छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६ - व्यक्तिचित्रण

एस's picture
एस in जनातलं, मनातलं
1 Jan 2015 - 12:20 am

नमस्कार मिपाकरहो.

मिपा छायाचित्रणकला स्पर्धेला लाभणारा वाढता प्रतिसाद पाहून ह्यावेळी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल घडवून आणत आहोत. आम्ही ह्या स्पर्धेसाठी विशेष परिक्षक म्हणून काम पाहण्यासाठी मिपासदस्य स्वॅप्स यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली.
ह्या स्पर्धेचा विषय श्री. स्वॅप्स हेच सुचवणार असून स्पर्धेसाठी उपलब्ध प्रवेशिकांमधून विजेत्यांची निवडही तेच करणार आहेत. प्रवेशिका १५ तारखेपर्यंत स्वीकारल्या जातील.
हा बदल फक्त ह्याच स्पर्धेपुरता मर्यादित राहिल.

एक सूचना: स्पर्धेचे इतर सर्व नियम तेच असल्याने प्रत्येकी एक प्रवेशिका स्वीकारली जाईल. एकाहून जास्त प्रवेशिका ज्यांनी दिल्यात त्याना एक चित्र कोणते घ्यावे ते सांगायची संधी देत आहोत. नाहीतर बाय डिफॉल्ट पहिले चित्र विचारात घेऊ.

--
संपादक मंडळ


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ह्या स्पर्धेचा विषय आहे 'व्यक्तिचित्रण अथवा पोर्ट्रेट फोटोग्राफी'. इथे साधारणपणे १८ वर्षांवरील वयाच्या एखाद्या व्यक्तीची आपण काढलेली प्रतिमा स्पर्धेसाठी पाठवू शकता. (लहान मुलांचे व्यक्तिचित्रण आणि त्यातही शिशु अथवा तान्हुल्यांचे छायाचित्रण हा नंतर कधीतरी स्वतंत्र विषय होऊ शकतो.)

स्पर्धेचे निकष:
कॅमेरा, लेन्स, इत्यादी तांत्रिक बाबींपेक्षा उपलब्ध साहित्याच्या क्षमतेचा कल्पक आणि पुरेपूर उपयोग. उदा. कमी प्रकाशात डीएसएलआर आणि फास्ट लेन्स वापरावी लागते. पण केवळ साधा मोबाइल कॅमेरा असेल तर दिवसा जास्त प्रकाश असतानाही चांगले फोटो येऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडे भारीतले कॅमेरे नाहीत म्हणून सहभाग घ्यायला बिचकू नका.

कॉम्पोजिशन (रचनाविचार) किती परिणामकारक आहे आणि उपलब्ध लाइटिंग (प्रकाशयोजना) चा वापर किती जाणीवपूर्वक केला आहे ह्याला जास्त प्राधान्य दिले जाईल.

कृपया सेल्फी पाठवू नये. ;-)

ग्रुप पोर्ट्रेट हा वेगळा विषय आहे. त्यामुळे सिंगल पोर्ट्रेट हवेत.

तांत्रिक माहिती नाही दिली तरी चालेल. उदा. कॅमेरा, लेन्स, आयएसओ, अ‍ॅपर्चर, शटरस्पीड, पोस्टप्रोसेसिंग इत्यादी. पण हा फोटो तुम्हांला का घ्यावासा वाटला आणि का आवडतो ह्यामागची लहानशी 'स्टोरी बिहाइंड द पिक्चर' सांगायची असेल तर चार-पाच वाक्यांत जरूर लिहा.

पोर्ट्रेट फोटोग्राफी ही स्टुडिओ सेटअप मध्येच केली पाहिजे असे काही नसते. नैसर्गिक प्रकाशात आणि आउटडोअर प्रकारच्या प्रकाशयोजनेतही कमालीचे व्यक्तिचित्रण करता येते. खाली दिलेली माहिती ही केवळ त्यातील मूलभूत संकल्पना सांगण्यासाठी आहे. हेच केले पाहिजे असे काही नाही. शेवटी छायाचित्रण हे एक रचनात्मक (क्रिएटिव्ह) कौशल्य आहे.

काही टिप्स:

पोर्ट्रेट फोटोग्राफीमध्ये डोळे व्यवस्थित शार्प (सुस्पष्ट) येणे महत्त्वाचे असते. व्यक्तीने दरवेळेस कॅमेर्‍याकडेच थेट पाहिले पाहिजे असे नाही. पण डोळे दिसत असतील तर त्यात थोडी चमक असावी. त्यामुळे छायाचित्राला एक प्रकारचा जिवंतपणा येतो.

फॅशन पोर्ट्रेटमध्ये मॉडेलच्या चेहर्‍यावरच्या सूक्ष्म सुरकुत्या, डाग इत्यादी दिसू नयेत म्हणून नेहमीच्या शार्प लेन्सेसऐवजी किंचित धूसर परिणाम देणार्‍या लेन्सेस वापरल्या जातात. त्यामुळे अशा पोर्ट्रेट्समध्ये एक प्रकारचा मुग्धपणा, ड्रीमीनेस जाणवतो. तुम्हांला पोस्टप्रोसेसिंग येत असल्यास हे ट्राय करून पहायला हरकत नाही. डोळे शार्प ठेवायचे पण गाल, कपाळ इत्यादी ठिकाणी किंचित ब्लर इफेक्ट द्यायचा. फास्ट लेन्स असेल तर f/1.8, f/2.8 सारखे मोठ्यातले मोठे अ‍ॅपर्चर वापरूनही हे साध्य करता येईल.

