नमस्कार मंडळी एक सल्ला हवा होता. नुकतीच एक जुनी चारचाकी घेतली आहे. आधी ट्रेनिंग स्कूल मध्ये जावून २० दिवस प्रशिक्षण घेतले. लायसन्स मिळाले परंतु गाडी चालवण्याचा आत्मविश्वास नाही. गाडी मध्ये बसल्यावर भीती वाटते कि आपण चालवू शकू कि नाही बाजूला कुणीतरी गाडी चालवता येणारा मित्र असला तर थोडा धीर येतो मात्र गाडी वळवताना वेगात जात असे वाटते नि बर्याचदा गाडी चालवताना मध्ये बंद पडते. आत्मविश्वासच राहिला नाही असे वाटते. आजूबाजूला इतर लोक आत्मविश्वासाने गाडी चालवताना पाहून मनात एकप्रकारचा न्यूनगंड आला आहे.
हे एक उदाहरण झाले तसेच चारचौघात मिसळण्याचीही भीती वाटते.
एखादा कार्यक्रम असेल तर मी मागेमागेच राहतो पुढाकार घेण्यास जमत नाही. ऑफिस मधेही नि जीवनातही ह्या भित्र्या स्वभावाचा, न्युन्गंडचा नि आत्मविश्वासरहित असण्याचा तोटाच झालाय. एखादे नवे जबाबदारीचे काम सोपवण्यात आले कि मी त्यातून पळवाटा काढू लागतो. छातीत धडधड सुरु होते. श्वास अनियंत्रित होतो.
मला आत्मविश्वास वाढवून पुढील आयुष्य व्यवस्तिथ जगता येईल काय? कृपया मार्गदर्शन करावे
प्रतिक्रिया
28 Nov 2014 - 5:24 pm | वैभव जाधव
आत्ता कळले डुआयडी काढण्याचे खरे कारण.
न्यूनगंड.
थाण्कू.
28 Nov 2014 - 5:30 pm | जेपी
20 दिवसाच्या ऐवजी 40 दिवस ड्रायविंगचे धडे गिरवा.20 दिवसात लायसन मिळाल मंजे काय शिकला नाय तुमी.
मला rto ने 3 वेळेस नापास केलत टेस्ट मध्ये.आज भन्नाट चारचाकी चालवतो.
दुसरा मुद्दा मानसिक वाटतो ,आपला पास.
28 Nov 2014 - 6:08 pm | तिमा
हा प्रश्न ड्रायव्हिंगचा नसून आत्मविश्वासाचा अभाव, असा आहे. त्यासाठी तुम्ही कुठल्या क्षेत्रांत प्रवीण आहात, त्यांतले काम जास्त करा. त्यातून जो आत्मविश्वास वाढेल तो मग दुसरीकडे उपयोगी ठरेल.
प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी स्किल असतेच, ते सापडले की तुम्ही यशस्वी!
28 Nov 2014 - 6:18 pm | टवाळ कार्टा
+११११११११११११११११११११११११११११
28 Nov 2014 - 6:20 pm | प्रसाद१९७१
न कंटाळता करत रहा ( जे काही करायचे आहे ते ). सरावानी कुशलता वाढते आणि कुशलता वाढली की कॉन्फिडन्स येतो.
28 Nov 2014 - 6:23 pm | सुबोध खरे
प्रतापराव,
आपण आपल्या सायकल शिकण्याचा अनुभव आठवून पहा. तोल सांभाळणे, पेडल मारणे, हैण्डल मारणे अशी अनेक अवघड कामे करता करता तारांबळ उडते. पण तेच एकदा चालवू लागलात कि खारे दाणे खात एका हाताने मजेत सायकल चालवता येते. तसेच आहे येथे.
एकदा नीट शिकलात कि वाहन चालवण्याची मजा काय आहे ते समजेल. लगे रहो.
