" आईले विचारल म्या "

Sanjay Kokare's picture
Sanjay Kokare in जे न देखे रवी...
15 Jan 2015 - 5:34 pm

आईले विचारल म्या आपलीपरिस्थिती एवढी गरीब कौन असते?,
आईन सांगितल मलेआपनशेतकर्याच्या एथ जन्मलो म्हणुन हे भोगाव लागते !!!
आईले विचारल म्या लोक तं आपल्याले जगाचा पोशिंदा म्हणते,
आईनं सांगितले कारण त्याईच्या ईथची पोई आपल्या ईथचपिकते !!!
आईलाविचारल म्या त्या नेत्याच्या अंगावरले कपडेएवढे पांढरे कसेकाय असते,
आईने सांगितले कारण त्यांईच्या कपडाचा कापुस पणआपल्याच मिळते!!!
आईले विचारल म्या मग माया अंगावरचे कपडे कौन मयकलेअसते,
आईन सांगितले कारण तुया कपडाले कापुस कमी न् घामच जास्त असते!!
आईले विचारल म्या मलेशाळेमधुन मास्तर कौन हाकलुन लावते,
आईने सांगितल कारण आपल्याजवळ शाळेच्या फी न् कपड्याची सोय नसते!!!
आईलाविचारल म्या आये मग आपल्याजवळ पैसे कौन नसते,
आईन सांगितल मलेकारण आपल्या वाटणीचा हिस्सा हे पुढारी लोकच खाउन घेते!!!
आईले विचारल म्या कौन वर्गातले पोरं म्हले तुया बापान आत्महत्या केली असम्हणते,
आईने सांगितले मलेकारण तुया बापान शेती करुनदुसर्याच पोट भरल असते!!!.....
........................................................
........................................................
कवी.............
संजयरा. कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
Facebook: Www.facebook.com/sanjaykokare

वाङ्मयशेतीकविता

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

15 Jan 2015 - 9:24 pm | प्रसाद गोडबोले

मी काय म्हणतो ... स्वतंत्र विदर्भ देवुन टाकाच राव =))))

hitesh's picture

16 Jan 2015 - 9:09 am | hitesh

जागतिकीकरण : देश कशाला हवा ? आसा त्यानी दुसरा धागाही काढलाय.

मग त्याना पुन्हा स्वतंत्र विदर्भ कशाला देताय ?

Sanjay Kokare's picture

15 Jan 2015 - 9:31 pm | Sanjay Kokare

पण कशासाठी

संदीप डांगे's picture

15 Jan 2015 - 10:51 pm | संदीप डांगे

तुमाले वऱ्हाडी लिवाचं अशीन तं जरासक ते सुद्दलेकन बी पावून गिउन घेत जा. अथि आंदीच कोनाले बर्बर म्हाईत नस्ते, त्यात तुमी असं लीवसान तं कसं ज्यमीन भौ?

अथि आंदीच कोनाले बर्बर म्हाईत नस्ते,

हे बाकी येक्दम खरं हां!

http://en.wikipedia.org/wiki/Berber_languages

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 4:27 pm | प्रचेतस

कुणाला कशाचं तर बाट्याला बर्बरांचं.

मला नाय बा. त्यांनी उल्लेख केला म्हणून आलो.

तदुपरि बर्बर ऐवजी बर्बरीक हा उल्लेख असता तर ;)

संदीप डांगे's picture

16 Jan 2015 - 9:20 pm | संदीप डांगे

तुमच्या कमेंट्स आमच्या डोक्यावरून गेल्या आहेत, कारण आमची गुडघ्यात असते ना म्हणून…

जर इस्कटून सांगाल काय तुमचा पोईण्ट म्हणजे जरासक आमीबी हासु :-)

कविते मध्ये शुद्धलेखन कस करणार भौ

विशाल कुलकर्णी's picture

27 Jan 2015 - 4:39 pm | विशाल कुलकर्णी

कविते मध्ये शुद्धलेखन कस करणार भौ

मी राहून राहून या प्रश्नाचा विचार करतोय. कविला नक्की काय म्हणायचय तेच कळत नाहीये. म्हणजे शुद्धलेखन कसे करायचे? की 'कवितेत शुद्धलेखन कसे करायचे? की 'कवितेत आणि शुद्धलेखन? की 'शुद्धलेखन (?)

