ने एका रिसॉर्ट च्या पॅसेजचा फोटो काढलाय. अँगल आवडला म्हणून काढला. तिथे कोणीच नसल्याने आणि पंखेही चालू नसल्याने शांतता होती. ;)

नया है वह's picture

13 Feb 2015 - 3:31 pm | नया है वह

तिच शांतता यामधे वाटते.

मस्त !

असंका's picture

13 Feb 2015 - 3:37 pm | असंका

प्रतिसादाला _/\_

हे चित्र इतकं ओळ्खीचं का वाटत होतं ते कळलं...

अगदी शाळेत जायला झालेला उशीर आठवून घामसुद्धा फुटला.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2015 - 12:02 am | मुक्त विहारि

जशा प्रत्येकाच्या सुखाच्या आणि समाधानाच्या संकल्पना वेगळ्या, तशाच प्रत्येकाच्या शांततेच्या संकल्पना वेगळ्या.

आम्हाला कधी एखाद्या सुंदर,रमणीय आणि कोलाहल नसलेल्या मंदिरात पण शांतता मिळते तर कधी एखाद्या समुद्र-किनारी, रात्रीच्या साग्रसंगीत जेवल्या नंतरच्या , वाळूच्या किनार्‍यावर अनवाणी घातलेल्या शतवापलीने पण शांतता मिळते.

पण मनापासून मानिसिक शांतता मिळते ते कट्ट्याच्या वेळी किंवा बायको बरोबर किंवा आमची लेडी-डायनॅसॉर झोपली असेल तर.जागेपणी पण तिचा काही त्रास नसतो.आम्हीच तिला त्रास देत बसतो.

हा आमचा असाच एका कट्ट्याचा फोटो.

ह्या कट्ट्याचे वैशिष्ट्य म्हणजे २ फार उत्तम माणसां बरोबरचे मतभेद (जे एकतर्फी होते, आमच्याकडूनच चूक झाली होती.) मिटले आणि आधी ज्यांच्या बरोबर संबंध घट्ट होते ते अजून द्रुढ झाले.

२ व्यक्ती, २ समाज एकत्र झाले, तर ती खरी सामाजीक शांतता असे आम्हाला वाटते.ती होईल तेंव्हा तेंव्हा होईल.पण निदान आपल्यापुरती तरी मतभेदांची दरी भरून निघणे हीच माझी मानसीक शांतता.

हे असे मानसीक शांततेचे क्षण आमच्या आयुष्यात परत-परत येतात.

.

वरील फोटो अस्मादिकांनी काढलेला नाही आणि तसेही मित्रांना भेटून मन इतके प्रसन्न झालेले असते की, आम्ही कॅमेर्‍याच्या वाट्याला पण जात नाही.

आमच्याच "शांतता----ज्याची-त्याची" ह्या आगामी (आणि कधीच प्रकाशन न होणार्‍या) ग्रंथ-मालिकेतील (खंड ८-प्रकरण-१०)

प्रवेशीका बाद असल्यास तसे कळवणे.

विषय कुठलाही असला तरी मु वि काका फक्त कट्ट्याचे फोटो टाकणार हे नक्की =))

हा कट्टा पल्याडचा दिस्तोय!!

मुक्त विहारि's picture

3 Feb 2015 - 8:11 pm | मुक्त विहारि

माणसे (माझ्या अनुभवानुसार) उत्तम आहेत ना?

आणि ज्ञान लालसेची अशांतता बर्‍यापैकी शांत करत ना? हे महत्वाचे.

@ स्पा...

असं कसं, असं कसं....

मागच्या वेळी, मुलाचा आणि आमच्या लेडी डायनॅसॉरचा, फोटो टाकला होता की....

ज्ञान लालसेची अशांतता बर्‍यापैकी शांत करत ना?

'ज्ञान लालसेची अशांतता ?' अर्रर्र!! कचकन वारलोच!! =))

मुक्त विहारि's picture

3 Feb 2015 - 8:20 pm | मुक्त विहारि

हा मला आवडलेला अजून एक फोटो.

आमच्या एका बाजूला साक्षांत कथा-लेखक तर दुसर्‍या बाजुला प्रतिसाद सम्राट.त्या रात्री खूप दिवसांनी शांतता अनुभवली.

