गाढव ऐकेना, गाढव समजेना

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जे न देखे रवी...
18 Sep 2014 - 10:58 pm

गाढव ऐकेना, गाढव समजेना
गाढवा उसंत नाही, खिंकाळण्याचे थांबेना.
गाढव ऐकेना ऽऽ ।

_______________________
डकवी अल्बमचे फोटो, शोभा साइटची होई
फुकटचा घेतला कुणी गावात रे?
काय गाढवाला नै ऐडिया?
आयडी जाईल नको गमजा.
होईल गोची, ढिंगटांग-ढिंगटांग,
ढिंगटांग-ढिंगटांग ढींग ।

गाढव ऐकेना ऽऽ ।
________________________

हे फुकटचे आंगण, आम्हा लाभे जैसे आंदण रे
नको पडू उताणा इथे-तिथे रे
हसती सूज्ञ तुला सारे, आप्त टाळ्या पिटता रे
नको झाडू दुगाण्या नित्य-नेमे रे.
आले मालक वाट पाहून, बघते गाढव मागे वळून,
कोण तू कुठला? पळाले आप्तजन रे.
आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आ ।

मार्गदर्शनमांडणी

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

18 Sep 2014 - 11:02 pm | सुहास..

=)) =))

ही मस्त काव्य-जुगलबंदी चालु आहे ...

किसन शिंदे's picture

18 Sep 2014 - 11:04 pm | किसन शिंदे

या असल्या स्कोर सेटल करणार्‍या धाग्याची तुमच्याकडून अपेक्षा नव्हती संजयजी.

संजय क्षीरसागर's picture

18 Sep 2014 - 11:36 pm | संजय क्षीरसागर

जो आयडी गेला तरी `ना खंत ना खेद' इतकी फालतू स्टेक आहे, त्यामागच्या व्यक्तीला कसा जोडा हाणावा अशी अपेक्षा आहे?

किसन शिंदे's picture

18 Sep 2014 - 11:55 pm | किसन शिंदे

मुळात जोडा हाणावाच कशाला हा प्रश्न पडतोय मला संक्षी साहेब. समोरच्याने पातळी सोडली तरी आपण सोडू नये असं नाही का वाटत तुम्हाला? तुमच्यासारख्या सूज्ञ माणसाने एका गाढवाच्या नादी लागून असलं काही लिहिणे माझ्यासारख्याला पटले नाही. साॅरी!! आणि हे लिहिताना मला तुमचे जुुने चांगले लेख आठवताहेत.

संजय क्षीरसागर's picture

19 Sep 2014 - 12:25 am | संजय क्षीरसागर

आणि जे पोस्टवर जमत नाही म्हणून तिथे जाऊन स्कोर सेटल असतील तर माझी बाजू मांडायला लेखनाशिवाय दुसरा पर्याय राहात नाही.
तुम्हाला माझं चांगलं लेखन स्मरतंय याचा आनंद आहे पण तशा लेखनाची अपेक्षा करतांना सदस्य टार्गेट केला जातोयं का हे पाहणं देखिल गरजेचं आहे असं मला वाटतं.

पुण्याचे वटवाघूळ's picture

19 Sep 2014 - 9:44 am | पुण्याचे वटवाघूळ

सदस्य टार्गेट केला जातोयं का हे पाहणं देखिल गरजेचं आहे असं मला वाटतं.

ही अपेक्षा इतरांकडून करण्यापूर्वी त्याच्या १% विचार तुम्ही स्वतः केलात तर असे का होते हे समजून यायला हवे. मिसळपाववर इतके सदस्य आहेत पण दरवेळा तुम्हीच का टार्गेट होतात? कारण इतर कोणीही सदस्य अन्य सभासदांच्या बुध्दीवर/ विचारशक्तीवर/ आकलनशक्तीवर कमेन्ट करत नाही.बाकी काहीही माणूस एकवेळ सहन करेल पण सतत आपली अक्कल काढली गेल्यास ते मात्र कोणीच सहन करणार नाही.

