१५ फेब्रुवारी, मिपा संमेलन...कशेळी, कर्जत

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
1 Jan 2015 - 1:34 pm

मिपाकरांनो,

प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818)

ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे.

पुण्याहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा.

मुंबईहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा.

ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत.

मी आणि आम्ही काही मिपाकर १४ता. रात्री पासूनच संमेलनाच्या ठिकाणी असूच.

नविन वर्षाच्या सुट्ट्या हातात असल्याने आणि बरेच दिवस म्हणजे तब्बल ४५ दिवस आधीच कल्पना दिल्याने, आरक्षण आणि प्लॅनिंग करायला जड जायला नको.

आता माझा ह्या धाग्याशी संबंध संपला.

तरीपण काही मदत लागली तर अवश्य कळवा.

अरे हां..महत्वाची गोष्ट......

प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे.

ठिकाण :वनविहार ,
ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात.
काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला).
प्रवेश फी :नाही.
जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज).
पार्किँग :भरपूर.
राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु.
संपर्क 9226093034 शिवाजी
0214683313
जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार.
पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल.
पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल.
मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत.
कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता.
राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे.
कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.

मौजमजामाहिती

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

9 Jan 2015 - 1:26 pm | मुक्त विहारि

मस्तच..

रविवारी सकाळी शक्यतो बाईक ने येण्याचा विचार आहे, जर बरेच जन असतील आणि ते ट्रेन ने जाणार असतील सकाळी तर त्यांच्याबरोबर पण येईन.

आमचे परम मित्र .. अआ आणि वल्लीशेट आदल्यादिवशी जात असल्याने आम्ही एकटे पडलो आहे.. कोण आहे काय सकाळच्याला जाणारे.

हर्षद दिसत नाही रे आजकाल येथे

टवाळ कार्टा's picture

9 Jan 2015 - 2:37 pm | टवाळ कार्टा

कोण आहे काय सकाळच्याला जाणारे. >> =))

अात्तापर्यंत आलेली नावे
मुवि सहकुटुंब
विनोद १८सहकुटुंब
भाते
समिर२०
डाॅ खरे सहकुटुंब
मापं
कंजूस
नुलकर कुटुंब
वल्ली
सगा
बुवा
गणेशा
अभ्या दोघे
बोका ए आझम
बाहरीनचा खलिफा
अन्या दातार
कॅप्टन जॅक स्पॅरो उर्फ वर लिहिलेले नाव!
चौरा काका
विजूभाऊ
सुहास झेले
टका
पिंगु
इस्पिकचा एक्का
द रामदास काका
स्वच्छंदी मनोज
पैसा ताई
अजया
इनिगोय
मनिमौ
सुचेता

टवाळ कार्टा's picture

10 Jan 2015 - 11:22 am | टवाळ कार्टा

रात्रकट्ट्याला असणारे आणि नसणारे अश्या २ याद्या बनवल्या तर बरे

..रात्रकट्ट्याला बसणारे आणि न बसणारे असं म्हणायचंय काय?

टवाळ कार्टा's picture

18 Jan 2015 - 2:57 pm | टवाळ कार्टा

हे रात्रकट्ट्याला असणार्यांच्या मधले २ प्रकार असू शकतात :)

मुक्त विहारि's picture

18 Jan 2015 - 10:52 pm | मुक्त विहारि

५ ओप्शन्स आहेत.

१. पक्षी-तीर्थ वाले,

२. पक्षी वाले

३. तीर्थ वाले.

४. फक्त शाकाहारी.

५. शनिवार असल्याने उपास करणारे.

थोडक्यात सगळ्यांचे स्वागत आहे.

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 9:41 am | टवाळ कार्टा

खिक्क...

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 9:42 am | टवाळ कार्टा

"शनिवार असल्याने उपास करणारे" म्हणजे "बुवाबाजी" कर्णारे काय? ;)

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Jan 2015 - 3:45 pm | माम्लेदारचा पन्खा

क्रूप्या णोंद घ्यावी....

