होमिओपाथी
( या लेखात बरेच इंग्रजी शब्द / वाक्ये वापरली आहेत. काही वेळी प्रतिशब्द माहीत नाहित म्हणून तर काही वेळा अर्थ सुस्पष्ट रहावा म्हणून. क्षमस्व !)
माझ्या तंत्रदर्शन वरील लेखात मी लिहले होते की ". फार कशाला, होमिओपाथी ही उघडउघड फसवणुक आहे हे जाहीर झाले असले तरी सुशिक्षित माणसेही त्या दवाखान्यात रांगा लावतातच की ! " त्या लेखातील शेवटचा परिच्छेद हा तंत्राला लोक का बळी पडतात यावर होता व श्रद्धा व अगतिकता ही दोन कारणे नमुद केली होती. त्यापुढे आणखी एक उदा. म्हणून होमिओपाथीचा निर्देश केला होता. त्याला आक्षेप घेण्यात आले म्हणून हा लेख. इथे होमिओपाथी ची मुलतवे व त्यावर घेतले गेलेले आक्षेप यांचाच विचार आहे. संदर्भ दिले नाहीत, जालावर भरपूर माहिती आहे.
हनिमन (१७५५-१८४३) हा जर्मन माणुस "होमिओपाथी " चा (या पुढे होमि.) जनक. त्याने घालून दिलेल्या मार्गावरून होमि,ची वाटचाल आज दोनशे वर्षे चालू आहे. दोन महत्वाची तत्वे जोडण्यात आली. त्यांचा उल्लेख पुढे केला आहे. माझ्यावरील आक्षेपात इतकी वर्षे फसवणुक होते आहे काय ? १८० कॉलेजेस आहेत इ. गोष्टी नमुद करण्यात आल्या आहेत. पहिल्याचे उत्तर हो व दुसर्याचे शिक्षणसम्राट पैसे मिळत असतील तर आणखी १८०० कॉलेजेस काढतील. असल्या गोष्टींनी होमि. शास्त्रसंमत ठरत नाही.
.
प्रथम होमि.ची गृहितके व त्यात मिळवलेली नवीन तत्वे पाहू.
(१) औषध अल्प प्रमाणात दिले तर त्याची उपयोगिता वाढते. म्हणून औषध पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये विरघळवून ते dilute करावयाचे .याच्या दोन पद्धती. पहिली x किंवा D. यात दशमान पद्धती वापरली जाते. १ ग्राम औषध १० ग्राम पाण्यात विरघळवा, त्याची Power झाली 1 x किंवा 1D. आता हे औषध आणखी ९० ग्राम पाणी घालून १०० ग्राम करा. याला म्हणावयाचे 2 x. हे जास्त पॉवरफुल. पुढचे १००० मध्ये १ म्हणजे 3 x. दुसर्या पद्धतीत १० ऐवजी १०० धरा, म्हणजे १०० मध्ये १. त्याला म्हणतात 1C 2C म्हणजे १०० x १०० = १०००० मध्ये १. 3C म्हणजे १० लाखात १. आले लक्षात ? आता हे असे औषध साखरेच्या लहानशा गोळीवर शिंपडून तुम्हाला "औषध" म्हणून देतात. बहुतेक डॉक्टर तुम्हाला कोणते औषध , काय Power चे दिले सांगत नाहीत पण बाजारात विकत घ्यावयाला गेलात तर बाटलीवर लिहलेले आढळेल. 5C च्या पुढचे औषद इतके Diluted असते की ते पाण्यात नसतेच म्हटले तरी चालेल. काचेच्या बाटलीत ठेवलेल्या डिस्टिस्ड पाण्यात विरघळ्लेले क्षारच जास्त असतात. तेव्हा अशा पाण्यात तयार केलेल्या औषधाला काय म्हणणार ?