अर्थात तुमच्यासारख्या महान विद्वान तत्ववेत्त्याला काय बोला?असे लोक समाजात असतात आणि मिसळपावही त्याच समाजाचे प्रतिबिंब आहे त्यामुळे असे लोक तिथेही अ॑सणारच ही बेशर्त स्विकृती मात्र कधीच केली आहे.

तो कृपया दूर करा.

आता याच पोस्टचं उदाहरण पाहा. मी आपणहून कधीही कुणाची कुरापत काढत नाही.

या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला, (पण मी त्यापेक्षा सवाई निघालो आणि बाजी उलटवली तो भाग सोडा!). त्यांची इथली संपूर्ण वाटचाल पाहा, फक्त माझ्या मनःपूर्वक लिहीलेल्या लेखांवर भंपक फोटो डकवून, असंबद्ध प्रतिसाद (इथे निर्बुद्ध म्हंटल तर पुन्हा पंचाईत!) टंकण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आणि प्रोत्साहन कुणाचं तर मान्यवरांचं! (अर्थात व्यक्तिगत आयडी वापरुन, म्हणजे करुन-सावरुन पुन्हा सेफ!)

वैध मार्गानं मी प्रकरण वरपर्यंत नेलं तर सल्ला असा की दुर्लक्ष करा. म्हणजे बाकी सर्वांनी मला कॉर्नर करा आणि मी मात्र मोठेपणा घ्या. आता यांच्या गर्दभलीलांना टाळ्या पिटणारे कोण तर ज्यांना स्वतःच्या पोस्टवर (माझा) प्रतिवाद करता आलेला नाही ते सगळे! मग मी जर म्हटलं `गाढवावर बसून युद्ध जिंकता येत नाही, थोडा तरी प्रामाणिकपणा ठेवा', तर पुन्हा अपमान केल्याचा रुसवा.

तर सारांश काय? मी कधी कुणाच्या वाटेला जात नाही पण संगनमत आणि कंपूबाजीनं कुणी मला घेरण्याचा प्रयत्न केला तर, मी एकटा पुरेसा आहे. अर्थात, माझा आयडी परावलंबी असला तरी अपमानापुढे त्याची मला किंमत नाही.

बाळ सप्रे's picture

19 Sep 2014 - 1:26 pm | बाळ सप्रे

वैध मार्गानं मी प्रकरण वरपर्यंत नेलं तर सल्ला असा की दुर्लक्ष करा.

मलाही तोच सल्ला योग्य वाटतो..
आपल्या हिरिरीने एखाद्या मुद्द्याच्या प्रतिवाद करण्याच्या गुणाचं कौतुक वाटतं. वैयक्तिक हल्ल्यांकडे दुर्लक्ष हाच उपाय सर्वोत्तम वाटतो. शेवटी अशा वादात जय पराजय नसतो. काथ्याकूटात काय घ्यायचय काय सोडायच ते प्रत्येक जण आपापलच ठरवणार .

तुमच्या प्रतिसादातच उत्तर आहे. तुम्हाला जर माहिती आहे की तुम्ही सवाई आहात, पुरुन उरणारे आहात तर मग येवढा काव्यप्रपंच कशासाठी? तुम्ही चिडावेच अशासाठी जर सगळं चाललंय हे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चिडलायेत हे दाखवून त्यांचे प्रयत्न यशस्वी केलेत.

हल्लीच वाचण्यात आलेलं वाक्य:

Keep smiling - it makes people wonder what you've been up to..

हा माझ्याबद्दल हेतुपुरस्सर पसरवलेला गैरसमज आहे,

का हो पण, सगळेच जण का हो तुमच्याच बद्दल हे असे गैरसमज पसरवतायत?

संजु काका किसन काका म्हणताय्त ते मलाहि पटतय ... वर आणखी एक गोष्ट ...
कि तुम्ही हाणलेला जोडा गाडवाने पळ्वुन नेला तं तुम्ही दुसर्या जोड्याचे काय बरे कर्णार ??
हाणायचेच आहे तर जोडे हाणा ... फक्त जोडा नको ...