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 4:02 pm | टवाळ कार्टा

म्हणजे सहकुटुंब असल्यामुळे शनिवारचा उपवास??? =))

चौकटराजा's picture

18 Jan 2015 - 11:50 am | चौकटराजा

पुण्याहून म्हण्जे त्यात सोलापूरकर( हे येणारेत ), इचलकरंजीकर ( हे आले तर) व पुण्याचे असे सगळे धरावे. तसेच कल्याण बाजूने येणारे त्यात कांदिवली , डोबूली सगळे. त्यातून दोन्ही गटातील रात्रीचे शिलेदार वजा करून यादी प्रसिद्ध करावी.म्हणजे ई ए नी म्हटल्या प्रमाणे १६ सीटर अशी काही गाडी पुण्याहूने आमच्या चिंचवड मार्गे १५/२ ला सकाळी आणता आली तर बरे ! रेलेवे पेक्षा खचे वाढेल पण पुढचा मेगा कट्टा २०१६ त असे मुविकडून अ‍ॅफेडेव्हिट घेउ !

मुक्त विहारि's picture

18 Jan 2015 - 12:20 pm | मुक्त विहारि

चालेल की...

अजून नावं आली की वेगळ्या याद्या करु.

सुबोध खरे's picture

11 Jan 2015 - 12:32 am | सुबोध खरे

कट्ट्याला येणार नक्की. पण कसं यायचं ते ठरत नाहीये. आदल्या रात्री यायचं तर दुकान बंद करायला उशीर झाला तर काय?
आणि सकाळी यायचं तर उठायला उशीर झाला तर?
रेल्वेनी, मोटार सायकलने कि कारने ते समजत नाहीये फार दिवस विचार करून डोक्याचा भुगा झाला. .
रेल्वे ने हात हलवत येता येईल. पण नेरळ पासून कशेळी पर्यंत आणि परत लळत लोंबत यायला लागेल
मोटार सायकलने बेस्ट आहे पण बायको कटकट करेल आणि क्यामेरा गळ्यात पडतो
कार- चालवायचा कंटाळा येतो
कोणता पर्याय सर्वात चांगला आहे तेच कळत नाही

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jan 2015 - 12:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या सोईच्या दिवशी व वेळेला तेथे येणारा दुसरा चारचाकीवाला गाठा ! हाकानाका !!

(इ-कॅब हा जरा खार्चिक पर्यायही आहे. ;) :) )

: इ ए फुक्टेअड्वायजर

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jan 2015 - 7:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

आठ-दहा जण जमले तर बराच आरामदायक आणि फारसा खार्चिक नसलेला खाजगी गाडीचा पर्यायही शक्य आहे.

टवाळ कार्टा's picture

11 Jan 2015 - 12:15 pm | टवाळ कार्टा

माझ्याबरोबर बाईकवरून येणार का? किंवा मी ट्रेनने सुध्धा येईन...चालेल मला

माम्लेदारचा पन्खा's picture

11 Jan 2015 - 7:33 pm | माम्लेदारचा पन्खा

कसं ते ठरायचय... आपण बरेच जण असलो तर वाहन परवडेल की !

टवाळ कार्टा's picture

11 Jan 2015 - 9:29 pm | टवाळ कार्टा

मला हे सुध्धा चालेल :)

विजुभाऊ's picture

14 Jan 2015 - 3:01 pm | विजुभाऊ

डाक्टरसाहेब चिंता नका करु. तुम्हाला उचलायची ( पिक अप करायची ) व्यवस्था करेन

सस्नेह's picture

14 Jan 2015 - 3:52 pm | सस्नेह

सुपारी घेता का 'उचलायची' ? लै जण टपलेत !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Jan 2015 - 1:31 am | निनाद मुक्काम प...

ह्या कट्ट्याला विशेषतः मूवी ह्यांच्या भेटी न घेता येण्यामुळे प्रचंड मिस करणार आहे.