Hahnemann advocated 30C dilutions for most purposes (that is, dilution by a factor of 10 raised to60). In Hahnemann's time, it was reasonable to assume the remedies could be diluted indefinitely, as the concept of the atom or molecule as the smallest possible unit of a chemical substance was just beginning to be recognized. The greatest dilution reasonably likely to contain even one molecule of the original substance is 12C . असो
(२) होमी.चे औषध देण्याकरिता डॉक्टर दोन पद्धती अवलंबतात. एक औषध थोड्या थोड्या दिवसांनी द्यावयाचे. त्याचा परिनाम बघण्यासाठी. तर का ही जण औषध सातत्याने घेण्यास सांगतात. नक्की काय करावयाचे ?
(३) नवीन औषध गुणकारी आहे की नाही बघण्याकरिता ट्रायल घेतांना रोग्यांच्या कळपातील काही जणांना औषध नसलेले डोस देतात त्याला म्हाणतात .placebo . कल्पना अशी की रोग्याला आपण खरे औषध घेतो असेच वाटत असतांना काही फरक पडतो का ? निरनिराळ्या देशात, निरनिराळ्या काळी घेण्यात आलेल्या ट्रायल्समध्ये असे आढळून आले आहे की होमि. औषधे व placebo यांच्या परिणामात काहीही फरक नाही. जेथे फरक आढलला तेथे कारण पुढील प्रमाणे
One of the earliest double blind studies concerning homeopathy was sponsored by the British government during World War II in which volunteers tested the efficacy of homeopathic remedies against diluted mustard gas burns.[144]
No individual preparation has been unambiguously shown by research to be different from placebo.[5][145] The methodological quality of the primary research was generally low, with such problems as weaknesses in study design and reporting, small sample size, and selection bias. Since better quality trials have become available, the evidence for efficacy of homeopathy preparations has diminished; the highest-quality trials indicate that the remedies themselves exert no intrinsic effect.[16][49]:206[146] A review conducted in 2010 of all the pertinent studies of "best evidence" produced by the Cochrane Collaboration concluded that "the most reliable evidence – that produced by Cochrane reviews – fails to demonstrate that homeopathic medicines have effects beyond placebo
Health organisations such as the UK's National Health Service,[169] the American Medical Association,[170] and the FASEB[131] have issued statements of their conclusion that there is "no good-quality evidence that homeopathy is effective as a treatment for any health condition."[169]
(४)सिंचोनाच्या सालीने मलेरिआ बरा होतो म्हणून हनिमनने तशी साल स्वत: इंजेक्शनच्या रुपाने घेतली व त्याला मलेरिआ झाल्यासारखे परिNaaम दिसून आले. त्यावरून त्याने "law of similars " अथवा " like cures like " हा नियम घातला. या नियमाबदल
Hahnemann's law of similars is a postulate rather than a scientific law. असे म्हणता येईल.
(५) पुढील परिच्छेदाबद्द्दल मला काही बोलावयाचे नाही.होमि.चे पुरस्कर्ते प्रकाश टाकू शकतील काय?
Some modern homeopaths have considered more esoteric bases for remedies, known as "imponderables" because they do not originate from a substance, but from electromagnetic energy presumed to have been "captured" by alcohol or lactose. Examples include X-rays[68] and sunlight.[69] Some homeopaths also use techniques that are regarded by other practitioners as controversial. These include "paper remedies", where the substance and dilution are written on pieces of paper and either pinned to the patients' clothing, put in their pockets, or placed under glasses of water that are then given to the patients, as well as the use of radionics to prepare remedies. Such practices have been strongly criticised by classical homeopaths as unfounded, speculative, and verging upon magic and superstition
(६) water memory, डायल्युशन वर फार टीका होऊ लागल्यावर एक नवीन सिद्धांत मांडला गेला. पाणी औषध आपल्या स्मरणात ठेवते. नंतर कितीही डायल्युशन केलेत तरी, औषध शिल्लक राहिले नाही तरी, पाणी या स्मरणाने तुम्हाला गुण देते. तुम्हाला काय वाटते ते मला माहीत नाही पण मला तर हे बापू-बुवा-महाराज यांचे पाय धुतलेले पाणी "तीर्थ" म्हणून कसे गुणकारी असते याची खात्री देणार्या भक्तांचीच आठवण होते !