:-/

आणि हो हि वरची पोस्ट लिहिताना मला तुमचे दंगे घातलेले लेख आठवतायत बरं का !! ...

प्रचेतस's picture

18 Sep 2014 - 11:05 pm | प्रचेतस

=))

आनन्दिता's picture

18 Sep 2014 - 11:06 pm | आनन्दिता

=))

काउबॉय's picture

18 Sep 2014 - 11:15 pm | काउबॉय

मज्या आहे

पैसा's picture

18 Sep 2014 - 11:47 pm | पैसा

+१

धन्या's picture

18 Sep 2014 - 11:16 pm | धन्या

गाढवावर सलग दुसरा धागा :(
शेवटी व पू काळेंनी लिहीलंय तेच खरं.

"माणसाबद्दल एकच गोष्ट ठामपणे सांगता येते की माणसाबद्दल काहीच ठामपणे सांगता येत नाही. "

काउबॉय's picture

18 Sep 2014 - 11:57 pm | काउबॉय

मग गाढवाला वाटले की ते कवी झाले मग त्याने कविता लिहली का अथवा त्याकवितेवर कोणी कोणी हजेरी लावली यावर नो कमेंट्स.

अखेरचा हा तुला दंडवत च्या चालीवर म्हणायचं का?

चाफा बोलेना रे मेल्या.. :-)

दंडवत कुठला हिते?

सूड's picture

18 Sep 2014 - 11:38 pm | सूड

मी तर जीवलगा राहिले दूर घर माझे, शिट्टी वाजली आणि डोंगराचे आडून एक बाय चांद उंगवला अशा तीन चालीवर म्हणून पाह्यलं !!

गवि's picture

18 Sep 2014 - 11:45 pm | गवि

__/\__

मी हाय कोली , एकविराआई तू डोंगरावरी आणि दिवस तुझे हे फुलायचे .. हे नाही केलेस वाट्टे.. ;-)

पैसा's picture

18 Sep 2014 - 11:49 pm | पैसा

सुखकर्ता दुखहर्ता नायतर दत्ता दिगंबरा या हो कसे वाटेल?

झालंच तर स्वकुलतारक सुता, नाथ हा माझा हे पण ट्राय करायला हरकत नाही

बॅटमॅन's picture

19 Sep 2014 - 12:47 pm | बॅटमॅन

'स्वकुलतारक सुता' हे शब्द बाकी 'ओ मेरी जोहर जबी' च्या चालीवर फिट्ट म्हंटा येतात बगा.

विजुभाऊ's picture

20 Sep 2014 - 3:54 pm | विजुभाऊ

ब्याट्या हे मी " पदोपदी अपार असती पुण्याच्या राशी.धन्य धन्य हो प्रदक्षणा.." या चालीवर म्हणून बघितले

पदोपदी अपार असती पुण्याच्या राशी.धन्य धन्य हो प्रदक्षणा..

ही नेमकी काय भानगड आहे? अमच्या सोसायटीत दिवाळीनंतर जवळपास महिनाभर रोज सकाळी प्रदक्षिणा धन्य होत असते. झोपेचे खोबरे होते पार.

संजय क्षीरसागर's picture

19 Sep 2014 - 12:56 am | संजय क्षीरसागर

गाढव खिंकाळले का हो?
स्वतःची बसली, स्वतःला हो |

आयडीची वाट लागली हो
आता लागा कामाला हो |

झक अशी मारली का हो?
बावळ्या लपूनी पाहातो हो |

फुंकले किती तू उकिरडे
बहुविध उपद्व्याप केले
जनाचे खाऊन उष्टे-माष्टे
शेपूट हलते का पाहे
पुढचा कुठला आयडी रे?
पुरता पोपट झाला हो |

जल्लां मस्त लिवतांय ओ, आनी येक लिवाच!!