इनोवो सारखी गाडी बुक करून एकत्र हसत खेळत गंमत जमंत करत जाण्याचा पर्याय खूप आवडला.
कट्याचे लाइव अपडेट सचित्र देत राहणे

अनुप ढेरे's picture

11 Jan 2015 - 12:04 pm | अनुप ढेरे

१५ फेब्रुवारीला वल्ड-कप मधली भारत पाकिस्तान मॅच आहे हे माहितीये का पब्लिकला?

टवाळ कार्टा's picture

11 Jan 2015 - 12:17 pm | टवाळ कार्टा

हैला
तिकडे टिव्हीची सोय आहे का बघायला हवे

मुक्त विहारि's picture

11 Jan 2015 - 5:07 pm | मुक्त विहारि

आणि

मोबाइलवर लाइव्ह मॅच बघता येते.

हिंदूस्थान जिंकला तर आनंदी आनंद आणि हरला तरी मिपाकर नक्कीच जिंकणार.

टवाळ कार्टा's picture

11 Jan 2015 - 9:30 pm | टवाळ कार्टा

आणि तिकडेच हमरी तुमरी झाली तर? ;)

मोबाइलवर लाइव्ह मॅच बघता येते.

पण नेटवर्क जाऊ शकतं, लोडशेडिंग होऊ शकतं, ३ग ऐवजी फक्त २ग च मिळू शकतं....काऽऽहीऽऽही होऊ शकतं!! वेंजॉय लोक्स !! *mosking*

मुक्त विहारि's picture

12 Jan 2015 - 4:39 pm | मुक्त विहारि

मिपा संमेलन हे होणारच....

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 2:29 pm | बॅटमॅन

दु. दु. सूड =)) =)) =))

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Jan 2015 - 4:33 pm | निनाद मुक्काम प...

दुख्खात आनंद शोधतो तो खरा डोंबिवलीकर

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Jan 2015 - 9:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी येतोय. पण आदल्या दिवशी येणं शक्य नाही. सो १५ ला येईन.

(अनिरुद्ध दातार)

णोटीसः

अनिरुद्ध (अन्या) दातार (मुळं गावः कोल्हापुर सद्ध्या मुक्काम निगडी प्राधिकरण) आणि मी अनिरुद्ध (अंड्या) दातार (निगडी प्राधिकरण बाय बर्थ) ह्या वेगवेगळ्या व्यक्ती असुन एकमेकांना भेटलेलो आहोत. त्याला माझा किंवा मला त्याचा डु-आयडी समजल्यास मि.पा. कलम ४२० अन्वये मिसळपाव पार्टी वसुल केली जाईल तसेचं खिसा रिकामा होईपर्यंत कोल्ड कॉफी प्यायली जैल. तस्मात दोन वेगवेगळ्या व्यक्ती मोजल्या जाव्यात ही णम्र विणंती. =))

आपलाच विणम्र
(अनिरुद्ध (अंड्या) दातार)

टवाळ कार्टा's picture

11 Jan 2015 - 9:49 pm | टवाळ कार्टा

=))

नाखु's picture

13 Jan 2015 - 2:36 pm | नाखु

मी एकालाच भेटलो असल्याने मला साक्षीसाठी कॉफीपानास हजर राहण्याचा ह्क्क (माझा कायदा कलम ९अ पोट्कलम ६ब सुधारीत दि ११.१.२०१५) आपोआप प्राप्त झाला आहे हे सविनय नमूद करतो.

कॉफीचा साक्षीदार
मु.पो.चिंचवड.
तळटीपःचिंचवड संपादकांशी आम्ची जान्-पैचान आहे याची नोंद घ्यावी.

चिंचवड संपादकांशी आम्ची जान्-पैचान आहे याची नोंद घ्यावी.

बरं मग??

नाखु's picture

13 Jan 2015 - 2:45 pm | नाखु

कुठला?