28 Nov 2014 - 8:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रयत्नांती परमेश्वर. हळुहळु येईन जजमेंट. प्रयत्न करत रहा. मी आमच्या ड्रायव्हिंग स्कुल वाल्याला घाबरवलं होतं पहिल्या दिवशी आखा अॅक्सलेटर दाबुन आणि क्लच सोडुन =))
28 Nov 2014 - 8:05 pm | टवाळ कार्टा
=))
28 Nov 2014 - 8:42 pm | चेतन677
तुमच्याप्रमाणे मलाही असा प्राॅब्लेम होता.....मीही कोणात जास्त मिसळायचो नाही तव्हा विचार केला की आपण कसेही जगलो तरी मरण येणारच एकदिवस....मग असे
घाबरत का जगायचे आपण?? बिनधास्त क्लच सोडा आणि अॅक्सलरेटर दाबा....अरे डर से न डरो क्योकि डर के आगे जीत है....
28 Nov 2014 - 10:42 pm | अनुप ढेरे
एक-दोन पेग लाऊन चालवा गाडी. फुल्ल कॉन्फिडन्स येइल चालवताना!
28 Nov 2014 - 11:47 pm | रेवती
??? खरच?
28 Nov 2014 - 11:51 pm | संचित
अहो तुम्ही तर पहिल्याच दिवशी जेल मध्ये रवानगी कराल असे उपदेश करून.
29 Nov 2014 - 12:02 am | अत्रन्गि पाउस
जाऊन नीट शिका .... नीट म्हणजे 'नीट'...
सगळे येईल मग...
कालच्या पेक्षा रोज फक्त १०० मीटर जास्त गाडी चालवा...पण परफेक्ट ...गाडीचे सगळे आवाज नीट ऐका ...छोत्याटली छोटी स्पन्द्ने म्हणजे गाडीचा संवादच ...
आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीत यश बघा...शर्टाला मस्त पैकी इस्त्री करा ... झकास चहा करा ...
एखादे स्तोत्र पाठ करा (राम रक्षा)...
अगदी नक्की ..सगळे ठीक होईल...
29 Nov 2014 - 12:45 pm | योगी९००
सकाळी लवकर उठा....साधारण ५ वाजता आणि जवळच्या गल्लीबोळात गाडी चालवायची प्रॅक्तीस करा.त्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.
29 Nov 2014 - 1:00 pm | manuski99@gmail.com
जगात कशालाच व कुनालाच घाबरु नका. माझि सुध्धा जुनिच कार आहे. पहिले पन जुनि घेतलि होति आता पन. निट दुरुस्त करुन घ्या. जुनि विकतातच मुळि खराब असते म्हनुन. माझि मरुति भर रस्त्यात बन्द पड्ते. मेक्यानिक्ला बोलावतो. गाडी बाजुला लावन्यास लोकाना बोलावतो मदत करावयास. नविन घेतलेलि उत्त्म राहिल. कार अतिशय शान्त डोक्याने चालवावि असा मला सल्ला मिलाला होता. त्यात आहे काय हो? थाम्बायचे तर ब्रेक दाबा न्युत्रल करुन थाम्बा. पुढे जायचे तर क्लच दाबुन पहिल्या गियर मधे टाका क्लच सोडा याक्सलएट्र दाबा. नन्तर दुसरा नन्तर तिसरा. मग जसे पाहिजे तसे करा. त्यात काहिच कौतुक नाहि. फारच त्रास होत असेल आता बजेट मधे विना गियर च्या कार मिलत आहेत. कुनाच्या बापाल भिउ नका. कोनतेहि काम करत असताना. अहो सगलेच आपल्या सारखे असतात. ते काहि फार शहने नसतात.
29 Nov 2014 - 4:58 pm | स्पंदना
वाडला! वाडला! परतापरावांचा आत्म्विश्वास वाडला!!
29 Nov 2014 - 5:41 pm | टवाळ कार्टा
=))
29 Nov 2014 - 2:55 pm | मराठी_माणूस
वरील प्रतिसादा वरुन "मोकलाया दाहि दिश्या" ची आठवण झाली.
29 Nov 2014 - 6:02 pm | कंजूस
वयाचा प्रश्न असतोच. वाढत्या वयात थोडा सफाईदारपणा कमीच राहतो.
न्युनगंडच्या विरुध्द शब्द काय ?
3 Dec 2014 - 1:32 pm | बॅटमॅन
अहंगंड.
