हॅप्पी थॅन्क्सगिव्हिंग
|| ॐ दवणेय नमः ||
माझ्या मिपावरील सर्व मित्र मैत्रीणींना आज थॅन्क्स गिव्हिंगच्या निमित्ताने मी धन्यवाद देवु इच्छितो !
मिपावरील चर्चात , काथ्याकुट मधील कचकचीत वादात , कवितांमध्ये , लेखनांमध्ये , भटकंतीच्या धाग्यांमध्ये आपण ज्याप्रकारे प्रतेकाला सामावुन घेता त्याला तोड नाही . मिसळसळ्व्पाववर येवुन कधी मिसळलो झालो ते कळालेच नाही .
तदुपरी प्रत्येक सदस्याला ज्याच्याशी ह्या ना त्या निमित्ताने संपर्क आला आहे त्याचे स्वतंत्रपणे प्रतिसादात आभार मानावेत असा मानस आहे :)
पुनश्च एकवार मिसळपाव परिवाराचे मनःपुर्वक आभार !
कळावे
-
आपलेच 'अमेरिकनाईझड'
प्रगो आणि गिरिजा :D
प्रतिक्रिया
27 Nov 2014 - 1:23 pm | कंजूस
अमेरिकेत काढा एखादी मिसळपाव टपरी.Hot n spicy lentil soup with chickpea crackers and indian bread.
27 Nov 2014 - 5:53 pm | बॅटमॅन
खल्लास!!!
Mcmisal, Misalia, (with hot chaa-kafe) असे अॅडिशनही करा म्हणजे मोका मिळाला की मोका कॉफीऐवजी आपला च्या त्यांच्या नरड्यात वतू, हाकानाका.
27 Nov 2014 - 2:22 pm | सूड
मिपा सोडून चाल्लांव काय गिर्जाकाका?
27 Nov 2014 - 4:17 pm | सतिश गावडे
पुन्हा बाकडयावर आलात का गिरिजाकाका?
27 Nov 2014 - 4:56 pm | प्रसाद गोडबोले
अरे आज थॅन्क्स गिव्हिंगची सुट्टी आहे ना अमेरिकेत मग क्लाईयंट ला सुट्टी म्हनूण आम्हीही रीलॅक्स !
27 Nov 2014 - 5:02 pm | यसवायजी
काका उसगावात काय करतैसा? आनी मग यलोरा क्यान्सल??
28 Nov 2014 - 1:28 am | सूड
उसगावातनं कवाच आल्यात वो, पर आता तिकडं थंडी वाजाय लागली का मंग हिकडं स्वेटर घालतायत म्हनं !! ;)
28 Nov 2014 - 12:50 am | रेवती
हॅपी थ्यांक्सगिव्हिंग!
गिर्जाजी, आज टर्की खाणार काय?
28 Nov 2014 - 2:32 am | मुक्त विहारि
सेम टू यू....
28 Nov 2014 - 3:57 am | स्पंदना
स्विकारलं बाबा एकदाच गिरिजाकाकूला प्रसाद काकांनी.
आता गुन्यागोविंदान नांदा हं.
आन पयला येकमेकाला थँक्स म्हना, न्हाय तर तेच र्हाउन जायाचं. काय?
28 Nov 2014 - 7:27 am | सस्नेह
हॅप्पी थँक्सगिविंग !
मिपा-लविंग प्रगिकाकू..