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2015 - 3:15 pm | टवाळ कार्टा

आणि छुपा / उघड, आजी / भावी हे सुध्धा सांगावे ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2015 - 3:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

कॉफीचा मग नाय तो ! +D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jan 2015 - 7:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तो मी नव्हेचं!!

पिं.चिं. च्या संपादकांची आणि आमची अजुन थेट ओळख नाही...फक्त लिखाण-वाचनातुन ओळख आहे. तस्मात कॉफीपानास त्यांनाही आमंत्रण द्यावे लागेल असं उपकलम ९अ पोटकलम खादाडी-पिदाडी विभाग ८च आहे. =))

(लखोबा लोखंडेचा आणि प्रभाकर पणशीकरांचा पंखा) अनिरुद्ध दातार, प्राधिकरण.

अन्या दातार's picture

13 Jan 2015 - 3:27 pm | अन्या दातार

वर अजयातैंनी दिलेली लिस्ट वाचून तिथेच उपप्रतिसाद द्यायचे डोक्यात आले होते. पण इथे अंड्या दाताराने खुलासा (तोही दंविसं कलमासह) वाचून त्यास कचकून अनुमोदन देत आहे.

टीप - वरील खुलाश्यावर शंका घेतल्यास वेगळी पार्टी वसूलण्यात येईल याची संबंधितांनी दखल घ्यावी ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jan 2015 - 6:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

झॅक रे भावा!!! =))

होऊ दे खर्च, मिपा आहे घरचं!!!! =))

द्विंस कलम =))

पैसा's picture

13 Jan 2015 - 10:53 pm | पैसा

मी हल्लीच गोंधळले तुमच्या दोघांत. फोनवर बोलताना कोल्लापूरकर अन्या का 'कप्तान चिमणराव' हे पटकन समजलं नाही! मग चिंचवडकर संपादकाकडून खात्री करून घेतली. मात्र तेव्हा 'चिमणराव' पण निगडीकर हे माहीत नव्हतं. नाहीतर अजून कन्फूजन!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jan 2015 - 10:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चिमणराव नै ओ तै...जॅक स्पॅरो "अंड्या" पिं.चिं.कर. =))

चिमणराव नको रे बाप्पा, ती कौ मागे लागायची. ;)

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2015 - 10:14 am | टवाळ कार्टा

"अंड्या" पिं.चिं.कर. =>>> =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Jan 2015 - 9:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सुट्टीची सोय झाल्यास आदल्या दिवशीही येउ शकीन :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jan 2015 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनःपुर्वक शुभेच्छा. :)

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

12 Jan 2015 - 7:52 pm | टवाळ कार्टा

ठाण्यातून / ठाण्याजवळून येणार्यांनी मला व्यनी करावा (सोबत स्वताचे वाहन असल्यास तेसुध्धा सांगा)
जमले तर सगळे एकत्र जाउ

दिनेश सायगल's picture

13 Jan 2015 - 3:39 pm | दिनेश सायगल

तुमच्यासोबत विनोद पण असणार आहेत काय?

सूड's picture

13 Jan 2015 - 4:05 pm | सूड

=))))

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2015 - 4:19 pm | टवाळ कार्टा

तुम्हाला लागणार असेल / करमत नसेल तर त्याची सुध्धा व्यवस्था करायची का? :)

दिनेश सायगल's picture

13 Jan 2015 - 4:25 pm | दिनेश सायगल

नाही, ते फक्त तुम्हालाच लागतात असे ऐकले आहे.
मी फक्त कूतूहलापोटी विचारले.

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2015 - 4:55 pm | टवाळ कार्टा

तुम्ही अनहितांचा ड्वैडी काय? नै...त्यांची क्यॅसेट पुढे जातच नाही

अनाहितांचं नाव काढलंस? आता कर्माने मेलास !! =))

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2015 - 8:52 pm | टवाळ कार्टा

मग घाबर्तो थोडीच

पैसा's picture

13 Jan 2015 - 9:30 pm | पैसा

तुझ्या मदतीने अनाहितांचे धागे शतकी द्विशतकी होतात! आम्ही बाबा टकाचे फ्यान.