रचनाविचार साधण्यासाठी मॉडेल फ्रेमच्या मधोमध न ठेवता थोडेसे एका बाजूला घेतल्यास आणि दुसर्‍या बाजूला थोडी मोकळी जागा सोडल्यास जास्त चांगले दिसेल. ह्याव्यतिरिक्तदेखील रचनाविचारात कल्पकतेने प्रयोग करता येतील.

खाली काही 'बेसिक फ्रेमिंग' शॉट दाखवले आहेत.

१. लॉन्ग शॉट. यात मॉडेलच्या पायापासून केसांपर्यंत पूर्ण पोर्ट्रेट घेतले जाते. सोबतच काही पार्श्वभूमीसुद्धा चौकटीत येते. दिवसाची वेळ, आजूबाजूचे पर्यावरण या शॉटमध्ये समाविष्ट करता येत असल्याने त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कामाच्या स्वरूपाचा वेध घेण्यासाठी अशा फ्रेमिंगचा वापर करतात.
LongShot

२. मीडिअम शॉट. या शॉटमध्ये गुढघा किंवा कंबरेपासून वर शरीराचा अर्धा फ्रेममध्ये येतो. यात व्यक्तिमत्त्व जास्त ठळकपणे दिसते.
MediumShot

३. मीडिअम क्लोजअप् शॉट. याला 'बस्ट शॉट' असेही म्हणतात. खांदे व छातीपर्यंतचा भाग फ्रेममध्ये येतो.
MediumCloseupShot

४. क्लोजअप् शॉट. चेहर्‍यावरील हावभाव अतिशय संवेदनशीलपणे दाखवण्यासाठी अशा टाइट फ्रेमिंगचा वापर केला जातो.
CloseupShot

५. एक्स्ट्रिम क्लोजअप् शॉट. खास डोळ्यांसाठी अथवा ओठांसाठी वापरला जाणारा शॉट.
ExtremeCloseupShot
(*प्रतिमा सौजन्य - पिक्साबे.कॉम)

व्यक्तिचित्रणात ज्याला फ्लॅटरिंग पोर्ट्रेट म्हटले जाते तो एक प्रकारचा त्रिमितीय परिणाम साधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या दिशांतून विषयवस्तूकडे प्रकाश पाडला जातो. त्याचे काही मूलभूत प्रकार खाली दाखवले आहेत.
१. की लाइट किंवा मुख्य प्रकाश. 'की' म्हणजे प्रमुख स्रोत. ह्याचा अजून दुसरा उपयोग हा डोळ्यांमध्ये वर सांगितल्याप्रमाणे चमक येण्यासाठी आणि डोळ्यांच्या आजूबाजूच्या सुरकुत्या झाकण्यासाठीसुद्धा होतो.
२. फिल लाइट किंवा दुय्यम प्रकाश. फिल म्हणजे भरून टाकणे. की लाइटमुळे विरुद्ध दिशेला निर्माण झालेल्या सावल्यांच्या भागात थोडा प्रकाश पडावा ह्यासाठी फिल लाइट वापरली जाते. हा प्रकाश शक्यतो मोठ्या परावर्तक पृष्ठभागाचा वापर करून मिळवला जातो.
की लाइट आणि फिल लाइटसाठी सॉफ्टबॉक्स वगैरे वापरून हे प्रकाशझोत सौम्य व विखुरलेले असे केले जातात.
३. हेअर लाइट / सेपरेशन लाइट किंवा तृतीय प्रकाशस्रोत. हा प्रकाशझोत अरुंद आणि थोडा तीव्र असतो. त्यामुळे केसांवर एक प्रकारचा त्रिमितीय भास निर्माण होतो. पुष्कळदा ग्लॅमर जगतातील मासिकांतील फोटो पाहिले असता व्यावसायिक छायाचित्रकारांच्या आणि हौशी छायाचित्रकारांच्या प्रतिमेत जो फरक जाणवतो तो ह्या हेअर लाइटमुळे जाणवतो.
४. बॅकग्राउंड लाइट. हा प्रकाश फक्त पार्श्वभूमीतील बारकावे झाकण्यासाठी किंवा कधीकधी मॉडेलच्या चेहर्‍यामागे 'हालो' प्रकारचा प्रकाश निर्माण करण्यासाठी केला जातो. त्यामुळे व्यक्ती छायाचित्रात उठून दिसते.
५. अ‍ॅम्बियंट लाइट. हा प्रकाश म्हणजे स्टुडिओत किंवा बाहेर, जिथे फोटो काढतोय तिथे सर्वत्र असलेला नैसर्गिक प्रकाश. खालील उदाहरणात सर्व कृत्रिम प्रकाशझोत बंद केले तरी खिडकीतून येणारा सौम्य स्वरूपाचा प्रकाश सर्वत्र भरून राहिलेला आहे. केवळ ह्या प्रकाशाचा आणि एखाद्या परावर्तक पृष्ठभागाचा वापर करूनही खूप चांगले फोटो काढता येतात.

PortraitLightingBasics1

PortraitLightingBasics2

खाली वेगवेगळ्या दिशांकडून चेहर्‍यावर प्रकाश पडल्यास कसा वेगवेगळा प्रभाव जाणवतो हे दाखवले आहे. हे केवळ माहितीसाठी.

PortraitLightingBasics3
PortraitLightingBasics4

अर्थात, ह्या स्पर्धेसाठीच्या प्रवेशिकांमध्ये स्टुडिओ लाइटिंग वापरून घेतलेल्या प्रतिमा बहुतांशी नसतील तरी वरील संकल्पनांचा वापर करून नैसर्गिक प्रकाशातही तुम्ही चांगल्या प्रतिमा घेऊ शकता. उदा. की लाइटसाठी एखाद्या खोलीतील मोठ्या खिडकीचा वापर करता येईल, तर दिवसा ऊन असताना सावलीत अशा स्वरूपाचा प्रकाश मिळू शकेल. हेअर लाइट मिळवण्यासाठी व्यक्तीच्या मागून प्रकाश येईल अशा प्रकारे साधा ऑन-कॅमेरा फ्लॅश वापरूनही मस्त प्रतिमा घेता येतील.