हाण्तिच्या ... वन्मोअर जोडा =))

संजय क्षीरसागर's picture

19 Sep 2014 - 1:19 am | संजय क्षीरसागर

याला कामकाज बहुत
ओझी वाहातो कुठ पर्यंत
आयडी जौंदे नाही खंत
गाढवा नांवे अनंत
आता याची करुणा येऊ द्या हो
याला बाहेर जाऊं द्या हो |

तोडीस तोड आहे काव्य,संक्षी!!

होकाका's picture

18 Sep 2014 - 11:55 pm | होकाका

हसती सूज्ञ तुला सारे, आप्त टाळ्या पिटता रे

=))

खटपट्या's picture

19 Sep 2014 - 12:15 am | खटपट्या

चांगलंय !!

यशोधरा's picture

19 Sep 2014 - 1:05 am | यशोधरा

संक्षी, तुम्ही कोणाला उद्देशून लिहिताय वगैरे माहित नाहीये, पण विडंबनं खरंच मस्त आहेत!

संजय क्षीरसागर's picture

19 Sep 2014 - 1:47 am | संजय क्षीरसागर

पेटला प्रतिसाद वणवा
गाढवा कैसा सोसावा
वेड लागेल नैतर काय
लॉगीन नको करायाला
आयच्या गावात गेला हो
स्वामी याला वाचवा हो

बावळ्या कुठे खेटतो हो
डाँकी फंकी झाला हो
झाला दिगंबर पाहा हो
स्वामी याला वाचवा हो |

जाऊंद्या ओ संक्षि, कायतरी लेखमाला सुरु करा पाहु

अत्रुप्त आत्मा's picture

19 Sep 2014 - 8:35 am | अत्रुप्त आत्मा

@जाऊंद्या ओ संक्षि>>> सर... <--- हे र्‍हायलं की रे पां डुब्बा! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

@कायतरी लेखमाला सुरु करा पाहु>>> याला मात्र +++१११

शहाण्याच्या शहाणपणाला
शहाण्याच्या शहाणपणाला
गाव हे सारं हासतंय
गाव हे सारं हासतंय

हॉ आ हॉ आ हॉ आ हॉ आ
बघ बघ बघ सखे कसं गाढव हे नाचतंय

* कुठल्या गाण्याच्या चालीत म्हणावे हे माहीती करुन घेण्यासाठी व्यनि करावा.

काउबॉय's picture

19 Sep 2014 - 12:29 pm | काउबॉय

वाटते आहे

धन्या's picture

19 Sep 2014 - 1:39 pm | धन्या

ह्या ह्या ह्या.
भलतेच राव हुशार तुम्ही. :)

रच्याकने, तुम्ही गुरे राखायला/वळायला/चारायला जायचेत काय?

मिटू लिस्टन ओवर वाइड स्पेक्ट्रम... असे म्हणु शकता :)

जेनी...'s picture

19 Sep 2014 - 8:46 am | जेनी...

बाव्चळ्ळेत सगळे =))

अनुप ढेरे's picture

19 Sep 2014 - 9:16 am | अनुप ढेरे

__/\__
एक नंबर संक्षी!!

कंजूस's picture

19 Sep 2014 - 9:21 am | कंजूस

एका कोपऱ्यात पडलेल्या डबड्याने उधळलेलं गाढव पाहिलं. मी इकडे पडून आहे असं उधळायला आणि खिंकाळायला मिळालं तर किती मजा येईल? पुढे ---

गाढव ते गाढवच शेवटी,दुसर्याने टाकलेल ओझ वाहुन नेण्यापरीस काही जमत नाही.
मग ते परटान टाकलेल्या ओझाच असो की कुभांराने टाकलेल्या मातीच असो की कुणाच्या विचारच. फक्त ओझ वहायच काम करत.

पन त्ये गाडाव ग्येलं कुटं ?

पण गाढवानं काहीही सोंग घेतलं तरी तोंड उघडलं की समजणारच.