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2015 - 9:55 pm | टवाळ कार्टा

"बाबा टका" नाही फक्त "टका"...नाहीतर मलापण "ह.भ.प." पदवी मिळेल
:)

अनुप ढेरे's picture

13 Jan 2015 - 9:23 pm | अनुप ढेरे

ते फक्त तुम्हालाच लागतात असे ऐकले आहे.

=))
अश्लील अश्लील!!!

..इतके लोक तीन खोल्यांत कसे मावणार?

भाते's picture

13 Jan 2015 - 8:44 pm | भाते

इतके प्रतिसाद! इतके मिपाकर या मिपा संमेलनाला येणार आहेत?

चक्क स्पेशल "26" ... (घारापुरी कट्टा!) पेक्षा जास्त! लई भारी!
कोण त्या कुठल्यातरी चेंडुफळी खेळाचा ऊल्लेख करतो आहे? (कृ.ह.घ्या.) तो चेंडुफळीचा खेळ आपल्याला तुनळी वर नंतर केव्हाही आणि कितीही वेळा बघता येईल ना!
साक्षात कट्टा नियोजन अधिकारी आपल्याबरोबर असल्यावर आपण सगळे जण त्यापेक्षा नक्कीच जास्त मज्जा करू. कट्टा वृत्तांत, मिपाकरांचे (आणि खादाडीचे सुध्दा!) फोटो टाकुन कट्टयाला न आलेल्या / न येऊ शकलेल्या समस्त मिपाकरांना इनो घ्यायला लाऊ.

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2015 - 9:25 pm | टवाळ कार्टा

१००

नका रे आता जास्त चर्चा करू, वैट वाट्टं.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2015 - 2:20 am | मुक्त विहारि

एक २-४ कट्टे करू...

कशेळे वनविहार कट्ट्याला रस्त्याने येण्यासाठी मार्ग

१)मुंबईकडून
दादर.. चेंबूर.. वाशी ..सीबिडी ..पनवेल.. पळस्पे ..{खोपोली रस्त्याने}.. अंबानी हॉस्पिटल .. कर्जतफाट्याला डावीकडे वळणे पुढे  प्रमाणे

२)पुण्याकडून
पुणे ..लोणावळा ..घाट उतरणे ..आडोशी बोगद्यानंतर एक्सप्रेसवे सोडून डावीकडचा खोपोली रस्ता घेणे.. खाली खालापूर नाका ..{पनवेल रस्त्याने} ..कर्जतफाट्याला उजवीकडे वळणे ..पुढे  प्रमाणे

 कर्जत रोडने ..एन डी स्ट्युडिओ ..कर्जत रेल्वे ओवरब्रिजने पलिकडे ..आमराई नाका ..डावीकडे नदीपूल ओलांडून.. परत डावीकडे.. {कशेळे- कडाव- मुरबाड रोडने}.. कडाव गणपतिचे गाव.. कशेळे ..उजवीकडे {जामरुघ रस्त्याने} ..कोटिंबे अनिरुद्धबापूंचा मठ आंबिवली ..{डावीकडचा टेंभरे फाटा सोडून पुढे सरळ पाचशे मिटर्सवर}@वनविहार.

३) कल्याण डोंबिवलीकडून

{शिळफाटा रस्त्याने} काटई नाक्याअगोदर डावीकडे ..{पाईपलाईन रोडने} अंबरनाथ एमआइडिसी ..बदलापूर ..{बदलापूर नेरळ रस्त्याने} नेरळ ..फाटक रे क्रॉसिँग करून ..{कशेळे रस्त्याने} कशेळे ..{जामरुघ रस्त्याने} आंबिवली ..@वनविहार.