छायाचित्रण हे अभिव्यक्तीचे एक साधन आहे. व्यक्तिछायाचित्रण हे केवळ ग्लॅमर, फॅशन क्षेत्रातच केले जाते असे नाही. रिपोर्ताज, स्ट्रीट फोटोग्राफी, माहितीपर पुस्तिका इत्यादींमध्येही व्यक्तिछायाचित्रण महत्त्वाचे मानले जाते. एक व्यक्ती म्हणून आपण सर्वचजण इतके वेगवेगळे असतो. तेही प्रत्येक क्षणी बदलते. हा वेगळेपणा, युनिकनेस टिपणे हे या अभिव्यक्तीचे ध्येय्य मानायला हरकत नाही. त्यातील गुंतागुंतीच्या तांत्रिकतेमुळे घाबरायचे काही कारण नाही.


ही नॅट-जिओच्या कव्हरवर प्रकाशित झालेली प्रसिद्ध प्रतिमा सर्वांना माहिती असेलच. शरबत गुला ह्या तत्कालीन अफगाण निर्वासित मुलीची स्टीव मॅककरी यांनी ही नैसर्गिक प्रकाशात घेतलेली प्रतिमा आहे.

सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...

छायाचित्रणप्रतिभा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

1 Jan 2015 - 12:28 am | श्रीरंग_जोशी

स्पर्धेच्या धाग्यामध्ये विषयासंबंधी तपशीलवार व उदाहरणांसकट माहिती दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.

या प्रकारच्या फोटोग्राफीमध्ये स्व. गौतम राजाध्यक्ष हे गाजलेले व्यक्तिमत्व होते.

प्रवेशिकांच्या प्रतिक्षेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jan 2015 - 2:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

(मला गुळगुळीत, एअरब्रश्ड, गोडगोड फोटो काढायचा आणि बघायचा कंटाळा येतो. म्हणून मुद्दाम चेहेऱ्याचा पोत, खरबरीतपणा दाखवणारा फोटो. या प्रकारचा चांगला फोटो काढण्याचे बरेच प्रयत्न केल्यावर शेवटी हा मिळाला, जमला, इ. ज्याचा फोटो काढलाय त्याला माझ्याकडे दुर्लक्ष करायची सवय लागायला काही काळ जाऊ द्यावा लागला. पण तो माझ्या उद्योगांकडे दुर्लक्ष करतो आणि मी त्याच्या. आता आम्ही आनंदात राहतो.)

फोटोतला अनावश्यक भाग कातरला. कॅननचे सगळेच फोटो शून्याच्या दोन एकक खाली एक्सपोज केलेले मला आवडतात, हा ही तसाच काढला.

पोर्ट्रेट

चौकटराजा's picture

1 Jan 2015 - 5:56 am | चौकटराजा

या स्पर्धेच्या परीक्षक पदी स्वॅप गुर्जी ची निवड केल्या बद्द्ल धन्यवाद ! पण आता वकत आणीबाणीचा आला. फक्त सुमार
फोटो देऊन प्रीक्षक बुवांची " उडदामाजी काळे गोरे....." अशी पंचाईत करू नये. कारण ते आता " प्राईम लेन्स" लावून बसणार्रेत ! बाकी लहान मुले व पोरर्ट्रेट हे दोन विषय वेगळे केल्याबद्द्ल हाबिनंदण !

के.पी.'s picture

1 Jan 2015 - 8:27 am | के.पी.

इथे कोणत्या तारखेपर्यंत प्रवेशिका पाठवायची आहे?

पैसा's picture

1 Jan 2015 - 9:07 am | पैसा

प्रवेशिका १५ तारखेपर्यंत स्वीकारल्या जातील.

वेल्लाभट's picture

1 Jan 2015 - 8:35 am | वेल्लाभट

स्पर्धेचा धागाच इतका माहितीपूर्ण आहे की त्यातच मजा आली आहे. बरंच नवं कळलेलं आहे. ते अमलात आणूच. पण तूर्तास माझी प्रवेशिका खालीलप्रमाणे.

एक्झिफ ची गरज नाही असं सांगितल्यामुळे तो डेटा देत नाही. पण फोटो टिपण्याचं मुख्य कारण असं की या माणसाच्या, जो रस्त्यावर पथनाट्य/गोंधळ/लोकगीत सदृश्य कला सादर करत होता, ते म्हणजे त्याचा बोलका चेहरा !

फोटो जुना आहे, त्यावर वॉटरमार्क आहे, तरी त्याला हरकत नसावी अशी आशा.

AJO

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2015 - 11:01 am | अत्रुप्त आत्मा

वेल्लाभटा.. *GOOD*

असंका's picture

2 Jan 2015 - 3:34 pm | असंका

क्लास!!!!

चेहरा डोळ्यासमोरनं हलत नाहिये दोन दिवस....

विशाल कुलकर्णी's picture

2 Jan 2015 - 5:29 pm | विशाल कुलकर्णी

जबरा फोटो ....

सस्नेह's picture

1 Jan 2015 - 9:14 am | सस्नेह

स्पर्धेची घोषणासुद्धा इतकी कलात्मक अन माहितीपूर्ण !

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2015 - 11:01 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

गुर्जी ( ;) ) नेमावा तर असा!

