पुण्यनगरीजवळचे भिगवण येथील पक्षीतिर्थ आणि भुलेश्वर या शिल्पसृष्टी विषयी बरेच ऐकून होतो. माझा आवडीचा विषय असल्याने "काय अजून तिथे गेला नाहीत?" अशी सारखी विचारणा व्हायची. मागच्या महिन्यात रेल्वे रेज॰ न मिळाल्याने हुकमी एक्का, चौकटराजा, सावंतकाकांसोबत भिगवणला जायची नामी संधी या बिनहुकमाच्या किलवरच्या दुर्रीची हुकली.
उरुळीकांचन येथे एका गांधीवादी संस्थेचे निसर्गोपचार केंद्र आहे. त्याविषयीचीही माहिती काढायची होती. ही तिन्ही ठिकाणे पुणे सोलापूर रस्त्यावर शंभरेक किमीच्या अंतरात आहेत. पुण्यातून इथे एका दिवसात {स्वत:च्या वाहनाने} जाऊन येणे सोपे असलेतरी मुंबईकडून येणाऱ्यांस आवाक्यात/परवडणारे/शक्य नाही त्यामुळे जाणे झाले नव्हते. पक्षांच्या फोटोंसाठी लागणारा ४००एमेम लेन्सवाला कैमरा नसल्याने केवळ भिगवण काय चीज आहे हे पाहण्याचाच उद्देश होता.
भुलेश्वराच्या दर्पणसुंदऱ्या {स्वप्नात येऊन} विचारत होत्या "काय येणार ना आम्हाला पाहायला ?""उरुळीची माहिती काढून आणा"ची घरून होणारी विचारणा'ला शेवटी 'आली अंगावर घेतलं शिंगावर', 'आलीया भोगासी असावे सादर' या उक्तींप्रमाणे रेल्वेचे तिकिट[ ठाणे (२३.३०)ते भिगवण(०६.२०सकाळी) स्लीपर ट्रेन नँ ५१०२९ पैसेंजर)काढून मोकळा झालो.परतीचे काढले [याच गाडीचे ५१०३०उरुळी(रात्री १०.०० ठाणे (पहाटे ४.००) ]येण्यासाठी पुणेमार्गे बसनेही येण्याचा पर्याय ठेवलाच होता. उशीर झाल्यास ट्रेनचे तिकीट हाताशी होतेच.
काल गेलो होतो.तुमच्या काय अपेक्षा आहेत ते आणि वेगळे फोटो {असलेतर}टाकून लेख लिहिणार आहे. माहिती अगोदर वल्लीने दिली आहेच. उगाच वाचकांस भुलेश्वराचे अजीर्ण नको.
वल्ली यांचा धागा इथेआहे
नांदेडिअन यांचा धागा इथेआहे
पक्षांचे सुंदर फोटो जयंतराव, हुकमीएक्का यांच्या कलादालन विभागात आहेतच. उरुळी निसर्गोपचार केंद्राचेही पत्रक आणले आहे.
ठाण्याहून सोमवारी रात्री साडेअकराला बीजापूर गाडी धरली. पहाटे पाचला दीडदोनशे सिंधीसमाजाचे लोक उरुळीला उतरलेले पाहून इथे काय आहे ते नंतर कळेल असा विचार करत साडेसहाला भिगवणास उतरलो. चहावाल्याच्या सल्ल्याने पटकन बाहेर पडून शेअर रिक्षाने ३ किमीवरच्या इंदापूर चौफुला या पुणे-सोलापूर रस्त्यावरच्या नाक्याकडे निघालो.थंडी चांगलीच होती. पाचच मिनीटात ऑंङ ऑँङ आवाज आला म्हणून वर पाहिले. काळे शराटी होते. डोक्यावरून पंधरा फुटांवर उघड्या चोचीचे, राखी, बगळे ,रोहित उडत होते. लगेच रस्त्याकडेच पाण्यावर दाट धुके आणि असंख्य बदके दिसली. आलो की पंढरीत. इतक्या सकाळीच भिगवण फत्ते झाले की.