कंजूस's picture

16 Jan 2015 - 8:28 pm | कंजूस

४)अलिबाग/पेणकडून

पेण-पनवेल रस्त्याने ..खारपाडा.. खाडी ओलांडल्यावर.. जिते.. आपटेफाट्याला उजवीकडे वळा.. आपटा ,आपटा रे॰ स्टे॰.. रसायनी रे॰ स्टे॰.. उजवीकडे वळून.. मोहापाडा ..दांडफाटा ..{पनवेल-खोपोली रस्त्याने उजवीकडे खोपोलीच्या दिशेने पुढे} कर्जतफाटा.. कर्जत रोडने ..एन डी स्ट्युडिओ ..कर्जत रेल्वे ओवरब्रिजने पलिकडे ..आमराई नाका ..डावीकडे नदीपूल ओलांडून.. परत डावीकडे.. {कशेळे- कडाव- मुरबाड रोडने}.. कडाव गणपतिचे गाव.. कशेळे ..उजवीकडे {जामरुघ रस्त्याने} ..कोटिंबे अनिरुद्धबापूंचा मठ आंबिवली ..{डावीकडचा टेंभरे फाटा सोडून पुढे सरळ पाचशे मिटर्सवर}@वनविहार.

चौकटराजा's picture

16 Jan 2015 - 11:06 pm | चौकटराजा

.
वरील चित्रात जिथे पिवळ्या रंगातील मार्ग ( डाव्या बाजूस) चालू होतो ते कशेळे गाव आहे. त्या गावात आणखी गौलवाडी कडून येणारा फिकट पिवळा मार्ग हा करजत-कशेळे व्हाया काडाव असा आहे. आता ठळक पिवळा मार्ग म्हणजे कशेळे- आंबिवली केव्ह असा १० किमी चा मार्ग व्हाया कोथिबे खणंद पिगळस असा आहे. हे वनविहार म्हणजे आंबिवली केव्ह हे ठिकाण आहे का ? असे असेल तर जीपीएस लावणे फार आवश्यक असणार आहे.

सुबोध खरे's picture

16 Jan 2015 - 10:41 pm | सुबोध खरे

१५ तारखेला सकाळी सहकुटुंब कट्ट्याला येत आहे. स्वतः मोटार चालवत नेणार असशील तरच येईन असे सौ ने सांगितल्याने नाईलाज आहे. किती जण सहकुटुंब येत आहेत?

मुक्त विहारि's picture

17 Jan 2015 - 4:13 am | मुक्त विहारि

१४ ता. रात्री पासूनच...

माम्लेदारचा पन्खा's picture

22 Jan 2015 - 11:56 am | माम्लेदारचा पन्खा

आमी आन बायको....होऊ द्या खर्च... वाह्न आहे घरचं !!

किसन शिंदे's picture

18 Jan 2015 - 12:03 am | किसन शिंदे

१५ ला सकाळी येण्याचा नक्की प्रयत्न करतो.

योगी९००'s picture

18 Jan 2015 - 12:14 am | योगी९००

१५ ला येण्याचा प्रयत्न करतो. आदल्या दिवशी घरात समारंभ असल्याने दुसर्‍या दिवसाची खात्री नाही. आलो तर गाडीने येईन आणि कांदीवली - ठाणे अशा मार्गाने येईन.

वनविहारचे तारीख बुकिंग नक्की केले आहे.१४-१५ फेब्रुवारीसाठी.साधारण पन्नास माणसांची रहायची सोय होऊ शकते असे तिथल्या मॅनेजरने सांगीतले आहे.

सुबोध खरे's picture

18 Jan 2015 - 11:17 pm | सुबोध खरे

१४ तारखेला भावाच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे आणि १६ तारखेला मुलाचा १८ वा वाढदिवस आहे त्यामुळे १४ ला रात्री जमणार नाही. १५ ला सकाळी नक्की.

यसवायजी's picture

19 Jan 2015 - 11:22 pm | यसवायजी

शेवटी तेच्च झाले. आमचा १३ ते २१चा परदेशी पलायनाचा प्लान झाल्याने हाही महाकट्टा हुकणार च्यामारी..