नक्की काय , म्हणायचय तरी काय तुम्हाला ?

स्वारी सर मी दिलेल्या स्पेस माझ्या ब्लाग वरुन ईथे पेस्ट करता डिलेट झाल्या वाटत

सतिश गावडे's picture

15 Jan 2015 - 11:15 pm | सतिश गावडे

काय जिलब्या पाडू र्‍हायला बे पोट्टया. थंड घे ना बे. आनि ते कवितेच्या खाली नाव गाव पत्ता इमेल फोन नंबर कशाले लागते?

संदीप डांगे's picture

15 Jan 2015 - 11:31 pm | संदीप डांगे

कवी संमेलन भरल्याचा फील यिउन ऱ्हायला येकदम

नाखु's picture

16 Jan 2015 - 9:59 am | नाखु

कवीतेचा आशय विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे . पहिली गोष्ट म्हणजे कवीतेखाली नाव वेळ संपर्क इ. देऊ नका (आधिच्या "पूर्वसूरींनी" आपली साहित्यकला प्रसार्/प्रचार साठी याच मार्गांचा अवलंब केला त्यामुळे सहवेदना जाऊन फक्त वेदना उरली.) उगा त्यांच्याशी स्पर्धा का करता? :-\ *boredom* *TIRED* |-0 :boredom:

निषाणी डावा अंगठा* मधील
मोहन आगाशे *beee* :-\
(आम्ही शेतीत अंगठे बहाद्दर आहोत असे जाणकारांचे प्रशस्ती पत्रक प्राप्त)

Sanjay Kokare's picture

16 Jan 2015 - 10:08 am | Sanjay Kokare

okkk

खटपट्या's picture

15 Jan 2015 - 11:17 pm | खटपट्या

चांगलीय !!

प्रमोद देर्देकर's picture

16 Jan 2015 - 8:33 am | प्रमोद देर्देकर

आवडली.

गणेशा's picture

16 Jan 2015 - 4:07 pm | गणेशा

कविता अतिशय छान आहे,

भाषा कुठली हे माहीती नाही पण वर्हाडी भाषा आहे का ?
आपल्या स्वताच्या भाषेचा फिल खरेच खुप छान असतो..
शिवाय ऐरणी -- खानदेशी वर्हाडी भाषा वाचायला खरेच खुप छान वाटती.

कवितेतला मतीत अर्थ खुप छान आहे.. तरी पण मांडणी थोदी सुट्टी सुट्टी करता येइल काय ?

उदा.

(मी माझ्या भाषेत लिहितोय, तुमची भाषा येत नाही मला)

आई ? का ग आपण गरीब ?
आपलं बी रगात लालच असतय नव्ह ?
कधी भरल ग आपल पोटाच खळगं
का आपल्याच घामाच्या सदर्‍याला शंभर ठिगळं ?

माझा काळाकुट्ट बा
आपल्याच गहान कापसाच्या शेतात राबतोय
विनतोय आपला संसार दिसंदिस
पांढर्‍या फेक सदर्‍यातल्या मालकास
कवा कळतील हे आपल दिस ?

का ग आई ? सांगना ?

आता हे योग्य आहे असे मी म्हणत नाही, पण वाचक म्हणुन प्रत्येक वेळेस आई म्हणाली, आणि मुलगा म्हणाला हे काव्यात योग्य वाटत नाही ते गद्यात छान वाटते.

बाकी भाषा आणि कविता दोन्ही आवडली आपली.

Sanjay Kokare's picture

16 Jan 2015 - 4:52 pm | Sanjay Kokare

okkk sir

रघुपती.राज's picture

16 Jan 2015 - 9:04 pm | रघुपती.राज

छान

भाकरी's picture

16 Jan 2015 - 9:21 pm | भाकरी

चेतन सुभाष गुगळे आठवले!!

माझा मिच's picture

27 Jan 2015 - 4:31 pm | माझा मिच

सुरेख