बर्लिन भिंतीच्या पतनाचा रौप्यमहोत्सव

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
9 Nov 2014 - 9:09 am

बर्लिन भिंतीच्या पतनाचा रौप्यमहोत्सव

आजच्याच दिवशी २५ वर्षांपूर्वी , ९ नोव्हेंबर १९८९ या दिवशी पूर्व जर्मन सरकारने बर्लिन भिंतीचे दरवाजे उघडून पूर्व बर्लिनच्या नागरिकांना पश्चिम बर्लिनमध्ये जायची परवानगी दिली. पुढे एक वर्षाच्या आत दोन्हीही जर्मन राष्ट्रे एकत्र आली.

इतिहासप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

बेर्लिन ची भिंत पाडल्याबद्दल तत्कालिन सोवियेत अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव यांचे अभिनंदन.

पिवळा डांबिस's picture

9 Nov 2014 - 10:06 am | पिवळा डांबिस

१५ वर्षांनंतर?
आणि ते ही गोर्बाचेव्ह डब्यात गेल्याला बरीच वर्षे उलटून गेल्यानंतर?
:)

एस's picture

9 Nov 2014 - 10:40 am | एस

२५ वर्षांपूर्वीही केले होते, आता मिपाच्या व्यासपीठावरून पुनरेकवार करतोय. :-)

बोका-ए-आझम's picture

9 Nov 2014 - 9:28 am | बोका-ए-आझम

या घटनेच्या एक वर्ष आधी रीगन आणि गोर्बाचेव यांची बर्लिनमध्येच बैठक झाली होती तेव्हा रीगनने अंबुजा सिमेंट स्टायलीत " मि. गोर्बाचेव, ही भिंत तोडून टाका ," असं विधान केलं होतं! ;)

नाहीतर आजही उखाळ्या पाखाळ्या काढत बसले असते

लोकसत्त मधे आलेला आजचा एक लेख.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/berlin-wall-novels-1039477/

बोका-ए-आझम's picture

9 Nov 2014 - 12:35 pm | बोका-ए-आझम

हाराल्ड ज‌ॅगर हा पूर्व जर्मन गुप्तपोलिस संघटना ' स्टासी ' मध्ये लेफ्टनंट कर्नल होता आणि बर्लिन भिंतीवरच्या पहा-याची आणि सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याने त्यावेळची लोकांची मन:स्थिती या लेखात वर्णन केली आहे.

http://m.timesofindia.com/world/europe/The-man-who-opened-the-Berlin-Wal...

बर्लिनची भिंत पाडली जाणे ही जगाच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. शेवटी कितीही काहीही झाले तरी आर्थिक समतेच्या गोंडस नावाखाली हुकुमशाहीचा वरवंटा चालविणाऱ्या, वैयक्तिक स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या आणि जगात सर्वाधिक रक्तपात घडवून आणणाऱ्या कम्युनिझम नावाच्या राक्षसाच्या अंताची सुरवात व्हायला ही घटना निमित्त नक्कीच झाली.बर्लिनची भिंत पडल्यानंतर अवघ्या दोन वर्षात सोव्हिएट युनियनसकट पूर्व युरोपातील कम्युनिझमचा अंत झाला!! माझ्यासारख्या उजव्याला या घटनेचे प्रचंड महत्व वाटते.

बर्लिन भिंतीवर स्वामीनाथन अय्यर यांचा टाईम्स ऑफ इंडियातील हा लेख वाचनीय आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी या लेखात शेवटी नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे. तो कोणाला आवडेल कोणाला आवडणार नाही.पण तरीही लेख नक्कीच वाचनीय आहे.

बोका-ए-आझम's picture

9 Nov 2014 - 11:10 pm | बोका-ए-आझम

अगदी बरोबर. आणि सर्वात मजा म्हणजे आपल्या इथल्या कम्युनिस्टांनी अगदी बाप मेल्यासारखे सोविएत युनियनच्या मढ्यावर आपले अश्रू ढाळले.