मदनबाण's picture

1 Jan 2015 - 11:18 am | मदनबाण

कर्जत स्टेशनचा वडेवाला... :)
Vade

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shiva Tandava Stotram { Amazing }

खटपट्या's picture

1 Jan 2015 - 11:21 am | खटपट्या

खूप छान !
दीलेलं काम चोख बजावणारा वाटतोय !!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2015 - 11:34 am | अत्रुप्त आत्मा

आयहाय...बाणोबांची सिक्सर..वेल्लाभटाच्याही वर!

अबोली२१५'s picture

1 Jan 2015 - 11:49 am | अबोली२१५

आमची  माऊ

नांदेडीअन's picture

1 Jan 2015 - 11:51 am | नांदेडीअन

२००८ साली ब्लॉगवर एक पोस्ट टाकला होता.
त्यातलाच थोडासा भाग इथे देतोय जेणेकरून ‘स्टोरी बिहाइंड दि फोटो’ कळेल.

"गावातून एक आजीबाई वर मंदिराकडेच येत आहेत.
थंडीपासून संरक्षण म्हणून म्हाताऱ्या आजीबाईने घोंगडी पांघरून घेतलेली आहे.
आज कित्येक दिवसांनंतर घोंगडी पाहायला मिळाली, नाहीतरी घोंगडीची जागा स्वेटर कधीपासूनच काबीज करत येत आहे.
इतक्यात त्या आजिबाई आमच्यापर्यंत येऊन पोहोचल्या सुद्धा आणि त्यांनी चक्क आमच्याशी बोलायलासुद्धा सुरुवात केली.

आजीबाई :- कुठले व्हा बाबांनो ?
आम्ही :- नांदेडचेच आहोत आजी.
आजीबाई :- च्हा पिता का, जरा गरम वाटल ? (बहुतेक त्यांनी आम्हाला कुडकुडताना पाहिलं असावं)
आम्ही :- चहा नको आजी, तुमच्या नुसत्या विचारण्यानेच उबदारपणा जाणवला.

त्या अनामिक आजीच्या मायेच्या उबेची आठवण राहावी म्हणून आम्ही आजीला त्यांची फोटो काढण्याची परवानगी मागितली.
आजीनेही नकार दिला नाही.
"

कॅमेरा - Panasonic FZ 18

ही घोंगडी नव्हे ही तर मायेची धाबळी.
जुन्या लुगड्या, धोतरा पासून बनते ही अन हीला फार उब असते. हिच्यात अस गुंडाळुन घ्यावस वाटत स्वतःला. घोंगड मात्र लोकरी पासुन बनवलेलं आणि फार म्हणजे फारच बोचरं असतं.

पैसा's picture

2 Jan 2015 - 2:42 pm | पैसा

धाबळी अन गोधडी यात फरक काय आहे? आणि जनीची 'वाकळ' म्हणजे काय? तुकडे जोडून शिवली की ती गोधडी, एका लुगड्याच्या घड्या घालून केलेली ती चौघडी एवढं माहित आहे.

त्या आजीचं लुगडंही दंडाचं दिसतं आहे. म्हणजे २/३ लुगड्यांचे तुकडे जोडून केलेलं. किती गरीब असेल बिचारी!

एस's picture

2 Jan 2015 - 5:03 pm | एस

धाबळीचं माहिती नाही. गोधडी माझी आज्जी फार सुबक अशी शिवायची. शक्यतो जुन्या सुती साड्या, मध्ये सुती कापडाचेच तुकडे, वर नक्षीसाठी वेगवेगळ्या रंगांचे तसेच कापलेले तुकडे. शक्यतो स्वस्तिक असायचंच. काठाला चहूबाजूंनी एक रंगीत पट्टी. फार जाड नाही, फार पातळ नाही. धावदोराच असायचा साधा, पण टाके अगदी बारीक आणि एकसारखे. डोळ्यांची खाचरं झाली तरी ती दुपारी अशी गोधड्या शिवत बसलेली असायची वाड्याच्या सारवलेल्या अंगणात. मी जवळ जाऊन पहात बसायचा. मग मला पाहून बोळक्या तोंडाने अगदी प्रसन्न हसायची. तिच्या गोधड्यांसारखंच तिचं हसू ऊबदार आणि मऊसूत असायचं. असोत. आठवणींच्या रंगीबेरंगी चिंध्या आपल्या.

सखी's picture

4 Jan 2015 - 8:07 am | सखी

नांदेडीयन, अपर्णाताई, पैसाताई आणि स्वॅप्स - तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद एक से एक आहेत, आजीची आणि गोधडीची आठवण नक्कीच झाली. सगळे फोटोही सुरेख आहेत, कोणता एक सर्वात आवडला सांगणे हे यावेळेसही अवघड होणार असे दिसते आहे.

स्पंदना's picture

6 Jan 2015 - 6:22 am | स्पंदना

गोधडी आणी वाकळ ह्या एकच असाव्यात. आम्ही वाकळ म्हणतो. जाड असते ती. टाक्यंची नक्षी असते तीला. भारतात आता वाकळ टाकाऊ झाली पण मी येथे आल्यावर क्विल्ट घ्यायला म्हणुन गेले, तेंव्हा सिंथेटीक कापूस भरलेलं सगळ्यात स्वस्त, मग कॉटन म्हणजे कापूस भरलेलं त्याहुन जरा महाग. हे दोन्ही गुब्बु गुब्बु !! नुसते अर्ध्या फुटाचे चौकोन शिवलेले त्यात कापूस भरलेला असे. अन त्याहून महाग असे बारीक टाके घतलेली खालुन वरुन वेगवेगळ्या कपड्यांचे चौकोन लावलेली ही वाकळ!!
हं!!
घरात आज्जीबाईंच्या हातची वाकळ उगा त्यांची म्हणुन कणगीत ठेवलेली आठवली! गच्च वाकळ आहे, बारीक टाके, अन त्यावरच मोठे टाके घालुन बॉर्डर काढलेली. तिन चार साड्या असाव्यात दर्शनी. वर्षातुन एकदा ती काढायची नदीवर दहाजणांनी उचलुन धुवायची दोन तीन दिवस वाळवायची. पुन्हा आपली गुंडाळी करुन कणगीत. ब्लँकेटस आहेत रेमंडची!!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2015 - 11:51 am | अत्रुप्त आत्मा