29 Nov 2014 - 6:33 pm | आनंदराव
सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यायाम करायला सुरुवात करा.
ज्से सायकल चालवणे, पळणे वगैरे.
त्याला वेळेचे बंधन घाला.
आत्मविश्वास वाढायला मदत होईल.
स्वानुभवाने सांगतो.
29 Nov 2014 - 8:16 pm | प्रतापराव
प्रतिक्रियांबद्दल मिपाकरांचे धन्यवाद.
आत्मविश्वास कमी असेल तर श्वासावर नियंत्रण ठेवले कि मनातली चलबिचल कमी होते असे एकाने सांगितले त्यात तथ्य आहे का ?
30 Nov 2014 - 4:10 am | उन्मेष दिक्षीत
http://www.manogat.com/node/19191
बघा काही घेउ शकला तर.
आणखी एक गोष्ट, परत नर्वसनेस, आत्मविश्वासाची कमी किंवा भीती वाटेल जेव्हा, for example, गाडी चालवताना, तेव्हा एक गोष्ट करा, तुम्ही वरती वीचारल्याप्रमाणं,
, थोडक्यात,
त्या मानसीक अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मी लगेच काय करावं ? सोल्युशन काय आता ? (श्वासावर नियंत्रण वगैरे) या असल्या भानगडींचा वीचारसुद्धा करु नका, कारण मग तुम्ही त्यात आणखीनच अडकाल.. ट्रस्ट मी, माझा अनुभव आहे हा !
त्यापेक्षा गाडी नीट चालवणे एव्हढाच एक उद्देश ठेवा !
" पण काही चुकलं तर ? "
अशी जेव्हा चलबिचल होते आणि ते तसं होउ नये म्हणुन आपण जेव्हा उपाय शोधाय्ला लागतो किंवा मग अनावश्यक सावधगिरी बाळगायला लागतो, तेव्हा ती गोष्ट हमखास चुकते हे तुम्हाला कळालं असेलच.
चुकलं तर चुकलं, काय बिघडलं ?. गाडी आपण चालवू तशी चालते, स्टीअरींग कंट्रोल आपल्या हातात आहे, ही गोष्ट लक्षात आली कि रिलॅक्स वाटेल. सुरुवातीला वेळ लागेल, पण काही चुकलं कि लगेच दुरुस्त करा ती पुढच्यावेळेला आणि बिन्धास्त ड्राइवींग एन्जॉय करा ! श्वासावर नियंत्रण ठेवायची गरज भासणार नाही. आणि हे सगळ्यालाच लागू होतं.
30 Nov 2014 - 7:58 am | स्वप्नज
बरोबर आहे.
2 Dec 2014 - 5:58 pm | आसुड
गाडि बंद पडली तर...हात्तिच्या मायला अस म्हणून स्वतःशीच हसा....
हिच सेम बाब कधिहि कुठेहि आपण कमी पडलो कि लागू होते... ( हा माझा सौताचा अनुभव हाय बर का गड्या... जम्ला तुमाला आनी पड्लाच लागू तर फुड्च्यास्नी बि सांगा बर का सायब)
2 Dec 2014 - 7:43 pm | काळा पहाड
समस्त हत्ती जमातीकडून निषेध.
2 Dec 2014 - 9:27 pm | प्रतापराव
सर्व प्रतिसादकर्त्याचे आभार .
संजय क्षीरसागर साहेब तुमची मनोगत वरची लेखमाला आवडली म्हणून तुमचे मार्गदर्शन हवे होते.की काय उपाय केले तर ह्या समस्या दूर होतील अथवा कमी होतील.
3 Dec 2014 - 12:30 am | संजय क्षीरसागर
तुमच्या व्यक्तीगत प्रश्नालाही (सरते शेवटी) तेच उत्तर असलं तरी सध्या तुमचा प्रश्न वेगळा आहे. सो वी गो बाय योर क्वेस्टशन अँड नॉट द लिंक.
अर्थात आहे. तुम्ही फक्त एक आणि एकच प्रयोग चालू ठेवा, तुमचे सर्व प्रश्न दूर होतील.
सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी, शांतपणे भींतीला पाठ टेकून बसा. श्वास तोंडानं शिट्टी वाजवतो तसा पूर्णपणे बाहेर सोडा, तुमचं पोट आपसूक पाठीकडे ओढलं जाईल. श्वास जोमानं बाहेर सोडला की तोंड मिटा. मग एक श्वासरहित शून्य अवस्था येते, त्या शांत अवस्थेचा आनंद घ्या. श्वास आपोआप नाकानं आत येईल आणि त्याचा वॉल्यूम नेहमीच्या इन्टेकपेक्षा बराच जास्त असल्यानं तुम्हाला एनर्जी येईल. आता ती एनर्जी घेऊन पुन्हा श्वास तोंडानं बाहेर सोडा.
घड्याळाकडे अजिबात दुर्लक्ष करा आणि जेवढा वेळ तुम्हाला मजा येतेयं तेवढा वेळ हा श्वासप्रयोग जारी ठेवा. सेल फोन बंद करा आणि तत्पूर्वी त्यात अर्ध्यातासानंतरचा गजर लावून ठेवा. या सेशन नंतर तुम्हाला ज्याम उत्साह येईल.
____________________________________
आता हा उत्साह घेऊन तुम्हाला सहज जमेलशी कोणतीही गोष्ट करा. म्हणजे गाडी काढावीशी वाटली तर गाडी काढा, ऑफिसचं काम करावंस वाटलं तर ते करायला घ्या. सकाळी पत्नीबरोबर फिरायला जावंस वाटलं तर फिरायला निघा.
___________________________________
प्रश्न कौशल्य आत्मसात करण्याचा नाही तर कृत्य करतांना सुरु होणार्या नेगटीव विचार कल्लोळांचा आहे. ती विचारांची झुंबड श्वास खेचून घेते. मग शरीराला अपुर्या पडणार्या श्वासामुळे मानसिक स्वास्थ्य हरवतं आणि कृत्यात चुका व्ह्यायला लागतात. स्मृती साथ देत नाही. अशा वेळी वर सांगितलेला श्वासप्रयोग सावकाशपणे सुरु करा. श्वासाचा इन्टेक नॉर्मल झाला आणि त्याची लय पूर्ववत झाली की आपण पुन्हा कृत्यावर फोकस होतो. मग स्मृती पुन्हा सक्रीय होते. त्यानं माइंड-बॉडी को-ऑर्डीनेशन विनासायास साधलं जायला लागतं आणि यथावकाश तुम्ही कृत्यात पारंगत होता.
_____________________________
मला आत्मविश्वास नाही (किंवा न्यूनगंड आहे) असं म्हणण्या ऐवजी, मला अमूक एक गोष्ट येत नाही (उदा. कार ड्रायवींग) किंवा तमूक गोष्टीची भीती वाटते (उदा. चारचौघांत मिसळणं किंवा त्यांच्यासमोर बोलणं) अशी स्पेसिफिक लीस्ट बनवा. `मला न्यूनगंड आहे' अशा विधानानं व्यक्ती पुरती नामोहरम होते आणि मग कौशल्य प्राप्त करण्याची तिची उमेद विरायला लागते.
`मला न्यूनगंड आहे' अशी तुमची (कितीही ठाम) समजूत असली तरी ती सोडून द्या. तुम्हाला फक्त कौशल्य प्राप्त करण्याची गरज आहे आणि ते करतांना येणारे उलट-सुलट विचारांचे कल्लोळ थांबले की कौशल्यप्राप्ती सहज आहे. वर सांगितलेला श्वसनप्रयोग तुमची मानसिकता संपूर्णपणे बदलेल ही माझी ग्वाही आहे, निर्धास्त राहा. आणि जितक्या उघडपणे प्रश्न विचारलायं तितक्याच प्रांजळपणे तुमचा अनुभव लिहा, इतरांना उपयोग होईल.