सौंदाळा's picture

19 Sep 2014 - 11:05 am | सौंदाळा

संक्षींचा स्ट्राईक रेट निराकार गाढवापेक्षा जास्त आहे.
निराकार गाढव : २८
संक्षी : नॉट आउट ४०

संजय अंकल गाढवाशी स्पर्धा करत नाहीयेत हो. :(

किसनद्येव सुधा संजय अंकलना हेच हेच सामजावु पहात आहेत. पण...

काउबॉय's picture

19 Sep 2014 - 12:43 pm | काउबॉय

यावर विश्वास बसत नसावा वाचकांचा....

दिनेश सायगल's picture

19 Sep 2014 - 12:02 pm | दिनेश सायगल

निराकार गाढव नावाच्या आयडीनं आपले गुर्जी कोण ते आजपर्यंत कवाच सांगितलं नाही. कोण बेचारा एकलव्य आहे कोणजाणे!

पण तुम्ही कशाला कोणा गाढवाच्या पाठी काठी घेऊन लागताय! शहाण्यासुरत्या माणसाला हे बरं दिसत नाही. हे सगळं वाचून तेन्नालीराम आणि पंडित व्हायची इच्छा असलेल्या माणसाची कथा मात्र आठवली!

कवितानागेश's picture

19 Sep 2014 - 12:13 pm | कवितानागेश

=))

तेन्नालीराम आणि पंडित व्हायची इच्छा असलेल्या माणसाची कथा मात्र आठवली

कंची वो ? आमाला सांगा की. :) थोडक्यात तरी..

पैसा's picture

20 Sep 2014 - 1:31 am | पैसा

मला तरी बिरबल आणि पंडिताची गोष्ट माहिती आहे. ही तीच का ते माहिती नाही.

एका ब्राह्मणाला काही विद्या नव्हती पण आपल्याला सर्वांनी पंडित म्हणावे असे त्याला वाटे. मग तो बिरबलाला भेटला आणि म्हणाला की मला लोकानी पंडित म्हणावेसे वाटते. मग बिरबल म्हणाला की तुला जे पंडित म्हणून हाक मारतील त्याना तू दगड मार. मग बघ काय होते ते. तो ब्राह्मण बाहेर गेल्यावर बिरबलाने त्याच्या गल्लीतल्या लहान मुलांना बोलावून सांगितले की अमूक एक ब्राह्मण आहे त्याच्या मागे पंडित म्हणत धावा आणि मजा बघा.

याच्या पुढची गोष्ट सांगायला पाहिजे काय?

स्पा's picture

20 Sep 2014 - 1:32 am | स्पा

=)) भारि

धन्या's picture

20 Sep 2014 - 1:33 am | धन्या

>> याच्या पुढची गोष्ट सांगायला पाहिजे काय?
सांगा. होऊदया खर्च, मिपा आहे घरचं. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Sep 2014 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

फुल टू धमाल चाललीय ! मिपावर आम्ही टिकून आहोत ते अश्याच मनोरंजनामुळे !

आता निराकार गाढवाच्या उत्तराची वाट पाहतोय ! ;) =))

प्रसाद गोडबोले's picture

19 Sep 2014 - 12:36 pm | प्रसाद गोडबोले

मलाही एक गाणे सुचत आहे

एका मिपात होती घोडी पिल्ले सुरेख , होते सर्वज्ञ वेडे गाढव तयात एक ...

वेळ काढुन लिहिले पाहिजे =))

gaaDhav

चला तुमची पण हौस पुरी करतो :

एका गावात होती, टोपणे-बुचे अनेक
होते बाईल वेडे, उल्लू तयांत एक ॥

घेऊन आयडी बाईचा, खेळावयास आले
लाजूनी मुरकुनी ते कोणास नादी लावे
होताच वस्त्रहरण, म्हणती हसून लोक
आहे असाच पपलू, हा आमच्यात एक |

प्रसाद गोडबोले's picture

19 Sep 2014 - 1:14 pm | प्रसाद गोडबोले

टग्या , भूत , विनम्र , प्रगो , पंत , गिरीजा , मोहीनी , काका इत्यादी माझे ड्यु आयडी आहेत . नोट करुन ठेवा म्हणजे सारखी सारखी गिरीजा ह्या एकाच आयडी वर ठेच लागणार नाही =))

दोघांना आणि त्या निमित्ताने गाढव आदि सर्वच जणांना मनापासून प्रश्न:

असे ओरबाडाओरबाडी करण्यात खुद्द स्वत:ला आनंद सुख मिळते का? मनाला लागले म्हणून प्रतिहल्ले होतात ना?