आमची(ही..) सुरवात! ;)
https://lh3.googleusercontent.com/-RjOuwRmUNjE/VKRNzlCllHI/AAAAAAAAGpw/sdJkAFXAzDI/w327-h581-no/IMG_20140528_074000.jpg

(बोंब्मल्या'वरून डे लैट मदी काडलेला फोटु!!! )

एस's picture

1 Jan 2015 - 12:07 pm | एस

धाग्यात सुरूवातीलाच स्पष्ट केल्याप्रमाणे लहान मुलांच्या फोटोंसाठी स्वतंत्र स्पर्धा नंतर घेतली जाईल. इथे १८ वर्षांवरील व्यक्तींची छायाचित्रे विचारात घेतली जातील. ही मर्यादा जाणीवपूर्वक ठेवली आहे. लहान मुलांच्या प्रतिमा स्पर्धेतून आपोआप बाद होतील. तरी आपण प्रवेशिका बदलून दुसर्‍या प्रवेशिका पाठवाव्यात ही विनंती.

मे महिन्यात राजमाचीला गेलो होतो त्यावेळी खरवंडी गावातला भेटलेला गाववाला.
"रामराम."
"रामराम."
"गडावर चाललो.छान आहे तुमचं गाव."
"कुठून आलात?"
"डोंबिवली. "
"मलापण ठाण्याला खोली घ्यायची आहे."
हे सांगतांना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद.

प्रचेतस's picture

2 Jan 2015 - 2:17 pm | प्रचेतस

मस्त फोटो कंजूसकाका.

एका फोटो मागे एव्ह्ढं शास्त्र? अय्याय्या!!

असंका's picture

2 Jan 2015 - 2:54 pm | असंका

एक प्रामाणिक शंका आहे-

इतर मेंबरनी आवडलेल्या छायचित्राला दाद/प्रतिसाद दिले तर चालतील का की ज्युरीसारखं इतरांच्या मतांचा परीणाम नको वगैरे?

स्वॅप्स गुर्जींवर कोणत्याही दबावाचा बरावाईट परिणाम होणार नाय!

असंका's picture

2 Jan 2015 - 3:32 pm | असंका

धन्यवाद...!

एस's picture

2 Jan 2015 - 5:04 pm | एस

चालेल की. अगदी खुलेपणाने कौतुक करा. मिपाकर त्यासाठीच तर प्रसिद्ध आहेत ना! :-)

प्रसाद१९७१'s picture

2 Jan 2015 - 5:27 pm | प्रसाद१९७१

अति उत्तम आणि माहीतीपुर्ण लेख.
पहील्या ४ फोटोंमधिल ललना पण छानच

विशाल कुलकर्णी's picture

2 Jan 2015 - 5:40 pm | विशाल कुलकर्णी

दोन वर्षांपूर्वी आईच्या एकसष्ठी-शांतीच्या दिवशी टिपलेली तिची कृतार्थ मुद्रा. कॅननच्या साध्या डिजीकॅमने काढलेला फोटो आहे. (Canon PowerShot A550 , ७.१ एमपी)

Ammoi

पैसा's picture

4 Jan 2015 - 8:50 am | पैसा

आईंच्या मनातल्या भावना चेहर्‍यावर पुरेपूर दिसत आहेत!

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2015 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

जुइ's picture

2 Jan 2015 - 9:19 pm | जुइ

गेली काही वर्षे आम्ही अमेरिकेतील मिनेसोटा राज्यात राहत आहोत. हे राज्य तेथील हिवाळ्यासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर बर्फ तर येथे पडतोच पण हिवाळ्यात अनेकदा सबझीरो (शून्य डिग्री फॅ. पेक्षा कमी) तापमान असते. काही वेळा इथे दैनंदिन जगणे आव्हानात्मक होऊन जाते. आधीच उणे तापमान अन कार गराजबाहेर काढण्यापूर्वी दारासमोर पसरलेला ६-८ इंच जाडीचा बर्फाचा थर. हा बर्फ न हटवल्यास कार अडकून पडण्याची पुरेपूर शक्यता असते. कधी कधी खूप बर्फ पडलेला नसला तरी अती थंड तापमानामुळे अगोदरचा बर्फ (स्नो) आइसमध्ये रूपांतरित झालेला असतो ज्यावरून चालणारी माणसे घसरून पडू शकतात किंवा गाडी स्कीड होऊ शकते. आइसचा असा थर फोडून काढावा लागतो.

हे सर्व साध्य करण्यासाठी व हिवाळ्यातील जगणे सुसह्य करण्यासाठी अनेक साधने असली तरी शारीरिक क्षमतेच्या व कणखर मानसिकतेच्या अभावी ती बिनकामाची असतात. हा फोटो त्याच प्रयत्नवादी मानसिकतेचे प्रतीक आहे.

Winter

स्पर्धाविषयाबद्दल उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल स्वॅप्स यांना मनःपूर्वक धन्यवाद.