ईंदापूर चौफुला येथे असे कळले की कुंभारगाव पाच किमी पुढे हाइवेने जाऊन नंतर आणखी पाच किमी डावीकडे आत आहे आणि स्पे रिक्षा (रु २००)करावी लागेल अथवा नऊ वाजता बस आहे.सवासात वाजले होते "आता तुम्ही येताना पक्षी पाहिलेत ते तिकडेही कुंभारगावला आहेत की"हा मोलाचा सल्ला मानून लगेच कुंभारगाव रहीत केले आणि पुलावर पुण्याची बस पकडून यवतला जाण्यासाठी उभा राहिलो.एका ट्रकमधून यवतकडे प्रवास सुरू झाला. पुणे १००किमीची पाटी दिसली. थोड्या वेळाने 'बगळ्यांची ही माळ दिसे' शंभरेक पाणकावळ्यांची माळ वेगवेगळी रचना करत पुण्याच्या दिशेनेच(!) उडत होती. हे दृष्य बराच वेळ पाहण्यास मिळाले कारणकी ट्रकच्याच साठ किमी वेगाने तेही पुण्याकडेच जात होते. डोळे भरून पाहणे झाले (दुसरं काय करणार?).
यवत नाक्यास (पुणे ४४किमी)साडे आठला आलो. प्रथम वडापाव चहा घेऊन पोटोबा थंड केला. रस्त्यावरूनच डोंगरावरचे भुलेश्वर दिसते. अंतर फार नाही (९किमी )परंतू या यवत -माळशिरस- सासवड/ जेजुरी मार्गावर बस कमी(चारच) आहेत.दहाची बस मिळून वीस मिनिटांत भुलेश्वरफाट्याला आलो. पंधरा मिनिटांत सूनसान परंतू मोकळ्या हवेत चालत देवळात पोहोचलो.टेकड्यांवर पसरलेल्या घायपात आणि बाभळींच्या रानटी झाडांत एका उंच ठिकाणचे हे वेगळेच घडणीचे मोठे देऊळ लक्ष वेधते.बाहेरून किल्ल्यासारखे साधे दगडी बांधकाम आहे पण आतल्या अंधारात खूप सुंदर कोरीव मूर्ती आहेत (होत्या).त्यांचे थोडे फोटो काढून बससाठी फाट्यावर बारा वाजता आलो.दीड वाजता एका टेंपोने परत यवतला आलो.
पुण्याच्या बसने उरुळीला येऊन रेल्वे स्टेशन(चालत दहा मिनिटे)जवळच्या आश्रमरोडच्या 'निसर्गोपचार आश्रमा'त पोहोचलो त्यावेळी अडीच वाजले. माहितीपत्रक मिळाले.
निसर्गोपचार ग्रामसुधार ट्रस्ट उरुळीकांचन पुणे ४१२२०२ फोन 02026926230
02026926298
Email : nisargopchar@live.com
nisargopchar@gmail.com
website : http://www.nisargopcharashram.org
अ)
या पत्रकाच्या फोटोची लिँक इथे आहे.
ब)
या पत्रकाच्या फोटोची लिँक इथे आहे.
क)
या पत्रकाच्या फोटोची लिँक इथे आहे.
येथून रे स्टे पाच मिनीटांवर आहे. सिंधीलोकांचा प्रयागधाम आश्रम{जुना} स्टेसमोरच आहे. नवीन दहा किमीवर उत्तरेस आहे. तिथे संक्रातिनिमित्त धार्मिक कार्यक्रम चालू होते त्यासाठीच सकाळी बरेचजण उतरले होते. १०ते २६ जानेवारीपर्यँत सर्व एक्सप्रेस गाड्या विशेषरुपाने उरुळीला थांबणार होत्या. त्यामुळे मला ईंद्रायणीचे तिकिट मिळाले आणि रात्री दहाला आरामात घरी पोहोचलो.