स्वत:ला त्रास सोसून इतरांना मजा पाहू देणे यात आनंद आहे का?

धागे अप्रकाशित करण्याच्या कामात संपादकांना आनंद वा इंसेंटिव्ह आहे का ?

सगळी उत्तरे "नाही" अशी असावीत..

मग हे धागे आणि हिशोब टाळता येणार नाहीत का?

बाकी काय बोलणार ?

लोकांच्या 'मनोरंजना'चं व्रत घेतलेल्यांना काय सांगायचं गवि?
शब्दाचा मार शहाण्या लोकांसाठी असतो.
यातुन कुणी शहाणं झालं तर आनंदच आहे.

प्रसाद गोडबोले's picture

19 Sep 2014 - 1:48 pm | प्रसाद गोडबोले

नमस्कार गवि काका !

इथे माझं , रादर कोणाचंच संक्षींशी वैयक्तिक भांडण नाहीये . (एक्वेळ तर अशी होती की मी संक्षींच्या लिखाणाचे फॅन होतो , परवा मेल चाळताना माझ्या लक्षात आले ... २००९ मध्ये माझ्या मित्राने मला लिहिलेल्या एका मेल मधे "संक्षी उत्तम लेखन करतात ते आवर्जुन वाच" असा उल्लेख आहे )

पण सध्या संक्षींचा मी एक्की मी , मी दुणे आम्ही , मी त्रिक भास , मी चोक निराकार , मी पंचे सर्वज्ञ हा पाढा लक्षात आल्याने फार हसु येते , मग कोणीतरी निराकार गाढव त्यांना डिवचते अन संक्षी दुर्लक्ष करायचे सोडुन परत मी चा पाढा सुरु करतात , हे सारे पहायला लय मजा येते राव . मग आम्ही कधी कधी त्याला हातभार लावतो =))
तुम्हीही कधीतरी ट्राय करुन पहा , मी चा पाढा लय भारी आघे राव ... आधीचे पाढे वाचयचे असल्यास सांगा लिंका पाठवतो ;)

हा प्रतिसाद भास आहे . प्रतिसाद असे काहीच नसते . मी कधीच चुकत नसतो अन आजपर्यंत कोणीच माझ्या मताचे खंडन करु शकले नाहीये . =))

बॅटमॅन's picture

19 Sep 2014 - 2:25 pm | बॅटमॅन

प्रगोशी सहमत!!!!

मीच काय तो सर्वज्ञ असे अ‍ॅटिट्यूड घेतल्यानेच लोकं चेकाळली. एकट्या संक्षीला का टार्गेट करता म्हणण्यापेक्षा तो पाढा बघा म्हणावं अगोदर नीट.

संजय क्षीरसागर's picture

19 Sep 2014 - 2:08 pm | संजय क्षीरसागर

मूळ धागा प्रकाशित होऊन कायम राहणं याचा अर्थ तो धोरणात बसतो असा होतो. थोडक्यात, त्यात काहीही व्यक्तिगत नाही असा निर्वाळा दिला जातो. मग त्यावर प्रत्युत्तर आल्यावर मान्यवरांना झळ पोहोचली की दोन्ही धागे डिलीट होतात (असा मागच्या पोस्टचा अनुभव आहे). तुम्ही सदस्यात डिस्क्रीमिनेट करा असं म्हणणार नाही पण लेट ऑल हॅव अ‍ॅन इक्वल चान्स. जर मूळ धागा `ओरबाडी' वाटत असेल तर तो प्रकाशित व्ह्यायला नको होता. आणि उत्तर देण्यात मला काय आनंद मिळणार? मी फक्त उत्तर देऊ शकतो इतकंच दाखवून दिलंय.