या वरच्या फोटोमुळे मी ७ वर्ष मागे गेलो... डेन्मार्क मधे असताना लैला ला { आमची क्लायंट आणि माझी उत्तम मित्र} मी रोज विचारायचो... बर्फ कधी पडणार ? मी कधी बर्फ पडताना पाहिले नव्हते आणि अनुभवले नव्हते ! आणि तो अनुभव घेण्यासाठी मी फारच आतुर झालो होतो... शेवटी एकदा बर्फ वॄष्टी झालीच...सकाळी माझ्या रुममेट नी सांगितले अरे बर्फ पडले आहे चल लवकर... मग काय अंगावरचे आहेत ते कपडे तसेच ठेवुन आणि फक्त कोट चढवुन बिल्डींगच्या बेसमेंट मधुन त्या इमारतीच्या मागच्या बाजुला आलो आणि बर्फाचा आनंद मी लुटला तो क्षण !
ICE FUN

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHO

मुक्त विहारि's picture

4 Jan 2015 - 11:49 am | मुक्त विहारि

दोन्ही मुठीत बर्फ... मज्जा आहे राव तुमची...

फुकट बर्फ मिळाल्यामुळे, तुम्ही बर्फाचे गोळे भरपूर खाल्ले असणार.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2015 - 11:53 pm | अत्रुप्त आत्मा

रंगा'रंग राव.. फोटू येकदम भारी! *OK*

अवांतरः- ह्यातल्या पोज मुळे आणि कपडे श्टाइल मुळे रंगा हा एकदम आपल्या(दोन्ही अर्थानी =)) ) बॅटमॅनच्या शिनूमातील नविअन व्हिलन पैकी एक असा वाटतो!
फोटू पाह्यल्या पाह्यल्या,त्या कल्पनेनी एकदम ख्याक्कन हसू आलं =))

सौरभ उप्स's picture

4 Jan 2015 - 1:47 am | सौरभ उप्स

S
निकॉन D५१००
५५-२०० लेन्स।
लग्न समारंभाची फोटोग्राफी करताना अंतरपाट समयी वरा समोर उभ्या असलेल्य वधू चे हाव भाव टिपताना सापडलेला हा क्षण….

Keanu's picture

4 Jan 2015 - 10:05 am | Keanu

मला असे फोटो आवडतात. समोरच्या व्यक्तीच लक्ष नसताना जे भाव टिपता येतात त्याला तोड नाही.

टवाळ कार्टा's picture

4 Jan 2015 - 11:04 am | टवाळ कार्टा

लै म्हणजे लैच भारी

सौरभ उप्स's picture

4 Jan 2015 - 7:04 pm | सौरभ उप्स

s
भीमाशंकर ला जाताना माळशेज घाट जवळ सापडलेला एक मेक्यानिक

स्पा's picture

5 Jan 2015 - 1:16 pm | स्पा

सहीच फोटो रे उप्स

बाकी माझ्या बाईक जे हैराण केलेले होते ते आठवले , देवासारखा हा भेटला :D

विशाल कुलकर्णी's picture

5 Jan 2015 - 5:40 pm | विशाल कुलकर्णी

जबरी रे ..., एक नंबर यार !

विशाल कुलकर्णी's picture

5 Jan 2015 - 1:14 pm | विशाल कुलकर्णी

मस्तच

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jan 2015 - 10:30 am | ज्ञानोबाचे पैजार

पोर पार पेटली आहेत.

कसले भारी भारी फोटो बघायला मिळाले धागा उघडल्यावर. सगळे जण मिळून स्वॅप्सची पंचाइत करुन टाकणार असे दिसते. बर झाल या वेळी मतदान ठेवले नाही ते.

आणि हो, स्वॅप्सच्या इतक्या सुरेख आणि उत्स्फूर्त प्रस्तावनेने ही स्पर्धा एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवली आहे. त्याचे तर करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2015 - 11:21 am | डॉ सुहास म्हात्रे

स्वॅप्स यांनी सुंदर प्रस्तावना लिहून स्पर्धेला उत्तम सुरुवात केली आहे.

ही स्पर्धा चांगलीच रंगणार आहे असे सांगणारे एकसे बढकर एक फोटो येत आहेत !

फोटोमिपाकरांना ब्राव्हो आणि चिअर्स !!! *clapping*

रामशास्त्री प्रभुणेच ते. दोन दोन फ्लैश मारून सूर्यालापण घाबरवतात.

एस's picture

4 Jan 2015 - 7:42 pm | एस

हाहाहाहा! *ROFL*

वाघा बॉर्डरवरचा एक 'रुबाबदार' बी.एस.एफ. जवान.
Foto1

पेहेलगामला चाललेली चिरंजीवांची 'खादाडी'.
Foto1

प्रसिद्ध दाल लेकमधल्या आम्ही राहीलेल्या 'बटरफ्लाय' हाउसबोटीचा कारभारी.
Foto1

दाल लेकमध्ये फेरफटका मारताना शिकार्‍याचा चालक, मालक व पालक.
Foto1

छायाचित्रणस्पर्धेतला हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. एकापेक्षा जास्त फोटो टाकले आहेत, चालतील का माहित नाही ??

मुक्त विहारि's picture

4 Jan 2015 - 11:42 pm | मुक्त विहारि

पण हरकत घेतलीच तर...

"वाघा बॉर्डरवरचा एक 'रुबाबदार' बी.एस.एफ. जवान." हा फोटो मला जास्त आवडला..

खटपट्या's picture

6 Jan 2015 - 4:47 am | खटपट्या

शिकार्‍याचे चालक मालक आणि पालक थेट युरोपातीलच वाटत आहेत. :)

त्या सीमेवरच्या चालू घडामोडी पाहता दोनचार फोटोंचा दे दणका योग्यच वाटतो. होऊ दे महागुरुंची पळापळ.