(दुःखी)SYG

परदेशी पलायनाचा प्लान झाल्याने हाही महाकट्टा हुकणार च्यामारी..(दुःखी)SYG

अरे दु:खी काय होतांयस? हा हुकला तर आणखी एक होईल कट्टा, परदेशी जावयाची संधी मिळणें महत्त्वाचें !! काय समजलांस?

यसवायजी's picture

20 Jan 2015 - 12:25 am | यसवायजी

व्हय जी मास्तर

येण्याची इच्छा बळावली आहे (रविवारी शिफ्ट लागली नाही ऑफीस मधे म्हणजे कट्टा पावला)...एवढे मीपकार येताहेत बघून. १५ तारखेला आल्यास किती खर्च होईल एका व्यक्तीचा ह्याचा अंदाज मिळाला तर बरे होईल. मी आलोच तर बहुतेक बाईकने प्रवास करायचा विचार आहे डोंबिवलीमधून.

प्रचेतस's picture

21 Jan 2015 - 9:26 pm | प्रचेतस

आजच ७/८ आणि १४/१५ ला हापिसला यावे लागेल असा मेल इनबॉक्सात पडल्यामुळे आमचे येणे क्यान्सल. :(

माम्लेदारचा पन्खा's picture

22 Jan 2015 - 11:57 am | माम्लेदारचा पन्खा

बुवा...तुमी पूर्वकल्पना नाय दिली हापिसला???

सस्नेह's picture

22 Jan 2015 - 12:04 pm | सस्नेह

फ्रेंच लीव्ह मारा बॉ ! कुलसंमेलनाला ज्येष्ठ संपादक कुणीच नैत असं व्हायचं नैतर !

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jan 2015 - 2:14 pm | अत्रुप्त आत्मा

++++++११११११

दोन्ही वीकेंड स्केड्युल आलंय.
नायतर आलो असतो.

फ्रेंच कट, फ्रेंच किस ऐकलंय आता हे फ्रेंच लीव्ह काय अस्तं म्हणे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2015 - 2:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

इंग्लीशाने कामाला दांडी मारली की ती झाली, "फ्रेंच लीव्ह" आणि तेच फ्रेंचाने केले तर ती झाली, "इंग्लिश लीव्ह" ! :)

ते असं की घरातूनच एस्सेमेस करायचा आज तापानं फणफणलोय / डिसेंट्री लागलीय / चुलतआजोबा वारले / बायको पडलीय हात मोडलाय किंवा यापेक्षा अॅडव्हान्सड कुणाला माहिती असेल ते कारण *biggrin*

डिसेंट्री लागलीय हाच पर्याय सर्वोत्तम।
दुसऱ्या दिवशी शिंकून/खोकून/कन्हू न दाखवावे लागत नाही। :D

दर्पणाबै हात मोडक्याच आहेत!!कारण खोटं नाही होणार ^_~

प्रचेतस's picture

23 Jan 2015 - 7:58 pm | प्रचेतस

:(

कट्टाप्रवर्तक आणि कशेळी कर्जत परिसराचे माहितगार यांना उद्देशून प्रश्नः

लेणी, गुंफा, कोरीवकाम, सातवाहन, गुप्त, पांडवकालीन दगडाचं काही आहे का त्या कट्ट्याच्या परिसरात. असेल तर इथे वर्णन करा. बघा..वल्लीचा इन्कार इकरारमधे बदलेल क्षणात. ;)

इरसाल's picture

22 Jan 2015 - 3:54 pm | इरसाल

आहे आहे.
आंबिवली जवळच वनविहार म्हणुन बौद्धकालीन विहार आणी लेण्या आहेत. परत पेठचा किल्ला आहे तो वेगळाच. अति उत्साही मंडळी नंतर मांगी-तुंगीच्या भेटीलाही जावुन येवु शकतात.
गवि इतके पुरेल का ?