म्हणूनच तर माझ्या प्रश्नात गाढवालाही इन्क्लूड केलंय ना.

नुसते नियमात बसणे आणि राहणे हा भाग पूर्ण वेगळा आहे. आणि अप्रकाशित होणे हाही भाग एकाच एका फॅक्टरवर अवलंबून नसतो. ते जाऊ दे.

मुळात कोणीच असे धागे / प्रतिसाद देण्याविषयी प्रश्न होता.

म्हणजे तुम्ही हाणा आणि मी ऐकून घेऊ? अरे मूळ पोस्ट जर प्रकाशित झाली तर उत्तर येणारच.

आणि हे बर्‍याच पूर्वीपासून चालू आहे. मी वर म्हटलंय :

या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला, (पण मी त्यापेक्षा सवाई निघालो आणि बाजी उलटवली तो भाग सोडा!). त्यांची इथली संपूर्ण वाटचाल पाहा, फक्त माझ्या मनःपूर्वक लिहीलेल्या लेखांवर भंपक फोटो डकवून, असंबद्ध प्रतिसाद (इथे निर्बुद्ध म्हंटल तर पुन्हा पंचाईत!) टंकण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आणि प्रोत्साहन कुणाचं तर मान्यवरांचं! (अर्थात व्यक्तिगत आयडी वापरुन, म्हणजे करुन-सावरुन पुन्हा सेफ!)

जर अ‍ॅक्शन घ्यायची असती तर केव्हाच घेतली असती असा कुणाचाही निष्कर्श निघणार नाही का?

या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला ,

हे जरा विस्कटून सांगता का ? निराकार गाढव हे जे काही आहे त्याने आपली खिल्ली कशी काय उड़ते ?

संजय क्षीरसागर's picture

19 Sep 2014 - 2:13 pm | संजय क्षीरसागर

असं म्हणणारे, मूळ पोस्टवर प्रतिसाद देतांना सारासार करु शकत नव्हते का याचाही विचार कर.

विवेकपटाईत's picture

19 Sep 2014 - 8:37 pm | विवेकपटाईत

एक संस्कृत म्हण आठवली. दहा पुत्र असले तरी गाढवाला ओझे उचलावे लागते. एक पुत्र असलेला सिंह जंगलाचा राजा असतो. .

विवेकपटाईत's picture

19 Sep 2014 - 8:38 pm | विवेकपटाईत

एक संस्कृत म्हण आठवली. दहा पुत्र असले तरी गाढवाला ओझे उचलावे लागते. एक पुत्र असलेला सिंह जंगलाचा राजा असतो.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Sep 2014 - 6:01 pm | अत्रुप्त आत्मा

एका गावात होती, टोपणे-बुचे http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif अनेक
होते बाईल वेडे, उल्लू तयांत एक ॥

घेऊन आयडी बाईचा, खेळावयास आले
लाजूनी मुरकुनी ते कोणास नादी लावे
होताच वस्त्रहरण, म्हणती हसून लोक
...............http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif
आहे असाच पपलू, हा आमच्यात एक |
===========
http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif

भिंगरी's picture

19 Sep 2014 - 1:38 pm | भिंगरी

लई भारी लिवलय प्रगो भाऊ

बॅटमॅन's picture

19 Sep 2014 - 12:48 pm | बॅटमॅन

बेशर्त स्वीकृती कुठल्या ***च्या **त गेली???????? सॉरी हं निराकारभौ. भाषेतला प्रचलित वाक्प्रचार म्हणून वापरलं, नायतर आम्ही तुमचे लय मोठ्ठे (५ वर फिरणारे) फॅन हाओत.

पण निव्वळ काव्यमूल्य पाहिलं तर ठीक आहे =))

रामपुरी's picture

20 Sep 2014 - 1:59 am | रामपुरी

पाढा हाय

मी एके मी
मी दुणे मी
मी त्रिक मी
....
...
...
...