स्पा's picture

5 Jan 2015 - 1:08 pm | स्पा

गणपती विसर्जनाची अलोट गर्दी, त्यात भरीस भर म्हणून लालबाग चा राजा मंडपाबाहेर आला, अक्खा जनसागर त्याची छबी टिपायला उसळला
त्यात ह्या कडकलक्ष्मी वाल्याकडे कोण बघणार,तरीही त्याच्या परीने तो प्रयत्न करत होताच पण चाबूक पाठीवर मारून मारून तोही थकला, एक क्षण त्यानेही राजाकडे पहिले , काय मागणे मागितले असेल त्याचे त्याला ठाऊक, त्याची स्वप्न त्याच्या डोळ्यात काठोकाठ भरलेली दिसली

fgf

सौरभ उप्स's picture

8 Jan 2015 - 12:14 am | सौरभ उप्स

मस्तच रे स्पा

आतिवास's picture

5 Jan 2015 - 2:07 pm | आतिवास

'अंदमान' मधली ही एक पंचायत सदस्य.
andaman
अवांतरः स्त्रियांचे अनेक फोटो आहेत, पण ते प्रकाशित करावेत की नको - अशा संदेहात मी नेहमी असते!

किल्लेदार's picture

5 Jan 2015 - 7:45 pm | किल्लेदार

:)

किल्लेदार's picture

5 Jan 2015 - 7:46 pm | किल्लेदार

* पोर्ट्रेट....

एस's picture

5 Jan 2015 - 7:55 pm | एस

सेल्फ पोर्ट्रेट आणि सेल्फी यामध्ये बराच फरक असतो म्हणा. सिंडी क्रॉफर्डचे आरशात घेतलेले सेल्फ्-पोर्ट्रेट म्हणा, किंवा आन्सेल अ‍ॅडमचे सेल्फ पोर्ट्रेट ही काही उदाहरणे. तीपण एक कला आहे. पण तुम्ही समजा सेल्फ पोर्ट्रेट पाठवले आणि मग इतरांनी सेल्फी पाठवायला सुरूवात केली तर मला प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा नकोच.

सेल्फीज, ग्रुप पोर्ट्रेट्स आणि किड्स पोर्ट्रेट्स सर्वांगीण विचार करूनच वगळली आहेत. :-)

किल्लेदार's picture

5 Jan 2015 - 8:04 pm | किल्लेदार

तेही बरोबरच आहे.यासाठी एक नविन स्पर्धा घेऊ म्हणजे मला पण वाव मिळेल. ;)

येडाखुळा's picture

5 Jan 2015 - 10:20 pm | येडाखुळा

DSC_9889-3

मुक्त विहारि's picture

5 Jan 2015 - 11:36 pm | मुक्त विहारि

आवडला...

मुक्त विहारि's picture

5 Jan 2015 - 11:47 pm | मुक्त विहारि

दोन व्यक्ती चालतील का?

मुक्त विहारि's picture

6 Jan 2015 - 12:05 am | मुक्त विहारि

मुळात आम्हाला प्राण्यांची आवड जरा जास्तच.

खरे तर वाघ किंवा सिंहच पाळायचा विचार होता.अगदीच काही नाही तर निदान एक २-४ हत्ती एक १०-१२ घोडे आणि २५-३० उंट पण पाळायचा विचार होता.

पण आमच्या तब्बल ६०० स्क्वे.फू. घरात फक्त इतकेच प्राणी कसे काय ठेवणार?

बरीच जागा तरी पण शिल्लक राहिली असती, म्ह्णून मग एक छोटी लेडी डायनॅसॉर विकत आणली.

आमच्या मोठ्या मुलाचे आणि ह्या लेडी डायनॅसॉरचे फार मेतकूट.

तो झोपला की, ही त्याचे रक्षण करत बसते.

कधी न्हवे तो आमच्या हातात कॅमेरा आला आणि बॅटरी पण सुरु होती आणि मेमरी कार्ड पण जागेवरच होते, त्यात भर म्हणून बायको टी.व्ही.च्या खोक्यात अक्कल शिजवायला बसली होती.

मग काय? मुवि, हाच तो क्षण आणि हीच ती संधी, असा विचार करून काहीतरी टिपले.

बघाना आमच्या लेडी डायनॅसॉरच्या डोळ्यात पण चमक आली आणि मुलाच्या चेहर्‍यावरचे, "मी बघतोय बाबा." हे पण भाव तुमच्या लक्षांत आलेच असतील...

,

एस's picture

6 Jan 2015 - 12:09 am | एस

तुम्ही सांगताय म्हणून लक्षात आले. फोटो दिसला असता तर अजून व्यवस्थित लक्षात आले असते. ;-)

मुक्त विहारि's picture

6 Jan 2015 - 12:11 am | मुक्त विहारि

आता बघा बरे,,,

मुक्त विहारि's picture

6 Jan 2015 - 12:10 am | मुक्त विहारि

,

एस's picture

6 Jan 2015 - 12:12 am | एस

आता दिसतोय फोटो.

मुक्त विहारि's picture

6 Jan 2015 - 12:15 am | मुक्त विहारि

आमचे फोटोग्राफी गुरु होणार का?

शिष्याची पातळी-कुवत समजली असेलच.

मला जर ही कला शिकवलीत तर, ह्या भुतलावर ते सोडाच अख्ख्या आकाशगंगेत, तुम्ही कुणालाही फोटोग्राफी शिकवू शकाल...

फोटोग्राफीत फार माठ मनूष्य आहे मी.

टवाळ कार्टा's picture

6 Jan 2015 - 9:44 am | टवाळ कार्टा

हा वर्ग सुरु होणार असेल तर मी सुध्धा येइन... क्रॅश कोर्स सुध्धा चालेल मला

तु येणार?