.

.त्या रात्री खूप दिवसांनी शांतता अनुभवली

.

बर्र

सूड's picture

5 Feb 2015 - 3:41 pm | सूड

__/\__

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2015 - 1:19 am | डॉ सुहास म्हात्रे

सकाळची वेळ, धुके अजूनही पूर्ण निवलेले नाही, वार्‍याची झुळूकही नाही ना समोरच्या तळ्याच्या पाण्यावर एकही तरंग आणि या सगळ्यांच्या मागे हजारो वर्षे मानवी हस्तक्षेपापासून मुक्त असलेले वर्षारण्य... नेहमी कल्ला करणारी जनताही हे दृश्य बघताना आपोआप मूक झाली होती... वातावरण, डोळे आणि मन; सर्व शांत शांत !

असंका's picture

3 Feb 2015 - 6:35 pm | असंका

एकही प्रतिबिंब थोडंही डिस्टॉर्ट झालेलं नाहीये. कमालीची शांतता आहे....!!

नंदन's picture

4 Feb 2015 - 12:00 pm | नंदन

सकाळची वेळ, धुके अजूनही पूर्ण निवलेले नाही, वार्‍याची झुळूकही नाही ना समोरच्या तळ्याच्या पाण्यावर एकही तरंग आणि या सगळ्यांच्या मागे हजारो वर्षे मानवी हस्तक्षेपापासून मुक्त असलेले वर्षारण्य... नेहमी कल्ला करणारी जनताही हे दृश्य बघताना आपोआप मूक झाली होती... वातावरण, डोळे आणि मन; सर्व शांत शांत !

सुरेख!

अनिलांची 'तळ्याकाठी' ही दशपदी आठवली:

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते,
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते.

प्रमोद देर्देकर's picture

2 Feb 2015 - 11:39 am | प्रमोद देर्देकर

छायाचित्रणाच्या स्पर्धेतला हा माझा पहिलाच प्रयत्न.
गावच्या सड्यावरुन काढलेलं हे छायाचित्र. गावात कधीतरीच ए.स्टी.येणार म्हणुन एरव्ही शांत पहुडलेला लाल मातीचा रस्ता आणि त्याला साथ देत बाजुने वाहणारी शांत खाडी.

1

स्पा's picture

2 Feb 2015 - 12:13 pm | स्पा

इथे आता फक्त शांततेताच आवाज उरलाय

fgf

निकॉन ड३१००
३५ मिमी लेन्स

असंका's picture

2 Feb 2015 - 12:34 pm | असंका

अप्रतिम फोटो....

असा फोटो की ज्याला कुठल्याही प्रस्तावनेची गरज नव्हती. मनात एकच विचार येऊ शकतो- केवढी शांतता आहे इथे!

(प्रतिसादकाच्या विनंतीवरून संपादित)

स्पा's picture

2 Feb 2015 - 12:37 pm | स्पा

हम्म, करतो बदल

विशाल कुलकर्णी's picture

2 Feb 2015 - 1:14 pm | विशाल कुलकर्णी

क्लासिक रे स्पावड्या !
जियो ...

वेल्लाभट's picture

2 Feb 2015 - 4:27 pm | वेल्लाभट

लव्हली !

हा फोटो रंगीत स्वरूपात(ही) दाखवा की.

कपिलमुनी's picture

3 Feb 2015 - 7:14 pm | कपिलमुनी

स्पा ला एक ट्राफी देउन शेप्रेट बसवा :)

सूड's picture

3 Feb 2015 - 8:16 pm | सूड

+१

सौरभ उप्स's picture

4 Feb 2015 - 2:44 pm | सौरभ उप्स

+१

कवितानागेश's picture

13 Feb 2015 - 12:32 pm | कवितानागेश

स्पा!!
बस नामही काफी है। ;-)

सौरभ उप्स's picture

4 Feb 2015 - 2:46 pm | सौरभ उप्स

सुपर्ब रे स्पा

गौरी लेले's picture

13 Feb 2015 - 2:52 pm | गौरी लेले

अप्रतिमच !

स्पा , आपण प्रोफेशनल छाया चित्रकार आहात काय ?