3 Dec 2014 - 10:14 am | संजय क्षीरसागर
वरच्या प्रक्रियेत दोन ठहेराव आहेत. श्वास संपूर्ण बाहेर सोडल्यावर जी श्वासरहित अवस्था आहे तो पहिला पॉज, त्यात फक्त शांत राहा. आणि नाकातून श्वास संपूर्ण आत आल्यावर जी एनर्जी भरून येते तो दुसरा ठहेराव, त्याचा श्वास पुन्हा बाहेर सोडण्यासाठी जंपीग प्लॅटफॉर्म म्हणून उपयोग करा. कुठेही मुद्दामून श्वास रोखणं (श्वासरहित अवस्थेत) किंवा श्वास पकडून ठेवणं (संपूर्ण श्वास आत आलेल्या स्थितीत) करु नका. त्याची अजिबात गरज नाही.
आणि दुसरी गोष्ट, ब्राह्मीप्राश सिरप (शक्यतो रामदेवजीबाबांच्या पातंजली ब्रँडचं) रात्री जेवल्यानंतर दोन चमचे घ्या, त्यानं झोप शांत लागते. तुमच्या मेंदूचा बायो-कंप्युटर व्यवस्थित शट डाऊन व्ह्यायला मदत होते. सकाळी उठल्यावर तुम्हाला कमालीचा उत्साह वाटेल.
3 Dec 2014 - 11:54 am | प्रतापराव
धन्यवाद सर
3 Dec 2014 - 2:19 pm | संजय क्षीरसागर
(फोन बंद करा असं लिहिलंय, ते सायलेंट करा असं वाचा.)
3 Dec 2014 - 12:53 pm | विटेकर
सेल फोन बंद करा आणि तत्पूर्वी त्यात अर्ध्यातासानंतरचा गजर लावून ठेवा.
सेल फोन बन्द केला तरी गजर होतो का ? नै , अन्भ्व नाय म्हणून विचारून राहिलो.
आणि " ठहराव " म्हणजे काय ?
एकदा सगळ्या शंका संपल्या की सराव करायला सुरुवात करीन म्हणतो.
आत्मविश्वास पार म्हण्जे पारच ढासळलाय रावं !
3 Dec 2014 - 12:54 pm | बबन ताम्बे
मला ड्रायव्हींग शिकविणारा वयस्क मास्तर होता. त्याने पहीले काम काय केले असेल तर किलींग ऑफ फियर. पहील्याच दिवशी हाय वे ला घेऊन गेला आणि १०० च्या स्पीड्ने गाडी पळवायला सांगितली. अर्थात स्टीरिंग कंट्रोल, क्लच, ब्रेक सगळे कंट्रोल त्याच्याकडेच होते. आम्ही फक्त स्टीरिंग हातात घेऊन अक्सलेटर दाबत होतो.
तुम्ही एक काम करू शकता.
१. सकाळी सहा-सातला एकट्यानेच गाडी काढायची. सकाळी रस्त्यावर वहातूक कमी असते. कींवा शक्य असेल तर मोकळ्या मैदानात गाडी घेऊन जाणे. भरपूर प्रॅक्टीस करणे. (गियर बदलणे, रीव्हर्स वगैरे).
२. गाडी बंद पडते याचे कारण तुम्ही स्लो स्पीडला क्लच न दाबता ब्रेक दाबत असाल. स्लो स्पीडला क्लच दाबून ब्रेक दाबावा आणि लगेच कमी गियरवर शिफ्ट व्हावे.
३.दुसरे कारण गाडीचा स्पीड आणि तुम्ही टाकलेला गियर हे मॅच होत नसेल. उदा. स्पीड २० ते ३० चा असेल आणि पाचवा गियर असेल तर थोड्या वेळाने गाडी बंद पडेल.
४. थोड्या चढावर गाडी बंद करून पुन्हा चालू करायची प्रॅक्टीस करणे. (हाफ क्लच्/ब्रेक स्कील. :-) आमच्या एका नातेवाईकाने संचेती पुलाच्या चढावर गाडी बंद पाडली आणि पुन्हा त्याला घाबरल्यामुळे चालुच करता येईना.मागे सगळे ट्राफीक जाम. :-) )
४. थोडा आत्मविश्वास आला की मग ट्राफीकमधे जावे.हळूहळू आत्मविश्वास वाटेल.
५. एक मात्र सत्य आहे की खूप सराव केल्याशिवाय चांगले ड्रायव्हींग येत नाही. (तरुण मुलांची गोष्ट वेगळी. :-) )