प्रतिसाद बघा लेख बघा सगळीकडे "मी"च आहे.
"तो मीच"

पुण्याचे वटवाघूळ's picture

20 Sep 2014 - 11:48 am | पुण्याचे वटवाघूळ

प्रतिसाद बघा लेख बघा सगळीकडे "मी"च आहे.
"तो मीच"

+१. याच कारणामुळे तर आपल्या गुरूजींना सगळे टार्गेट करत असतात.पण मीपणाचा चष्मा सतत लावल्यामुळे ते त्यांच्या लक्षात येत नाही. ठिक आहे. आपले काय जाते निराकार गाढव आणि गुरूजींमधली जुगलबंदी बघायला? :)

संजय क्षीरसागर's picture

20 Sep 2014 - 3:50 pm | संजय क्षीरसागर

तरी म्हटलं बोथट सुरी अजून कसे उगवले नाहीत! कारण माझ्याविरोधात काही लिहीलं गेलंय आणि वेळात वेळ काढून हे आले नाहीत असं अद्यापी कधी झालेलं नाही. बाकी कुठे न का देईना, अशा वेळी ते प्रतिसादाचा हक्क हमखास बजावणार!

बाय द वे, `मी' हे मराठीतलं सर्वनाम आहे. तुम्हाला कंटेंटपेक्षा `मी' आला की पुढचं दिसेनासं होतंय बहुदा. तुमच्या प्रश्नाला पहिला प्रतिसाद यथोचित दिला होता (तो सोईस्करपणे सोडून दिलायं). काही हरकत नाही, आता स्वतःबद्दल लिहीतांना, कोणतं सर्वनाम वापरतात ते सांगा.

आणि मला एक कळत नाही, एका उपद्रवी आयडीला पाचर बसल्यावर इतरांना इतकी व्याकूळता का येतेयं?

जयंत कुलकर्णी's picture

19 Sep 2014 - 10:34 pm | जयंत कुलकर्णी

प्रतिसाद वाचणे आणि त्यावर विचार करुन एकमेकांस घायाळ करणारे प्रतिसाद लिहिणे यात किती वेळ जात असेल याची कल्पना केलेली बरी......यातून कोणाला काय आनंद मिळतो हा एक संशोधनाचा विषय ठरावा....सगळ्यांना नम्र विनंती की यात वेळ व बुद्धी वाय घालवू नये..........बघा पटले तर !

स्पा's picture

19 Sep 2014 - 11:16 pm | स्पा

यु सेड इट

दशानन's picture

19 Sep 2014 - 11:21 pm | दशानन

+१

तसेही या धाग्याचे शीर्षकच खूपकाही सांगून जाते.

धन्या's picture

20 Sep 2014 - 1:15 am | धन्या

हेच म्हणतो.

जयंत कुलकर्णी's picture

20 Sep 2014 - 9:50 pm | जयंत कुलकर्णी

घडून गेलेल्या घटनांना इतिहास म्हणतात. त्यातून काय बोध घ्यायचा हे ज्याचे त्याने शोधायचे असते. बर्^याच वेळा हे असे घडू नये यासाठीही तपशिलात जाऊन लिखाण करावे लागते. पण जाऊदेत.......क्रौर्याबद्दल कोणाला आकर्षण असेल असे मला वाटत नाही....आता मला पटले की चांगल्या भावनेने काहीही लिहा, तुम्हाला त्यात वाकड्यातच शिरायची भारी हौस आहे....त्यात तुम्हाला खरा आनंद मिळतो हे स्पष्ट आहे...

हा प्रतिसाद शेवटचा........

होकाका's picture

20 Sep 2014 - 10:03 pm | होकाका

तुम्हाला त्यात वाकड्यातच शिरायची भारी हौस आहे

आशेच म्हण्तो.

ईर्षातुराणाम् न भयम् न लज्जा

भिंगरी's picture

20 Sep 2014 - 9:15 am | भिंगरी

,,,,,,,,,,,,हवा येऊ द्या.