फोटोच्या कोपर्‍यात लिहिलेले नाव प्रसन्न आपटे आहे का ?

आपण प्रोफेशनल छाया चित्रकार आहात काय

नाही हो अजून तेवढी कुवत नाहीये):)

फोटोच्या कोपर्‍यात लिहिलेले नाव प्रसन्न आपटे आहे का ?

हो

अत्रुप्त आत्मा's picture

13 Feb 2015 - 3:12 pm | अत्रुप्त आत्मा

http:// www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Feb 2015 - 3:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

ओ गौरी ताई,
जरा लायनीत या.
पयला नंबर माझा आहे.

त्या णंतर स्पंदना ताई (मागच्या जन्मातल्या अपर्णा ताई)

स्पंदना ताईंच्या कितीतरी आगुदर म्या इकडे फिल्डींग लाउन बसलो आहे, तुम्ही कुठे मधे घुसता.

आतातर स्पण्दना ताईंनी तर स्वतःच्या नावात पण स्पा येईल हे बघितले आहे.

मी पण नाव बदलायच्या विचारात आहे.

तुम्ही उगाच आम्हाला काँपिटीशन वाढवु नका.

आमचा स्पा आहेच गुणाचा.

स्पावड्या आज घरी गेलास की आई कडुन दृष्ट काढुन घे बर.

पैजारबुवा,

सूड's picture

13 Feb 2015 - 3:24 pm | सूड

बास, किती कवतिक कराल. *DIABLO*

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Feb 2015 - 3:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुडक्या,
तुझ्यावर पण डोळा आहे रे माझा.
पण आधि लगिन कोंडाण्याच.

पैजारबुवा,

तुझ्यावर पण डोळा आहे रे माझा.

अर्र !! कशाला उगा!

पण आधि लगिन कोंडाण्याच.

तेच, कोडाण्याचं काय बी करा. माझ्यावरचा डोळा पटकन उचला बरं!! ;)

स्पंदना's picture

16 Feb 2015 - 6:01 am | स्पंदना

आतातर स्पण्दना ताईंनी तर स्वतःच्या नावात पण स्पा येईल हे बघितले आहे.

न्हाय ओ न्हाय!!
म्या सासू कशाला त्याला पिसू सारखी डसू?

सूड's picture

16 Feb 2015 - 2:25 pm | सूड

म्या सासू कशाला त्याला पिसू सारखी डसू?

आंतरजालीय सासूजावयाची जोडी बघून मला स्पा म्हणजे जावई विकत घेणे आहे मधला केविलवाणा राया आणि सविता प्रभुणेंनी रंगवलेलं पाताळयंत्री स्त्रीपात्र आठवलं....

नया है वह's picture

13 Feb 2015 - 3:32 pm | नया है वह

सुरेख

किल्लेदार's picture

2 Feb 2015 - 12:16 pm | किल्लेदार

नगर जवळील सिमेट्री …. एक भयाण शांतता !!!
काही वर्षांपूर्वी नगर जवळच्या सिमेट्री मध्ये गेलो होतो. भर दुपारी अशी भयाण शांतता होती कि विचारू नका. पण थडगी मात्र नमुनेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. तण भरपूर वाढले असल्यामुळे एक वेगळेच गूढरम्य वातावरण तयार झाले होते. बरोबर "सवंगडी" होता त्यामुळे ते वातावरण एकदम अंगावर आले नाही.
१८५७ साली जे इंग्रज मारल्या गेले त्यांची ही थडगी असे ऐकले आहे. चुकत असल्यास बरोबर माहिती द्यावी.

1250427698

1250427754

अनुप ढेरे's picture

2 Feb 2015 - 12:30 pm | अनुप ढेरे

वाह.. आवडले फोटो.