मग झालं...

शिकणे सोडून टवाळ-गिरीच जास्त होईल...

टवाळ कार्टा's picture

7 Jan 2015 - 12:03 pm | टवाळ कार्टा

उग्गिच...

मुक्त विहारि's picture

6 Jan 2015 - 12:12 am | मुक्त विहारि

आता फोटो दिसत असावा...

(स्वगतः फोटो दिअसत असेल तर, भटक्या खेडवालांना एक बियर पार्टी परत लागू....)

आम्ही तसे कट्टेकरी, (पण तिथेही आमच्या हातात कॅमेरा नसतो.)

असाच कुणीतरी काढलेला अज्जुन एका कट्टेकर्‍याचा फोटो...

त्यांनी सांगावे आणि आम्ही ऐकावे...

,

आपला १५ फेब्रुवारीचा कट्टा, ज्या जागेत होणार आहे, त्या जागेतल्या झोपाळ्यावर बसलेल्या आमच्या गुरुंचा फोटो...

,

म्हणजे आमच्या निवडीचा ताप कमी करुन स्वॅपबुवांच्या डोक्यावर मारायला...

मी नाही त्यातला आणि एक फोटो टाकला. (मी नाही त्यातली आणि एक सरी घातली ).
मायक्रोफोन हातात न घेणारा नंतर हातातून सोडतच नाही.

#डिजिटल फोटोग्राफी आल्यापासून एक चांगले झाले कैमऱ्याचाच एकदा काय तो खर्च नंतर फोटो काढणे आणि जगाला दाखवण्याचा खर्चच नाही. (फिल्म कैमरा घेऊन पोळलेला.)

प्रचेतस's picture

6 Jan 2015 - 8:55 am | प्रचेतस

आमच्या एका मित्राचा आम्ही काढलेला फोटू. (त्यांची पूर्वपरवानगी घेऊनच येथे टाकत आहे)

a

खटपट्या's picture

6 Jan 2015 - 10:16 am | खटपट्या

कोणाकडे बघू असे झालेय. खूप छान फोटो !!

फोटो छान !! पण ते मोराला हरिण का दाखवतायेत? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2015 - 2:44 pm | अत्रुप्त आत्मा

मोरानी त्याला-पाहिजे ते बघितलं, http://www.sherv.net/cm/emoticons/playful/tongue-in-cheek-smiley-emoticon.gif
.
.
.
असो!

हा हा !! अहो बुवा, ती मुद्रा हरणाची आहे म्हणून म्हटलं. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2015 - 3:35 pm | अत्रुप्त आत्मा

अत्यंत अपेक्षित प्रतिसाद! चालू द्या.....................

विशाल कुलकर्णी's picture

6 Jan 2015 - 10:36 am | विशाल कुलकर्णी

एकाहून एक सुंदर फोटो येताहेत. आत्मारामगुर्जींचातरं लैच भारी :)

विशाल कुलकर्णी's picture

6 Jan 2015 - 10:41 am | विशाल कुलकर्णी

माय सिस्टर ...
काही वर्षांपूर्वी अलिबागजवळ जंजीर्‍याला गेलो होतो. तेव्हा राजापूरीहून शिडाच्या तरीतून जंजीर्‍याकडे जाताना घाबरून डोळे मिटून घेतलेल्या बहिणाबाईंची टिपलेली छबी..

bahinabai

मोहन's picture

6 Jan 2015 - 11:20 am | मोहन

गानयोगिनी श्रीमती धोंडुताई कुलकर्णींची ही मैफिल शेवटचीच ठरली. धोंडुताई गाणार म्हणुन अनेक दिग्गज कलाकार मैफिलीला उपस्थीत होते. उ. अझीझउद्दीन बाबांच्या प्रथम पुण्यतीथी निमित्त कार्यक्रम होता. ८५ वयाच्या आसपास असलेल्या बाई अप्रतीम गायल्या. मी एकंदर माहोल पाहुन भारावुन आपला फोटोच काढत बसलो. नंतर लक्षात आल्यावर थोडेफार गाणे पण रेकॉर्ड केले.
त्यानंतर मात्र वर्ष - दिड वर्षातच त्या गेल्या. आता केवळ आठवणी राहील्या ...
याच मैफिलीतली त्यांची एक भावमुद्रा. फोटो क्रॉप करुन ईतर डिटेलस कमी केले आहे.
Gaanyogini

विशाल कुलकर्णी's picture

6 Jan 2015 - 12:51 pm | विशाल कुलकर्णी

ओहो.. सुंदर !

वाचक's picture

7 Jan 2015 - 2:39 am | वाचक

मागे एकदा टाकली होती बहुतेक

तबला नवाझ सुप्रीत देशपांडे
Supreet Deshpande

एक भावमुद्रा
Khanjiri

एस's picture

7 Jan 2015 - 11:57 am | एस

धाग्यातील खालील सूचना येथे उद्धृत करीत आहे -


एक सूचना: स्पर्धेचे इतर सर्व नियम तेच असल्याने प्रत्येकी एक प्रवेशिका स्वीकारली जाईल. एकाहून जास्त प्रवेशिका ज्यांनी दिल्यात त्यांना एक चित्र कोणते घ्यावे ते सांगायची संधी देत आहोत. नाहीतर बाय डिफॉल्ट पहिले चित्र विचारात घेऊ.

बेमिसाल's picture

7 Jan 2015 - 10:18 pm | बेमिसाल

entry

Other information
Camera: SONY DSC 572
Flash : Used
Focal Length: 6mm
Exposure time : 0.02s[1/50]
F.No. f/28
ISO: 100