(७) होमि.मध्ये Miasms म्हणून एक भानगड असते. मला काही उलगडा झालेला नाही, प्रतिसादांमध्ये कोणी जाणकार प्रकाश पाडू शकेल काय ?
याचा अर्थ असा आहे का की होमिओपाथी सर्वस्वी निरुपयोगी आहे ? नाही, तसे नाही. तिचाही उपयोग काही दुखण्यात होतो. बर्याच वेळी दुखणी मानसिक असतात. म्हणजे रुग्णाला औषधाची नाही तर मानसिक सहानुभूतीची गरज असते. (पूर्वी तरी) होमिओपाथीचे डॉक्टर रुग्णाची चौकशी करावयाचे, थोडा वेळ का होईना त्याला आपल्याला विचारणारे कोणी तरी आहे याचे समाधान मिळावयाचे व एकदा डॉक्टरवर विश्वास बसला की त्याने दिलेल्या कोणत्याही गोळ्यांनी रुग्णाला बरे वाटावयाचे. रोग श्रद्धेनेच बरा व्हावयाचा. काही रोग सायक्लिक असतात.सुरवातीला कमी, मग जास्त , परत कमी. तुम्ही मधल्या वेळी गेलात तर अशा गोळ्यांनीच आपल्याला बरे वाटले असेही तुम्हाला वाटू शकते. सकाळमध्ये एका डागदरीणीने लिहले होते " एकदा राती उशिरा मला एक फोन आला. नेहमी येणार्या एका मुलीच्या वडिलांचा. त्यांनी गयावया केली म्हणून त्यांना घरी बोलावले. मुलीला तपासले, योग्य ते औषध लिहून दिले आणि त्यांना विचारले "आता रात्री तुम्हाला औषध कुठे मिळणार ?" ते म्हणाले, " औषध कोण आणणार ? आम्ही कधीच आणत नाही, तुम्ही तपासले की मुलीला बरे वाटते." घ्या !
फार वाढवण्य़ात अर्थ नाही. (६) व(७) वरून आता वाटू लागले आहे की होमि.चा उल्लेख शेवटच्या परिच्छेदात करावयाच्या ऐवजी एक नवीन तंत्र म्हणूनच करावयास पाहिजे होता. इति अलम ! (मुख्य स्रोत : विकिपेडिया )
शरद
प्रतिक्रिया
27 Sep 2014 - 1:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
"प्रचंड प्रमाणात डायल्युशन केले तर त्या द्रावणाच्या एक मिलीलिटर भागात औषधाचा एकही अणू शिल्लक नाही असे होऊ शकते" इतकाच एक छोsssटासा मुद्दा नजरेतून सुटलेला दिसतो आहे ! ;)
बाकी चालू द्या.
27 Sep 2014 - 1:18 pm | सुबोध खरे
पोटे साहेब
आधुनिक वैद्यकशास्त्र हि कुणाचीही मक्तेदारी नाही. कुणीही व्यवस्थित महाविद्यालयात शिकावे आणि व्यवसाय करावा. फक्त आधुनिक वैद्यकशास्त्रात न देता
माझा केलेले दावे मान्य होणार नाहीत. येथे बायको दाखव नाही तर जावई हो असे असते.
ट्रिचुरेशन हि प्रक्रिया घन पदार्थात मोठ्या प्रमाणावर करावी लागते द्रव पदार्थात नाही हे सामान्य ज्ञान आहे. चार थेंब शाईचे बादलीभर पाण्यात टाकून पहा. समर्थन करण्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ नये.
27 Sep 2014 - 4:03 pm | पोटे
ट्रिचुरेशन घन , द्रवासाठी होमिओपथिक डायल्युशन असते.
या दोन्ही गोष्टी पोटंटायझेशन याचा भाग अहेत.
डायल्युशन याचा अर्थ नुसतेच थेंबभर औस्शध मिस्सळणे नव्हे.