Rasta

पैजारबुवा

विशाल कुलकर्णी's picture

2 Feb 2015 - 1:26 pm | विशाल कुलकर्णी

पर्थ, ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरीया गार्डन्सच्या भागात टिपलेला एक शांत, एकाकी रस्ता ...

road alone

कॅमेरा : सॅमसंग गॅलेक्सी (एस ४) फोन

विशाल कुलकर्णी's picture

9 Feb 2015 - 10:53 am | विशाल कुलकर्णी

स्पर्धेसाठीची प्रवेशिका बदलता येइल का? असल्यास माझी वरील प्रवेशिका रद्द करून ही प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात यावी. फ्रीमँटलच्या बंदरावर अनपेक्षीतपणे सापडलेली शांतता..

fremantle

१. शांत्/अशांत समुद्र - एकच रिकामी खुर्ची - तुम्ही - सुर्यास्त :D

Image1

२. शांत असं तळं - सुर्यास्त - तुम्ही - सोबतीला कोणी असेल तर मजाच :P
Image1

स्पा's picture

2 Feb 2015 - 4:26 pm | स्पा

मस्तच रे प्रभ्या

अबोली२१५'s picture

3 Feb 2015 - 5:24 pm | अबोली२१५

tarkali beach

असंका's picture

3 Feb 2015 - 6:46 pm | असंका

साइज का कमी केली?

मगाची इमेज अंगावर येत होती. हीचा इफेक्ट आता नाही म्हणलं तरी जरा कमी झालाय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2015 - 7:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

इमेज स्क्रीनच्या बाहेर जात होती त्यामुले थोडी लहान केली आहे.

किसन शिंदे's picture

3 Feb 2015 - 5:36 pm | किसन शिंदे

1

गुहागरला बीचवरून दुर्गामाता मंदिरकडे जाताना वाडीच्या मधोमध असणारी ही पायवाट!! समुद्राची गाज, पक्ष्यांचा आवाज, आणि झाडांची सळसळ इथल्या शांततेला भंग करत होती.

असंका's picture

3 Feb 2015 - 6:38 pm | असंका

मेजवानी चालू आहे...

तारकरलीचा फोटो बघून सुट्टीची आठवण फारच तीव्र व्हायला लागलीये!!

विशाल कुलकर्णी's picture

3 Feb 2015 - 7:16 pm | विशाल कुलकर्णी

जबरी फ़ोटो आहेत एकेक !

यसवायजी's picture

3 Feb 2015 - 7:17 pm | यसवायजी

स्थळ- नॉयश्वानस्टाईन कॅसल, जर्मनी.

ही माहिती + जाहिरात-

१.
a

२.
b
३.
c

.

स्पा's picture

3 Feb 2015 - 7:58 pm | स्पा

पहिला फोटो.... विनर
संपलोय साफ

यसवायजी's picture

5 Feb 2015 - 7:56 pm | यसवायजी

ज्या कुठल्या संपादकांनी फोटोचा आकार वाढवून दिला त्यांना धन्यवाद. :)

असंका's picture

5 Feb 2015 - 8:44 pm | असंका

...आमचेही!!

सुंदर फोटो आहेत! पण तीन तीन का?

नियम नंतर वाचला. फ़क्त पहिला स्पर्धेसाठी मानला जावा.

गौरी लेले's picture

13 Feb 2015 - 2:53 pm | गौरी लेले

फारच सुंदर !!

प्रचेतस's picture

3 Feb 2015 - 8:25 pm | प्रचेतस

काय काय पाहिले ह्या जागेने
यादवांचे वैभवशाली साम्राज्य,
शिल्पसमृद्ध मंदिरे
औरंगजेबाची ४ लाखांची फौज
संभाजीराजांच्या दुर्दैवाचे दशावतार

आणि आज फक्त
वैराण, उजाड....शांतता........
पेडगावच्या भग्न बहादूरगडातून.

a

चिगो's picture

9 Feb 2015 - 1:38 pm | चिगो

खुपच बोलका फोटो, वल्ली.. तुम्ही लिहीलेल्या वर्णनाने सहज सुचलेल्या ओळी..

"भोगिले मी तारुण्य, वैभव
झेलले वार, पाहिली भ्रांत
आता भग्न, एकाकी मी
मज कुशीत इतिहासही क्लांत"..