-*--*--*-
प्रतिसादातले फोटो दिसत नाहीत म्हणून ते इथे देत आहे.
थोडे फोटो
१)रस्ता
२)द्वारपाल जय
३)जवळून
४)रति-मदन?
५)दर्पणसुंदरी
६)मदनिका
७)यक्ष
उरुळी कांचन आश्रमाची माहितीपत्रके
१)
२)
३)
आणखी फोटो
८)मुकुटात मुंडकी धारणकर्ता उजवीकडचा शैव द्वारपाल
९)उजवीकडचा शैव द्वारपाल
१०)प्रवेश कमानी
११)हा राजचिन्ह प्राणी लखुंडी येथेही आहे हत्तीची सोंड, मकराचे तोंड, सिंहाचे शरीर, मोराचे शेपुट
१२)मिशीवाला यक्ष कोण ?
१३)विषकन्या ?
१४)मदनिका
प्रतिक्रिया
14 Jan 2015 - 5:54 pm | गणेशा
उरुळी कांचन ची माहीती हवी असल्यास मी देवु शकेन. १९८५ ते २००९ पर्यंत मी उरुळी कांचन ला राहत होतो, अजुनही माझे घर तेथे आहे.
निसर्गोपचार आश्रम छान आहे, पुर्वी खुप गर्दी असायची आजकाल मंदावली आहे, परंतु एकदम छान संस्था आहे. स्थापणा विनोबा भावे यांनी केली आहे ह्या संस्थेची.
त्यावेळी माझ्या वर्गमित्राचे वडील तेथे दॉक्टर होते. आता ही एक मित्र त्या संस्थेत कामाला आहे बहुतेक.
14 Jan 2015 - 10:14 pm | कंजूस
थोडे फोटो
१)रस्ता
२)द्वारपाल जय
३)जवळून
४)रति-मदन?
५)दर्पणसुंदरी
६)मदनिका
७)यक्ष
15 Jan 2015 - 2:45 pm | कंजूस
उरुळी कांचन आश्रमाची माहितीपत्रके
१)
२)
३)
14 Jan 2015 - 6:45 pm | प्रचेतस
ते जय विजय नसून शैव द्वारपाल आहेत.
रतीमदन नसून राम लक्ष्मण सीता आहेत. ह्याचे दोन पट योग्य त्या जागेवर नाहीत. मारीच वधाचा प्रसंग जीर्णोद्धाराचे वेळी नंदीमंडपाच्या उजवे बाजूच्या छतावर चुकीच्या ठिकाणी लावला गेला आहे. अजून एका प्रसंगाचा तुम्ही फोटोत दाखवलेला इतकाच तुकडा शिल्लक असून तो बाहेर पायर्यांच्या बाजूला स्थापित केला आहे.
६ व्या क्रमांकाची मदनिका ही सुरसुंदरी सिंदूररेखिता आहे,
15 Jan 2015 - 1:50 am | मुक्त विहारि
छान प्रवासवर्णन...
15 Jan 2015 - 6:31 am | कंजूस
आणखी फोटो
८)मुकुटात मुंडकी धारणकर्ता उजवीकडचा शैव द्वारपाल
९)उजवीकडचा शैव द्वारपाल
१०)प्रवेश कमानी
११)हा राजचिन्ह प्राणी लखुंडी येथेही आहे हत्तीची सोंड, मकराचे तोंड, सिंहाचे शरीर, मोराचे शेपुट
१२)मिशीवाला यक्ष कोण ?
१३)विषकन्या ?
१४)मदनिका
15 Jan 2015 - 10:35 am | अत्रुप्त आत्मा
मस्स्स्स्त! :)
4 Feb 2015 - 5:11 pm | कंजूस
धन्यवाद
4 Feb 2015 - 5:19 pm | जेपी
आवडल.
अवांपर-किती फिरता तुम्ही.
आमाला लाज वाटली पायजे .
इथुन पंधारा किमीवर एक किल्ला आहे आणी जन्मल्यापासुन गेलो नाही.