पुस्तक : सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू !

डांबरट's picture
डांबरट in जनातलं, मनातलं
21 Sep 2014 - 10:54 am

मेनन : संरक्षण मंत्री की परराष्ट्र मंत्री ! (माझ्या अभ्यासाप्रमाणे परराष्ट्राचा मंत्री)

आजचा म.टा. मधला सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू या पुस्तकावरचा लेख वाचला. हे पुस्तक मूलतः मेनन यांनी लिहिलेल्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. सामान्यतः आपल्याला या लेखाच्या नावावरून वाटतं की,कोण्या संरक्षण मंत्र्याने हे पुस्तक लिहिले आहे म्हणजे फार काहीतरी खळबळजनक खुलासे असणार.कारण सध्या राजकारणी, किवा तथाकथित नोकरशहा यांनी पुस्तकातून स्फोट करायचा धडाका लावलाय. पण तसे नाही.
कारण मेनन सध्या हयात नाहीत.

पण राहून राहून कोणाला न कोणाला नेहरू घराण्याबद्दल उमाळा येत असतो. (नेहरू आजच्या राजकारण्यापेक्षा हजार पटीने चांगले होते हे मी स्पष्ट करू इच्छितो असो.)
तर या पुस्तकातले हे मेनन, संरक्षण मंत्री कसे म्हणावेत ? कारण या लेखाचा पहिल्याच उताऱ्यात लिहिलेल्या प्रसंगाबद्दल याच मेनन यांनी नेहरूंना खोटा आणि तथाकथित छान छान अहवाल दिला,नेहरूंचे जवळचे मित्र म्हणून नेहरूंनी पण अहवाल खरा आहे असा समज करून घेतला.

या अहवालानंतर विरोधी पक्ष शांत झाले खरे पण त्यानंतर काही दिवसातच भारत - चीन युद्ध पेटले. असा हा आपला संरक्षण मंत्री युद्ध सुरु झाल्यावर आजारपणाच्या रजेवर गेला. चीन युद्ध २० ऑक्टोबर ला सुरु झाले आणि २१ नोव्हेंबर ला संपले, व्ही के कृष्ण मेनन यांनी संरक्षण मंत्रिपद ३१ ऑक्टोबर ला सोडले.म्हणजे भारताला ऐन लढाईत ढकलून.त्यानंतर तारणहार बनला महाराष्ट्राचा शेर यशवंतराव चव्हाण.
या धक्क्यातून नेहरू सावरले नाहीत आणि खंगत गेले,वारले. !
असा हा पळपुटा संरक्षण मंत्री. मला आश्चर्य आहे कि, हेन्डरसन ब्रूक रिपोर्ट आता तरी जाहीर का नाही करत ? कदाचित नेहरू - गांधी घराण्याचं वलय अजून तसंच आहे.

स्पष्टीकरण : या लेखाद्वारे मला कोणताही पक्षाला पाठींबा द्यायचा उद्देश नाही. यावर आपल्या प्रतिक्रया याव्यात हि इच्छा.

इतिहाससमीक्षा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

21 Sep 2014 - 2:26 pm | टवाळ कार्टा

मी पयला...मिपावरचा १ अजरामर विषय...बघुया १००+...२००+ की ३००++

पाषाणभेद's picture

21 Sep 2014 - 4:36 pm | पाषाणभेद

मीच पयला होणार होतो पण लाजेस्तव झालो नाही.

सवंगडी's picture

21 Sep 2014 - 5:02 pm | सवंगडी

हि पुस्तकं नेमकी वेळ साधून बाहेर येतात कशी ?
तुमच पण टायमिंग जमलय हो !
पं. नेहरू यांच्या बद्दल काय बोलावे ?

सवंगडी आमच्या टायमिंगच सोडा. पण अशी पुस्तकं बरोब्बर बाजारात आणण्याला मार्केटिंग स्किल म्हणतात.
आणि मोठी मोठी नावं घेतली कि भारदस्तपणा पण असावा

तुम्ही पुस्तक वाचून हे लेखन केले? की बातम्याच्या आधारे?

डांबरट's picture

22 Sep 2014 - 9:20 am | डांबरट

मी हे पुस्तक आजून वाचलेले नाही. पण याबाबतचा सगळा इतिहास मात्र वाचला आहे.
आणि वृत्तपत्रात आलेला कालचा जाहिरात वजा परिचय पुरेसा आहे स्पष्टता येण्यासाठी.

सवंगडी's picture

22 Sep 2014 - 9:27 am | सवंगडी

नेहरूंचे सिलेक्टेड वर्क्स ब-याच लोकांना माहिती आहेत.

या प्रश्नाचं उत्तर हे,"साहेब, मारूती कांबळेचं काय झालं?"
या प्रश्नाइतकंच गूढ आहे....
कॉन्ग्रेस सरकार तर कधी हा रिपोर्ट प्रकाशित करणार नव्हतंच!
असो. आता कॉन्ग्रेसेतर सरकार स्थापन झालं आहेच. असेल त्यांच्यात दम तर करील हा रिपोर्ट प्रकाशित...
नाहीतर 'उडदामाजि काळे गोरे' हेच खरं...

सवंगडी's picture

22 Sep 2014 - 4:27 pm | सवंगडी

मारुती कांबळे ! हा कोण हो ? अन त्याच काय झालं ते झालं …
आणि त्याच धर्तीवर हा हेन्डरसन ब्रुक कोण ? अन त्याचा रिपोर्ट कशाला घरी घेऊन गेले हे कोन्ग्रेसी ??
च्यायला बोउन्सरच बाउन्सर !

प्यारे१'s picture

22 Sep 2014 - 5:04 pm | प्यारे१

अरे ये पीएसपीओ नही जानता!

सामना हा मराठी चित्रपट पहावा.

एस's picture

22 Sep 2014 - 5:28 pm | एस

निळू फुल्यांच्या स्मरणार्थ वृत्तपत्रात मागे एक लेख आला होता. त्यातील एक आठवण ही 'सामना'शी संबंधित होती. मला वाटतं ह्या चित्रपटाचं चित्रीकरण हे आळेफाटा की बेल्हे की राजूर वगैरे कुठल्याश्या भागात झालं होतं. तिथल्या गावात तो सीन चित्रित होणार होता. निळू फुलेंचा वेश पुढार्‍याचा, पांढर्‍या शुभ्र कपड्यांचा असला तरी प्रत्यक्षात त्यांचे कपडे नीळ घालून निळे रंगवले होते कारण सिनेमा कृष्णधवल होता. सभेचे दृश्य होते. मंडप उभारलेला, गर्दी जमलेली, निळूभाऊ भाषण द्यायला उठतात, सुरू करतात आणि तेवढ्यात खालच्या गर्दीतूनच कोणीतरी ओरडतं, "मारूती कांबळेचं काय झालं?" एकच कोलाहल माजतो.

अशा रीतीने तो सीन चित्रित झाला. अगदी खरा वाटावा असा.

(वरील तपशील आठवणींच्या भिस्तीवर लिहिला असल्याने तपशीलात चुका असू शकतात. मूळ लेख मला वाटतं रामदास फुटाण्यांचा होता.)