अत्रुप्त आत्मा's picture

4 Feb 2015 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा

भार्गवराम मंदिर-देवाचं गोठणं.. , या ठिकाणी गेलेलो असताना.. माझा पुतण्या-चि.नील.. याला देवळाच्या प्रवेशद्वारातच... काका...ध्यानु ध्यानु'चा फोटो - म्हणून हुक्की आली. आणि मग तसाच(चपलांसह..) तिथे बैठक लाऊन बसला.. मग क्काय?.. येव्हढी शां...त पोझ दिल्यावर, क्यामेर्‍यानी क्लिकवले दोन..चार..
त्यातलाच हा एक .........
ध्यानस्थ-शांततेचा मूळ ध्वनी-असा निरागसपणे चेहेर्‍यावर उमटलेला!
.................................................शांति'नील..................................................................

https://lh6.googleusercontent.com/-yrRkwvUZ_Ls/VNEO-UVIviI/AAAAAAAAG5U/GVGgaxUpfbY/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B129.jpg

मुक्त विहारि's picture

4 Feb 2015 - 12:38 am | मुक्त विहारि

"ध्यानस्थ-शांततेचा मूळ ध्वनी-असा निरागसपणे चेहेर्‍यावर उमटलेला!"

सहमत...

स्वच्छंदी_मनोज's picture

6 Feb 2015 - 9:47 pm | स्वच्छंदी_मनोज

+१

गौरी लेले's picture

13 Feb 2015 - 2:55 pm | गौरी लेले

आहा .... कित्ती निरागस !

आतिवास's picture

4 Feb 2015 - 12:39 am | आतिवास

delhi

किती सुरेख आहेत एक एक फोटोज!!

श्रीरंग_जोशी's picture

4 Feb 2015 - 8:21 am | श्रीरंग_जोशी

सर्व प्रवेशिका एकाहून एक आहेत.

प्रमोद देर्देकर's picture

4 Feb 2015 - 9:00 am | प्रमोद देर्देकर

माझी अजुन एक प्रवेशिका :- डोंगराच्या कपारीतील नैसर्गिक गुहेजवळ असणारी शांतता.

1

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2015 - 2:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी मनात पहिला नंबर पकडला आहे. :)

-दिलीप बिरुटे

सविता००१'s picture

4 Feb 2015 - 3:11 pm | सविता००१

पण पहिला फार फार सुरेख.

मृत्युन्जय's picture

4 Feb 2015 - 3:18 pm | मृत्युन्जय

कमाल कमाल फोटो आहेत. नि:शब्द झालोय.

सौरभ उप्स's picture

4 Feb 2015 - 3:18 pm | सौरभ उप्स

1

स्पा's picture

4 Feb 2015 - 4:08 pm | स्पा

ओहो
भारीये :)

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2015 - 6:58 pm | टवाळ कार्टा

YAMAHA SZ-150???

स्पा's picture

13 Feb 2015 - 3:44 pm | स्पा

येस

सविता००१'s picture

9 Feb 2015 - 12:40 pm | सविता००१

मस्त फोटो.खल्लास

मृत्युन्जय's picture

4 Feb 2015 - 3:45 pm | मृत्युन्जय

एक प्रवेशिका आमचीही

Kashmir

पहलगामच्या गुलाबी थंडीतल्या सकाळी काढलेला हा फोटो. आजूबाजूला एकही घर नव्हते. हा एकाकी बंगला आणि नीरव शांतता. कमालीचे वातावरण होते ते.

चौकटराजा's picture

4 Feb 2015 - 5:18 pm | चौकटराजा

1

शांत या संध्यान्त काळी

रवीराज's picture

4 Feb 2015 - 9:40 pm | रवीराज

दिवेआगर येथील एका मंदिराच्या चौकटीतुन.
कॅमेरा- कोडॅक झेड डी ७१०
शटर स्पीड- १/६४५
आयएसओ- ६४
फोकल लेंग्थ- ६.३ एम एम
अपर्च्रर- एफ़ ४
पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट

Dive Agar

मोहन's picture

4 Feb 2015 - 9:56 pm | मोहन

गर्द निळा जलाशय त्यातून हिरव्या वनश्रीची पार्श्वभूमी लाभलेली. नि:शब्द शांतता ! अशा ठीकाणी काळ देखील थांबल्यागत वाटतो. (स्पर्धेसाठी नाही)

kerala

विनोद१८'s picture

4 Feb 2015 - 10:28 pm | विनोद१८

'दाल लेकवरची शांतता'

Foto1