27 Sep 2014 - 1:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
ट्रायच्युरेशन एखाद्या घन पदार्थाचे लहान कण करण्याची अथवा त्याचे द्रवातले अणू एकमेकापासून वेगळे करण्यासाठी करायच्या क्रिया असतात... ट्रायच्युरेशन अणुंची मूळ संख्या बदलू शकत नाही किंवा एका अणूचे अनेक भाग करू शकत नाही. :)
कोणत्याही पदार्थाचा गुणधर्म दिसण्यासाठी / परिणाम होण्यासाठी त्याचा कमीत कमी एक तरी अणू आस्तित्वात असणे आवश्यक आहे, याबाबत दुमत नसावे !
26 Sep 2014 - 6:57 pm | आतिवास
भारत सरकारचं 'आयुष' नामक एक खातं आहे.
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी दुवा पाहावा.
26 Sep 2014 - 7:09 pm | प्रसाद१९७१
No individual preparation has been unambiguously shown by research to be different from placebo. The methodological quality of the primary research was generally low, with such problems as weaknesses in study design and reporting, small sample size, and selection bias. Since better quality trials have become available, the evidence for efficacy of homeopathy preparations has diminished; the highest-quality trials indicate that the remedies themselves exert no intrinsic effect A review conducted in 2010 of all the pertinent studies of "best evidence" produced by the Cochrane Collaboration concluded that "the most reliable evidence – that produced by Cochrane reviews – fails to demonstrate that homeopathic medicines have effects beyond placebo.
26 Sep 2014 - 7:10 pm | प्रसाद१९७१
हे लॉजिक तर मला फार आवडले
Furthermore, since water will have been in contact with millions of different substances throughout its history, critics point out that water is therefore an extreme dilution of almost any conceivable substance. By drinking water one would, according to this interpretation, receive treatment for every imaginable condition.[
26 Sep 2014 - 7:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
हैला ! हे अगोदर कसं नाही लक्षात आलं ?... कदाचित तेवढा विचारच केला नाही म्हणून असेल काय ?! ;)
26 Sep 2014 - 8:29 pm | सुबोध खरे
एक्का साहेब
मी मागे एका प्रतिसादात म्हटले होते कि शहराच्या पाणीपुरवठ्यातच तितके थेंब औषध मिसळा. म्हणजे फ्लूची किंवा डोळे येणे किंवा गास्ट्रो आणि तत्सम साथीवर उपचार करण्याची गरजच लागणार नाही. सर्वच लोकांना एकदम उपचार होतील. शिव्या ह्र्युद्या विकार कर्करोग इ वर पण उपचार होऊन जातील.
पण कदाचित होमियॉपथिच्या लोकांचे या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी साटेलोटे असावेत त्यामुळे कोणी असा विधायक विचार मनावर घेत नाहीत.
26 Sep 2014 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
तसे नाय हो !
"जगाच्या उत्पत्तीपासून (म्हणजे अगदी हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाण्याचा पहिला अणू तयार झाला तेव्हापासून) आतापर्यंत पाण्याचे अणू कित्येक इतर अणूंच्या संपर्कात आले आहेत. त्या सगळ्यांची जाणीव/आठवण्/गुणधर्म पाण्याने साठवली असेल तर त्या सर्व अणूंमुळे मानवी शरीरावर होणारे सर्व बरे वाईट परिणाम केवळ पाणी पिण्यानेच व्हायला पाहिजेत, नाही का?"
असा प्रश्न मनात आला !!! :)
29 Sep 2014 - 9:17 am | प्रसाद१९७१
मस्तच आयडीया.
26 Sep 2014 - 8:31 pm | सुबोध खरे
शिवाय हृदयविकार कर्करोग इ वर पण उपचार होऊन जातील.असे वाचावे
28 Sep 2014 - 12:02 pm | आनंदी गोपाळ
कितीदाही डोकेफोड केली, तरी होमिओपथीवाले 'बरे' होणार नाहीत.
वरतून अर्धवट
28 Sep 2014 - 12:06 pm | आनंदी गोपाळ
कितीदाही डोकेफोड केली, तरी होमिओपथीवाले 'बरे' होणार नाहीत.
वरतून अॅलोपथीचे शून्य ज्ञान असताना आम्ही डॉक्टर आहोत असे म्हणत आरोग्यमंत्र्यांना लाच देऊन अॅलोपथी औषधे वापरणार, व पेशंटचे नुकसान झाल्यावर "हा अॅलोपथीचा साईड इफेक्ट बरं का! आमच्या होमिओपथीत नस्तं असं काही" अशा थापा मारणार.
लोकांचंही मला एक कळत नाही. होमिओपथीची, रामदेवबाबाची औषधे घेऊन आजार बळावून जेव्हा अॅलोपथीकडे येतात, तेव्हा गुण लागला नाही तर मारामार्या अन केसेस करायला तयार असतात. होमिओपथीवाल्यांमुळे जीव जायची वेळ आली तर तिथे यांचा आवाज का निघत नाही?
29 Sep 2014 - 10:41 am | प्रसाद१९७१
ज्ञान तर शुन्य आणि त्याही पेक्षा ह्या होमिओ/आयु वाल्यांचा विश्वास नाही ना मॉडर्न मेडीसीन वर मग कशाला औषधे लिहुन देतात मॉडर्न मेडीसीन ची. किंवा शासना कडे भीक मागतायत की आम्हाला पण मॉडर्न मेडीसिन ची औषधे वापरायची परवानगी द्या म्हणुन.
कमीतकमी आपल्या तत्वाशी प्रामाणीक तरी रहा.
हे रोग्यांना पण लागू आहे. असेल होमिओ/आयु वर विश्वास तर काही झाले तरी खर्या डॉक्टर कडे जाउ नका.
29 Sep 2014 - 10:16 am | पिवळा डांबिस
मजा येतेय.
चालू द्या...
29 Sep 2014 - 12:14 pm | अनुप ढेरे
तुमचं काय मते होमिओपदी बद्दल? :)
29 Sep 2014 - 11:33 am | सौंदाळा
मिपावरील सप्त-चिरंजीवांपैकी एक होमिओपॅथी..
बाकी चिरंजीव अस्तिक-नास्तिक, पुणे-मुंबई, स्त्री-पुरुष, जातपात, राजकारण, गांधी-गोडसे
29 Sep 2014 - 11:38 am | गवि
शाका. मांसा .?????
गे लेस्बियन ?
लिव्ह इन ?
29 Sep 2014 - 12:01 pm | सौंदाळा
शाका-मांसा वर चर्चा झाली नाही बरेच दिवसात, तेच गे-लेस्बियनबाबत, लिव्ह्-इन मात्र सध्या हॉट आहे.
साली एकदा रणधुमाळी होऊनच जाऊ दे वरच्या विषयांबद्दल
गविबद्दलचा आदर दुणावला.
अभ्यासाला लागतो आता कसुन
29 Sep 2014 - 2:34 pm | मराठी_माणूस
एका जवळच्या नात्यातल्या तरुण मुलाला दोनदा वेगवेगळ्या कारणासाठी (एकदा कावीळ आणि एकदा ताप्)दोन वेगवेगळ्या अॅलोपॅथिक डॉ. कडुन जे उपचार (?) मिळाले , त्यांनी मुळ रोग बरा होणे बाजुलाच राहीले पण त्या औषधांचा प्रचंड त्रास झाला . ते सर्व मग आयुर्वेदिक उपचारानी निस्तरावे लागले
28 May 2020 - 7:56 pm | चौथा कोनाडा
कोविड-१९ च्या सध्याच्या अर्सेनिकम अल्बम ३०सी या होमिओपथी औषधाची प्रतिकारशक्तीवाढी साठी चर्चा सुरु आहे.
आपल्यापैकी कोणी हे औषध वापरून पाहिले आहे काय ? काही परिणाम जाणवले का ?